Ganapati Visarjan: पुण्यातील मानाच्या चौथ्या तुळशी बाग गणपतीला निरोप...

Ganapati Visarjan: पुण्यातील मानाच्या चौथ्या तुळशी बाग गणपतीला निरोप...

हळू हळू पुण्यातील गणपतींना निरोप देण्यात येत आहे. पुण्यातील मानाचे गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार गणपती बाप्पांच विसर्जन आता झालेलं आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

हळू हळू पुण्यातील गणपतींना निरोप देण्यात येत आहे. पुण्यातील मानाचे गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार गणपती बाप्पांच विसर्जन आता झालेलं आहे. गुलाल उधळत तसेच पालखीत बसवून पुण्यातील मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तसेच पुण्यातील पारंपारिक पद्धतीनुसार पुण्यातील मानाच्या चार ही गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. तर बाप्पाला भाविकांकडून भावूक होऊन निरोप देण्यात आला आहे. पुण्याचा चौथा मानाचा तुळशी बाग गणपतीच.

7 वाजून 12 मिनिटांनी विसर्जन करण्यात आल आहे. पर्यावरण पूरक पद्धतीने कृत्रिम हौदात या वर्षी देखील तुळशी बाग गणपतीच विसर्जन करण्यात आल आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात पुणेकर भाविकांनी आपल्या लाडक्या तुळशी बाग गणपतीला निरोप दिला आहे. ज्याप्रकारे आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत भावभक्तीने आगमन करून मंडपात आणि घराघरात बसवण्यात आलं होत त्या बाप्पाला अखेर निरोप देण्यात आला आहे. बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भावूक होऊन निरोप देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com