नवरात्री 2024
Navratri 2024 Mumbai Dadar Market : नवरात्रीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; दादरचं मार्केट खरेदीसाठी प्रसिद्ध
दादरचं मार्केट हे खरेदीसाठी मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मार्केट आहे. नवरात्रीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
दादरचं मार्केट हे खरेदीसाठी मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मार्केट आहे. नवरात्रीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. तर नवरात्रीसाठी लागणाऱ्या कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. नवरात्री उत्सवात महिला याठिकाणी खरेदीसाठी आलेल्या पाहायला मिळत आहेत.
नवरात्रीमध्ये नऊ रंगांचे वेगवेगळे कपडे, साड्या, ड्रेस यासर्व गोष्टी घेण्यासाठी महिलांची गर्दी याठिकाणी झाल्याची पाहायला मिळत आहे. तसेच देवीसाठी लागणाऱ्या वस्तू देखील याठिकाणी मिळत असल्याचं बाजारात पाहायला मिळत आहे. देवीच्या घटस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे.