गणेशोत्सव 2024
Mumbaicha Raja 2024: गणेशगल्ली मुंबईचा राजा प्रथम दर्शन सोहळा; पाहा फोटो...
मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्ली अर्थातच मुंबईच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा पार पडला.
मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्ली अर्थातच मुंबईच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा पार पडला. गणेश गल्लीच्या मंडळाचं यंदाचं हे 97वं वर्ष आहे. त्यामुळे बाप्पाच्या पाहुणचारासाठी आता संपूर्ण मुंबईनगरी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. गणपती आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात माहित आहे.
दरम्यान गणेश भक्तांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मानाच्या या पहिल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी बरीच गर्दी केली होती. तर यावेळी मंडळाच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, हॉस्पिटल इमर्जन्सी, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सोयी सुविधा याठिकाणी उपलब्ध केल्या आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्याआधी मुंबईच्या राजाची पहिली झलक ही गणेश भक्तांना पाहायला मिळाली.