Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंचे आर्थिक स्त्रोत वाढेल,
Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंचे आर्थिक स्त्रोत वाढेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्यHoroscope | 'या' राशीच्या व्यक्तींंचे आर्थिक स्त्रोत वाढेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंच्या नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Published by :
Riddhi Vanne
Published on

मेष (Aries Horoscope)

रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. यश व फायदा मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. जुन्या परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल.

वृषभ (Taurus Horoscope)

नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. राहु-हर्षल-चंद्र युतीत अनपेक्षित आर्थिक लाभही संभवतो.

मिथुन (Gemini Horoscope)

शासकीय सेवेत नियमबाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस ठरेल. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भवतील .

कर्क (Cancer Horoscope)

कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. प्रगतिकारक दिवस आहे. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा.

सिंह (Leo Horoscope)

नोकरी व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण होतील. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत.

कन्या (Virgo Horoscope)

आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधक डोके वर काढतील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थाबाबत काळजी घ्यावी लागेल.

तूळ (Libra Horoscope)

व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसऱ्यावर जामीन राहू नका, अन्यथा फसवणूक आर्थिकहानी होण्याची शक्यता आहे..

वृश्चिक (Scorpio Horoscope)

नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी, समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा.

धनु (Sagittarius Horoscope)

आज संयमी भूमिका घेतली तर मोठे आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. अनावश्यक चिंतेपासून दूर राहा. देण्या-घेण्यात सावधानी बाळगा.

मकर (Capricorn Horoscope)

घरासंबंधी समस्या दूर होतील. आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत. व्यापारात साथिदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. शारिरिक कामात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा.

कुंभ (Aquarius Horoscope)

व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस ठरेल. लेखकवर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मानसन्मान मिळेल.

मीन (Pisces Horoscope)

मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com