Navratri 2024: नवरात्रीदरम्यान जवसाचे धान्य पेरण्या मागे काय आहे कारण; जाणून घ्या...
नवरात्री अवघ्या काही दिवांवर येऊन ठेपली आहे. गणपतीनंतर आनंदाचा उत्साहाचा आणि मौजमस्ती करण्याचा सण म्हणजे नवरात्री नवरात्री दरम्यान आपण देवीची 9 ची दिवस मनोभावे सेवा करतो. तर या दिवसात 9 दिवस गरबा दांडीया आणि इतर खेळ खेळले जातात. तसेच 9 दिवस नऊ रंगांचे वेगवेगळे कपडे सुद्धा परिधान केले जातात. तसेच नवरात्रीत आपण अनेक अशा गोष्टी पाहतो. नऊ दिवस वेगवेगळे रंग परिधान करण्यामागे देखील प्रत्येक रंगाची अशी एक कथा आहे.
तसेच त्या प्रत्येक रंगात देवीचे वेगवेगळे रुप दडलेली आहेत तसेच त्या रुपांची एक कथा देखील आहे. तसेच नवरात्रीमध्ये तुम्ही देवीच्या बाजूला एक लागवड लावलेली पाहिली असेल ही लागवड नेमकी कशासाठी लावली जाते यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का? ही लागवड नेमकी कशाची लावले जाते आणि ती पुर्ण नऊ दिवस देवीच्या बाजूला का ठेवली जाते? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
नवरात्रीदरम्यान देवीच्या बाजूला पेरली जाणारी लागवड ही जवसाची असते. असं म्हटलं जाते की, नवरात्रीदरम्यान घरात जवसाची लागवड लावल्याने घरात धान्याची भरभराट होते तसेच सुख समृद्धी नांदते. तर यामागे एक पौराणिक कथा देखील आहे. ती म्हणजे अशी की, ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती होत होती त्यावेळेस ब्रम्हदेवीने मानवाची निर्मिती करण्याआधी धान्याची निर्मिती केली त्यावेळेस देवीने सर्वात आधी जवस या धान्याची पेरणी केली आणि जवसाला ब्रम्हदेवी समान मानले जाते. त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या मुर्तीच्या बाजूला जवसाची लागवड केली जाते.