Year Ender 2024 | सरत्या वर्षातील देशातील मोठ्या राजकीय घडामोडींचा आढावा

२०२४ सालातील प्रमुख राजकीय घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळालं आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले.
Published by :

२०२४ साल हे देशासाठी महत्त्वाचं वर्ष होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपला यश मिळालं आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. यंदाच्या वर्षातील देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्याचा आढावा आपण घेणार आहोत.

  • झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कथित लँडस्केप प्रकरणी तुरुंगात टाकण्यात आलं. मात्र, जामिन मिळाल्यानंतर विरोधी पक्ष भाजपचा पराभव करून त्यांनी निवडणूक लढवली. आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.

  • नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान

  • ओडिसामध्ये नवीन पटनायक यांची २४ वर्षाची सत्ता उलथवून लावत भाजपने त्यांचा पराभव केला.

  • आंध्रप्रदेशात टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू यांची सत्ता आली. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी वायएसआरचा पराभव केला.

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देत 'आप'मधील आतिशी यांच्याकडे सत्तेच्या चाव्या सोपवल्या.

  • जम्मू-कश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचं पुनरागमन पाहायला मिळालं.

  • हरियाणामध्ये भाजपने सत्ता कायम राखली. मात्र, भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत खांदेपालट केली. मनोहरलाल खट्टर ऐवजी नायब सिंह सैनी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

  • प्रियंका गांधी वाड्रा यांनी वायनाड लोकसभा पोटनिवडणूक जिंकत पदार्पण केलं.

  • अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्षेप घेतला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com