Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना व्यवसायामध्ये नवे मार्ग सापडतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य
मेष (Aries Horoscope)
नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. अचानक लाभ होतील.
वृषभ (Taurus Horoscope)
कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमला या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल. उद्योग व्यापार तेजील राहिल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल.
मिथुन (Gemini Horoscope)
आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय, पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार-व्यवसायात तेजी राहिल.
कर्क (Cancer Horoscope)
नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. नोकरीत विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही, याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo Horoscope)
नोकरीत कामाप्रती सजग रहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगलकार्य, धार्मिक कार्य घडतील. विद्यार्थ्याच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल.
कन्या (Virgo Horoscope)
आपल्या क्षेत्रात योग्य गुरूवर्य मंडळी भेटतील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल.
तूळ (Libra Horoscope)
नोकरदारास सलोख्याचे वातावरण अनुभवता येईल. धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. व्यापारिक प्रकरणात जवाबदारी वाढणार आहे. आपसातील वाढ समझदाराने मिटवा.भावडांशी वादविवाद टाळा.
वृश्चिक (Scorpio Horoscope)
आपल्या व वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात. नोकरीत केलेली चुकू महागात पडेल. कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. शासकीय सेवेत प्रलोभनांना बळी पडू नये. कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा. व्यापारात कर्जप्रकरणे नामंजूर होतील.
धनु (Sagittarius Horoscope)
नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल.
मकर (Capricorn Horoscope)
ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणि मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius Horoscope)
आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल.
मीन (Pisces Horoscope)
शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहिल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. चांगल्या भावनेने काम करा.