गणेशोत्सव 2024
गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज; बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी
गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर आला आहे.
अमोल धर्माधिकारी,पुणे
गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर आला आहे. अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सगळीकडे बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण बाप्पाची आतुरतेनं वाट बघत आहेत.
गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. मोठ्या मोठ्या गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. बाप्पाचं स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज झालेले आहेत. खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.
सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहेत. बाजारपेठ ग्राहकांनी फुलली असून सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. पुण्यातील बाजारपेठा अक्षरशः फुलून गेलेल्या आहेत.