Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी नोकरीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे
Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी नोकरीत विचारपूर्वक निर्णय घ्यावेHoroscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी नोकरीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी नोकरीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Published by :
Riddhi Vanne
Published on

मेष

विसभोळेपणा जाणवेल. एखाद्या विपरित घटनेतुन लाभ होण्याची शक्यता आहे. शासनाकडून होणारे लाभ मिळतील. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल.स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा.

वृषभ

मनोबल आत्मविश्वास वाढेल. साहसी निर्णय घ्याल. नोकरीत कामाप्रती ओढ निर्माण होईल. शासकीय योजना आमलात येतील. काही नवनविन कल्पना सूचतील. यशस्वी व्हाल. फायदेशीर दिवस राहणार आहे.

मिथुन

सुखी समाधान रहाल. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. वाहन स्थावर संपत्तीचे सौख्य लाभेल. विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल.

कर्क

मित्रमैत्रिणी अथवा वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने काही आनंदाच्या घटना घडू शकतील. जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास चांगले यश मिळणार आहे. अडकलेला पैसा मिळु शकेल.

सिंह

नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल.

कन्या

एखादया विपरित घटनेतून लाभ होणाच्या योग आहे. कुटुंबाकडून विशेष सहकार्य लाभेल. नोकरीत महत्वाची कार्य आज नक्की करा. अनुकूल यश मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील.

तुला

नोकरीत कामकाजात सुधारणा होईल. कायदेशीर बाबीकडे लक्ष दयावे लागणार आहे. ताणतणाव वाढणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबात मनमानी करू नका.

वृश्चिक

नवीन प्रकल्प कामे मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होईल. नोकरीत काम यशस्वी होतील. महिलावर्गास प्रतिकारक दिनमान आहे.

धनु

आज नवीन प्रयोग करण्यास उत्तम दिवस आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरीत जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडाल. आज कार्य वेळेवर पूर्ण होईल. प्रवासाचे योग प्रबळ आहे. प्रवासातून लाभ होणार आहे.

मकर

मन प्रसन्न प्रफुल्लीत राहिल. उर्जावान दिनमान आहे. नोकरीत महत्वाची कामे मार्गी लागतील. केलेल्या कामाचा योग्य मोबदला पदरी पडेल. स्वतःच्या मनाने निर्णय घ्यावेत. पत्नीकडून सहकार्य लाभेल लागेल.

कुंभ

जुन्या व्याधी उद्भभवण्याची शक्यता आहे. स्वःतावर नियंत्रण ठेवा. नोकरीत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. शासकीय कामकाजाचे निर्णय आज घेवू नयेत.

मीन

शारिरिक त्रास होईल. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग घडतील. व्यापारात अडचणी त्रास आणि योजनेस विलंब होण्याची शक्यता आहे. मानसिक संतुलन ठेवा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com