Navratri 2024: जाणून घ्या नवरात्रीमध्ये लावण्यात येणाऱ्या अखंड ज्योतिमागे काय आहे कारण...
नुकतेच गणेशोत्सव होऊन गेला, गणेशोत्सव झाला आणि सुरुवात झाली ती पितृपक्षाला पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशीनंतर लगेच येते ती नवरात्री. नवरात्रीची पुजा ही मोठ्या भक्तीमय आणि भावपूर्ण वातावरणात पार पाडली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस हे फार उत्साहाचे असतात. नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीचा मोठ्या मनोभावे स्त्री आणि पुरुषांकडून उपवास केला जातो. या उपवासात स्त्री असो किंवा पुरुष हे काही न खाता पीता निर्जळी उपवास करतात. तसेच या उपवासाच्या वेळेस अनवानी ज्याठिकाणी जायचे असेल त्याठिकाणी जाताना पाहायला मिळतात. नवरात्रीच्या दिवसांमध्ये स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी देवीच्या दरबारासमोर मोठ्या संख्येने गरबा खेळला जातो. तसेच नवरात्रीचे नऊ दिवस त्या त्या दिवसांप्रमाणे विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केले जातात.
अशातच आणखी एक गोष्ट केली जाते ती म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या पुढ्यात एक अखंड ज्योत पेटवली जाते. ही अखंड ज्योत नवरात्रीचे नऊ दिवस अखंड पेटती ठेवली जाते तसेच ही ज्योत विझु नये यासाठी काळजी घेतली जाते. अखंड ज्योति म्हणजे, अखंड या शब्दाचा अर्थ आहे जो जो नेहमी टिकून राहतो असा आणि ज्योति म्हणजे जी शुभ कार्यात देवा समोर लावली जाणीरी ज्योत ज्यामुळे सर्वत्र सकारात्मक प्रकाश पसरतो. असा या दोन शब्दांचा अर्थ असणारी अखंड ज्योत नवरात्रीत देवीपुढे लावली जाते. नवरात्रीत अखंड ज्योत लावणे फार महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की, नवरात्रीत अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विझणे म्हणजे अशुभ मानले जाते.
पौराणिक मान्यतेनुसार अशी मान्यता आहे की, नवरात्री येण्याआधी पितृपक्षाचा कालावधी चालू असतो ज्यामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी आपल्या आजूबाजूला वावर करत असतात. त्यांना आपल्यापासून दूर करण्यासाठी तसेच दैवीशक्तीचा जागर करण्यासाठी ही अखंड ज्योत नवरात्रीचे नऊ दिवस अखंड पेटती ठेवली जाते. यामुळे आपल्या आपल्या आजूबाजूला जो नकारात्मक अंधक्कार असतो तो या अखंड ज्योतिच्या प्रकाशाने नाहीसा होतो आणि आपल्या आजूबाजूला सकारात्मकता वावरू लागते. तसेच आपल्या घरात आणि प्रत्येक ठिकाणी सुख, समृद्धी आणि आनंदमयी तसेच प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होते. देवीसमोर लावलेल्या अखंड ज्योतिप्रमाणेच प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मकतेचा तसेच सुख-समृद्धीचा प्रकाश अखंड तेवत राहूदेत यासाठी ही अखंड ज्योति लावली जाते असा यामगचा उद्देश आहे.