Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा दिवस काही राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि कसा असेल त्यांचा आजचा दिवस. वाचा संपूर्ण राशीभविष्य.
Published by :
Prachi Nate
Published on

मेष (Aries Horoscope)

आज केलेले संयुक्त उपक्रम अखेरीस फायदेशीर ठरतील, परंतु तुम्हाला भागीदारांकडून काही मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागेल. घरी विधी/हवन/शुभ समारंभ केले जातील. आज तुमच्या जोडीदाराचे काही नुकसान होऊ शकते. आशावादी रहा आणि उज्ज्वल बाजू पहा. तुमच्या आत्मविश्वासपूर्ण अपेक्षा तुमच्या आशा आणि इच्छा पूर्ण करण्याचे दरवाजे उघडतात.

वृषभ (Taurus Horoscope)

आज तुम्ही सहजपणे भांडवल उभारू शकता - थकीत कर्जे वसूल करू शकता - किंवा नवीन प्रकल्पांवर काम करण्यासाठी निधी मागू शकता. कुटुंबातील एखाद्या महिला सदस्याच्या आरोग्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते. प्रेम सकारात्मक भावना दाखवेल जर तुम्ही नवीन व्यवसाय भागीदारीचा विचार करत असाल तर कोणतीही वचनबद्धता करण्यापूर्वी सर्व तथ्ये हातात घेणे आवश्यक आहे.

मिथुन (Gemini Horoscope)

आज तुम्ही तुमच्या घरात आणि आजूबाजूला काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रियकराच्या भावनिक मागण्यांपुढे हार मानू नका. आज तुम्हाला ऑफिसमध्ये असे काम मिळू शकते जे तुम्ही नेहमीच करायचे होते. तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वतःसाठी वेळ काढू शकता आणि तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाऊ शकता.

कर्क (Cancer Horoscope)

आज तुम्हाला पैशांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु तुमच्या समजुती आणि शहाणपणाने तुम्ही परिस्थिती बदलू शकता आणि तुमचे नुकसान नफ्यात बदलू शकता. मोठ्या व्यवसाय करारांवर वाटाघाटी करताना तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रवास-मनोरंजन आणि सामाजिकीकरण आज तुमच्या अजेंड्यावर असेल.

सिंह (Leo Horoscope)

दिवसाची सुरुवात चांगली असू शकते, परंतु संध्याकाळी काही कारणास्तव तुम्ही तुमचे पैसे खर्च करू शकता, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. असा दिवस जेव्हा कामाचा ताण कमी असेल आणि तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्याल. नवीन प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता चांगली असेल. सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी हा दिवस यशस्वी आहे कारण त्यांना बहुप्रतिक्षित प्रसिद्धी आणि मान्यता मिळेल.

कन्या (Virgo Horoscope)

जर तुम्ही अनेक दिवसांपासून कामावर संघर्ष करत असाल तर हा दिवस खरोखरच चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमचा दिवस सर्व नातेवाईकांपासून दूर शांत ठिकाणी घालवायला आवडेल. सोशल मीडियावर तुम्हाला वैवाहिक जीवनाबद्दल विनोद ऐकायला मिळत राहतात, परंतु आज तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल आश्चर्यकारक सुंदर तथ्ये तुमच्यासमोर येतील तेव्हा तुम्ही खूप भावनिक व्हाल.

तूळ (Libra Horoscope)

तुमच्या अपेक्षेनुसार जगल्याने तुमचे स्वप्न पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत पिकनिकला जाऊन तुमचे मौल्यवान क्षण पुन्हा जगा. तुमच्या वर्चस्ववादी वृत्तीमुळे तुमच्या सहकाऱ्यांकडून टीका होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करताना, तुम्ही अनेकदा स्वतःला विश्रांती देण्यास विसरता. परंतु आज, तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल आणि एक नवीन छंद शोधू शकाल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी मिळू शकते.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

आज तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल - ज्यामुळे तुम्ही तणावग्रस्त आणि अत्यंत चिंताग्रस्त व्हाल. आज तुम्हाला पैशाचे महत्त्व समजेल आणि ते अनावश्यकपणे खर्च केल्याने तुमच्या भविष्यावर कसा नकारात्मक परिणाम होऊ शकतो हे समजेल. आज तुम्हाला घरात संवेदनशील समस्या सोडवण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव वापरण्याची आवश्यकता आहे.

धनु (Sagittarius Horoscope)

डचणी टाळण्यासाठी तुमचे बजेट काटेकोरपणे पाळा. तुमच्या प्रियजनांकडून भेटवस्तू देण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी हा दिवस शुभ आहे. मेणबत्तीच्या प्रकाशात प्रियजनांसोबत जेवण वाटून खा. महिला सहकाऱ्या तुम्हाला खूप पाठिंबा देतील आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यात मदत करतील. तुमचे कुटुंब आज तुमच्यासोबत अनेक समस्या शेअर करेल, परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या जगात व्यस्त राहाल आणि तुमच्या मोकळ्या वेळेत तुम्हाला आवडेल असे काहीतरी कराल.

मकर (Capricorn Horoscope)

तुमच्या आरोग्यासाठी ओरडू नका. दूध उद्योगाशी संबंधित असलेल्यांना आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. जोडीदार आणि मुले तुम्हाला अतिरिक्त प्रेम आणि काळजी देतील. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. कामावर तुमचे कौतुक होऊ शकते. तुमच्या मोकळ्या वेळेत तुम्हाला आवडेल असे काहीतरी कराल. वैवाहिक जीवन चांगले बनवण्यासाठी तुमचे प्रयत्न आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले रंग दाखवतील.

Terror Tahawwur Rana: 26/11हल्ल्यातील मास्टरमाईंड आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

मोठी बातमी समोर आली आहे, पाकिस्तान वंशांचा कॅनडातील व्यापारी तहव्वुर राणा जो 26/11 मुंबई दहशतवादी या हल्ल्यातील मास्टरमाईंड होता त्याला आता लवकरच भारताकडे सोपवण्यात येणार आहे. त्याला भारतात आणण्यासाठी कायद्यासोबतच राजकीय संबंधांचा वापर करण्यात येत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकन न्यायालयाने प्रकरणात फैसला सुनावला होता. अमेरिकन कोर्टाने राणाची याचिका फेटाळल्यानंतर त्याला मोठा झटका बसला होता. भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण संधी अंतर्गत त्याला भारताला सोपवण्यास न्यायालयाने मंजूरी दिली होती. दरम्यान राणाला लवकरच भारतात आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून भारताचं हे मोठं यश मानण्यात येत आहे.

कोण आहे तहव्वूर राणा?

तहव्वूर राणावर पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेज इंटेलिजेंस आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तयब्बाचा सक्रिय सदस्य असल्याचा आरोप आहे. मुंबईमध्ये झालेल्या 26/11 या हल्ल्यातील दोषारोपपत्रात तहव्वुर राणा याचे नाव आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड डेव्हिड कोलमॅन हेडलीला तहव्वूर राणाने 26/11 या हल्ल्यात मदत केल्याचे तपासात समोर आले होते. हल्ल्यानंतर त्याला एका वर्षाच्या कालावधीत FBI ने शिकागो येथून अटक केलं होत.

Gen Beta: gen z नव्हे आता 'जनरेशन बीटा'! नव्या वर्षात जन्माला येणाऱ्या पिढीला नवी ओळख....

सोशल मीडियावर सध्या Gen Z हा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

प्रत्येक जनरेशननुसार त्या-त्या कालावधीत जन्मलेल्या पिढीला ठरावीक नाव आणि ओळख मिळाली आहे.

1996-2010 या पिढीला Gen Z म्हणून ओळखलं जात.

तसेच 2010-2024 या पिढीला जेन अल्फा म्हणून ओळख जात.

त्याचसोबत नव्या वर्षात जन्माला येणाऱ्या पिढीला 'जनरेशन बीटा' ही नवी ओळख

१९९६-२०१० हा जेन झेड म्हणून ओळखला गेला, २०१० ते २०२४ ला जेन अल्फा म्हणून ओळख मिळाली. तर आता नव्या वर्षांत म्हणजेच २०२५ मध्ये जन्माला येणारी मुलं जेन बीटा म्हणून ओळखली जाणार आहेत. मनी कंट्रोलने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

जनरेशन बीटा हे जनरेशन अल्फाला फॉलो करणार आहे. त्यामुळे पहिल्या पिढीला सुचित करण्यासाठी नव्या पिढीला जेन बीटा नाव देण्यात आलंय. ही पिढी पूर्णपणे भिन्न जगाने आकार घेईल. जनरेशन बीटा हा आपल्या विकसित होत असलेल्या जगाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे.

२०२४ च्या सुरुवातीपासून जगरताल आर्टिफिशिअल इंन्टेलिजन्सचा वापर सुरू झाला. जेन बीटा या नव्या यंत्रणेचा सर्रास वापर करताना दिसणार आहे. तसंच, स्मार्ट उपकरणांचाही यांच्याकडून अधिक वापर केला जाईल.

सोशल मीडिया या जनरेशनसाठी त्यांची भूमिका विकसित करण्याचं माध्यम ठरणार आहे.

आपत्कालीन स्थितीत शाळा बंद राहणं, सामाजिक अंतर ठेवणं अशा गोष्टींपासून ही पिढी लांब राहिल. याच्या आधीच्या पिढीने करोनोमुळे ही सामाजिक स्थिती अनुभवली आहे.

लोकसंख्याशास्त्रज्ञ आणि भविष्यवादी मार्क मॅकक्रिंडल यांनी त्यांच्या जनरेशन बीटा ब्लॉगमध्ये लिहिलंय की, महत्त्वाच्या सामाजिक आव्हानांशी झुंजत या जगाला वारसा मिळणार आहे. पर्यावरणीय आव्हानांमुळे त्यांच्या सुरुवातीच्या जीवनात सामाजिक मुल्यांना आकार देतील.

संशोधक जॅसन डोर्सी म्हणाले, आम्ही लहानपणी जेन मिलिनिअल्सबद्दल बोलत होतो. पण जनरेशन बीटा जनरशन अल्फापेक्षाही वेगळ्या पद्धतीने सुरू करेल. तसंच, या पिढीतील अनेकजण २२ वं शतकही पाहतील.

Pandharpur: पवार कुटुंब एकत्र येणार? आशा पवारांच्या साकड्यावर राजकीय प्रतिक्रिया

https://www.lokshahi.com/video/pandharpur-political-reaction-on-pawar-family-reunion-issue

नववर्षाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. नववर्षात पवार कुटुंब यावं यासाठी आशा पवार यांनी विठुरायाला साकडं घातलं आहे. घरातील सगळे वाद संपू दे,वर्षभरात शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत यासाठी आशा पवारांनी पंढरपुरात विठुरायाला साकडं घातलं आहे. यादरम्यान आशा पवार यांनी पंढरपुरात विठ्ठला घातलेलं साकडं खर होणार का? तसेच पवार कुटुंब एकत्र येणार का? या प्रश्नावर राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत.

याचपार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बद्दलचा निर्णय या दोघांनीच घ्यायचा आहे. त्यांच्या कोणत्याच निर्णयावर भाजपकडून कोणत्याच प्रकारचा नाही असा करार नाही आहे. त्या पक्षाने निर्णय घ्यायचा आहे त्यांच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये कोणीही बोलण योग्य नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

तसेच अमोल मिटकरी म्हणाले की, आशा पवार अजित पवार यांच्या आई आहेत आणि त्या पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी गेल्या दरम्यान त्या जे काही बोल्या ते त्यांनी पत्रकाराला दिलेली प्रतिक्रिया होती.. त्या घरातील ज्येष्ठ्य आहेत आणि घरातील वरिष्ठ्यांना असं वाटत की आपलं कुटुंब एकत्र यावं. मात्र, एकत्र येणं हे एका बाजूने होतं नाही तर त्यासाठी दोन्ही बाजूकडून होणं महत्त्वाचं असतं, आता त्यांचा तो प्रश्न त्या कुटुंबातील वरिष्ठ आणि पक्षनेते ठरवतील त्यांना काय करायचं असं म्हणत अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange On Devendra Fadnavis: ...तर फडणवीसांना राज्यात फिरु देणार नाही, जरांगेंचा इशारा

आरक्षण मिळणार नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यामध्ये फिरू देणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी फडणवीसांना केलेला आहे. 25 जानेवारीपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु करणार असल्याचं आधीच मनोज जरांगेंनी सांगितलेल आहे. अंतरवाली सराटी येथे जरांगे आमरण उपोषण करणार आहेत. मला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाजाने यावं, असं आवाहन जरांगेंनी नांदेडच्या लोहा याठीकाणी केल आहे, त्याचवेळी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Raj Thackeray: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या, राज ठाकरेंचा इशारा

https://www.lokshahi.com/news/raj-thackeray-elections-to-local-bodies-stalled-raj-thackeray-warns

2024 मध्ये कोरोनाच्या संकटामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. तसेच त्याचसोबत लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका देखील पार पडल्या त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असा प्रश्न उपस्थित झाला. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये गेल्या २५ वर्षांत झालेले बदल, मनसेची स्थापना आणि प्रवास, जनतेच्या कायम राहिलेल्या समस्या, निवडणुकीतील पक्षाचं अपयश, मराठी भाषिकांच्या अडचणी, महिलांवरील अत्याचार, निवडणुकांसाठी नसून लोकांसाठी काम करण्याचं पक्षाला आवाहन अशा अनेक बाबींचा समावेश केला आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये खासगी विमान कोसळले, 2 ठार 18 जखमी; हे एका फर्निचर उत्पादन इमारतीच्या छताला धडकले अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एक छोटे विमान इमारतीच्या छताला धडकले आणि कोसळले. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,

तर 8 जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले आहेत.

Harbour Railway: हार्बरवरील लोकलची वाहतूक विस्कळीत, वाहतूक सुरळीत करण्याचे रेल्वेचे प्रयत्न सुरु

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. हार्बरवरील लोकल उशिराने जात आहे. ठाण्यावरून तुर्भे किंवा कोपरखैराला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. ट्रान्स हार्बर ची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तुर्भे आणि कोपरखैराने स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.

Chandrashekhar Bawankule:'देशातील प्रमुख राज्यांच्या धोरणाचा अभ्यास केला जाणार'

https://www.lokshahi.com/video/chandrashekhar-bawankule-the-policy-of-major-states-of-the-country-will-be-studied

राज्यामध्ये नवं वाळू धोरण तयार केले जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. देशाच्या प्रमुख राज्याचा अभ्यास केला जाणार असं देखील बावनकुळे यांनी म्हटलं आहे. येत्या 15 दिवसांमध्ये नव्या धोरणांचा मसुदा तयार केला जाणार असून वाळू माफियांना चाप लावण्यासाठी आता काही निर्णय घेतले जाणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

याचपार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दगडखानीतून येणारी वाळू जी क्रश चार्ड आहे ती किती वापरायची तसेच नदीतील वाळू किती वापरायची यातून आपल्याला जे सरकारचं बांधकाम आहे ते कसे पुर्ण होती. तसेच घरकुलांना गरीब माणसांना रेती कशी मिळेल याकरता एक विस्तृत धोरण आम्ही याठिकाणी लवकरचं 15-20 दिवसांमध्ये आणतो आहे. दरम्यान यामध्ये संपुर्ण देशाच्या संपुर्ण राज्याचा सुद्धा वाळू धोरण मागवलेलं आहे. जनतेच्या देखील काही एक्सपर्ट लोकांच्या ज्या सुचना असतील त्या देखील आम्ही स्वीकारू आणि या राज्याला चांगल आणि कधीही बदलाव लागणार नाही असं वाळू धोरण आम्ही देणार आहोत.

Rohit Sharma Sydney Match:अत्यंत चुकीचा निर्णय! सिडनी कसोटीतून रोहित शर्माला वगळ्यानं सिद्धू पाजी संतापले, म्हणाले...

https://www.lokshahi.com/sports/cricket/rohit-sharma-sydney-match-sidhu-paji-angry-over-rohit-sharmas-exclusion-from-sydney-test-says

गेल्या काही काळापासून रोहित शर्माचा फॉर्म फारच खराब राहिला आहे तर त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने मागील ४ कसोटी सामने गमावले आहेत. ज्यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघ 1-2 ने पिछाडीवर असून सिडनी कसोटी मालिकेमध्ये बरोबरी करण्यासाठी भारतीय संघाला अखेरची संधी आहे. सध्या भारतीय संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळत नाही यासाठी क्रिकेटप्रेमींकडून कर्णधार रोहित शर्माला जबाबदार ठरवलं जात आहे. दरम्यान आता सिडनी कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमधून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला वगळण्यात आलं असून त्याच्या जागी आता भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला कर्णधार पद देण्यात आलं आहे.

सिडनी कसोटीमधून कर्णधार रोहित शर्मा बाहेर

भारतीय संघाच्या यादीत एकूण 16 नावे होती ज्यामध्ये रोहित शर्मा केवळ प्लेइंग इलेव्हनमधूनच नाही तर संघाबाहेरही होत आहे असं दिसून येत आहे. या यादीमध्ये संघात समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंची नावे आहेत तसेच प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, अभिमन्यू इश्वरन, सर्फराज खान आणि हर्षित राणा यांची नावे या यादीत होती. मात्र यात रोहितचे नाव नव्हते. दरम्यान माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी सिडनी कसोटीतून रोहित शर्माला वगळल्यानं संताप व्यक्त केला आहे. एक महान खेळाडू ज्याने आतापर्यंत भारतीय क्रिकेट टीमला अडीअडचणींमधून अनेकदा बाहेर काढलं आहे, एक कर्णधार म्हणून लहान खेळाडूंना वडिलधाऱ्यांसारख काय चांगल काय वाईट याबद्दल शिकवलं आहे, अशा इज्जदार माणसाबाबद अत्यंत चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, असं म्हणत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Maharashtrachi Hasya Jatra Fame Actress: कपाळावर चिरी अन् 'साऊ पेटती' म्हणतं महाराष्ट्राची हास्यजत्राच्या अभिनेत्रींकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

https://www.lokshahi.com/entertainment/a-tribute-to-savitribai-phule-from-the-hasya-jatra-actresses-of-maharashtra

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला बालिका दिन किंवा महिलामुक्ती दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. देशभरात 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील स्त्री कलाकार ईशा डे, चेतना भट, नम्रता संभेराव, शिवाली परब, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात या सहा जणींनी सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं आहे. त्यांनी 'साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल' ही कविता सुरुवातीला गायली आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस

तुझ्याकडं गाडी बंगला असो / नसो..

तुझ्याकडं पैसाअडका असो / नसो..

तुझ्याकडं भारीतले कपडे मोबाईल असो / नसो..

तुझं लग्नं झालेलं असो / नसो..

पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस - आजन्म राहो..

ही चिरी कुणाच्या नावाची नाही..

ही तुझी आहे..

तुला आत्मसन्मान शिकवणारी..

सुरुवातीला रसिका वेंगुर्लेकर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत म्हणाली की, 'नमस्कार, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा. आम्ही सगळ्याजणी आज सावित्री उत्सव साजरा करत आहोत. कारण, ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो.'

पुढे ईशा डे म्हणाली की, 'गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात आहे. तुम्ही, आम्ही आणि भारतातील सगळ्या मुली आज मोकळेपणाने शिक्षण घेऊ शकत आहेत…याशिवाय शिक्षण पूर्ण झाल्यावर हव्या त्या क्षेत्रात काम करु शकतात…हे ज्यांच्यामुळे शक्य झालंय त्यांच्या जन्मदिवशी उत्सव साजरा झालाच पाहिजे.'

त्याचसोबत पुढे वनिता खरात म्हणाली की, 'हा स्त्री जागर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. कारण, प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाची, स्त्रियांच्या हक्कासाठी, त्यांच्या सन्मासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी मोठा लढा दिला आहे.'

यानंतर चेतना भट म्हणाली की, 'त्यांच्या या सगळ्या कार्याची आठवण आपण उराशी कायम जपून ठेवली पाहिजे.'

पुढे नम्रता संभेराव म्हणाली, 'म्हणून प्रत्येकाने आपआपल्या उंबऱ्याबाहेर ज्ञानाची एक पणती लावली पाहिजे.'

पुढे शिवाली परब म्हणाली, 'आम्ही सगळ्यांनी आमच्या कपाळावर जी चिरी लावलीये ती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आशीर्वाद आहे.'

Pune Muralidhar Mohol: पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीला जपत, साहित्य संमेलनाचे आयोजन

https://www.lokshahi.com/news/preserving-the-cultural-identity-of-pune-organizing-a-sahitya-samelan

पुण्याने देशामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुणे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि साहित्याची भूमी समजले जाते, तसेच विचारांची-इतिहासाची वारसा असलेली ही भूमी आहे. संमेलनाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळताना मी कुणी साहित्यिक अथवा अभ्यासक या भूमिकेतून कार्य करणार नसून मी एक कार्यकर्ता या भूमिकेतून जबाबदारीच्या जाणीवेने, आत्मियता जपत पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन, अशी ग्वाही केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. शिवाय ‘१०० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पुण्यात व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पुण्यातील संपर्क कार्यालय साहित्य परिषदेत सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. संमेलनाच्या सरकार्यवाहपदी नेमणूक केल्याबद्दलचे पत्र मंत्री मोहोळ यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, सरहद पुणेचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. सतिश देसाई, शैलेश पगारिया, सचिन ईटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. पुणे शहरातील सांस्कृतिक घडामोडींचे नियमित वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा, साहित्य सेवकांचा सत्कार या प्रसंगी मंत्री मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ असे सन्मानाचे स्वरूप होते.

साहित्य क्षेत्रातील वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या कार्याचा गौरव करून मंत्री मोहोळ पुढे म्हणाले, दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे महत्त्व मोठे असून प्रत्येकाच्या मनात असलेली कार्यकर्त्याची भूमिका माझ्याही मनात आहे. यातूनच आत्मविश्वासपूर्णतेने साहित्य संमेलनाच्या यशस्वीततेसाठी मी बांधील आहे. पुण्याचा प्रतिनिधी आणि पुण्याविषयी आदरभाव जपत प्रामाणिकपणे चांगले काम करून माझ्या शहराचे नाव जपेन.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संमेलन हा भाषिक उत्सव, भाषेची जत्र असते. हा उत्सव अधिक देखणा करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात आदरभाव असून त्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. दिल्ली येथे होणारे साहित्य संमेलन प्रयोगशीलता आणि नाविन्यतेचा वापर करून संयोजक संजय नहार आणि त्यांचे सहकारी अधिक देखणे करतील.

प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे असे व्यासपीठ आहे जेथे महाराष्ट्राची व्यापक भूमिका मांडली जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर दिल्लीत होणारे हे पहिले संमेलन आहे. दिल्लीत संमेलन आयोजित करण्याची संधी सरहद पुणेला मिळाली आहे, याचा आनंद आहे. दिल्लीत होणाऱ्या संमेलनामागे मराठी माणूस एक होत आहे ही संकल्पना जपली जात आहे.

CM Mamata Banerjee: बंगालला अस्थिर करण्यामागे केंद्र सरकारचा कट ममता बॅनर्जींचे आरोप, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

https://www.lokshahi.com/news/cm-mamata-banerjee-central-govt-conspiracy-to-destabilize-bengal-politicsmamata-banerjee-allegations-whats-the-matter-find-out

बंगालला अस्थिर करण्यामागे केंद्र सरकारची ब्लू प्रिंट असल्याचे मला जाणवत आहे, असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. ज्यामुळे राजकीयवर्तूळात खळबळ माजली आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगालला अस्थिर करण्याचा कट रचला असून या कटाचा भाग म्हणून सीमा सुरक्षा दलाकडून म्हणजेच बीएसएफ कडून बांगलादेशी घुसखोरांना राज्यात घुसखोरी करण्यासाठी मदत केली जात आहे, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच पुढे त्या म्हणाल्या इस्लामपूर, सिताई, छोपरा आणि इतर सीमावर्ती भागांमधून बांगलादेशी घुसखोरांना बीएसएफकडून घुसखोरी करण्यासाठी मोकळीक दिली जात आहे, अशी माहिती ममता बॅनर्जींना मिळाल्याचं त्या म्हणत आहेत. बीएसएफ लोकांचा छळ करीत आहे आणि राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप देखील ममता बॅनर्जींनी केला आहे. ज्यामुळे सीमा सुरक्षा दलावर आरोप करणाऱ्या ममता बॅनर्जी या देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत. पुढे त्या म्हणाल्या की, शेजारी बांगलादेशाशी आपले चांगले संबंध आहेत, पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक राजीवकुमार यांना ममता बॅनर्जींनी आदेश दिला आहे की, सीमेच्या दोन्ही बाजूंना शांतता राहावी यासाठी घुसखोरांचा ठावठिकाणा शोधून काढा.

तसेच ममता बॅनर्जींच्या या आरोपावर सीमा सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिलं आहे, अशा कुठल्याही कृत्यात बीएसएफ सहभागी नाही असं म्हणत ममता बॅनर्जींचे आरोप सीमा सुरक्षा दलाने फेटाळले आहेत.

IND vs AUS: '100 टक्के' झेल! सिडनी कसोटीत विराट कोहलीचा वादग्रस्त झेल सुटला, स्मिथ म्हणला...

https://www.lokshahi.com/sports/cricket/ind-vs-aus-100-percent-catch-virat-kohlis-controversial-catch-in-sydney-test-smith-says

सिडनी येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहलीला जीवनदान मिळाले. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा पहिल्याच चेंडूवर त्याच्याविरुद्ध झेलचे आवाहन करण्यात आले. हा झेल वादग्रस्त ठरला होता. झालं असं की, आठव्या षटकात, बोलंडने ऑफ-स्टंपभोवतीचा एक लांबीचा चेंडू कोहलीला दिला, ज्याने त्याची धार स्मिथकडे दिली. स्मिथने झेल घेण्याच्या प्रयत्नात पुढे झेप घेतली पण त्यानंतर चेंडू मार्नस लॅबुशेनच्या दिशेने वळवला. कोहलीला सुरुवातीला नॉट आउट देण्यात आले आणि ऑस्ट्रेलियन लोकांनी डीआरएससाठी जाण्याचा निर्णय घेतला. तिसरे पंच जोएल विल्सन यांना मात्र चेंडू लॅबुशेनच्या दिशेने जाण्याआधी जमिनीवर पडल्याचे वाटले आणि त्यामुळे विराट कोहलीला नाबाद देण्यात आले. मात्र स्टीव्ह स्मिथचा विश्वास आहे की त्याने क्लीन कॅच घेतला याचपार्श्वभूमीवर स्मिथने आपलं वक्तव्य मांडले आहे.

स्टीव्ह स्मिथ म्हणाला आहे की, त्याने क्लीन कॅच घेतल्याचे त्याला जाणवले. पहिल्या दिवशी लंच ब्रेकमध्ये फॉक्स स्पोर्ट्सला सांगितले की, त्याची बोटे 100 % बॉलच्या खाली होती. पण अंपायरने निर्णय घेतला आहे. आम्ही पुढे जाऊ, तुम्ही पाहू शकता की तो बॉल वर फ्लिक करत आहे, त्याने जे केले ते उत्कृष्ट होते,” त्याने 7 क्रिकेटला सांगितले. पुढे कोहली मात्र अखेरीस 17 धावांवर स्कॉट बोलंडने बाद केला, ज्याने 32 व्या षटकात बाहेरच्या चेंडूवर गोलंदाजी केली. कोहलीला तिसऱ्या स्लिपमध्ये नवोदित ब्यू वेबस्टरने झेलबाद केले.

Beed Valmiki Karad: वाल्मिक कराडला कोर्टाचा धक्का! विनंती अर्ज फेटाळला

https://www.lokshahi.com/news/beed-walmik-karad-court-shock-to-valmik-karad-request-application-rejected

बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. यादरम्यान राजकीयवर्तुळात खळबळ माजली होती. वाल्मिक कराड याला दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. केज सत्र न्यायालयात वाल्मिक कराडकडून उपचारबाबत विनंती अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली. आपल्याला स्लीप अ‍ॅप्नीया नावाचा आजार असल्याचा दावा वाल्मिक कराडने अर्जात केला आहे. मात्र केज न्यायालयात केलेला हा विनंती अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला कोर्टाचा मोठा धक्का बसला आहे.

खंडणी प्रकरणात सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मीक कराड याने केज न्यायालयात विनंती अर्ज केला होता. या अर्जात खाजगी मदतनीसची मागणी केली गेली होती. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. सदरील अर्ज फेटाळला असला तरी शासकीय सुविधा माञ कराडला मिळणार आहेत. वाल्मीक कराड याला स्लीप एपनिया हा आजार आहे. आणि यासाठी मशीन हाताळण्यासाठी त्याने मदतनीसाची मागणी केली होती. रोहित कांबळे यांना सदर मशीन चालवण्याचा अनुभव असल्याने त्यांना त्याचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे सदरची मशीन रोहित कांबळे हेच चालू शकतात असं या अर्जात म्हटले गेले होते.

Beed Anjali Damania: अंजली दमानिया यांच्या त्या वक्तव्याने वंजारी समाज आक्रमक

https://www.lokshahi.com/news/beed-anjali-damania-anjali-damanias-statement-made-vanjari-society-aggressive

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रकरणात देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा या मागणीसाठी चर्चेत येताना दिसल्या. मात्र त्यांच्या एका वक्तव्यामुळे बी मधील वंजारी समाज त्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहे.

'एका टीव्ही चॅनलला दिलेल्या प्रतिक्रियेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजातील लोकांना पोलिसात भरती केले, शासनात भरती केले, मग हळूहळू त्यांना बीडकडे आणण्यात गेलं.. हे लोक इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार? इतर समाजाचे लोक या लोकांकडे गेल्यास त्यांना न्याय मिळणं शक्यच नाही.. त्यांना पैसे दिले जातात', असं विधान दमानिया यांनी केले होते. या वक्तव्याने वंजारी समाज आक्रमक झाला असून अंजली दमानिया यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिय्या मांडण्यात आला आहे. दमानिया यांच्या वादग्रस्त विधाने दोन समाजात विकृष्ट निर्माण होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वंजारी समाज आग्रही आहे.

इथे कलेक्ट वेगळ्या समाजाचे आहेत, एसपी वेगळ्या समाजाचे आहेत. त्यांच असं म्हणं आहे की इथं 100% वंजारी समाजाचे लोक कर्मचारी आहेत... वंजारी समाजाचे सगळे पोलीस आहेत...वंजारी समाजाने दहशत केली, वंजारी समाज सगळ करतो असं काही नाही... इथे वंजारी समाजचालाचं भयभीत करून सोडलं आहे.... या बाहेरून येणाऱ्या लोकांनी त्यांनी येऊन आमच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही ग्रामीण पोलिस स्टेशनला येऊन त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी प्रतिक्रिया वंजारी समाजाने दिली आहे.

Vaibhav Naik over Rajan Salvi: राजन साळवी-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर वैभव नाईक यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

https://www.lokshahi.com/news/vaibhav-naik-on-rajan-salvi-vaibhav-naiks-reaction-on-rajan-salvi-uddhav-thackeray-meeting-said

राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असताना, राजन साळवी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ असल्याचे राजन साळवी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मतदारसंघातील कामाबद्दल भेटीत चर्चा केली तसेच कार्यकर्त्यांच्या भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याचपार्श्वभूमीवर वैभव नाईक म्हणाले आहेत की, राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. मागील १५ वर्षे साळवी हे शिवसेनेचे आमदार म्हणून काम करीत होते. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अडीच वर्षे काम केले आहे. मला खात्री आहे की, राजन साळवी हे शिवसेना सोडणार नाहीत. पक्षाच्या अडचणीवेळी ते पक्षाच्या सोबत राहतील. त्यांच्या विरोधात जर वरिष्ठांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी काम केले असेल तर राजन साळवी यांनी उद्भव ठाकरे यांना सांगितले पाहिजे. निश्चितपणे उद्धव ठाकरे हे ज्यांनी राजन साळवी यांच्या विरोधात काम केले, त्यांच्यावर कारवाई करतील. राजन साळवी यांना निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जनसामान्यात जी किंमत आहे, ती इतर कुठे मिळणार नाही. तसेच मला आणि राजन साळवी यांना शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीनंतर ऑफर आल्या होत्या. परंतु, आम्ही लोकांबरोबर राहिलो, निष्ठावंत म्हणून राहिलो. आज अनेक अडचणी आमच्यासमोर असल्या तरी आम्ही लोकांसोबत राहिलो आहोत.

Pimpri-Chinchwad:पिझ्झा खात असाल तर सावधान! पिझ्झामध्ये आढळला चाकूचा तुटलेला तुकडा

https://www.lokshahi.com/news/pimpri-chinchwad-be-careful-if-you-eat-pizza-a-broken-piece-of-a-knife-found-in-a-pizza

तुम्ही सुद्धा पिझ्झा खात असाल तर आता लगेच सावध व्हा, कारण पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचां तुटलेला तुकडा आढळून आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये डॉमिनोज पिझ्झात चाकूचां तुटलेला तुकडा आढळून आला आहे. इंद्रायणी नगर मध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांसाठी काल रात्री 596 रुपयांचा पिझ्झाची ऑनलाइन ऑर्डर केली होती. पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना, अरुण कापसे यांच्या दातात अचानक पिझ्झा कट करणाऱ्या चाकूच तुटलेला तुकडा घुसला होता. त्यांनी हा सर्व प्रकारडोमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला फोन करून सांगितला, आणि त्यानंतर पिझ्झाच्या मॅनेजररडून उलट सुलट उत्तर आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र घडलेल्या सर्व प्रकारानंतर डॉमिनोज पिझ्झाकडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डर चे पैसे लगेच परत करण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी, खेळ खेळणाऱ्या डॉमिनोज पिझ्झा विरोधात अरुण कापसे हे आज पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत. अरुण कापसे यांच्यासोबत घडलेला हा प्रकार अतिशय धक्कादायक असल्याने त्यांनी सांगितले.

Rajan Salvi: ठाकरे गटाच्या राजन साळवी यांचा निर्णय काय? उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दिली महत्त्वाची माहिती

https://www.lokshahi.com/news/rajan-salvi-important-information-given-after-rajan-salvi-meeting-uddhav-thackeray

राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असताना, राजन साळवी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ असल्याचे राजन साळवी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मतदारसंघातील कामाबद्दल भेटीत चर्चा केली तसेच कार्यकर्त्यांच्या भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे राजन साळवी म्हणाले की, गेले 2 दिवस माझ्या मतदार संघातल्या राजापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली त्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यानंतर लांजा मतदार संघातल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. आज मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मतदार संघामध्ये ज्या-ज्या घटना घडत होत्या, ज्या गोष्टी मला माझ्या मतदार संघातल्यांनी सांगितल्या, त्या लोकांच्या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहचवल्या आहेत. त्यांनी त्यासर्व घटना ऐकून घेतल्या आणि त्यावर ते योग्य तो निर्णय घेतील. अशा माझ्या अपेक्षा आहेत.

2006 साली झालेला पराभव आणि 2024मध्ये झालेला आताचा पराभव यात खूप फरक आहे. घटनाक्रमाबद्दल मी नक्कीच नाराज होतो, ज्या भावना असतील ती मत मांडली असतील, मी आता उद्धव साहेबाकडे सर्व भावना मांडल्या आहेत. यावेळी संजय राऊत, मिलिंद नार्वेकर सर्व होते आणि मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे. असं म्हणतं राजन साळवी यांनी आपली जी काही नाराजी होती ती त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेटून बोलल्याचं ते म्हणाले आहेत.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छानणी होणार , आदिती तटकरे यांची माहिती

https://www.lokshahi.com/news/ladki-bahin-yojana-applications-for-ladki-bahin-yojana-will-be-scrutinized-informed-by-aditi-tatkare

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छानणी होणार असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. वर्धा, पालघर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरून तक्रारी आल्याचं कारण सांगितलं जात आहे. ही पडळताळणी तक्रारनिहाय केली जाणार असल्याचं देखील आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. यानिमित्ताने केशरी आणि पिवळ कार्ड वगळता सगळ्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पळ काढला असून लाडकी बहिण योजनेवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. १०० दिवसांच्या आराखडा बैठकीनंतर तटकरेंचा काढता पाय काढलेला दिसून येत आहे. "माध्यमांनी संभ्रम निर्माण करू नये"असं म्हणत लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी कपातीवर आदिती तटकरेंचे अजब उत्तर आलेले पाहायला मिळत आहे.

दरम्यान आदिती तटकरे म्हणाल्या की, ज्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या बाबींचा विचार करून आपण पुन्हा अर्ज पडताळणी केली जात आहे, त्यामुळे जे दोन वेळा अर्ज भरले गेले आहेत अशा तक्रारींच्या जोरावर आम्ही हे अर्ज पडताळणी करणार आहोत.

तसेच सुप्रिया सुळे म्हणाल्या की,

मी अगोदर बोलले होते काल ही बोलले आहे, हे अपेक्षित होते... आरबीआयकडून येणारा राज्याचा फिस्कल डिफेसिट रिपोर्ट मी दोन दिवसांपुर्वी दाखवला आहे... डीपीडीसीचे पैसे वळवले जात आहेत.....

Marathi youth in Mumbai: मराठी माणसाची गळचेपी थांबणार कधी? महाराष्ट्रात मराठी तरुणाला नोकरी नाकारली

https://www.lokshahi.com/news/marathi-youth-in-mumbai-when-will-the-strangulation-of-marathi-people-stop-marathi-youth-denied-job-in-maharashtra

महाराष्ट्रात सध्या मराठी माणसासोबत कोणत्या न कोणत्या गोष्टीवरून गळचेपी केली जात आहे, मग ती भाषेवरून असो किंवा एखाद्या हायक्लास सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबाची असो. नुकत्याच काही घटना समोर आल्या ज्यामध्ये कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर मुंब्रामध्ये एका मराठी भाषेत बोलणाऱ्या तरुणाला माफी मागायला लावली होती. असं सगळ होत असताना आता दक्षिण मुंबईतील एका तरुणाला तो मराठी असल्यामुळे नोकरी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतो. महाराष्ट्रातच होणारी मराठी माणसाची गळचेपी थांबायचं नाव घेत नाही.

मराठी पोर आम्हाला कामाला नको, मराठी पोर आमच्याकडे कामाला सूट होत नाहीत असं मरिन लाईन्स येथील राधेश्याम कंपनीकडून सांगण्यात येत तरुणाला नोकरी नाकारण्यात आली. मराठी मुलं आमच्याकडे कामाला येतात आणि दोन दिवसांत सोडून जातात म्हणून आम्हाला मराठी मुलं कामाला नको, असं कंपनीच्या मालकानं म्हटलं आहे. त्यानंतर त्या युवकाने लगेच घडलेल्या प्रकाराबद्दल शिवसेना दक्षिण मुंबई मध्यवर्ती कार्यालय येथे संपर्क साधताच दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे व कुलाब विभाग अधिकारी विकास अडुळकर यांनी त्या संबंधित कंपनीच्या ऑफिसला भेट देत तेथील कंपनीच्या मालकाला या घटनेबाबत जाब विचारण्यात आला तसेच मराठी मुलांना महाराष्ट्रात राहून जर नोकऱ्या देणार नसतील तर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल अशी ताकीद देण्यात आली व यापुढे मराठी तरुणांना नोकरीत प्राधान्य देऊ असे आश्वासन दिल्यावर त्यांना समज देऊन सोडण्यात आले..

IND vs AUS: ऋषभ पंतचा जलवा! पंतचं अर्धशतक अन् आक्रमक खेळीसह ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दाखवले दिवसा चांदणे

https://www.lokshahi.com/sports/cricket/ind-vs-aus-rishabh-pants-fire-pants-half-century-and-aggressive-innings

सिडनी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटीच्या थरारक खेळाचा जलवा पाहायला मिळत आहे. दोन्ही संघाकडून जोरदार खेळी खेळली जात आहे. पहिल्याच डावात भारतीय संघाकडून 185 धावा आटोपात आणल्या गेल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडून 181 धावांसह खेळी खेळली गेली. अशातच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या तुफानी फलंदाजी रिषभ पंतची आक्रमक खेळी पुन्हा एकदा पहायला मिळाली. यावेळी पंतने पहिल्या बॉलवरचं स्कॉट बोलँडला षटकार ठोकला अन् अवघ्या 29 बॉलमध्ये आपली सेंच्युरी पूर्ण केली. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतने वादळी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. रिषभ पंत फलंदाजीसाठी ज्यावेळेस क्रीझवर आला त्यावेळी भारतीय संघाने 78 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या.

रिषभ पंतची दमदार फटकेबाजी

दरम्यान या सामन्यात रिषभ पंतची कामगिरी ही 33 बॉवर 6 चौकार आणि 4 षटकारांसह 61 धावांची खेळी करणारी होती. यामुळे रिषभ पंत हा ऑस्ट्रेलियात सर्वात जलद कसोटी अर्धशतक करणारा प्रतिस्पर्धी संघाचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या जॉन ब्राउन आणि वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिक्स याच्या नावावर होता, ज्यांनी ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये 33 बॉलसह अर्धशतक केले होते. पण आता ऋषभ पंतने त्याला मागे टाकत हा रेकॉर्ड स्वत:च्या नावी केला आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक असून याआधी पंतने 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 28 बॉलसह अर्धशतक झळकावले होते. जे भारताच्या फलंदाजाने झळकावलेले सर्वात जलद अर्धशतक आहे.

IND vs AUS Sachin Tendulkar Post: 'त्याची फलंदाजी पाहणे नेहमीच मनोरंजक'! सचिन तेंडुलकरलाही पडली पंतच्या दमदार खेळीची भूरळ; म्हणाला...

https://www.lokshahi.com/sports/cricket/ind-vs-aus-sachin-tendulkar-post-sachin-tendulkar-post-for-pants-powerful-innings

सिडनी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटीत ऋषभ पंतची थरारक खेळी पाहायला मिळाली. पंतने पहिल्या बॉलवरचं स्कॉट बोलँडला षटकार ठोकला अन् अवघ्या 29 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतने वादळी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलाच चोप दिला आहे. रिषभ पंत फलंदाजीसाठी ज्यावेळेस क्रीझवर आला त्यावेळी भारतीय संघाने 78 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. तर पहिल्याच डावात भारतीय संघाकडून 185 धावा आटोपात आणल्या गेल्या आहेत. या सामन्यात रिषभ पंतची कामगिरी ही 33 बॉवर 6 चौकार आणि 4 षटकारांसह 61 धावांची खेळी करणारी होती. यामुळे रिषभ पंत हा ऑस्ट्रेलियात सर्वात जलद कसोटी अर्धशतक करणारा प्रतिस्पर्धी संघाचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्या चेंडूपासून ऑस्ट्रेलियाला खिंडार पाडले आहे. यादरम्यान क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकरला देखील ऋषभ पंतच्या या वादळी खेळीची भूरळ पडली आहे. याचपार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर ऋषभ पंतसाठी पोस्ट केली आहे.

सचिन तेंडुलकरची पोस्ट

'ज्या विकेटवर बहुतेक फलंदाजांनी 50 किंवा त्यापेक्षा कमी SR वर फलंदाजी केली असेल, तिथे ऋषभ पंत पंतची १८४ च्या स्ट्राइक रेटने केलेली खेळी खरोखरच उल्लेखनीय आहे. त्याने पहिल्याच चेंडूपासून ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणलं. त्याला फलंदाजी करताना पाहणं नेहमीच मनोरंजक असतं. किती प्रभावी खेळी!'

Sourav Ganguly Daughter: बसची धडक सदैवाने बचावली सौरव गांगुलीची लेक! जाणून घ्या...

https://www.lokshahi.com/sports/cricket/sourav-ganguly-daughter-sourav-gangulys-daughter-luckily-escaped-being-hit-by-a-bus-find-out

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या मुलीच्या कारला कोलकात्यातील डायमंड हार्बर रस्त्यावरील बेहाला चौरस्ता परिसरात बसने धडक दिल्याची घटना घडली आहे. मात्र सुदैवाने सना गांगुली हिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. सना गांगुलीने घडलेला साऱ्या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्या बरोबर घटनास्थळी धाव घेत असणाऱ्या बस ड्रायव्हरला सना गांगुलीच्या कार चालकाने त्याचा पाठलाग करत साखर बाजारजवळ त्याला पकडले आणि त्याला अटक करण्यात आली आहे.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी घटनाक्रम सांगताना सांगितले की, सना गांगुलीच्या कारला कोलकात्याहून रायचककडे जाणाऱ्या बसने अचानक धडक दिली ज्यामुळे हा अपघात घडून आला. सना गांगुली कारमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटवर बसल्यामुळे या अपघातातून ती थोडक्यात बचावली. दरम्यान गांगुली कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळाल्यानंतर, कोलकाता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी आरोपी बस चालकाला अटक केली.

Bangladeshi Arrested: मुंबईत घाटकोपर पोलिसांची मोठी कारवाई, 13 बांगलादेशींना अटक

https://www.lokshahi.com/news/bangladeshi-arrested-big-operation-by-ghatkopar-police-in-mumbai-13-bangladeshis-arrested

पोलिसांनी एका दिवसात मुंबईच्या घाटकोपर पोलिसानी आज तब्बल १३ बांगलादेशी नागरिक अटक केले आहे. हे सर्व १३ आरोपी नागरिक नालासोपाऱ्याच्या अचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते. गेल्या महिन्यात घाटकोपर पोलिसानी मोहम्मद अली शेख या बांगलादेशी आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती. या 13 जणांमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यात मिळालेल्या माहितीच्या आधारे तैबूर अजगर शेख, आलम अजगर शेख, मिजानू सलाम शेख, अब्दुल सिराज शेख,मुराद मिजानूर शेख, रत्ना तैबुर शेख,अमीना मुराद शेख,सबिना अब्दुला शेख, कोहिनूर मिजानूर शेख यांच्यासह चार अल्पवयीन मुले अश्या तेरा जणाना अटक केली आहे. हे बांगलादेशी अनधिकृतपणे भारताची सीमा ओलांडून पश्चिम बंगालमार्गने भारतात आले आहेत. त्यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी ची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांना आहे.

Cracked Heels Problem In Winter: थंडीत पायाला भेगा पडतायत? या भेगा कमी करण्यासाठी हे उपाय नक्की वाचा

https://www.lokshahi.com/ampstories/web-stories/cracked-heels-problem-in-winter-cracked-feet-in-winter-be-sure-to-read-these-solutions-to-reduce-these-cracks

थंडी पडताच पायांना भेगा पडायला सुरुवात होते.

यामुळे पायाला खाज येण पाय झोंबणे अशा समस्या उद्भवतात.

तसेच या भेगांमुळे आवडीचे फुटवेअर देखील वापरण अवघड होऊन जात.

यावर काही रामबाण उपाय आहेत.

यावेळी पायांच्या भेगांना नारळाचे तेल लावा.

तुरटी आणि लिंबू पायाला लावल्याने देखील भेगा कमी होण्यास मदत होते.

कोरफड जेल हे केसांप्रमाणेच पायांच्या भेगांसाठी देखील उपयुक्त आहे.

मध लावल्याने देखील भेगा नाहीशा होण्यास मदत होते.

SIT: एसआयटीचे प्रमुख डॉ.बसवराज तेली यांच्या कसून चौकशीनंतर मुख्य आरोपींनी सांगितला घटनाक्रम

https://www.lokshahi.com/news/sit-after-thorough-interrogation-by-sit-chief-dr-basavaraj-teli-the-main-accused-narrated-the-incident

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक धागेदोरे समोर येत आहेत या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांना देखील केज पोलिस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली आहे. यानंतर आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख डॉ.बसवराज तेली यांच्या कसून चौकशीनंतर मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे हे घटनेनंतर गुजरातला गेले. तेथे 3 तारखेपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला. परंतु पैसे संपल्याने दोघेही पुण्यात आले. एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. 26 दिवस पोलिसांना गुंगारा कसा दिला याची पोलिस तपासात झाली आहे.

धारूर तालुक्यातील वायबसे दाम्पत्याकडून आरोपींचा महत्वाचा क्ल्यू मिळाला असून सुदर्शन, सुधीर आणि नव्याने समावेश झालेल्या सिध्दार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींना केज न्यायालयातून बाहेर काढताच नेकनूर पोलिस ठाण्यात आणले. येथे एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांनी या तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली. यामध्ये नंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत प्रश्नांची भडिमार केली. त्याची उत्तरे देताना तिन्ही आरोपींना घाम फुटल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

तीन दिवसांपूर्वी त्रिकूट फुटले

सुदर्शन घुलेजवळ असलेले पैसे दोन ते तीन दिवसांपूर्वी संपले. त्यामुळे यातील कृष्णा आंधळे हा पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता. एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता; परंतु त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले, एका व्यक्तीला भेटणार होते; परंतु त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. कृष्णा फरार होणार यशस्वी झाला..

मंदिरात जेवण अन् झोप

■ देशमुख यांची हत्या केल्यानंतर घुले, आंधळे आणि सांगळे हे तिघेही आरोपी सोबतच होते. रेल्वेने ते गुजरातमध्ये गेले.

■ तेथील एका शिवमंदिरात थांबले. जवळपास १५ दिवस तेथेच राहिले. मंदिरातच जेवण आणि झोपणे अशी त्यांची दिनचर्या आतापर्यंत होती.

यू ट्यूबवर पाहिली बातमी

सुदर्शन घुलेसह तिघे जण एका रेल्वेस्थानकावर होते. एका व्यक्तीचा मोबाइल घेतला. त्यात देशमुख हत्या प्रकरणाची बातमी यू ट्यूबवर पाहिली होती. तेथूनच त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. त्यामुळे ते महाराष्ट्रात थांबले नाहीत...

Wardha Guardian Minister: वर्ध्यात पालकमंत्री पदासाठी डॉ. पंकज भोयर यांचा मार्ग मोकळा

https://www.lokshahi.com/video/wardha-guardian-minister-dr-pankaj-bhoyar-cleared-for-the-post-of-guardian-minister-in-wardha

वर्ध्याचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची वर्णी लागणार असं दिसून येत आहे. सध्या राज्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच दिसून असताना मात्र वर्ध्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच दिसून येत नाही. महायुती सरकारमध्ये जिल्ह्याच्या मंत्री तोच जिल्ह्याचा पालकमंत्री फारमुल्यामध्ये भोयर यांची वर्णी लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे. डॉ पंकज भोयर 2वर्ध्याचे आमदार आहेत महायुती सरकार मध्ये ते राज्यमंत्री आहे

Yuzvendra Chahal Divorce Rumours: चहलच्या इंस्टाग्राम स्टोरीने घटस्फोटाच्या चर्चांना दिली नवी दिशा! 'तुम्हाला तुमच्या वेदना माहीत आहेत'

https://www.lokshahi.com/sports/cricket/yuzvendra-chahal-divorce-rumors-chahal-dhanashrees-divorce-rumors-fueled-by-yuzvendras-insta-story

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि अभिनेत्री धनश्री वर्मा यांच 2020 साली लग्न झालं असून त्यांच्या लग्नाला आता जवळपास पाच वर्ष झाली असावीत. 2023 मध्ये धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ‘चहल’हे नाव काढून टाकले होते. त्यानंतर चहलने देखील ‘नवीन जीवन लोड होत आहे’ अशी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे त्यांच्या नात्याला नवी दिशा मिळाली होती. यानंतर युजवेंद्र आणि धनश्री गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. आता युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा या दोघांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन एकमेकाला अनफॉलो केलचं आहे त्याचसोबत एकमेकांसोबत असणाऱ्या पोस्ट देखील सोशल मीडियावरून डिलिट केल्या आहेत. यादरम्यान आता चहल-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना युजवेंद्रच्या इन्स्टा स्टोरीने उधाण आणलं आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर तुम्हाला तुमच्या वेदना माहीत आहेत, असं म्हणतं त्याच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहेत. एवढं सगळं सुरु असताना आता सोशल मीडियावर चहलची एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात तो मद्यधुंद असून त्याला स्वत:ची प्रकृती सावरता येत नसल्याचं दिसून येत आहे.

Player Of The Series Jasprit Bumrah: ट्रॉफी नाही! पण टीम इंडियाच्या पठ्ठ्याने पटकवला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब

https://www.lokshahi.com/sports/cricket/player-of-the-series-jasprit-bumrah-no-trophy-but-team-indias-batsman-won-the-player-of-the-series-award

सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 ची मालिकाची समाप्ती झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेवर 3-1 विजया मिळवला आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024साठी मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात भारतीय संघाला नक्कीच यश आले होते, पण चार सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दमदार खेळ दिसून आला. या मालिकेत भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने नक्कीच जीवतोड मेहनत घेतली आहे. मात्र, शेवटी भारतीय फलंदाजीबरोबरच गोलंदाजीनेही निराशा केली. शेवटच्या कसोटीसाठी कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहलाही दुखापत झाली. अशा स्थितीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही. सिडनी कसोटी हरल्यानंतर बुमराहने भारतीय संघाचा बचाव केलाया सामन्यात जसप्रीत बुमराह हा एकमेव खेळाडू आहे जो योद्धासारखा लढत राहिला आणि सामनावीर ठरला. बुमराहने या मालिकेत वादळी कामगिरी करत 32 विकेट घेतल्या, या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

याचपार्श्वभूमीवर बुमराह म्हणाला की, 'थोडी निराशा आहे पण, तुम्ही तुमच्या शरीराशी लढू शकत नाही. काहीवेळा तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यावी लागते. मला मालिकेतील सर्वोत्तम विकेटवर अधिक गोलंदाजी करायची होती पण ते पहिल्या डावात काही समस्या निर्माण झाल्या नाहीत'.

जस्प्रित बुम्हराहाने रचला इतिहास ठरला बेस्ट प्लेअर!

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील कसोटी सामन्यात बुमराहने विकेट्सचं द्विशतक पूर्ण केल आहे. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला आऊट करून ही खास कामगिरी केली. कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाला जे जमले नाही ते एका भारतीय गोलंदाजाने केल आहे. कसोटीत 20 पेक्षा कमी सरासरीने 200 बळी घेणारा बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज आहे. यावेळचा ऑस्ट्रेलिया दौरा जसप्रीत बुमराहसाठी सर्वोत्तम ठरला आहे. मेलबर्न स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या चौथ्या दिवशी बुमराहसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी लोटांगण घातलं.

IND vs AUS: टीम इंडियाचे वर्चस्व संपुष्टात! तब्बल 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाने केला टीम इंडियाचा दारुण पराभव

https://www.lokshahi.com/sports/cricket/ind-vs-aus-team-indias-dominance-ends-australia-defeats-team-india-after-10-years

सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 ची मालिकाची समाप्ती झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेवर 3-1 विजया मिळवला आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024साठी मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात भारतीय संघाला नक्कीच यश आले होते, पण चार सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दमदार खेळ दिसून आला. या मालिकेत भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने नक्कीच जीवतोड मेहनत घेतली आहे. मात्र, शेवटी भारतीय फलंदाजीबरोबरच गोलंदाजीनेही निराशा केली. ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवलाच तसेच तब्बल दहा वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. याचसोबत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची वर्णी लागली आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 3 आणि बोलंड 4 विकेट घेतल्या. तर कॅमिन्सला 2 आणि लायनला 1 विकेट मिळाली अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया गोलंदाजी करताना स्कॉट बोलंड आणि मिचेस स्टार्कने कहर केला.

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय पटकावत मिळवले यजमान पद

सिडनी कसोटीत भारताने पहिल्या डावात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघाने 162 धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून, ट्रॅव्हिस हेड 34 आणि वेबस्टर 39 यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली असून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 च्या शर्यतीतूनही बाहेर झाली आहे. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांची निराशा केली.

कसा होता पहिला डाव

भारताने पहिल्या डावात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाले. शुभमन गिल देखील 20 धावांसह बाद झाला. विराट कोहली थोडा वेळ लयीत दिसला पण शेवटी ऑफ स्टॅम्पच्या बॉलचा बळी ठरला. पंत आणि जडेजाच्या जोडीने संघाची कमान हाती घेतली. अशा रितिने भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या होत्या. यावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 181 धावांसह सामना आटोपला.

कसा होता दुसरा डाव

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी निराशा केली कारण, कोणीही 22 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. भारताचा दुसरा डाव 157 धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला 162 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताकडे पहिल्या डावानंतर 40 धावांची आघाडी होती. मात्र दुसऱ्या डावात ऋषभ पंतने 33 बॉलमध्ये 61 धावा केल्या ज्यामुळे तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा ठरला. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने 6 विकेट घेतल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेड 34 आणि वेबस्टर 39 यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर विजयावर शिक्कामोर्तब केला.

DOMBIVALI LIGHT BILL UDDHAV PHOTO

Dombivli Light Bill Photo: ...म्हणून हा प्रकार घडला! लाईट बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो, रवींद्र चव्हाण म्हणाले

https://www.lokshahi.com/news/dombivli-light-bill-photo-uddhav-thackerays-photo-as-chief-minister-on-light-bills-ravindra-chavan-said

महाविकास आघाडीचं सरकार कोसळून अडीच वर्षे उलटून गेली आहेत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार होऊन अडीच वर्षांचा काळ लोटला आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री झाले आणि ते जवळपास अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असेल तरी जळगावात महावितरणनं पाठवलेल्या वीजेच्या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे, वीज बिलांवर ठाकरेंचा फोटो पाहून ग्राहक काहीसे शॉक झाले आहेत.

याचपार्श्वभूमीवर आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी आमदार आणि रवींद्र चव्हाण, यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की, हेतू परस्पर या गोष्टी होत असतील आणि ज्यामुळे हे प्रकार घडतं असले, त्याच्यावर नक्कीचं करावाई केली जाईल, असे चव्हाण म्हणाले, दरम्यान भाजपच्या देश राज्यव्यापी अभियानातर्फे डोंबिवलीत रविवारी संघटन पर्व उपक्रम अंतर्गत प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले होते यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, यांनी उपस्थिती लावत अभियानाला सुरवात केली

Uddhav Thackeray MLAs: अनेक ठिकाणाहून ठाकरेंना पदाधिकाऱ्यांचा राम राम! ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश

नवी मुंबई, पालघर, मुरबाड, नाशिक,धुळे, साक्री, परभणी येथील उबाठा गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंदआश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झाला आहे. उबाठा गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्याना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालघरमधूनही अनेक पदाधिकाऱ्यांचा उबाठा गटाला जय महाराष्ट्र ठोकला आहे.

उबाठा गटाच्या माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, माजी नगरसेविका दीपा पामळे, उबाठा शहरप्रमुख प्रवीण पाटील, माजी नगरसेवक तुषार भानुशाली, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाटील, युवासेना शहर संघटक निमिष पाटील तसेच डहाणूतील आदिवासींच्या प्रश्नांसाठी झटणारे युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष विराज गडग यांनी आज पक्षप्रवेश केला. मुरबाड, नाशिक,परभणी, धुळे, साक्री शहरातील पदाधिका-यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

Sambhajiraje Chhatrapati: 'धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, सरकार त्यांना पाठीशी का घालतंय?'

https://www.lokshahi.com/video/sambhajiraje-chhatrapati-take-dhananjay-mundes-resignation-why-is-the-government-supporting-him

बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरुन मंत्री पंकजा मुंडे अद्याप का गप्प आहेत असा सवाल संभाजीराजे आणि खासदार बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडे यांचे पान हालत नाही, हे पंकजा मुंडेच बोलल्या होत्या. असं देखील संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तर वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर पंकजा मुंडे थोड्या तरी बोलल्या का? असा सवाल खासदार सोनावणे यांनी केला आहे.

याचपार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ज्या क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झाली, हा विषय पूर्वीप्रमाणे प्रलंबित राहायला नको. नुसता संतोष देशमुख पुरता हा विषय नाही...माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे...म्हणून सर्व पक्ष, धर्म लोक याठिकाणी एकवटले आहे...जातीच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न आहे...हा मराठा विरोधात वंजारी विषय नाही...ही माणुसकीची हत्या आहे. मी राज्यपालांना विनंती केली की आपण या प्रकरणात लक्ष घालावे... वाल्मिक कराड यांना जी कलम लावली आहेत, त्यामुळे ते सहज बाहेर पडू शकतात...खंडणी ऐवजी या प्ररकणा संबंधित असल्याने त्याप्रकारे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावी...धनंजय मुंडे हे त्यांचे बॉस आहेत...त्यांचा राजीनामा द्यायला हवा...याआधी मनोहर जोशी, आर आर आबा, अशोक चव्हाण यांना पदावरून हटवले आहे.. मग धनंजय मुंडे यांना सरकार त्यांना पाठीशी का घालतंय?

वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडे यांचे पान हालत नाही पंकजा मुंडेच बोलल्या- संभाजीराजे

पुढे संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी बोलायला पाहिजे... हा संपुर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. पंकजा मुंडे स्वत: म्हणाल्या आहेत, वाल्मिक कराडचं एवढं प्राभाल्य आहे की, धनंजय मुंडे यांचे पान सुद्धा हालत नाही, हे त्याच बोलल्या होत्या. हे जे सुरु आहे, ते महाराष्ट्राला परवडणारे नाही. पुढे संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, एसआयटीमध्ये पीएसआय आहे, त्याचा वाल्मिक कराड सोबत फोटो आहेत... तुम्हाला जर का न्याय हवा असेल तर शहाजी उमप यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी चौकशीसाठी नेमा.

Chandrashekhar Bawankule: पालकमंत्रीपदाबाबत तिढा नाही,आज चर्चा पूर्ण होणार; बावनकुळेंची प्रतिक्रिया

https://www.lokshahi.com/news/discussion-on-the-post-of-guardian-minister-is-likely-to-take-place-today-bawankule

नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे, यावेळी ते म्हणाले की, नागपूर शहर व जिल्हा आणि विदर्भातील 86 हजार हेक्टर झुडपी जंगली जमीनी संदर्भात सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. असं असताना विभागीय आतूक्ताकडून झुडपी जंगल जमिनी सोडविण्याचा अहवाल आला आहे. त्यासाठी समिती देखील नेमण्यात आली आहे. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. पुढे बावनकुळे म्हणाले की, अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना दोन दिवस मंत्रालयात आले नाही. केजरीवाल यांना सपोर्ट करण्यासाठी मोदींवर बोलण्याअगोदर त्यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज, असं म्हणत बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच पालकमंत्रीपदाबाबत आज चर्चा होण्याची शक्यता असल्याचं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल आहे.

मतदाराबद्दल अजित दादांच्या भूमिकेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया- म्हणाले..

पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही जनतेतून निवडून आलो असल्याने आम्ही जनसेवक आहोत.. जनसेवकांनी जनतेसमोर नतमस्तक होऊनच आपला कारभार केला पाहिजे. मतदाराबद्दल अजित दादा काय बोलले मी ऐकले नाही, त्यांनी काय भूमिका मांडली याबद्दल मला बोलायचं नाही, मात्र मतदार हा आमचा सर्वस्व आहे. आम्ही कोणीही राजे नाही तर सेवक आहोत आणि सेवकाच्या भूमिकेतच आम्ही राहणार.. माझी आणि आमच्या सरकारची भूमिका आहे जनताच आमचं मालक आहेत..

सुरेश धस यांच्या कडून केल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात टीकेवर बावनकुळेंची भूमिका

सुरेश धस यांच्या कडून केल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात टीका केली जात आहे. सुरेश धस यांना मी दोन-तीन वेळा बोललो आहे. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांना बोलतील.. त्यांची जी काही मत आहेत त्यांनी आपल्या भूमिका सरकारमध्ये मांडल्या पाहिजे.. जनतेच्या व्यासपीठावर कोणती गोष्ट उजाघर करण्याऐवजी सरकारकडे किंवा पक्षातील लोकांजवळ मांडली पाहिजे..

पालकमंत्रीपदाबाबत आज चर्चा होण्याची शक्यता - बावनकुळे

मागे वफ बोर्डाला दोन कोटी रुपये दिले होते, ते रेकॉर्ड डिजिटलायझेशन करण्यासाठी दिले होते.. वफ बोर्डाच्या कायद्यासंदर्भात काय करायचं केंद्र सरकार त्याबद्दल विचार करत आहे.. लोकसभेची संयुक्त समिती गठीत झाली आहे आणि लवकरचं त्याचा रिपोर्ट येईल.. हिंदू समाजाच्या वफ बोर्डाने जप्त केलेल्या प्रॉपर्टी चुकीच्या पद्धतीने गेल्या आहे त्या परत मिळायला हव्या.. नितेश राणे यांच बोलणं योग्य आहे, याकरिता राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही काम करत आहे. पालकमंत्री पदासाठी चर्चा होणार होती मात्र अजित पवार विदेशात असल्याने यावर ही उपाय काढला जाईल.. आज चर्चा होईल असं मला वाटतं...

Chhagan Bhujbal On Manilrao Kokate: मी आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक, माणिकराव कोकाटे उपरे

https://www.lokshahi.com/news/chhagan-bhujbal-on-manilrao-kokate-me-and-sharad-pawar-founder-of-the-nationalist-party

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांसोबत सोबत बोलताना काही मुद्दे मांडले ज्यात ते बीड प्रकरणावरून कोणत्याही निर्दोश व्यक्तीला शिक्षा होता कामा नये तर पोलिस त्यांची चौकशी करत आहेत, असं म्हणत मनोज जरांगेंना शांत राहण्याचं आव्हान करत होते. तसेच मणिकराव कोकटे यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की मी आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक आहोत त्यामुळे काल आलेले माणिकराव मला काय सांगतात. असं म्हणत भुजबळांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

मी आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक

मणिकराव कोकटे यांना मला सांगायचं आहे की मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा संस्थापक आहे. शरद पावर आणि मी या पक्षाचे प्रमुख संस्थापक आहोत. माझा जो एटीएन बंगला होता विरोधी पक्षाचा तिथे जर झेंडा कोणता असावा, नाव काय असाव, निशाणी आहे घड्याळाची ती कशी असावी एवढचं नाही तर घटना आणि बाकी सगळ आम्ही केललं आहे. मी प्रांताध्यक्ष सुद्धा पहिला आहे. कोकाटे हे तर उपरे आहेत 5 वर्षांपुर्वी ते कधीही राष्ट्रवादीमध्ये नव्हते... ते आले त्यांची माणसं घेऊन आणि बोल्ले त्यांना पक्षात यायचं आहे, तेव्हा मी बोललो होतो शरद पवारांसोबत झालं गेलं विसरुन त्यांना पक्षात घ्या आणि हे काल आलेले मला काय सांगतात पक्षाचे लाड आणि बाकी सगळं, पक्षाने लाड केले की नाही ते मी आणि पक्ष बघून घेऊ...

दोषींना फाशीच द्यावी, पण निरपराधाला...

तुमच्याकडे जी काय माहिती असेल ती त्यांना द्या ना... शिक्षा होऊ देत आरोपींना, आणि माझ्या वेळेस तर मीच मोक्का लावला होता. राजकारणात अशा गोष्टी होत असतात, परंतू मला असं वाटत की, कोणावर अन्याय होता कामा नये... दोषींवर कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा देखील झाली पाहिजे... तो जो खून झाला तो अतिशय निर्घृण पद्धतीने झाला... कारण, आमदार सुरेश धस ज्या पद्धतीने हाऊसमध्ये सांगत होते, ते ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात की, एवढ्या क्रुर पद्धतीने हत्या केली आहे. ज्याची आपण कल्पना देखील करु शकतं नाही.. त्यामुळे जे कोणी दोशी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे...

एका सुद्धा निर्दोष व्यक्तीला शिक्षा नाही झाली पाहिजे

सुरेश धस अजित पवारांना म्हणाले होते, 'क्या हुआ तेरा वादा' यावर भुजबळ म्हणाले की, बरोबर आहे. जर ते तसं म्हणाले आहेत की ते चौकशी करणार आणि योग्य तो निर्णय घेणार तर मग अजित पवारांनी दिलेला पाळला पाहिजे. मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने बोलतात हे बरोबर नाही...ही लोकशाही आहे... ठोक्षाही आहे का? असं मनोज जरांगे म्हणाले आहेत पण पोलिस त्यांच काम करत आहेत तर इतर कोणी त्यात पडू नये असं मला वाटत.... मला सगळ्यांना विनंती आहे कि अतिशय शांत पद्धतीने करावे...कायदा सांगतो की, एका सुद्धा निर्दोष व्यक्तीला शिक्षा नाही झाली पाहिजे...दोषीला फाशीच झाली पाहिजे...

Chhagan Bhujbal: दोषींना फाशीच द्यावी, पण निरपराधाला...;भुजबळांनी घेतली धनंजय मुंडेंची बाजू?

https://www.lokshahi.com/news/did-bhujbal-take-dhananjay-mundes-side

Champions Trophy: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताचे 'हे' तगडे खेळाडू करणार कमबॅक

https://www.lokshahi.com/sports/cricket/these-strong-players-of-india-will-make-a-comeback-before-the-champions-trophy

सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 ची मालिकाची समाप्ती झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेवर 3-1 विजया मिळवत भारताचा 6 विकेट्सनी पराभव करत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024साठी मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात भारतीय संघाला नक्कीच यश आले होते, पण चार सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दमदार खेळ दिसून आला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली असून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 च्या शर्यतीतूनही बाहेर झाली आहे. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांची निराशा केली.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १२ जानेवारीपर्यंत सर्व संघांना आपल्या संघाची घोषणा करावी लागणार आहे. त्यामुळे निवडकर्ते मजबूत आणि अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. अशातच आता इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. यावेळी 5 टी20 आणि 3 वनडे अशी सामन्यांची मालिका दोन्ही संघामध्ये रंगणार आहे. दरम्यान या मालिकेमध्ये भारतीय संघातील हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि अर्शदीप सिंग या 3 स्टार खेळाडू कमबॅक करणार आहेत.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अर्शदीप सिंगची भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली तसेच अय्यरने देखील त्याची वादळी फलंदाजी दाखवली पाँडेचेरीविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रेयसने 137 धावांची खेळी केली होती. यासह कर्नाटकविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ११४ धावा केल्या होत्या. ज्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते. तसेच वर्ल्डकप २०२३ स्पर्धे दरम्यान हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती त्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं. ज्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पंड्या भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र आता त्याची कामगिरी पाहता त्याला पुन्हा एकदा वनडे संघात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे हार्दिक आणि अर्शदीपसह श्रेयस अय्यरला देखील संघात कमबॅक करण्याची संधी मिळू शकते.

Rishi Dhawan Retirement:आर. अश्विननंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का! या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

https://www.lokshahi.com/sports/cricket/rishi-dhawan-retirement-after-r-ashwin-another-blow-to-team-india-this-players-sudden-retirement

भारतीय क्रिकेटर्समध्ये अनेक मोठ्या खेळाडूंनी या वर्षात आपल्या करिअची चांगली सुरवात केली तर अनेक खेळाडूंनी या वर्षात निवृत्तीची घोषणा केली आहे. नुकतीच भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 18 डिसेंबर 2024ला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा प्रवास थांबवला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना भारताने अनिर्णित ठेवल्यानंतर अश्विनने धक्कादायक निर्णय घेतला. आर अश्विनने निवृत्तीची घोषणा केली. असं असताना क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका पार पडली असून ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेवर 3-1 विजया मिळवत भारताचा 6 विकेट्सनी पराभव करत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. अशातच 2016 मध्ये माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वामध्ये टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या ऋषि धवनने अचानक तडकाफडकी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. ऋषि धवनने आतापर्यंत 29.74 च्या सरासरीने 186 विकेट घेतल्या आहेत. तसेच फलंदाजी करताना 2906 धावा केल्या आहेत. त्याने 1 शतक आणि 15 अर्धशतकांची नोंद स्वत:च्या नावे केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने 135 सामने खेळले आहेत आणि टी-२० क्रिकेटमध्ये 1740 धावांसह 118 विकेट घेतल्या आहेत.

'मला कोणतीही खंत नाही तरी....' काय म्हणाला ऋषि धवन

मी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू इच्छितो (मर्यादित षटक) याबद्दल मला कोणतीही खंत नसली तरीही जड अंतःकरणाने. हा एक खेळ आहे ज्याने गेल्या 20 वर्षांपासून माझे जीवन परिभाषित केले आहे. या खेळाने मला अपार आनंद आणि अगणित आठवणी दिल्या आहेत ज्या नेहमी माझ्या हृदयाच्या अगदी जवळ राहतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA), पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी मला दिलेल्या संधींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला थोडा वेळ घ्यायचा आहे. नम्र सुरुवातीपासून ते भव्य टप्प्यांवर माझ्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत, हा एक विशेषाधिकार आहे. क्रिकेट ही माझी आवड आहे आणि दररोज सकाळी उठण्याचे माझे कारण आहे. आज मी ज्या व्यक्तीत आहे त्या व्यक्तीत मला घडवण्यात तुम्ही दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल मी माझे सर्व प्रशिक्षक, मार्गदर्शक, संघमित्र आणि सपोर्ट स्टाफ यांचे आभार मानू इच्छितो. सर्व चाहत्यांसाठी, तुम्ही माझ्यासाठी या खेळाचे रक्त आणि आत्मा आहात. तुमचा जयजयकार आणि मंत्र नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ असतील. तुम्ही माझ्यावर केलेले प्रेम आणि कौतुक मी कायमचे जपत राहीन. तुमचे खूप खूप आभार, कारण तुमचा पाठिंबा क्रिकेटला खरोखर खास बनवतो. शेवटचे पण सर्वात कमी नाही माझे कुटुंब आहे. त्यांच्याशिवाय मला यापैकी काहीही साध्य करणे, जगणे किंवा स्वप्न देखील शक्य नव्हते. माझ्या अतूट पाठिंब्याने आणि त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेमाने मला जीवनात आणि क्रिकेटच्या खेळात खऱ्या अर्थाने पुढे नेले आहे. मी माझ्या आयुष्यातील या संक्रमणकालीन अध्यायाला सुरुवात करत असताना, मी उत्साहाने आणि अपेक्षेने भरले आहे. जिंकण्यासाठी असंख्य आव्हाने आहेत, नवीन स्वप्नांचा पाठपुरावा करणे आणि स्वीकारण्यासाठी नवीन संधी आहेत. मला विश्वास आहे की क्रिकेटने माझ्यात निर्माण केलेली कौशल्ये आणि मूल्ये मला या पुढच्या टप्प्यात मार्गदर्शन करतील.

उच्च, आठवणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मैत्रीसाठी धन्यवाद.

HMPV VIRUS: मुंबईकरांना दिलासा! मुंबई महापालिका क्षेत्रात अद्याप कोणताही रूग्ण HMPV बाधित नाही

https://www.lokshahi.com/news/hmpv-virus-no-patient-infected-with-hmpv-in-mumbai-municipal-corporation-area-yet

कोविड 19 नंतर चीनमध्ये पुन्हा एकदा नव्या व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं समोर आली. प्रामुख्यानं 14 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये आणि वयस्कर व्यक्तींना या HMVP म्हणजे ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस विषाणूचा संसर्ग होतोय. चीनचे शेजारी देश या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना सारख्या विषाणूचा उद्रेक पाहायला मिळतोय. HMPV म्हणजेच मानवी मेटान्यूमोव्हायरस चीनमध्ये वेगाने पसरत आहे. अनेक लोकांना याची लागण झाली असून चीनमधील रुग्णालयांमध्ये HMPV च्या रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो.

मुंबई महापालिका क्षेत्रात HMPV बाधित रूग्ण नाही

मुंबई शहर व उपनगरात असा Human Metapneumo Virus (HMPV) बाधित कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात येत आहे. या शिवाय नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि, खबरदरीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनांच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यासंदर्भातील सूचनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

आरोग्य सेवा संचालनालयाचं नागरिकांना आवाहन काय

या गोष्टींची काळजी घ्या-

साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.

ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे.

जेव्हा कधी खोकला किंवा शिंक येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.

भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे.

संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुवीजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.

या गोष्टी करण टाळा-

हस्तांदोलन करु नका.

वापरलेल्या टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर.

आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा.

डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करु नये.

सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका.

Mustard Oil: केसांसह तळपायाला ही लावले जाते मोहरीचे तेल, जाणून घ्या याचे फायदे

मोहरीचे तेल हे सहसा लोक स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासाठी वापरतात.

तुमच्या त्वचेवर तर होतोच, त्याचसोबत याने केसांसह तळपायाला देखील चांगला आराम मिळतो.

मोहरीच्या तेलात पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असते.

ज्यामुळे कोरडी आणि पापुद्रे आलेली त्वचा निघून जाण्यास मदत होते.

तसेच केसांना हे तेल लावून मालिश केल्यास केसांचा गुंता तसेच कोरड्या केसांना फाटे फुटणे नाहीसे होतात.

तळपायाला या तेलाने मालिश केल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत होऊन मेंदु रिलॅक्स होतो.

तसेच मासिक पाळीदरम्यान महिलांनी हे तेल तळपायांवर लावल्याने मासिक पाळीतील वेदना कमी होतात.

तसेच मसल्सना आराम मिळतो आणि चांगली झोप लागते

Wardha: समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! एक कोटींचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी ताब्यात

https://www.lokshahi.com/news/wardha-big-action-on-samruddhi-highway-goods-worth-one-crore-seized-two-accused-arrested

भूपेश बारंगे, वर्धा | जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गवरून कंटेनरने सुगंधित तंबाखू ,गुटखा अवैधरित्या जात असल्याची पेट्रोलिंग दरम्यान माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच सिंदी परिसरात सापळा रचून दिल्लीवरुन मुंबईकडे जाणाऱ्या कंटेंनरला थांबवण्यात आले. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी सोबत घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या कंटेनर चालक यांना विचारपूस केली असता दीपक ट्रान्सपोर्टचे मालक व विकास छाबडा रा.दिल्ली या दोघांचा असल्याचे सांगितले. कंटेनर क्र. आर जे 52 जीए 5670 मधून दिल्ली येथून मुंबईला प्रतिबंधित सुगंधित तंबाखू नेत असल्याचे सांगण्यात आले. कंटेनर ताब्यात घेऊन पाहणी दरम्यान वेगवेगळ्या कंपनी 70 लाख सहा हजार पाचशे रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आढळून आला.वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर किंमत 30 लाख असून एकूण एक कोटी सहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कंटेनर मध्ये सुपर कॅश गोल्ड कंपनीचा सुगंधित तंबाखु वनज ५१०३ कि.ग्रॅ., सिग्नेचर कंपनीचा सुगंधित पान मसाला वजन ११०१ कि.ग्रॅ. , व्ही.सी. ५ कंपनिचा सुगंधित तंबाखु वजन ८५० कि.ग्रॅ. असा प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु किंमत 70 लाख सहा हजार पाचशे तसेच वाहतुकीसाठी वापनण्यात आलेले कंटेनर किमंत तीस लाख असा एकुण मुद्देमाल एक कोटी सहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदरचा माल गुन्हयाचे पुराव्याकामी ताब्यात घेवून आरोपी शाहीद ईलीयास, वय ३२ वर्षे, रा. मु.पो. अडवर, ता.जि. नुह (मेवात), रा. हरियाणा , हाकमखॉन शाकिरखॉन वय २२ वर्षे, रा. मु.पो. अडवर, ता.जि. नुह (मेवात), रा. हरियाणा ,दिपक ट्रान्सपोर्ट चे मालक , विकास छाबडा दोन्ही रा. दिल्ली , वाहन मालक अशिना विकास छाबडा रा. दिल्ली यांचे विरूध्द पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) येथे कलम १२३, २७४, २७५, २२३, भा.न्या.सं. सह कलम २६(१), २६(२) (iv), २७ (३) (९), ३०(२) (a), ३(१) (zz) (iv), ५९ अंन्नसुरक्षा व मानके कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि अमोल लगड, राहुल ईटेकार, बालाजी लालपालवाले व पोलीस अंमलदार नरेन्द्र पाराशर, मनिष श्रीवास, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनिष कांबळे, अमोल नगराळे, नितीन ईटकरे, गोपाल बावणकर, सागर भोसले, मंगेश आदे, दिपक साठे, मिथुन जिचकार, प्रफुल पुनवटकर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

Dhananjay Munde: "मी राजीनामा दिलेला नाही"; मुंडेनी फेटाळल्या राजीनाम्याच्या चर्चा

https://www.lokshahi.com/video/dhananjay-munde-i-have-not-resigned-munde-dismisses-talks-of-resignation

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर अद्याप ही कोणता गुन्हा दाखल झालेला नाही मात्र तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच एकमेकांसोबत चांगले संबंध असल्यामुळे जी काही चौकशी या प्रकरणाबाबत सुरु आहे ती होईपर्यंत धनंजय मुंडे यांना पदावरून दूर ठेवा असं नेत्यांकडून मागण्या केल्या जात आहेत. मित्रपक्ष भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील अशी मागणी केली होती की त्यांनी राजीनामा द्यावा. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागण्या केल्या जात आहेत मगं ते विरोधक असो किंवा सत्ताधारी असो त्यांच्या मित्रपक्षातील नेते देखील राजीनाम्याची मागणी करत आहेत आणि अशातचं आता धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या चर्चा फेटाळल्या आहेत. तर धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली होती आणि त्यादरम्यान ते राजीनामा देणार नाही असं त्यांनी सांगितल होत. धनंजय मुंडे हे सध्या मंत्री आहेत आणि त्यांचे निकटवर्णी मानले जाणारे वाल्मिक कराड हे सध्या जेलमध्ये आहेत. असं सगळं सुरु असताना धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे धनंजय मुंडेंनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. " मी राजीनामा दिलेला नाही" असं वक्तव्य धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आलं आहे.

Sanjay Raut On Ajit Pawar: अजितदादा हतबल, आपल्याच मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही - संजय राऊत

https://www.lokshahi.com/news/sanjay-raut-on-ajit-pawar-ajit-pawar-is-desperate-did-not-accept-the-resignation-of-his-own-minister-sanjay-raut

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहेत. असं असताना या घटनेचा राजकीयवर्तुळात वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणेचा मास्टरमाईंड धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर कारवाई सुरु आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक तसेच सत्ताधारी मित्रपक्षातील काही नेते यांच्याकडून केली जात आहे. अशातच धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा मिळत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

याचपार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत... अजित पवार हे अ‍ॅ क्सिडेंटल नेते आहेत. भाजपच्या ईव्हिएमच्या कृपेने त्यांना जागा मिळालेल्या आहेत. स्वत:च्या कतृत्त्वावर नाही... जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते, तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असत, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही, असं म्हणतं संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

Supriya Sule On Beed Case: सरकारने संवेदनशीलपणा दाखवावा, बीड प्रकरणात सुप्रिया सुळे यांचा संताप

अनेकजण मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत.सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा.. अशोक चव्हाण यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता, मग आता सरकारने काय करायचं ते ठरवावं.. बजरंग सोनवणे आणि अंजली दमानिया यांच्याबद्दल बोलले जात आहे, हे चुकीचं आहे.. मी कुणाचाच राजीनामा मागितला नाही,त्यामुळे महायुतीच्या मित्र पक्षातील लोकांच्या भूमिकेमुळे सकारात्मक निर्णय घ्यावा..हीच आमची अपेक्षा आहे..

त्या मुलीचे अश्रू पाहून तरी सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा, मुख्यमंत्री पण काल बोलले आहेत की ते कोणाला ही सोडणार नाही. अशोक चव्हाण यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता, मग आता सरकारने काय करायचं ते ठरवावं.. बजरंग सोनवणे आणि अंजली दमानिया यांच्याबद्दल बोलले जात आहे, हे चुकीचं आहे.. काही विषय असे आहेत ज्यात राजकारण बाजूला माणूसकीच्या नात्याने हाताळावे, हा जर थोर पुरुषांचा राज्य आहे तर त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. यामध्ये विश्वासाचा किरण एकचं आहे की हे प्रकरण आता महाराष्ट्र नाही तर संपुर्ण भारत हे प्रकरण जगासमोर आणत आहे. त्याचसोबत सगळ्या पक्षाचे लोक मन आणि मतभेद बाजूला ठेवून या प्रकरणात आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून एकत्र आले आहेत. हे एक आशेच किरण आहे की, महाराष्ट्र अजून ही सुसंस्कृत आहे. आता निर्णय काय घ्यायचा हे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षाने ठरवायचं आहे. अनेकजण मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. मी कुणाचाच राजीनामा मागितला नाही,त्यामुळे महायुतीच्या मित्र पक्षातील लोकांच्या भूमिकेमुळे सकारात्मक निर्णय घ्यावा..हीच आमची अपेक्षा आहे..सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, असं आव्हान सुप्रिया सुळे यांनी सरकारला केलेलं आहे.

Pankaja Munde on Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे काय म्हणाल्या ?

https://www.lokshahi.com/news/what-did-pankaja-munde-say-on-dhananjay-mundes-resignation

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहेत. असं असताना या घटनेचा राजकीयवर्तुळात वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणेचा मास्टरमाईंड धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर कारवाई सुरु आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक तसेच सत्ताधारी मित्रपक्षातील काही नेते यांच्याकडून केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे काय म्हणाल्या...

विधाकांनी असं म्हटलं आहे की, त्यांच्यावर अशी वेळ आली होती त्यावेळेस त्यांना राजीनामा द्यावा लागला होता मग आता धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप केले जात आहेत तर त्यांनी देखील त्यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान याचपार्श्वभूमीवर पंकजा मुंडे म्हणाल्या की, त्यांच्या पक्षाचे नेते आणि सर्वोच्च नेते उत्तरं देऊ शकतात... त्यांच्या निर्णय तेच घेतील मी काही बोलू शकत नाही... माझे काही प्रोटोकॉल आहेत, मी लहान मंत्री आहे...

जो कुणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे - पंकजा मुंडे

मी छोट्या लेव्हलच्या विषयांना हाताळते.. महाराष्ट्रामध्ये एसआयटी लावण्याचं जे पत्र आहे ते मी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे आणि त्याची सोफ्ट कॉपी मी जाहीर करु शकते, जिथे व्यक्त व्हायचं तेंव्हा व्यक्त झाले.. माझ्या जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीची निघृण हत्या होते. त्याप्रकरणामुळे मी त्याठिकाणी एसआयटी लावण्याची मागणी देखील केली आहे... मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सांगितलं तपास होईल आणि यात कोणाची ही हयगय करणार नाही... आरोपीला कडक शिक्षा करु असं त्यांनी सांगितले आहे.... मी मंत्री आहे, अशात आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे... मोर्चा काढत असू तर आपणच आपल्या सरकारवर अविश्वास दाखवतोय... माझ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय तर आम्हीच प्रश्न उभे करत असू तर ते त्यांच्यावरच संशय घेण्यासरखं होईल.. यात राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय. ह्याच्या तून काही वेगळं मिळवण्याचा प्रयत्न कोणीही करु नये...हे अधिकारी मी आणले का?... पालकमंत्री, मुख्यमंत्री यांनी आणले होते... मात्र पालकमंत्री होते ते पण बोलत आहेत शिक्षा झाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे... मला माहिती नाही कोण आहे त्यात मग मी कसा आरोप करु कोणावर...आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, माझा कार्यकर्ता होता तो.....त्यांच्या मुलांना घेऊन भाषण करणं मला योग्य वाटत नाही, त्याच्यापेक्षा संतोष देशमुख याला न्याय मिळवून देण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

Justin Trudeau Resignation: कॅनडामध्ये मोठी राजकीय उलथापालथ, जस्टिन ट्रुडो यांनी दिला राजीनामा

https://www.lokshahi.com/news/justin-trudeau-resignation-major-political-upheaval-in-canada-justin-trudeau-resigns#google_vignette

कॅनडामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी लिबरल पार्टीच्या नेतेपदाचा देखील राजीनामा दिला आहे. लिबरल पार्टीच्या खासदारांच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. नवीन पंतप्रधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जस्टिन ट्रुडो हे कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत.

आता त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. कॅनडाच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनिता आनंद, पियरे पॉलीव्रे, क्रिस्टिया फ्रीलँड आणि मार्क कार्नी यांसारखी प्रमुख नावे पुढे येत आहेत. यापैकी भारतीय वंशाच्या नेत्या अनिता आनंद त्यांच्या प्रभावी कारभारामुळे आणि सार्वजनिक सेवेच्या चांगल्या रेकॉर्डमुळे प्रबळ दावेदार मानल्या जातात. अनिता आनंद या कॅनडाच्या पंतप्रधान झाल्या, तर जस्टिन ट्रूडो यांच्या काळात कॅनडा आणि भारत यांच्यात बिघडलेले संबंध पुन्हा चांगले होतील, अशी अपेक्षा केली जाऊ शकते. दरम्यान, कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. या कारणास्तव भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होणे भारतासाठी चांगले संकेत देऊ शकते. याआधी जस्टिन ट्रूडो यांच्या कारकिर्दीत भारतावर हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा खोटा आरोप करण्यात आला, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. कॅनडाच्या सरकारने या संदर्भात कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही. याचा परिणाम असा झाला की, पक्षातील इतर नेत्यांशी जस्टिन ट्रुडोचे संबंध बिघडले. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल. याचपार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोयता गॅंगचा पुन्हा धुमाकूळ

Pune Crime: पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! पुण्यात कोयत्याची दहशत

https://www.lokshahi.com/lokshahi-crime/pune-crime-law-and-order-issue-in-pune-is-back-on-the-agenda

पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात कोयता गँगची हायदोस सुरू असल्याच चित्र समोर दिसत आहे. पुणे शहरात कोयत्याने वाहनांच्या तोडफोडीच्या घटना होतचं होत्या की, आता ही कोयता गँग नागरिकांवर जीवघेणा हल्ला करत आहेत.

बिबवेवाडी परिसरात कोयत्याने दोन जणांवर जीवघेणा हल्ला, एका तरुणाचा हाताचा पंजा कोयत्याने तोडला, मनगटखाली पंजा तुटल्याने पंजा गमावण्याची तरुणावर वेळ आली आहे. फिर्यादी आणि त्याचा मित्र पीयूष यांना आरोपींनी भेटायला बोलावले होते. पूर्वी त्यांच्यात वाद झाल्याने या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये पीयूष्या हातावर आरोपींनी कोयता मारला ज्यामध्ये त्याचा हाताचा पंजा खाली पडला आणि पीयूष गंभीर जखमी झाला. इतकंच नाही तर पीयूष च्या हातावर आणि मांडीवर सुद्धा आरोपींनी कोयत्याने वार केले. घटनेनंतर दोघा जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले गेले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पीयूषच्या हाताचा पंजा जोडायचा प्रयत्न सुद्धा केला आहे

एवढचं नव्हे तर हनुमान टेकडीवर फिरण्यास गेलेल्या एका 17 वर्षीय मुलीला कोयता धाक दाखवून लूटमार देखील करण्यात आली आहे. या मुलीला मारहाण करून कोयता गँगने तिच्याकडील सोनसाखळी हिसकावून नेली. भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीत दोन घटनेत दोन जणांवर कोयत्याने वार देखील करण्यात आला आहे. दरम्यान सर्व प्रकरणाची दखल डेक्कन पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून सदर चोरांचा तपास करण्यात येत आहे.

Yuzvendra Chahal: चहलसोबत ती मिस्ट्री गर्ल कोण? मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडिओ व्हायरल

सध्या भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी अभिनेत्री आणि डान्स कोरियोग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. या दोघांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन एकमेकाला नुस्त अनफॉलो नाही केलं तर एकमेकांसोबत असणाऱ्या पोस्ट देखील दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावरून डिलिट केल्या आहेत. यादरम्यान आता चहल-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना युजवेंद्रच्या इन्स्टा स्टोरीने उधाण आणलं आहे.

घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर तुम्हाला तुमच्या वेदना माहीत आहेत, असं म्हणतं त्याच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न देखील केल्याचं दिसून आलं आहे. एवढं सगळ सुरु असताना आता सोशल मीडियावर चहलची एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात तो एका मुलीसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये दिसला होता. मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये स्पॉट झालेला युझवेंद्र आपला चेहरा हाताने लपवण्याचा प्रयत्न करत होता. तर ती मिस्ट्री गर्ल आपला चेहरा लपवताना दिसून आली. या व्हिडिओमध्ये चहलने पांढऱ्या रंगाचं ओव्हरसाईज टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे तर चहल आणि धनश्री यांच्या नात्याला आता फुलस्टॉप लागला असून या मुलीबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

Satara: साताऱ्यात 51 दुर्मिळ पक्ष्यांचे आगमन, पर्यावरणीय समृद्धतेचे प्रतीक

https://www.lokshahi.com/news/satara-arrival-of-51-rare-birds-in-satara-a-symbol-of-ecological-prosperity

साताऱ्यातील दुष्काळी तालुका खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी तलावात यंदा पक्ष्यांचे आगमन अधिकच रंगले आहे. या तलावात सध्या दोन फ्लेमिंगो आणि राजहंस यांसह विविध प्रकारचे 51 पक्षी आढळले आहेत. दरवर्षी या तलावात पक्षांचे आगमन होणे ही एक सामान्य गोष्ट असली तरी यंदा आढळलेली पक्षांची विविधता आणि संख्या निश्चितच पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वडुज येथील प्रसिद्ध पक्षी तज्ञ व छायाचित्रकार डॉ. प्रवीण चव्हाण यांनी या पक्षांचे छायाचित्रण केले असून, त्यांनी सांगितले की, सद्या या तलावावर 51 प्रकारांचे दुर्मिळ पक्ष दिसत आहेत. यामध्ये फ्लेमिंगो आणि राजहंस यांचा समावेश आहे, जे पर्यावरणीय समृद्धतेचे आणि जैवविविधतेचे प्रतीक मानले जातात.

पक्ष्यांचा आगमन: पर्यावरणीय संकेत

यंदाच्या पक्षी आगमनाने हे तलाव पर्यावरणप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांसाठी एक आकर्षणाचे ठिकाण बनले आहे. विविध पक्षांची वस्ती, हे तलावाच्या पाणी स्रोतांची स्थिती, जलस्रोतांचे शुद्धता आणि जैवविविधतेचे चांगले संकेत देतात. यामुळे या तलावाच्या निसर्ग संतुलनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

स्थानिक पातळीवर जागरूकता वाढवणे आवश्यक

दरवर्षी सूर्याचीवाडी तलावावर पक्षांची वस्ती दिसते, परंतु यंदाच्या आगमनाने हे तलाव अधिक लक्ष वेधून घेत आहेत. हे पक्ष पर्यावरणातील बदल, जलस्रोतांची गुणवत्ता, आणि जैवविविधता यांचा सकारात्मक संकेत देत आहेत. यासाठी स्थानिक पर्यावरण तज्ञ, पक्षी प्रेमी आणि शालेय विद्यार्थी यांच्यात जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पक्ष्यांचे संरक्षण आणि निरीक्षण

तलावातील पक्षांचे संरक्षण आणि निरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे पक्षांची विविधता आणि त्यांचा अधिवास याची माहिती घेतल्यावर, या पक्षांचे आणि त्यांचे पर्यावरणातील स्थान वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल. यामुळे एकंदर जैवविविधतेच्या संरक्षणासाठी तसेच पर्यावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी योग्य दिशा मिळेल.

सूर्याचीवाडी तलावातील विविध पक्षांचे आगमन पर्यावरणाच्या समृद्धतेचे प्रतीक आहे. यामुळे पर्यावरण शास्त्रज्ञ आणि पक्षी प्रेमींना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक उत्तम संधी मिळाली आहे. योग्य संरक्षण आणि निरीक्षणाच्या उपाययोजना केल्यास हे तलाव जैवविविधतेचे किल्ले बनू शकतात

Irani Chai: तुम्ही सुद्धा चाय लव्हर आहात! मग इराणी चहाची सिक्रेट रेसिपी, जाणून घ्या

https://www.lokshahi.com/ampstories/web-stories/irani-chai-are-you-also-a-tea-lover-then-know-the-secret-recipe-of-irani-tea

भारतात निम्यापेक्षा जास्त लोक हे चहाचे प्रेमी आहेत.

अशाच चाय लव्हरसाठी इराणी चहाची सिक्रेट रेसिपी जाणून घ्या.

एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात वेलची, दालचिनी, चहा पावडर आणि साखर मंद आचेवर उकळी घ्या.

त्यानंतर पातेलं अॅल्युमिनिअर फॉईलने कव्हर करून त्यावर दुसरं झाकण ठेवा.

पुन्हा मंद आचेवर 15 ते 20 मिनीटे चहा उकळू घ्या.

यानंतर उकळत्या दूधात क्रिम आणि कंडेंस्ड मिल्क मिक्स करा.

यानंतर दुध गरम झाल्यावर चहा गाळून घेऊन त्यात घट्ट झालेलं दूध घाला.

अशा प्रकारे क्रिमी इराणी चहा तयार आणि याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

Buldhana: बुलढाण्यात टक्कल व्हायरसमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

https://www.lokshahi.com/video/buldhana-baldness-is-falling-in-3-days-fear-among-villagers-due-to-baldness-virus-in-buldhana

एकीकडे HMPV व्हायरसने राज्याची चिंता वाढवलेली असतानाच, बुलढाण्यात मात्र एका अज्ञात व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालखेड या गावात अचानक केस गळून टक्कल पडत असल्याची घटना समोर आली आहे. यामुळे या भागात टक्कल व्हायरस आल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा असून परिसरात घबराट पसरली आहे. अवघ्या ३ दिवसातच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गावकऱ्यांनी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रार दिली असून आरोग्य पथक पुढील तपासणीसाठी गावात पोहोचल आहे.

ऑस्ट्रेलियात भारताला पराभव पत्करावा लागला यापेक्षा मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेला ०-३ हा पराभव भारतीय क्रिकेटसाठी सर्वांत निराशाजनक होता, असे मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने व्यक्त केले. यो दोन्ही मालिकांत फलंदाजांचे अपयश खूप महत्त्वाचे होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली या प्रमुख फलंदाजांना दोन्ही मालिकांत चमक दाखवता आली नाही. यामुळे दोघांवर चौफेर टीका होत असताना युवराजने मात्र त्यांची पाठराखण केली आहे.

Yuvraj Singh: विराट-रोहितला ट्रोल करणाऱ्यांवर युवराज सिंगची प्रतिक्रिया, खेळाडूला वाईट बोलण सोप पण....

https://www.lokshahi.com/sports/cricket/yuvraj-singh-yuvraj-singhs-reaction-to-those-trolling-virat-rohit-its-easy-to-speak-ill-of-a-player-but

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 च्या मालिकेची समाप्ती झाली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-1 या स्कोरने विजय मिळवत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. या विजयाने ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली असून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 च्या शर्यतीतूनही बाहेर झाली आहे. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांची निराशा केली. यादरम्यान आता विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन अनुभवी खेळाडूंवर ट्रोलिंगचे जाळे टाकले जात आहेत. त्यांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पराभवावर झालेल्या टीकेदरम्यान रोहित शर्माने विराट कोहलीचे समर्थन करत म्हटले आहे.

खेळाडूला वाईट बोलण सोप पण सपोर्ट करण कठीण-युवराज सिंग

गेल्या पाच-सहा वर्षात भारताने काय मिळवले आहे ते मी पाहिलं आहे... मला नाही वाटत कोणती टीम ऑस्ट्रेलियाकडून बॅक टू बॅक जिंकली असेल... आपण आपले जे ग्रेट खेळाडू आहेत विराट कोहली आणि रोहित शर्मा त्यांच्याबद्दल असं नाही बोलू शकत... त्यांच्याबद्दल खूप वाईट बोललं जात आहे त्यांना टॅोल केलं जात आहे... पण, लोक विसरत चालले आहेत की, त्यांनी भूतकाळात काय यश मिळवले आहे. या कालावधीतील ते सर्वोत्तम खेळाडू आहेत. ठिक आहे! हरले पण आपल्यापेक्षा त्यांना ती गोष्ट दुखावत आहे... कोच म्हणून गौतम गंभीर, रोहित शर्मा, विराट रोहली आणि जस्प्रित बुमराह ते सर्वात चांगले खेळाडू आहेत सध्याच्या घडीला.... ज्यावेळेस खेळाडू चांगला खेळ खेलत नाही त्यावेळेस त्यांना वाईट बोलणं खूप सोप आहे पण त्यांना सपोर्ट करण कठीण आहे... त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे आणि त्यांचे योगदान पण जास्त आहे... त्यामुळे माझं काम आहे माझ्या भावांना मित्रांना सपोर्ट करतं राहण आणि मी करणार....

त्याने स्वत:चा विचार करण्याआधी.... - युवराज सिंग

मी अजून तरी माझ्या आजवरच्या कारकिर्दीत अजून एकदा ही असं पाहिलं नाही की, एका कर्णधाराचा खेळ चांगला नाही म्हणून त्याला बाहेर बसवलं गेललं आहे... यात रोहित शर्माचं कौतुक केलं पाहिजे की, त्याने स्वत:चा विचार करण्याआधी पहिला संघाचा विचार केला, त्यामुळे तो सर्वोत्तम कर्णधार आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

https://www.lokshahi.com/sports/cricket/mohammad-kaif-on-jasprit-bumrah-captaincy-think-twice-before-giving-bumrah-the-captaincy-mohammad-kaifs-tweet-on-jasprits-captaincy

नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. वैयक्तिक कारणांमुळे रोहित शर्माला मालिकेतील सलामीच्या सामन्यात अनुपस्थित रहाव लागलं आणि काही कारणाने त्याला शेवटच्या कसोटीलाही वगळण्यात आल्यामुळे त्याला शेवटच्या सामन्याला मुकवं लागलं, आणि त्यामुळे बुमराहने पर्थमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि संघाला विजय मिळवून दिला, परंतु सिडनीमध्ये भारताचा पराभव झाला. यानंतर आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान उपकर्णधार पदाचा धुरा बुमराहकडे सोपण्याच्या चर्चा सुरु होत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता मोहम्मद कैफने त्याच्या कॅप्टन्सीवर ट्वीट केले आहे.

भारतीय संघ सोनेरी हंस गमवेल- मोहम्मद कैफ

"पूर्णवेळ कर्णधार म्हणून बुमराहची नियुक्ती करण्यापूर्वी बीसीसीआयने दोनदा विचार करावा. या सामन्यामध्ये त्याने केवळ विकेट्स घेणे आणि तंदुरुस्त राहणे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्याच्यावर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवल्यास, क्षणाच्या उष्णतेत वाहून गेल्याने दुखापती होऊ शकतात आणि उत्कृष्ट कारकीर्द कमी होऊ शकते. यामुळे भारतीय संघाला सोनेरी हंस गमवावा लागेल.

जसप्रीत बुमराहची उत्कृष्ट खेळी

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील 5 कसोटी सामन्यांमध्ये, बुमराहने 9 सामन्यांमध्ये 32 विकेट्स घेत आघाडीकडून गोलंदाजी केली. तो सर्वात यशस्वी गोलंदाज होता आणि त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील 5 कसोटी सामन्यांमध्ये, बुमराहने 9 सामन्यांमध्ये 32 विकेट्स घेत आघाडीकडून गोलंदाजी केली. तो सर्वात यशस्वी गोलंदाज होता आणि त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आले.

Pune New App: ब्ला ब्ला कार ॲपवर पुणे परिवहन विभागाची कारवाई, अवैध प्रवासी वाहतुकीची तपासणी

https://www.lokshahi.com/news/pune-new-app-pune-transport-department-takes-action-on-bla-bla-car-app-checks-illegal-passenger-transport

ब्ला ब्ला कार ॲप सारख्या इतर तत्सम ॲप द्वारे अवैध प्रवासी वाहतुकीची तपासणी करण्याचे आदेश पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत…एरवी एकट्यासाठी चारचाकी गाडी काढून मुंबई पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कार पुलिंग करून पैसे वाचवण्याची सुविधा ब्ला ब्ला ॲपेने उपलब्ध करून दिली होती. मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये रोज प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना ही मोठी सोय झाली होती. त्यातच पैशांची, इंधनाची बचत अशा कारणांमुळे अगदी कमी वेळेत हे ॲप प्रचंड लोकप्रिय झालं आणि त्याला प्रतिसाद ही मोठ्या प्रमाणावर मिळाला पण आता आर टी ओ ने म्हणजेच परिवहन विभागाने एक नवा आदेश जाहीर केला आह

ब्ला ब्ला कारचे पिकअप पॅाईंट शोधून काढण्यासाठी खोटे प्रवाशी म्हणून नोंदी करून प्रवास करा आणि त्यानंतर कारवाई करा अश्या सूचना सुद्धा देण्यात आल्या असून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. कारवाई करण्यासाठी रस्ता सुरक्षा पथकाला पुण्यातील नवले पूल, चांदणी चौक, स्वारगेट, पुणे स्टेशन यासारख्या आणखी काही ठिकाणी पथके तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ॲप सारख्या इतर ॲप द्वारे बुकिंग केलेल्या खाजगी वाहनांची तपासणी सुद्धा केली जाणार आहे. या वाहनांवर आता ई चलन द्वारे ही कारवाई होणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

Wedding Season: लग्नात लाडक्या लेकीला रुखवात का देतात? जाणून घ्या

https://www.lokshahi.com/ampstories/web-stories/wedding-season-why-do-they-give-a-gift-to-their-beloved-daughter-at-a-wedding-find-out

रुखसत आणि वतन या दोन शब्दांपासून रुखवत शब्द बनलेला असून रूखसत म्हणजे निरोप आणि वतन म्हणजे आपला देश.

लग्नाच्या वेळी मुलीसोबत पाठवण्यात आलेल्या वस्तुंना रुखवत असे म्हणतात.

पुर्वी प्रवास करणं अवघड असल्यामुळे सासरी गेलेल्या मुलीशी माहेरच्यांचा फार कमी संपर्क होत होता.

दूर सासर असलेल्या मुलीला माहेरून हाताने बनवलेल्या वस्तू, मिठाई, तुळशी वृंदावन, सप्तपदी,सौभाग्य अलंकार रुखवतामध्ये दिले जातात.

मुलीला माहेरची आठवण जास्त येऊ नये म्हणून मुलीच्या मावश्या, आत्या, काकी, मैत्रिणी रुखवत तयार करतात.

यामध्ये बैलगाडी,डोली, आईचा निरोप लिहिलेली कार्डशीटस्, सजवलेले कलश,सजवलेली पान-सुपारी, कृष्णाची हंडी.

तसेच ताटावरील रुमाल, विणलेले तोरण, विणलेला झूला,आरसा,विणलेला गणपती,भातुकली,फळे, सजविलेले घर.

त्याचसोबत सनई-चौघडा,नवरा-नवरी,सुपारीचे भटजी, विहिण पंगत,गौरीहार,जातं,पाटा-वरवंटा,उखळ या गोष्टी दिल्या जातात.

Jitendra Awhad On Ramgiri Maharaj: रामगिरी महाराजला जोड्याने मारायची वेळ; आव्हाड यांचा हल्लाबोल

https://www.lokshahi.com/news/jitendra-awhad-on-ramgiri-maharaj

अहिल्यानगर शहरातील ईसळक निंबळक या गावांमध्ये निसर्गसृष्टी गोशाळेच्या मुक्त गोठ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आलेल्या महंत रामगिरी महाराजांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवात ही वंदे मातरम ने करण्यात आली. कालच महंत रामगिरी महाराजांनी राष्ट्रगीत "जन गण मन" वरून केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले होते.आपल्या देशाचे राष्ट्रगीत हे "वंदे मातरम" असावे असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं त्यातच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात "वंदे मातरम" ने केल्याने पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे रामगिरी महाराज यांच्या विधानावर पुन्हा एकदा पडसाद उमटताना दिसत आहेत. यादरम्यान रामगिरी महाराज म्हणाले की, माझी मागणी अशी आहे की, राष्ट्रगीत असं असाव की त्यातून देशाचं समाजप्रबोधन व्हाव... देशाला उद्देशुन असाव हा माझा उद्देश आहे.

याचपार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड रामगिरी महाराज यांच्या विधानावर संतप्त होत म्हणाले की, आता रामगिरी महाराजला जोड्याने मारायची वेळ आली आहे. आता "जन गण मन" वर पण त्याचा आक्षेप आहे? असा प्रश्न आव्हाडांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे... त्याला म्हणावं त्याच्यापेक्षा बॅनची मागणी कर ना, आता रामगिरी बाबाचं अती होत चाललं आहे असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केल आहे.

Kalyan-Dombivli: कल्याण-डोंबिवलीसाठी 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता, 27 गावांना दिलासा

https://www.lokshahi.com/news/kalyan-water-pipeline-rs-357-crore-water-supply-scheme-approved-for-kalyan-dombivli-relief-for-27-villages

हिवाळी अधिवेशनात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, यांनी 27 गावातील पाणी प्रश्नावर लक्ष देत सातत्याने पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांना पाणी प्रश्न सोडविण्याबाबत विनंती केली होती, तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश मोरे, यांनी 27 गावात पाणी पुरवठा वाढवावा असे सांगितले होते. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमृत योजने'अंतर्गत कल्याण-डोंबिवली शहरासाठी 357 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. यावेळी अमृत योजनेचे प्रोजेक्ट मॅनेजर चेतन मोरे, हेही उपस्थित होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने अखेर याला यश आले. या योजनेला मान्यता मिळाल्याने कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट 27 गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार असून 105 दलघमी साठवण क्षमता देखील निर्माण होणार आहे. 27 गावातील वाढीव पाणी पुरवठ्याबाबत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, व कल्याण ग्रामीण मतदार संघांचे आमदार राजेश मोरे, यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, याला यश आल्याने नागरिकांनी आभार मानले आहे.

Ajith Kumar Racing Accident Viral Video: तोल गेला अन्! दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार याचा रेसिंग दरम्यान भीषण अपघात

https://www.lokshahi.com/news/ajith-kumar-racing-accident-viral-video

दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार हा सध्या दुबई 24एच या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. ही रेसिंग स्पर्धा 11 जानेवारी रोजी होणार आहे. दुबई 24एच ही एक टीम रेसिंग स्पर्धा आहे. अजित आणि त्याच्या संघातील ड्रायव्हर फॅबियन डफीक्स, मॅथ्यू डेट्री (बेल्जियम) आणि कॅमेरॉन मॅक्लिओड (ऑस्ट्रेलिया) हे 992 क्लासमध्ये सहभागी होणार आहेत.

दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार याचा रेसिंग दरम्यानचा व्हिडीओ अजित कुमार यांच्या टीमने शेअर केला आहे. मंगळवारी त्यांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कार बॅरिअरला धडकते आणि चार ते पाच वेळा गोल फिरताना दिसत आहे त्यामुळे या अपघातात कारचा चक्काचूर झाला.180 च्या स्पीडने अजित कुमार रेसिंग करत असताना त्याचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार बॅरिकेटला धडकली. सुदैवाने अजित कुमार याला या अपघातात कुठलीही दुखापत झाली नाही आणि तो अपघात झालेल्या गाडीपासून दूर जाताना दिसत आहे. या अपघातात अभिनेत्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, या अपघातमुळे अभिनेता अजित कुमार याच्या चाहत्यांध्ये एकच खळबळ उडाली आहे. अजितने त्याच्या आगामी 'गुड बॅड अग्ली' चित्रपटातील त्याचे काम पूर्ण केले आहे. हा चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tejashri Pradhan Exit From Premachi Goshta: तेजश्री प्रधानचा 'मुक्ता' पात्राला राम राम! "ही" अभिनेत्री करणार प्रेमाची गोष्टमध्ये एन्ट्री

https://www.lokshahi.com/entertainment/tejashri-pradhan-exit-from-premachi-goshta

स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला युवकांपासून ते वयस्करांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचा चाहतावर्ग मिळाला आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रासह ही मालिका प्रत्येकाच्या आवडीची ठरली आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान, शुभांगी गोखले, राज हंचनाळे तसेच अपूर्वा नेमळेकर आणि संजीवनी जाधव यांसारखे रुजलेले कलाकार पाहायला मिळत आहेत. या कलाकारांच्या जबरदस्त पात्रासह त्यांचा तगडा अभिनय या मालिकेला उत्कृष्ट बनवत आहे. मालिकेत येणारे वेगवेगळे ट्विस्ट या मालिकेची लोकप्रियता वाढवतात त्यामुळे या मालिकेचा चाहतावर्ग ही मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे. या मालिकेतून सर्वात आधी मिहीका हे पात्र साकारणारी मृणाली शिर्के हीने 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून निरोप घेतला आणि तिच्या जागेवर अमृता बने ही मिहीका हे पात्र साकारताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर तिचा हळूहळू प्रेक्षकांनी स्विकार केला आणि मालिकेचा टीआरपी पुन्हा एकदा वर आला आणि टीआरपीमध्येही या मालिकेचे स्थान टॉप 5 मध्ये राहिले आहे. सगळं काही सुरळीत चालत असताना या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे. या मालिकेत 'मुक्ता' हे मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधानने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले. सुरुवातीपासून तेजश्रीच्या कमबॅकमुळे ही मालिका चर्चेत आली होती. मात्र, आता तिच ही मालिका सोडत असल्यामुळे मालिकेचा टीआरपी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण, मुक्ता हे पात्र तेजश्री प्रधानने प्रेक्षकांच्या मनात चांगलचं रोवल होत. मात्र आता तिच्या जागेवर 'स्वरदा ठिगळे' ही मुक्ता हे पात्र साकारणार आहे, दरम्यान तिला देखील प्रेक्षक मुक्ताच्या पात्रात स्विकारणार का? असा महत्त्वाचा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.

तेजश्रीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे शिवाय तिने स्टोरी देखील ठेवली आहे ज्यात तिने लिहलं आहे की, 'आज घेतलेला योग्य निर्णय तुमच्या भविष्याला आकार देतो, तसेच पोस्टमध्ये तेजश्रीने लिहलं आहे की, "चिअर्स !! कधीकधी तुम्हाला बाहेर पडावे लागते, तुमची लायकी जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण तुमच्यासाठी असे कोणीही करणार नाही".

Gadchiroli: गडचिरोलीत 2 जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, दोन्ही नक्षलींवर 8 आणि 2 लाखांच इनाम

https://www.lokshahi.com/video/gadchiroli-2-fierce-female-naxalites-surrender-in-gadchiroli-rewards-of-rs-8-and-rs-2-lakhs-on-both-naxalites

नक्षलविरोधी अभियानात गडचिरोली पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय... त्यातील एक नक्षलवादी श्यामला हिच्यावर 8 लाखांचे तर काजलवर 2 लाखांचे इनाम होते... गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ समोर त्यांनी आत्मसमर्पण करून नक्षल चळवळीचा त्याग केला. नक्षलविरोधी अभियानात गडचिरोली पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केले. त्यात कंपनी क्रमांक 10 ची सेक्शन कमांडर श्यामला झुरु पुडो ऊर्फ लीला आणि भामरागड दलम सदस्य काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी यांचा समावेश आहे. श्यामला हिच्यावर 8 लाखांचे तर काजलवर 2 लाखांचे इनाम होते. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ समोर त्यांनी आत्मसमर्पण करून नक्षल चळवळीचा त्याग केला.

"एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक…"

Deepika Padukone On SN Subrahmanyan: L&T कंपनीच्या चेअरमनच्या 'त्या' वक्तव्यावर दीपिका संतापली, म्हणाली एवढा मोठा माणूस असं बोलतोय...

https://www.lokshahi.com/news/deepika-padukone-on-sn-subrahmanyan

अभिनेत्री दीपिका पादुकोण कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येताना दिसते ती अनेकदा ‘टॉक्सिक वर्क कल्चर’ आणि ‘वर्क-लाइफ बॅलेन्स’म्हणजेच काम आणि आयुष्य यांच्यातील समतोल या विषयांवर नेहमीच मोकळेपणे व्यक्त होते. यावेळी दीपिकाने थेट एल अँड टी या कंपनीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी केलेल्या वक्तव्यावर तडकाफडकी प्रतिक्रिया दिली आहे, तिने तिच्या सोशल मीडिया स्टोरीद्वारे त्यांनी केलेल्या 'माझ्या कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावं असं मला वाटतं', या वक्तव्यावर नाराजी दाखवली आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करण्याचा सल्ला देणारे लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांचे वार्षिक वेतन कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा 500 पट अधिक आहे अशी माहिती मिळाली आहे. मात्र सुब्रह्मण्यन यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर अनेक जण कमेंट करत आहे. सुब्रह्मण्यन यांच्या या विधानामुळे पुन्हा वर्क लाईफ बॅलेन्सचा मुद्दा चर्चेत आला आहे.

एल अँड टी कंपनीचं स्पष्टीकरण-

लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांच्याकडून एक स्पष्टीकरण करण्यात आलं आहे, त्यांनी कर्मचाऱ्यांना दररोज काम करायला लावण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांनी असं म्हटलं आहे की, माझ्या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावं... देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला सत्यात उतरवण्यासाठी सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे. एल अँड टीमध्ये राष्ट्राची उभारणी हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. आठ दशकांहून अधिक काळ आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, उद्योग आणि तांत्रिक क्षमतांना आकार देत आहोत. हे भारताचं दशक आहे असं आम्हाला वाटतं. पुढे ते म्हणाले आहेत की, रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप आहे... जर मी तुम्हाला रविवारी काम करायला सांगितले, तर मला जास्त आनंद होईल, कारण मी देखील रविवारी काम करतो.... घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या बायकोला किती वेळ देणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा. त्यांच्या याच वक्तव्यावर आता उद्योगती हर्ष गोयंक, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि बॅटमिंटन ज्वाला गुट्टानेही प्रतिक्रिया दिली आहे.

याचपार्श्वभूमीवर दीपिका पादुकोणने तिची प्रतिक्रिया तिच्या सोशल मीडिया स्टोरीला पोस्ट केली आहे. दरम्यान दीपिका म्हणाली की, एवढ्या वरिष्ठ पदांवर असलेल्या लोकांना असं विधानं करताना पाहून धक्का बसतो, त्याचसोबत तिने मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं असं हॅशटॅग देत त्यांच्यावर फटकेबाजी केली आहे.

Sudhir Mungantiwar: जनतेच्या हितासाठी एकत्र येणे महत्त्वाचे, मविआवर मुंनगटीवारांच परखड विधान

https://www.lokshahi.com/news/sudhir-mungantiwar-collective-results-for-ones-own-benefit-mutiwarchakhad-statement-on-mavia

त्याठिकाणी माननीय जे.पी.नड्डा, अमित शाहा त्याचसोबत नितीन गडकरी हे तीन प्रमुख उपस्थित राहणार आहेत. जवळजवळ 15 हजार कार्यकर्ता महाराष्ट्रातून येतील. एक संदेश घेऊन जातील, आमची संघटना ही केवळ निवडणुक जिंकण्याचं मशीन नसलं पाहिजे.... ही लोकांची मन जिंकणारी संघटना असली पाहिजे... निवडणुकीत कधी हार होते कधी जीत होते पण जिंकण असो किंवा हरणं त्यात मी किंचित देखील भयभीत नाही अशी मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये असावी... निवडणुक जिंकण आमचं लक्ष नाही, तर लोकांची मन जिंकण हे आमचं लक्ष आहे... त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या लोकांच्या मनापर्यंत पोहचल्या पाहिजे... त्यासाठी सदस्यता नोंदणी अभियान करतं महाराष्ट्रात दीड करोड सदस्यता करण्याचा पक्षाने विचार केला आहे... ते 1 करोड 50 लाख महाराष्ट्रातील शिवभक्तांना भाजपसोबत जोडण्याचा जो कार्यक्रम सुरु आहे त्याच्याबद्दल विश्लेषण होईल...

ज्यावेळेस तुम्ही विचाराने एक न येता केवळ सत्तेसाठी एक होता, विश्वास घात करण्यासाठी एकत्र येता, कोणाला तरी अद्दल घडवण्यासाठी एक येत असाल, तर तुम्ही जास्त दिवस एक नाही राहु शकत... जर तुम्ही जनतेच्या हितासाठी एकत्र येत असाल, अशा वेळेस जनतेच्या हितात तुमचं हित हे महत्त्वपुर्ण नसतं.. आणि जर तुम्ही कोणाला तरी अद्दल घडवण्यासाठी एकत्र आला असाल, तर तुमचं हित महत्त्वपुर्ण होऊन जात....

Suresh Dhas: 'मुन्नी' ट्विस्टवर सुरेश धसांनी दिली हिंट, राष्ट्रवादीच्या मुन्नीचं कोडं सुटलं?

https://www.lokshahi.com/news/suresh-dhas-suresh-dhas-gave-a-hint-on-the-ncps-munni

बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबरला हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. जातीयवादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात होता. यादरम्यान राजकीयवर्तुळात खळबळ माजली होती. बीड प्रकरणाचा मोर्क्या वाल्मिक कराड याला अटक करावी यासाठी अनेक मोर्चे काढले जात होते. तो वाल्मिक कराड अखेर आज पुणे पोलिसांना शरण आला आहे. याचपार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी बीड प्रकरणी अनेक मोर्चे देखील केले. याचपार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे राजीनामा देत नसल्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'क्या हुआ तेरा वादा' असे म्हणतं लक्ष्य केले. यानंतर त्यांनी अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण ही बालवाडीतील पोरं आहेत असा उल्लेख या दोघांवर केला. आता त्यांनी बडी मुन्नीचा उल्लेख केला आहे. मात्र ही मुन्नी कोण असा प्रश्न सर्वत्र पडला होता याबद्दल आता सुरेश धस यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान सुरेश धस म्हणाले होते की, सुरेश धस म्हणाले की, राष्ट्रवादीतील मुन्नी ही पुरुष आहे, ती कोणी महिला भगिनी नाही, आणि मी ज्या मुन्नीला बोललो आहे तिला हे 100% कळालेलं आहे. फक्त ती अजून बाहेर आलेली नाही... मुन्नीने बाहेर येऊ द्या, मुन्नी अगोदरचं बदनाम झालेली आहे. असं म्हणत पुढे धस म्हणाले की, "मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए" असं म्हणत धस यांनी या मुन्नीवर घणाघाती टिका केली आहे. पुढे धस म्हणाले की, ही जी डार्लिंग आहे या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे माझ्याकडे आहेत, असं सुरेश धस म्हणाले. राष्ट्रवादीतील बडी मुन्नी आणि बदनाम मुन्नीने समोर येऊन बोलावे मग मी बघतो, असे म्हणत पुढे धस म्हणाले की, मिटकरी आणि चव्हाण यांचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच आहे, हेच धस यांनी सूचित केले.

Balashaheb Thackeray Smarak: या वास्तुसोबत आम्ही भावनात्मक बंधनामध्ये जोडलेलो आहे- उद्धव ठाकरे

https://www.lokshahi.com/news/balashaheb-thackeray-smarak-we-are-emotionally-connected-to-this-structure-uddhav-thackeray

पुढच्या 23 जानेवारीपासून शिवसेनाप्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरु होईल. आम्ही पुढील 2026 च्या 23 नेवारी आधी हे स्मारक लोकांच्या चरणी आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरणा देणारं स्मारक होईल. श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही, अशी मोठी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांच स्वागत करत ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, गेले काही वर्ष या स्मारकाचं काम चालू आणि चर्चा पण सुरु आहे. मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट कारण हे काम आता खुप छान वाटत आहे पण करण खुप कठीण होत. देसाई साहेब आणि आदित्य या दोघांनी या जागेचं महत्त्व सांगितलं. योगायोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारकही बाजूलाच आहे. पण या जागेतलं आव्हान म्हणजे महापौर बंगला. ही जागा नुस्ती वास्तू नसून आमच्याठी भावनात्मक बंधन जोडलेली आहे. आतापर्यंत शिवसेनाप्रमुखांच्या अनेक बैठका इथे झाल्या आहेत. तसेच युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत. हा महापौर बंगला हेरिटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं हे फार महत्त्वाचं आणि खूप कठीण होतं. त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं खूप कठीण होतं".

Aaditya Thackeray On Viral Video: ठाकरेंची बदनामी करणारा व्हिडीओ वायरल, आदित्य ठाकरे करणार कारवाई

https://www.lokshahi.com/video/aaditya-thackeray-on-viral-video-video-defaming-thackeray-goes-viral-aditya-thackeray-will-take-action

ठाकरेंची बदनामी करणारा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये असणारे हॉटेल ठाकरेंचे आहे असा दावा यापोस्टमध्ये करण्यात आला आहे. याबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी विनायक राऊत पोलिस ठाण्यामध्ये पोहचलेले होते. यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याचपार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले की, मी पण पाहिलं की कुठुन तरी कोण तरी वर येत आणि खाली जात आहे, याचा संबंध काय? मी पण यासंबंधी सायबरसेलमध्ये गुन्हा दाखल करणार आहे... कारण असे फाल्तू चाळे कोणी तरी करत असतं, कोणाचं तरी नाव चिटकवायचं कोणाची तरी बदनामी करायची... ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्याने समोर येऊन बोलावं, कोणाची तरी व्हिडिओ घ्यायची ती सोशल मीडियवर टाकाची आणि कोणाची बदनामी करायची हे अशे चाळे एकच पक्ष करतो आणि निवडणुक जिंकण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही नक्कीच याविषयी चौकशी करु आणि तक्रार देखील करु, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे.

Washim: वाशिममध्ये 1 कोटी 15 लाख लंपास! 24 तासात दोन आरोपींना अटक

https://www.lokshahi.com/lokshahi-crime/washim-1-crore-15-lakhs-looted-in-washim-two-accused-arrested-in-24-hours

वाशिम शहरातील विठ्ठल कृषी मार्केटमधील 2 कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला करून 1 कोटी 15 लाख रुपये लंपास केल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. याप्रकरणी तातडीने तपास करून पोलिसांनी अवघ्या 24 तासात दोन सख्ख्या भावांना अटक केलीये. विजय गोटे आणि संजय गोटे असं अटक केलेल्या दोघा भावांचे नाव असून ते वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथील रहिवासी आहेत. आरोपीच्या घरातून एक कोटी दोन लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून. उर्वरित तेरा लाख रुपये आणि आणखी काही आरोपींचा पोलीस तपास करत आहेत.

याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या या चोरीचा छडा लावण्यासाठी वाशिम सह अकोला आणि यवतमाळ इथल्याही पोलिसांच्या टीम गठीत करून सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अटक केल्याचं सांगितलंय.....

काल भावेश बाहेती यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना, विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बायस यांना, HDFC बँकेमधून १ कोटी रुपये आणि दुसऱ्या ठिकाणाहून १५ लाख रुपये गोळा करून मार्केटकडे आणण्याची जबाबदारी दिली होती. स्कूटरवरून परतत असताना, हिंगोली रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी रॉड आणि शस्त्रांचा वापर करून दोन्ही कर्मचाऱ्यांना गंभीर जखमी करत रोकड भरलेली पिशवी लंपास केली.

Wardha: वर्ध्यात भीषण अपघात! अवैध दारूची वाहतूक जीवावर बेतली

https://www.lokshahi.com/lokshahi-crime/wardha-terrible-accident-in-wardha-illegal-liquor-transportation-claims-lives

भूपेश बारंगे वर्धा |

नागपूर जिल्ह्यातून सेलू येथे दुचाकीने अवैधरित्या दारू आणत असताना दुचाकीची अज्ञात वाहनाला धडक बसली या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा काही भाग चेंदामेंदा झालेला होता. ही घटना मध्यरात्री सुमारास घडली. वैभव हेमराज राऊत व आलोक संतलाल उईके दोघेही सेलू येथील रहवाशी असून अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. नागपूरवरून सेलू येथे अवैध रित्या दारूची वाहतूक करत असताना भरधाव वेगात दुचाकी असल्याने अपघात घडला.

यावेळी दुचाकीचा समोरील भाग चुराडा झाला. या अपघात मृत्यू पावलेले युवक अवैध दारू विक्री करत असल्याची माहीती आहे. नागपूर जिल्ह्यातून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करत असताना भरधाव वेगाने दुचाकी घेऊन येत असताना अपघात घडला. या अपघात दारूच्या शिष्याचा सडा रस्त्यावर पडला होता. त्यावरून अवैध दारू आणत असताना अपघात घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातात दारूच्या शिष्याचा सडा

मध्यरात्रीच्या सुमारास मोपेड वाहनाने दोघे जण नागपुर जिल्ह्यातून सेलू यथे अवैधरित्या देशी विदेशी दारू घेऊन जात असताना अपघात घडला या अपघातात दारूच्या शिष्या घटनास्थळी अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.

विना नंबरच्या दुचाकीवरून दारूची वाहतूक

पांढऱ्या रंगांची मोपेड विना नंबरची दुचाकीने अवैधरित्या दारूची वाहतूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.जिल्ह्यात दारूबंदी असताना बाहेरील जिल्ह्यातून रात्रीच्या सुमारास सर्रास दारूची वाहतुक केली जाते. यात विना नंबर चे वाहन वापरून दारूची वाहतूक केल्याचे या अपघातातून उघडकीस आले आहे.रात्रीच्या सुमारास विना नंबर वाहन मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावत असून यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.पोलिसांनी तात्काळ याकडे लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Cricketers Divorece: शिखर, हार्दिक अन् चहलनंतर आता 'या' क्रिकेटरच्या संसारात घटस्फोटाचं वादळ?

https://www.lokshahi.com/sports/cricket/manish-pandey-had-separated-from-his-wife-actress-ashrita-shetty

क्रिकेटविश्वात अनेक गोष्टी घटताना दिसत आहेत. भारतीय संघत नुकताचं ऑस्ट्रेलिया सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 ची मालिका खेळून झाले ज्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असून आता इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. यावेळी 5 टी20 आणि 3 वनडे अशी सामन्यांची मालिका दोन्ही संघामध्ये रंगणार आहे त्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. अशात भारतीय क्रिकेटर्सच्या आयुष्यात अनेक गोष्टी घटताना पाहायला मिळत आहे ज्यामध्ये अनेक खेळाडूंच्या संसारात घटस्फोटाचं वादळ आलं आहे. ज्यामध्ये शिखर, दिनेश कार्तिक, शामी, हार्दिक अन् नंतर चहलचा नंबर लागला. चहल आणि धनश्रीच्या वेगळं होण्याच्या बातम्या सुरुचं होत्या की आता आणखी एका भारतीय क्रिकेटरच्या संसारात घटस्फोट हा अडथळा आला आहे.

चहलनंतर आता भारतीय संघाबाहेर असलेला अनुभवी फलंदाज मनीष पांडे आणि त्याची पत्नी अभिनेत्री आश्रिता शेट्टी यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मनीष पांडेने पत्नी आश्रिता शेट्टीचे त्याच्या इन्स्टाग्रामवरून डिलिट केले आहेत. आश्रिता शेट्टीनेही तिच्या प्रोफाईलवरून मनीष पांडेचा फोटो काढून टाकले आहेत. एवढचं नाही तर दोघेही आता सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत नाहीत. आश्रिता आयपीएल दरम्यान अनेकदा स्टेडियममध्ये मनीषला पाठिंबा देण्यासाठी दिसली आहे. मात्र आयपीएल 2024 मध्ये ती मनीषला पाठिंबा देण्यासाठी दिसली नाही.

मनीष पांडेची क्रिकेटमधील आतापर्यंतची कारकिर्द

मनीष पांडे आणि अश्रिता शेट्टी हे दोघेही 2019मध्ये लग्नबंधनात अडकले. आश्रिता ही मुळची कर्नाटकातील असून ती तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करते. 2015 मध्ये भारतासाठी पदार्पण केले मात्र 2021 नंतर त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधीही मिळालेली नाही. 2009 मध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने शतक केले होते. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा मनीष पांडे हा पहिला भारतीय फलंदाज आहे. भारतासाठी त्याने 29 एकदिवसीय सामन्यांमध्ये 566 धावा केल्या. तसेच 39 टी-20 मध्ये 709 धावा केल्या आहेत.

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला का उडवली जाते पतंग? जाणून घ्या मागचं कारण

https://www.lokshahi.com/ampstories/web-stories/makar-sankranti-2025-why-are-kites-flown-on-makar-sankranti-know-the-reason-behind-it

मकर संक्रांत आली की पहिला आकाशात दिसतात ते म्हणजे रंगीबीरंगी पतंग.

या पतंग आकाशात उंचावर उडवल्या जातात.

संपुर्ण आकाश हे मकर संक्रांतीला सुंदर पंतगांनी व्यापुन गेलेले पाहायला मिळते.

मात्र मकर संक्रांतीलाच या पतंग का उडवल्या जातात माहित आहे का?

मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो, त्यामुळे शरीराला उर्जेची गरज असते.

त्यामुळे मकर संक्रांतला पतंग उडवण्यामुळे हात व पायांचा व्यायाम होतो.

त्यामुळे सूर्यप्रकाशात राहिल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते.

यामुळे सर्दी खोकला हे आजार होण्याची शक्यता कमी होते.

Breaking News Toores: टोरेस कंपनीच्या दादरच्या ऑफिसवर मुंबई पोलिसांचा छापा

https://lokshahi.com/video/breaking-news-toores-mumbai-police-raids-companys-dadar-office

टोरेस प्रकरणातील घोटाळ्यानंतर इंस्टाग्राम अकाउंटवर वारंवार त्याप्रकरणा संबंधित विडिओ अपलोड करणे सुरूच आहे. काल पुन्हा नवीन विडिओ अपलोड करण्यात आला आहे, आणि या व्हिडिओ मधून गुंतवणूक दारांना या प्रकरणातील दोषी लोकांची नावे जाहीर करण्यात आली आहे. टोरेस दुकानात लूटमार झाली असून ती लूटमार आणि दुकान तौफिक रियाझ याने प्लॅन करून लुटले असल्याचे सांगितले आहे. या टोरेस दुकानात काम करणारे ऐकून 49 लोकांची नाव देण्यात आली आहेत, आणि पुन्हा टोरेस कंपनी कडून नागरिकांना पैसे देणार असल्याचे आमिष देण्यात येत आहेत. टॉरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील 3 आरोपींना 6 जानेवारीला मुंबई सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं होतं. या सुनावणी दरम्यान तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही पोलीस कोठडी आज संपत असून आज पुन्हा या तिन्ही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अशातच टोरस कंपनी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडनं मुंबईतील टोरस कंपनीच्या कार्यालयावर आज पुन्हा एकदा पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली आहे. आजच्या छापेमारीमध्ये पोलिसांनी मोठमोठ्या बॉक्समध्ये काही डॉक्युमेंट्स, फाईल, लॅपटॉप, ज्वेलरी हे सगळं जप्त करून मोठमोठ्या बॉक्समधील कंपनीमध्ये असलेला मुद्द्यामाल जप्त केला आहे. मुंबईसह नवी मुंबई आणि इतर ठिकाणी टोरेज कंपनीच्या कार्यालय असलेल्या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई होत असताना पाहायला मिळत आहे.

Gujrat: गुजरातमध्ये लहान मुलांना मोबाईल बंदीचा प्रस्ताव; मोबाईलवर बंदी होणार?

https://www.lokshahi.com/video/gujrat-proposal-to-ban-mobile-phones-for-young-children-in-gujarat-will-mobile-phones-be-banned

गुजरात सरकारचा लहान मुलांना मोबाईल बंदीचा प्रस्ताव करण्यात आला आहे. लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालणाच्या गुजरात सरकारचा विचार. देशातल्या पहिल्या राज्याची लहान मुंलांच्या मोबाईल वापरावर मनाईचा विचार. मुलांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर परिणाम होत असल्यानं सरकार हा निर्णय लवकरच घेण्याच्या विचारात आहे. गुजरात सरकार याबाबत एक समिती बनवत आहे. मुलांना खेळ आणि वेगवेगळ्या एक्टव्हिटीमध्ये गुंतवण्यावर भर असेल. याबाबत गुजरातच्या शिक्षणमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. नुकताचं आपण पाहिलं तर बोहरा समाजाने देखील लहान मुलांसाठी मोबाईल बंदीचा निर्णय घेतलेला होता. ज्यानंतर या निर्णयाचा सर्वत्र स्वागत देखील करण्यात आला होता. 15 वर्षा खालील मुलांना मोबाईल वापरण्यात बंदी आणावी असा निर्णय बोहरा समाजाने घेतलेला होता.

Sanjay Raut On PM Modi: ते देवचं आहेत, मी त्यांना माणूस मानत नाही! राऊतांचा मोदींवर खोचक टोला

https://www.lokshahi.com/news/sanjay-raut-on-pm-modi-5

सध्या राजकीयवर्तूळात मविआ आणि महायुती या दोन्ही गटाकडून एकमेकांवर घणाघाती टीका केल्या जात आहेत. अशातच महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना म्हटलं आहे की, ते मुंबईसह नागपूरपर्यंत स्वबळावर निवडणूक लढणार. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमावायचे आहेच. आम्ही स्वबळावर लढणार आहोत, अशी घोषणा संजय राऊतांनी केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान देवच आहेत.. असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर टोलेबाजी केली आहे.

निखिल कामथ यांच्यासोबतचा पंतप्रधान मोदींचा कालचा पॉडकास्ट 'पीपल विथ द प्राईम मिनिस्टर' प्रसिद्ध झाला. दरम्यान पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होत की, मी देखील माणूस आहे माझ्याकडून पण चुका होऊ शकतात... माणसाच्या जीवनात चुका अपरिहार्य आहेत. मोदींनी केलेल्या या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे गटाते खासदार संजय राऊतांनी टोला लगावत मोदींवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, मी त्यांना माणूस मानत नाही, ते देवच आहेत.. देव हा देव असतो, एकदा जर हे घोषित केले की ते देवाचा अवतार आहेत तर मग ते माणूस कसे होती... ते विष्णूचे तेरावे अवतार आहेत, त्यांनी स्वतःच हे म्हटले होते... त्यांच हे म्हणं एकलं देखील होत सगळ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आता परत तेच म्हणत आहेत मी माणूस आहे... काही तरी गडबड आहे केमिकल लोचा आहे... असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान मोदींवर खोचक टोला लगावला आहे.

Suresh Dhas vs Ajit Pawar: मुन्नी कोण? दादांनाही माहित नाही; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?

https://www.lokshahi.com/news/suresh-dhas-vs-ajit-pawar-who-is-munni-even-dada-doesnt-know-who-owns-suresh-dhass-money

बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. जातीयवादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात होता. यादरम्यान राजकीयवर्तुळात खळबळ माजली होती. बीड प्रकरणाचा मोर्क्या वाल्मिक कराड याला अटक करावी यासाठी अनेक मोर्चे काढले जात होते. याचपार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी आता बडी मुन्नीचा उल्लेख केला आहे. मात्र ही मुन्नी कोण असा प्रश्न सर्वत्र पडला होता याबद्दल आता सुरेश धस यांनी इशारा दिला आहे. दरम्यान सुरेश धस म्हणाले होते की, सुरेश धस म्हणाले की, राष्ट्रवादीतील मुन्नी ही पुरुष आहे, ती कोणी महिला भगिनी नाही, आणि मी ज्या मुन्नीला बोललो आहे तिला हे 100% कळालेलं आहे. फक्त ती अजून बाहेर आलेली नाही... मुन्नीने बाहेर येऊ द्या, मुन्नी अगोदरचं बदनाम झालेली आहे. असं म्हणत धस यांनी या मुन्नीवर घणाघाती टिका केली आहे.

याचपार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान अजित पवार म्हणाले की, बडी मुन्नी कोण आहे हे त्यांना विचारा... अशा फालतू गोष्टी जर कोणी बोलत असेल, मी स्पष्ट नाव घेऊन बोलणारा आहे... त्यामुळे या सर्व प्रकाराबद्दल त्यांना विचारा कोण आहे ते... अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी केलं आहे.

Madhya Pradesh: लिव्ह-इन राहण तरुणीच्या जीवावर बेतल! दिल्लीनंतर आता मध्य प्रदेशात श्रद्धा प्रकरण 2.0

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर आता मध्य प्रदेशमध्ये श्रद्धा हत्याकांड 2.0 असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशातील दमोह येथे एका तरुणाने 10 महिन्यांपूर्वी त्याच्या लिव्ह-इन प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. शहरातील वीज गेल्यानंतर खोलीतून दुर्गंधी येत असताना ही हत्या उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. तसेच, या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची हत्या करणारा तरुण तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. प्रेयसी त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती. यामुळे आरोपी संयाजने नाराज होऊन असे पाऊल उचलले. आरोपी संजयने 10 महिन्यांपूर्वी त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली होती आणि तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवून पळून गेला होता. पोलिसांनी आरोपी संजय पाटीदारला उज्जैन येथून अटक केली आहे.

पोलिसांच्या चौकशीनंतर असं समोर आलं की, जुलै 2023 मध्ये आरोपी संजय पाटीदार हा मध्य प्रदेश येथील दमोह येथे भाड्याने राहत होता. यानंतर शेजाऱ्यांनी सांगितले की, मार्च 2024 पासून प्रतिभाला कोणीही पाहिले नव्हते. शेजारी विचारल्यावर संजय सांगायचा की पिंकी तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, ​​प्रतिभा प्रजापती ही उज्जैनमधील संजय पाटीदार यांच्यासोबत घरात राहत होती. त्यानंतर त्याने 2024 मध्ये घर रिकामे केल आणि त्यावेळेस घरमालकाला सांगितले होते की, माझे काही सामान या खोलीत ठेवले आहे, त्यामध्ये फ्रीज देखील आहे. शहरातील वीज गेल्यानंतर खोलीतून दुर्गंधी येत असताना ही हत्या उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

Makar Sankranti 2025: महाराष्ट्रासह 'या' राज्यात देखील पाहायला मिळतो मकरसंक्रांतीचा उत्साह

https://www.lokshahi.com/ampstories/web-stories/makar-sankranti-2025-the-enthusiasm-of-makar-sankranti-can-also-be-seen-in-this-state-along-with-maharashtra

महाराष्ट्राप्रमाणे इतर ही राज्य आहेत ज्याठिकाणी मकरसंक्रांतीचा जल्लोष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मकरसंक्रांतीला 'पोंगल' किंवा भोगी म्हणून ओळखले जाते.

तामिळनाडूमध्ये पोंगल हा सण तीन दिवस साजरा केला जातो.

तसेच गुजरातमध्ये मकरसंक्रांतीला 'उत्तरायण' म्हणून ओळखले जाते.

उत्तर प्रदेश येथे मकरसंक्रांतला 'सकरात' असं म्हटलं जातं.

या दिवशी तेथे लोक गंगेमध्ये स्नान करतात. यावर्षी प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आले आहे.

पंजाबमध्ये 'लोहारी' म्हणून मकरसंक्रांत साजरी केली जाते.

पंजाबमध्ये रब्बी पिकांच्या कापणीशी हा सण संबंधित आहे.

Yuvraj Singh Retired: विराटमुळे युवराजची निवृत्ती? भारताच्या माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान

https://www.lokshahi.com/sports/cricket/yuvraj-singh-retired-yuvrajs-retirement-due-to-virat-sensational-statement-by-former-indian-cricketer

भारतीय क्रिकेटर्समध्ये अनेक चर्चांना उधाण आल्यांच पाहायला मिळत आहे, अशातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने एक खळबळजनक विधान केले आहे. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत उथप्पा म्हणाला की, विराट कोहलीने युवराज सिंगला निवृत्ती घेण्यास भाग पाडले. यामुळे विराटच्या चाहते्यांची माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्यावर नाराजी पाहायला मिळत आहे. 2007 च्या टी 20 विश्वचषकाच्या भारतीय संघातही युवराज सिंग होता. ज्यावेळेस 2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता त्यावेळेस युवराज सिंगने फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये स्वतःचे पुरेपुर योगदान देत 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता. मात्र यानंतर युवराज कॅन्सर सारख्या आजाराला समोरा जात होता.

याचपार्श्वभूमीवर आता लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत उथप्पा म्हणाला की, कॅन्सरसारख्या आजाराशी लढल्यानंतर युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅक करणार होता. जेव्हा विराट कोहली संघाचा कर्णधार होता, तेव्हा युवराज सिंगाला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. विराटने त्याला सपोर्ट केला नाही. युवराजने फिटनेस चाचणीच्या स्तरांमध्ये दोन गुणांची सवलत मागितले होते मात्र विराटने त्याची ती विनंती फेटाळली... मात्र दोन गुणांची सवलत न मिळाल्यानंतरही युवराजने फिटनेस टेस्ट पास केली. त्याला संघात घेण्यात आले. पण एका सामन्यात युवराजचा फॉर्म खराब झाला आणि त्यामुळे विराट कर्णधार असल्यामुळे विराटच्या मतानुसार त्याला बाजूला करण्यात आले. ज्यामुळे पुढे त्याला कमबॅक करण्याची संधी देखील मिळाली नाही, असं वक्तव्य रॉबिन उथप्पा याने केलं आहे.

Los Angeles Wildfires: लॉस एंजेलिसमध्ये विनाशकारी अग्नितांडव! 288 कोटींचा बंगला जळून खाक

अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील सहा जंगलांमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. ही आग कॅलिफोर्निया रहिवासी भागातही पोहोचली आहे. या दुर्घटनेत पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आणि 1 हजार 100 हून जास्त इमारती जळून खाक झाल्या आहेत. तर एक लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. या आगीचा फटका 27 हजार एकर क्षेत्रफळाला बसला असून जंगल वाचवण्यासाठी हजारो हात झटत आहेत. या अग्नीतांडवात 52 बिलीयन अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं आहे. त्याचसोबत अमेरिकेतल्या लॉस एजेलीसला महाभयानक अगीचा विळखा घातला असून या आगीत हजारो घर आणि हजारो हेक्टर जंगल जळून खाक झाले आहेत. या भागात सोसाट्याचा वारा वाहत असल्याने आग विझविण्याचं काम अधिक अवघड झालं आहे. या वाऱ्यामुळे जंगलांना आग लागताच ती पसरत गेली.

त्याचसोबत अमेरिकेतली लॉस एंजेलिस शहरात लागलेल्या भयंकर आगीमुळे एक आलीशान घर आगीत जळतानाचा व्हिडीओ सोशव मीडियावर व्हायरल झाला आहे. अमेरिकेतील ऑनलाइन रिअल इस्टेट मार्केटप्लेस Zillow वर हे घर 35 मिलीयन डॉलर्स म्हणजे भारतात ते अंदाजे २८८ कोटी एवढ्या किमतीला विकत घेण्यासाठी उपलब्ध होते. मात्र लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या विनाशकारी आगीने या घराला पुर्णपेणे वेळखा घातला आणि हे घर या वणव्यादरम्यान जळून खाक झाले आहे.

Ajit Pawar On Walmik karad: कराडच्या फोटो प्रकरणावरून दादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

https://www.lokshahi.com/news/ajit-pawar-on-walmik-karad-dadas-advice-to-workers-on-karads-photo-issue

यावेळी अजित पवारांनी वाल्मीक कराड यांच्या राजकीय नेत्यांच्या सोबत असलेल्या फोटो प्रकरणावरून भाष्य केलं, वाल्मीक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. तसेच याची आम्हाला मोठी किंमत देखील मोजावी लागते असे देखील अजित पवार म्हणाले असून पुढे ते नर्मदा किसन ऍग्रो उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, आम्हाला याची किंमत मोजावी लागते,कार्यकर्त्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे.. सध्या राजकारण काय चाललं आहे ते पहा सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो त्यामुळे सगळं आकरीतच घडत आहे. त्यामुळे कदाचित कोणाचा चुकीचा फोटो माझ्यासोबत आला, तर ते मला माहिती नव्हतं, तो चुकून काढला आहे असं मी सांगेल असं अजित पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले की, त्यामुळे आम्ही पोलिसांना देखील सूचना दिल्या आहेत, दोन नंबर वाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा, असे म्हणत अजित पवारांनी वाल्मीक कराडच्या फोटो प्रकरणावरून कार्यकर्त्यांना सल्ला दिला.

पुढे अजित पवार म्हणाले की, अलीकडे गर्दी वाढत आहे, सगळ्यांना आमच्या सोबत फोटो काढायचा असतो, पण फोटो नाही काढून दिला तरी नाराज होतात, आणि गडी बदलला असे म्हणतात, आणि अशातच एखादा नवीन गडी येतो, फोटो काढून जातो आणि वाटच लागते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढताय याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांनी द्यावी असा सल्ला देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला...

Makar Sankranti 2025: यंदा मकर संक्रांतीला 'या' रंगाचे कपडे घालू नका, कारण...

मकर संक्रांत काही दिवसांवर आली आहे.

यादिवशी मुलं उंच आकाशात रंगीबेरंगी पंतग उडवतात.

मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.

याशिवाय हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगांची साडी नेसणे देखील शुभ आहे.

मात्र यावर्षी संक्रांत ही पिवळ्या कपड्यावर आल्याने या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नका.

त्यामागचं कारण असं की, यंदा देवीनं पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे.

देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तर देवी कुमारीका आहे.

तसेच देवीने पिवळं वस्त्र परिधान करत हातात गदा आणि केशरी टिळा लावलेला आहे.

Tiku Talsania Health Update: टिकू तलसानिया यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट! तो हृदयविकाराचा झटका नव्हता, तर...

https://www.lokshahi.com/entertainment/tiku-talsania-health-update

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते टिकू तलसानिया हे सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चेत येताना दिसत आहेत. टिकू तलसानिया एका सिनेमाच्या स्क्रीनिंगला गेले होते. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितल. टिकू यांची पत्नी दीप्ती तलसानिया यांनी आता टिकू तलसानिया यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. टिकू तलसानिया यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याची माहिती समोर आली आहे.

टिकू तलसानिया यांनी हिंदी तसेच गुजराती चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. टिकू तलसानिया हे एक विनोदी अभिनेता असून त्यांनी सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानसोबत काम केलं आहे. त्यांचे 'कुली नंबर 1' , 'राजा हिंदुस्तानी', 'जुडवा', 'देवदास', 'अंदाज अपना अपना', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'हंगामा', 'धमाल' यांसारख्या गजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी 250 हुन अधिक सिनेमांमध्ये काम केलं असून त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.

Rohit Sharma BCCI Meeting: BCCIच्या बैठकीत रोहितचं मोठ विधान! कर्णधारपदावरून होणार बाजूला?

https://www.lokshahi.com/sports/cricket/rohit-sharma-in-bcci-meeting

नुकत्याच झालेल्या बॉर्डर - गावस्कर ट्रॉफी स्पर्धेमध्ये रोहितची कामगिरी चांगली पाहायला मिळाली नाही. ज्यामुळे त्याच्यावर मोठ्याप्रमाणात टीका केल्या जात होत्या.या सिरीजमध्ये रोहित शर्माकडून कर्णधारपदाची जबाबदारी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपेक्षा केल्या जात होत्या. मात्र, तो त्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी अपुरा ठरला. या सिरीजमधील पहिला सामना जिंकूनही टीम इंडियाला पुढच्या चार सामन्यांमध्ये तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टेस्ट सामन्यात रोहितने 5 डावात फलंदाजी केली पण त्याला केवळ 31 धावा करता आल्या. अशा परिस्थितीत त्याला सिडनी टेस्टमधून वगळलं गेलं होत. ज्यामुळे क्रिकेटप्रेमींकडून त्याच्या खेळीवर नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान 11 जानेवारीला मुंबईत बीबीसीआयची बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांना बीसीसीआयने अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. ज्यामध्ये रोहितने त्याच्या कर्णधारपदाबद्दल आपले मत मांडले आहे. रोहित शर्मा म्हणाला की, मी आता काही काळच कर्णधार राहीन त्यामुळे मी बराच काळ टीम इंडियासोबत नसणार आहे, तोपर्यंत पुढील कर्णधाराचा शोध घ्यावा... कर्णधारपदासाठी तुम्ही केलेल्या आगामी निवडीला माझा पुर्ण पाठिंबा असेल.. असं मत रोहितने यावेळी मांडले आहे तर रोहितनंतर आता भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार हा विषय चर्चेचा ठरला आहे.

Devendra Fadnavis: श्रद्धा सबुरीचा मंत्र ज्यांना समजला ते यशस्वी झाला, नाही समजले ते...

विधानसभेच्या निवडणुकीत भाजप पक्षाला घवघवीत यश मिळाले त्यानंतर, आता भाजपाचं शिर्डीत महाअधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्याचसोबत राज्यातील सर्व भाजप नेते हे देखील उपस्थित आहेत. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर 'ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला आपण पाहिलं', असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला.

मला अतिशय आनंद आहे कारण हे महाअधिवेशन आपण शिर्डीमध्ये घेतलं... कारण, आपल्या सगळ्यांना माहित आहे की, साई बाबांनी आपल्याला एक मंत्र दिला आहे, तो म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा... श्रद्धा आणि सबुरीचा आपल्या भाजप पक्षात सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे. राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि स्वतः शेवटी म्हणजे सबुरी आहे.. हा मंत्र आपल्या जीवनात आपण सगळे सातत्याने पाळत असतो... ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले आणि ज्यांना समजला नाही त्यांची हालत बुरी झाली... हे आपण विधानसभा निवडणुकीत पाहिले आहे... मकर संक्रमण संपून महाकुंभाचे अमृत प्राप्त करण्यासाठी हजारो लोक एकत्रित येणार आहेत,अशावेळी महाविजयाचा आनंद आपण साजरा करत आहोत... महाराष्ट्रातील जनतेने तीनवेळा १००पेक्षा जास्त जागा एकट्या भाजपला दिल्या...गेल्या ३० वर्षांच्या इतिहासात सलग तीनवेळा १००हून अधिक जागा जिंकणारा भाजप एकमेव पक्ष आहे... गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगढ यांसोबत महाराष्ट्राने सलग तीनवेळा जिंकण्याची किमया केली आहे

Sharad Gore: सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे, मराठी साहित्यातील अतुलनीय योगदानासाठी चेन्नई येथे सन्मानित

https://www.lokshahi.com/entertainment/renowned-writer-sharad-gore-honoured-in-chennai-for-his-unparalleled-contribution-to-marathi-literature

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिध्द साहित्यिक शरद गोरे यांना Southwestern American University च्या वतीने मराठी साहित्य केलेल्या अतुलनीय योगदाना बद्दल त्यांना मानद डॉक्टरेट उपाधीने चेन्नई येथे सन्मानित करण्यात आले. गेली ३२ वर्ष श्री गोरे हे साहित्य संवर्धनाचे कार्य करीत आहेत, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने त्यांच्या नेतृत्वात १८० साहित्य संमेलन यशस्वीपणे आयोजित केली आहेत.

त्यांच्या 'सूर्या एक प्रेरणादायी प्रवास' या मराठी चित्रपटाने कान्स बर्लिन सारख्या जगविख्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पारितोषिकावर आपली विजयी मोहर उमटवली आहे. तर 'धर्माची दारू जातीची नशा' या नाटकाचे व महापुजेची उतर पुजा, अन्नदान की पिंडदान, बर्हिवासा पंखातलं आकाश आदी लघुचित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. गोरे संपादक असलेल्या युगंधर प्रकाशन या संस्थेच्या वतीने आजवर १४४ दर्जेदार ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. शिवव्याख्यानासह विविध विषयावर त्यांनी २ हजाराहून अधिक व्याख्याने महाराष्ट्रात दिली आहेत. तसेच महाराष्ट्र गौरव सह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

इतकी संमेलनं आयोजित करणारे ते साहित्य विश्वातील एकमेव व्यक्ती असून हजारो साहित्यिकांना त्यांनी आजवर विचारपीठ मिळवून दिले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचा त्यांनी मराठी काव्य अनुवाद केला असून इतर ९ ग्रंथाचे विपुल लेखन केले आहेत. रणांगण एक संघर्ष ,उषःकाल, प्रेमरंग, एैतवी, सूर्या एक प्रेरणादायी प्रवास, फुल टू हंगामा आदी मराठी चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे व गीतलेखन व संगीत देखील दिले आहेत.

Mumbai Metro: मेट्रोच्या मार्गिकांवरील नियमित संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र

https://www.lokshahi.com/news/mumbai-metro-safety-certificate-for-regular-operation-on-metro-lines

मेट्रो वेग वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्गिकांवरील नियमित संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल आहे. 'दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो 2अ' आणि 'दहिसर - गुंदवली मेट्रो' मार्गिकांवरील मेट्रो गाड्या आता सुसाट चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे... या दोन्ही मार्गिकांवरील नियमित संचालनासाठी रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस), नवी दिल्ली यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील मेट्रा गाड्या ताशी 50 ते 60 किमीऐवजी ताशी 80 किमी वेगाने धावणार आहे...

दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ' आणि 'दहिसर - गुंदवली मेट्रो 7' मार्गिकांवरील मेट्रो गाड्या आता सुसाट चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही मार्गिकांवरील नियमित संचालनासाठी रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस), नवी दिल्ली यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील मेट्रा गाड्या ताशी 50 ते 60 किमीऐवजी ताशी 80 किमी वेगाने धावणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) 337 किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील 'मेट्रो 2 अ' मार्गिका 18.6 किमी लांबीची असून यात 17 स्थानकांचा समावेश आहे. तर 'मेट्रो 7' मार्गिका16.5 किमी लांबीची असून यावर एकूण स्थानकांचा 13 समावेश आहे. या दोन्ही मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल 2022 मध्ये, तर दुसरा टप्पा जानेवारी 2023 मध्ये वाहतूक सेवेत दाखल आणि या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या.

या दोन्ही मार्गिकांना आता हळूहळू मुंबईकरांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. आजघडीला या दोन्ही मार्गिकांवरून अडीच लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. आतापर्यंत या मार्गिकांवरून 15 कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. अतिवेगवान आणि सुकर, सुरक्षित प्रवासामुळे मेट्रोला प्रवाशांची पसंती मिळते.मुंबईकरांना शाश्वत, पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.

या दोन्ही मेट्रो मार्गिकांना नियमित संचालनासाठी प्रमाणपत्र मिळणे ही एक मोठी उपलब्धी असून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर हे प्रमाणपत्र म्हणजे 'एमएमआरडीए'च्या वचनबद्धतेचा दाखला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या प्रमाणपत्रामुळे आता मेट्रो गाड्यांचा वेग वाढेल, असा विश्वास महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला

Mumbai Local: मुंबई पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे झाले हाल...

मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं पहायला मिळालं आहे. आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक होता, त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या होत्या, त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. त्याचबरोबर विरार, नालासोपारा, भाईंदर, मिरा रोड आणि इतर स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत होती. मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात असुविधा सहन करावी लागली. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. गाड्या रद्द झाल्याने प्रवाशी, कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला. रेल्वे प्रशासनाने सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत जलद मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला होता. या ब्लॉकदरम्यान, जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गांवर वळवण्यात आल्या होत्या. परिणामी, काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर अंधेरी आणि बोरीवलीदरम्यान चालणाऱ्या काही गाड्या गोरेगावपर्यंतच मर्यादित होत्या.

Suhas kande: सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाकडून वेटरला धाक, पोलिसांकडून तपास सुरु

https://www.lokshahi.com/lokshahi-crime/suhas-kande-suhas-kandes-bodyguard-threatens-him-with-a-gun-police-start-investigation

नाशिकच्या नाशिक रोड रेल्वेस्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना जिल्ह्यातील एका आमदाराच्या अंगरक्षकाने शासकीय रिव्हॉल्व्हर ताणून हॉटेलच्या वेटरला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. विशाल झगडे असं ह्या अंगरक्षकाचं नाव आहे. विशाल झगडे वर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. विशाल झगडे हा नाशिक ग्रामीण पोलिसात आमदार म्हणून कार्यरत आहे. सागर निंबा पाटील यांच्या फिर्यादी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक रोड येथील हॉटेल रामकृष्णमध्ये ते व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी (ता. १०) रात्री साडेबाराच्या सुमारास ते हॉटेलमध्ये असताना संशयित पोलिस विशाल झगडे हा हॉटेलमध्ये दोन साथीदारांसह जेवण करण्यासाठी आला होता. त्याने हॉटेलमधील वेटर सिरॉन शेख यास बोलाविले. त्या वेळी बोलताना संशयित झगडे याने वेटरला शिवीगाळ केली. त्यावरून वेटर बोलला असता, संशयित झगडे याने त्याच्याकडील शासकीय रिव्हॉल्व्हर काढून वेटर शेख याच्यावर ताणली आणि त्यास शिवीगाळ करीत धमकावले. या प्रकारामुळे वेटरसह हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली. संशयित पोलिस झगडे याच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्यासह शस्त्र दाखवून धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पवार याबाबत पुढील तपास करत आहे.

Gulabrao Patil On Sanjay Raut: 'राऊतांना स्वप्न पडल्यानं ठाकरेंना स्वबळाचा सल्ला दिला असेल'

https://www.lokshahi.com/video/gulabrao-patil-on-sanjay-raut-2

उद्धव ठाकरेंचे उत्कृष्ट मार्गदर्शक संजय राऊत यांना स्वप्न पडल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या सूचना केल्या असतील, असं खोचक विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे. तर ठाकरेंची शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याबाबत आमचं काही म्हणणं नाही, पण त्यावेळी भाजपाला मदत करण्यासाठी आम्ही उठाव केला याचा विचार भाजप करेल, असंही पाटलांनी म्हटलं आहे.

गुलाबराव पाटलांचा राऊतांना खोचक टोला

याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे उत्कृष्ट मार्गदर्शक संजय राऊत यांना स्वप्न पडल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या सूचना त्यांनी केल्या असतील. कदाचित असं स्वप्न त्यांना मागच्या काळामध्ये पडलं असतं तर आज शिवसेनेची अशी वाताहात झाली नसती.

ठाकरे-भाजप एकत्र येण्याच्या चर्चांवर पाटलांचं विधान

तसेच पुढे म्हणाले की, शिवसेना भाजप एकत्र येण्याबद्दल वाद नाही व त्याबद्दल आमचं काही म्हणणंही नाही .. पण त्यांनी ज्या काळात भाजपाला मदत करायला पाहिजे होती, त्या काळात भाजपच्या विचाराला हे सोडून चालले गेले... त्या काळात भाजपाला मदत करण्यासाठी आम्ही उठाव केला याचा विचार भाजप करेल असं मला वाटतं... जो पडतीच्या काळामध्ये आपल्या सोबत असतो तो आपला भाऊ, त्यामुळे आता युती होईल किंवा नाही हा विषय जरी असला तरी भाजप शिवसेना जवळ करेल असं मला वाटत नाही... असं वक्तव्य

Arvind Sawant: स्वत:ला संपवणार, देशमुखांचा इशारा! अरविंद सावंत सरकारवर संतापले

https://www.lokshahi.com/video/arvind-sawant-santosh-deshmukh-incident-arvind-sawant-angry-with-the-government

बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली. संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये आतापर्यंत ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच आता सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना ही जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती समोर आली होती. उद्या टॉवरवर चढून आंदोलन करत स्वत:ला संपवणार असा गंभीर इशारा संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी सरकारला दिला आहे. याचपार्श्वभूमीवर अरविंद सावंत सरकारवर संतापले आहेत. त्यांनी सरकारवर आणि कायदा सुव्यवस्थेला जाब विचारलेला आहे.

दरम्यान अरविंद सावंत म्हणाले की, पोलिसांना का दोष देता ज्या दिवशी पंतप्रधानांनी '७० हजार करोड का घोटाळा हुआ, सिंचन घोटाळा हुआ...' बोलले होते ना? मग त्या सिंचन घोटाळ्याच्या माणसाला स्वतः सोबत घेतलं... वित्तमंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं त्याच दिवशी समजायचं या देशाचं संविधानच संपल होतं... आणि आम्ही संविधान बोललो तर फेक नॅरेटिव्ह... मग संविधान तिथेच संपल कारण, त्यांनी आरोप करून नंतर परत स्वतः सोबत घेतलं त्यांना पद दिली, त्यांना देशाची मंत्रिपद दिली तेव्हा खालच्यांना काय कळतं करा काही पण... कुठे आहे कायदा सुव्यवस्था रसातळायला गेली आहे, महाराष्ट्राला लांछन लागलं आहे, लहान मुलींवर अत्याचार ज्या महाराष्ट्रात होतात त्या महाराष्ट्राला अभिमानाने बोलता येणार नाही... सरकारला बोलता येणार नाही..

Mahakumbh 2025: प्रयागराज महाकुंभ मेळ्याला उद्यापासून होणार सुरुवात

प्रयागराज येथे सोमवार पासून म्हणजे उद्यापासून महाकुंभमेळ्याला सुरूवात होणारे आहे. त्यापूर्वी श्री पंचायती आखाडा बडा उदासीनचे महंत आणि संतांनी महाकुंभात प्रवेश केला आहे. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्याचबरोबर अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या आध्यात्मिक गुरू स्वामी कैलाशानंद गिरी जी महाराजांच्या आश्रमात पोहोचल्या आहेत. दरम्यान महा कुंभाच्या वेळी त्रिवेणी घाटावर स्नान केल्याने मनुष्याला जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे आत्मा आणि शरीर दोन्ही शुद्ध होतात अशी मान्यता आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या पहाटे 05: 03 मिनिटांनी महा कुंभाच्या पहिले शाही स्नानाला सुरूवात होईल आणि दुसऱ्या दिवशी 14 जानेवारीला म्हणजे मकर संक्रांतीला दुसरे शाही स्नान असेल तसेच 29 जानेवारी मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी वसंत पंचमी, 12 फेब्रुवारी माघ पौर्णिमा आणि अखेर 26 फेब्रुवारी महाशिवरात्री यादिवशी शाही स्नान केले जाईल. तर साधूंची मांदियाळी उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी देशविदेशांतून असंख्य साधुसंत आले असून, ते भाविकांच्या आकर्षणाचा विषय बनले आहेत.

Beed Dhananjay Deshmukh: धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

https://www.lokshahi.com/news/beed-dhananjay-deshmukh-dhananjay-deshmukhs-protest-by-climbing-on-a-water-tank

बीडच्या मस्साजोग गावात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज आंदोलन करणार आहेत...मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येणार आहे...302 चा गुन्हा दाखल करुन संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला दोषी ठरवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मसाजोग गावातील मोबाईल टॉवर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काल रात्री उशिरा सीआयडी पथकाने धनंजय देशमुख यांची भेट घेतली. मात्र धनंजय देशमुख आंदोलनावर ठाम आहेत.

BMC News: पालिका रुग्णालयात आणीबाणी, वितरकांकडून औषध पुरवठा बंदचा इशारा

https://www.lokshahi.com/video/bmc-news-emergency-at-municipal-hospital-distributors-warn-of-medicine-supply-shutdown

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयासह विविध रुग्णालयात औषध पुरवठा करणाऱ्या औषध पुरवठादाराचे १२० कोटी रुपये थकवले आहेत. मुंबई महापालिका जोपर्यंत औषध पुरवठादाराची थकीत रक्कम देत नाही, तोपर्यंत औषध पुरवठा बंद करणार असल्याचा इशारा ‘ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर’ने दिला आहे. मात्र यामुळे पालिकेच्या २७ रुग्णालयांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी आज सोमवार, १३ जानेवारीपासून पालिका रुग्णालयात आणीबाणी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून याला पालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा `लायसन्स होल्डर`चे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.

अभय पांडे - ऑल फूड ड्रॅग असोसिएशन अध्यक्ष

वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची सुमारे १२० कोटी रुपयांची देयके मुंबई महानगरपालिकेने चार महिन्यांपासून थकवली आहेत. देयके थकवल्यामुळे वितरकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. परिणामी, वितरकांनी तातडीने देयके मंजूर न झाल्यास आज पासून औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेला दिला आहे.

Saamana on Congress: कॉंग्रेसचे अरविंद केजरीवालांवर गंभीर आरोप; सामना अग्रलेखातून कॉंग्रेसला कानपिचक्या

https://www.lokshahi.com/video/saamana-on-congress

सामना अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. 'केजरीवालांना देशद्रोही ठरवत प्रचाराचा मुद्दा करणं काँग्रेसला शोभत नाही' असं सामनामध्ये लिहलं आहे. तसेच काँग्रेसने संवाद ठेवावा हीच प्रार्थना असं देखील सामनामध्ये लिहलं आहे. सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र आहे, आणि जे इंडिया आघाडीच्या काँग्रेस पक्षाचे मित्रपक्ष आहेत त्यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. सध्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. येत्या 5 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. याचपार्श्वभूमीवर एकीकडे दिल्लीत प्रचारासाठी कॉंग्रेसची रंगत वाढलेली आहे तर दुसरीकडे त्यांच्या मित्रपक्षाकडून कानपिचक्या दिल्या जात आहेत.

सामना अग्रलेखात नेमक काय लिहलं आहे?

दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये निवडणुकीत सामना होण्याची शक्यता... केजरीवालांना देशद्रोही ठरवत प्रचाराचा मुद्दा करणं काँग्रेसला शोभत नाही. काँग्रेस 'अकेली' मोदी वृत्तीचा पराभव करण्याची क्षमता राखत असेल तर त्यांना कोणीच रोखणार नाही. त्यांच्याशी संबंधित टोळी ते कोणत्या प्रकारच्या राजकारणावर विजयी होतात ते दाखवते. या विकृतीशी लढण्यासाठी ऐक्याची वज्रमूठ, इंडिया आघाडीस नेतृत्व आणि जमल्यास एक निमंत्रकही हवा. नाहीतर मुसळ केरात, ते होऊ द्यायचे काय याचा विचार काँग्रेसने करायला हवा. संवाद ठेवा हीच हात जोडून नम्र प्रार्थना!

Beed Dhananjay Deshmukh: मोठी बातमी! अखेर धनंजय देशमुखांच आंदोलन मागे

https://www.lokshahi.com/news/beed-dhananjay-deshmukh

बीडच्या मस्साजोग गावात संतोष देशमुखांना न्याय देण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज आंदोलन हे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात होते मात्र त्याठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता, त्यामुळे धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना ते दिसून आले. . 302 चा गुन्हा दाखल करुन संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला दोषी ठरवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात होत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मसाजोग गावातील मोबाईल टॉवर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काल रात्री उशिरा सीआयडी पथकाने धनंजय देशमुख यांची भेट घेतली. मात्र धनंजय देशमुख आंदोलनावर ठाम आहेत. आता अखेर धनंजय देशमुखांनी त्यांच आंदोलन मागे घेतलं आहे. दरम्यान यावेळी मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील हे त्यांना विनंती करताना दिसून आले तसेच पोलिसांचा बंदोबस्त त्याठिकाणी दिसून आला पोलिस देखील वर चढून त्यांना खाली उरण्याची विनंती करत होते, आणि अखेर आता धनंजय देशमुखांनी त्यांच आंदोलन मागे घेतलं आहे. यादरम्यान त्यांची तब्येत देखील खालावल्याची माहिती मिळाली आहे.

Beed Dhananjay Deshmukh: सकाळपासून नाश्ता नाही,चक्कर येत आहेत; धनंजय देशमुख यांचा लोकशाहीशी संवाद

सकाळपासून जेवन केलं नाही त्यामुळे त्यांना चक्कर आल्या सारख वाटत आहे. त्यांच्या मागण्या आहेत की, त्यांच्या भावाला म्हणजेच संतोष देशमुख जे आहेत त्यांची अमानुशपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या आरोपींबद्दल पुर्ण माहिती मिळून सुद्धा त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. त्यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली पाहिजे. तसेच 302 चा गुन्हा दाखल करुन संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला दोषी ठरवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करत आहेत. संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी त्यांच्या काही आरोपींवर मोक्का लावण्यात आला असून वाल्मिक कराड जे या संपुर्ण घटनेचे कर्ताधर्ता मानले जात आहेत त्यांच्यावर अद्याप मोक्का का लावला जात नाही. त्यांच्यावर देखील मोक्का लावण्यात यावा अशी मागणी धनंजय देशमुखांची आहे. दरम्यान आंदोलन सुरु असताना त्यांची तब्येत खालावल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता त्यांना पाणी आहे एनर्जी ड्रिंक देखील त्यांना देण्यात येत आहे.

Beed Sarpanch Case: ग्रामस्थांचेही डोळे पाणावले, धनंजयसोबत गावकरीही पाण्याच्या टाकीवर चढले

बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. संतोष देशमुख जे आहेत त्यांची अमानुशपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या आरोपींबद्दल पुर्ण माहिती मिळून सुद्धा त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. त्यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली पाहिजे. तसेच 302 चा गुन्हा दाखल करुन संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला दोषी ठरवण्याच्या मागणीसाठी धनंजय देशमुख यांच्याकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले आहे. याचपार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत गावकऱ्यांकडून देखील त्यांना प्रतिसाद मिळत होता. मात्र यासर्व प्रकरणामुळे गावकरी देखील हळवे झाल्याचे पाहायला मिळाले.

मनोज जरांगे सातत्याने डीवायएसपींच्या संपर्कात असल्याचं समोर येत आहे. मात्र यासगळ्या संदर्भात धनंजय देशमुख यांच्याकडून आरोप केला जात आहे की, आपल्याला तपासापासून दूर ठेवलं, असा आरोप धनंजय देशमुख यांच्याकडून वारंवार केला जात आहे. दरम्यान तेथील ग्रामस्थांचेही डोळे पाणावले असून तरी देखील ते न्यायाची मागणी करत आहेत.

Beed Protest: धनंजय देशमुखांची समजूत काढायला महिला पोलीस थेट पाण्याच्या टाकीवर

https://www.lokshahi.com/video/beed-protest-female-police-directly-approach-water-tank-to-convince-dhananjay-deshmukh

बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करण्यात आली, त्यांच्या आरोपींना अटक केली असून वाल्मिक कराडला 302 चा गुन्हा दाखल करुन दोषी ठरवण्याच्या मागणीसाठी धनंजय देशमुख यांच्याकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले आहे. धनंजय देशमुख यांना झेलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. धनंजय देशमुखांसाठी गावकऱ्यांकडून साडी पसरवण्यात येत आहे. साडी पकडून ती पसरवली जात आहे. जेणे करून त्यांना कोणत्या प्रकारची हानी पोहचू नये, तर दुसरीकडे महिला पोलिस या देशील दुसऱ्या टॉवरवर चढून त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच त्याठिकाणी गावकऱ्यांकडून संतोष देशमुख अमर रहे अशी घोषणाबाजी केली जात आहे. दरम्यान ज्या वरिष्ठ पोलिस अधिकारी आहेत त्या धनंजय देशमुखांची समजूत काढत आहेत त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत.

Beed Dhananjay Deshmukh: आंदोलन मागे घेताच, मनोज जरांगेंना मिठी मारत धनंजय देशमुखांना अश्रू अनावर

बीडच्या मस्साजोग गावात संतोष देशमुखांना न्याय देण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज आंदोलन हे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात होते मात्र त्याठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता, त्यामुळे धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना ते दिसून आले. अखेर धनंजय देशमुखांनी त्यांच आंदोलन मागे घेतलं आहे. दरम्यान यावेळी मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील हे त्यांना विनंती करताना दिसून आले.

ज्यावेळेस धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतला आणि ज्यावेळेस ते खाली उतरले त्यावेळेस मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांची गळाभेट घेतली आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे यांच्याकडून वारंवार समजवण्याचा प्रयत्न सुरु असताना धनंजय देशमुख यांना मात्र अश्रू अनावर झाले आहेत. पोलिस प्रशासनावर आता त्यांचा जरा देखील विश्वास नसल्याचं त्यांनी वारंवार म्हटलं आहे, पोलिस प्रशासन खरचं काम करत आहे का? असा प्रश्न देशमुख कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. धनंजय देशमुख यांच्यासोबतच जे ग्रामस्थ टाकीवर आणि टॉवरवर चढले होते आंदोलनासाठी त्यांना देखील ते विनंती करत आहेत की, त्यांनी आता खाली यावं तसेच आता मनोज जरांगे यासर्व प्रकरणी आपली काय प्रतिक्रिया देतात हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.

Makar Sankranti 2025 Wishes: मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा आपल्या प्रियजनांना पाठवा

https://www.lokshahi.com/lokshahi-special/makar-sankranti-2025-wishes-send-sweet-makar-sankranti-wishes-to-your-loved-ones

नववर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत, मकर संक्रांत हा सण उत्साहाचा आणि गोड बोलून नाती जपण्याचा आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण काळ्या रंगाचे कपडे परिधान करून उंच आकाशात पंतग उडवतात. तर स्त्रीया देखील काळ्या रंगाची साडी नेसून सौभाग्याचा साज करून हळदी-कुंकूचे कार्यक्रम साजरे करतात. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार जेव्हा सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. यंदाही मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरा होत आहे. आपल्या प्रियजनांना, आप्तेष्ठांना तसेच मित्रपरिवाराला मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा द्या.

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

वर्षाचा पहिला सण करा भरभरून साजरा,

तिळात गुळ मिसळा आणि गोड गोड बोला...

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या यशाचा पतंग

उंच उंच उडत राहो हीच सदिच्छा,

तुम्हाला आणि सहकुटुंबाला,

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या,

मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या,

मकर संक्रांतीच्य गोड गोड शुभेच्छा!

झाले-गेले विसरुनी जाऊ,

तिळगूळ खात गोड गोड बोलू...

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Bhogi 2025: भोगीच्या दिवशी केस का धुवावेत; जाणून घ्या कारण

https://www.lokshahi.com/ampstories/web-stories/bhogi-2025-why-should-you-wash-your-hair-on-the-day-of-bhogi-know-the-reason

मकरसंक्रांतीच्या आधी येते ती भोगी.

भोगी अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतींनी साजरी करण्यात येते.

वडिधाऱ्यांकडून अनेकदा भोगीच्या दिवशी केसावरून अंघोळ करण्याचे सल्ले दिले जातात.

मात्र यामागे कारण काय जाणून घ्या.

खरं तर तिळाने केसं धुतल्याने अनेक फायदे होतात.

भोगीच्या दिवसात अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकले जातात.

तिळाच्या पाण्याने केस धुतल्याने शरीरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात.

तसेच विविध रोगांपासून सुटका मिळते.

आजचा सुविचार

https://www.lokshahi.com/aajcha-suvichar/aajcha-suvichar-19

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या खर्चात अनपेक्षितरित्या वाढ होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

https://www.lokshahi.com/aajch-rashibhavishya/horoscope-14th-of-january-2025

Rupee On Record Downfall: बाजार घसरला, रुपयाच्या घसरणीचा शेअर बाजारात घसरण

https://www.lokshahi.com/news/rupee-on-record-downfall-market-fell-rupees-fall-led-to-a-fall-in-the-stock-market

नवीन वर्ष सुरु होऊन नुकताचं आठवडा झाला आहे आणि पहिल्या आठवड्यातच शेअर बाजारातील खळबळजनक बातमी समोर आली आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे पैसे बुडत असताना डॉलरच्या तुलनेत रुपयाची ताकद कमी होत आहे. तज्ज्ञांच्या मते, रुपयाच्या या घसरणीचे कारण भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली अलीकडे केलेली विक्री आहे. याशिवाय भू-राजकीय तणावाचाही रुपयावर नकारात्मक परिणाम झाला आहे. आयात महाग होईल रुपयात घसरण म्हणजे भारतासाठी वस्तूंची आयात महाग होईल. याशिवाय परदेशात फिरणे आणि अभ्यास करणेही महाग झाले आहे. समजा, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ५० होते, तेव्हा अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना ५० रुपयांना १ डॉलर मिळू शकतो. आता 1 डॉलरसाठी विद्यार्थ्यांना 86.31 रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे शुल्कापासून ते निवास, भोजन आणि इतर गोष्टी महाग होणार आहेत.

शेअर बाजार घसरण

आज बाजारातील विक्रीच्या वादळात सर्वच क्षेत्र लालेलाल झाले आहेत. बँकिंग, ऑटो, आयटी, धातू, एफएमसीजी, फार्मा, आरोग्यसेवा आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा लागला असून बाजारातील अस्थिरता मोजणारा इंडिया व्हिक्स 6.77 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचसोबत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्सला देशांतर्गत बाजारातील घसरणीत पुन्हा एकदा सर्वात मोठा फटका बसला आहे. निफ्टी मिडकॅप सेन 900 सेन्सेक्स अंकांच्या घसरणीसह निफ्टीचा स्मॉलकॅप सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला आहे.

Kumbh Mela 2025: प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचा उत्साह, महाकुंभात आखाड्यांच्या अमृतस्नानाला प्रारंभ

https://www.lokshahi.com/news/kumbh-mela-2025-kumbh-mela-in-prayagraj-the-nectar-snan-of-the-akhadas-begins-in-the-mahakumbh

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कालपासून कुंभ मेळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय...काल कुंभ मेळ्यात दीड कोटी भाविकांनी शाहीस्नान करत मेळ्यात सहभाग नोंदवलाय....तर आजपासून 13 आखाड्यांचं अमृत स्नान होणाराय...दरम्यान आजापासून भाविक 45 दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करणार आहेत...

देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. एवढी गर्दी आहे की बरेच लोक वेगळे झाले आहेत. कुंभ स्नानासाठी परदेशी भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जर्मनी, ब्राझील, रशियासह 20 देशांतून भाविक दाखल झाले आहेत. दर तासाला २ लाख भाविक संगमात स्नान करतात. आजपासूनच भाविक 45 दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करणार आहेत.

संगमाच्या सर्व प्रवेश मार्गांवर भाविकांची गर्दी आहे. वाहनांना प्रवेश बंद आहे. बस आणि रेल्वे स्थानकापासून 10-12 किलोमीटर पायी चालत भाविक संगम येथे पोहोचत आहेत. 60 हजार सैनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यात गुंतले आहेत. पोलिस स्पीकरवरून लाखोंच्या संख्येने गर्दीचे व्यवस्थापन करत आहेत. कमांडो आणि निमलष्करी दलाचे जवानही ठिकठिकाणी तैनात आहेत.

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध चालू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो सैनिक दोन्ही बाजूच्या हजारो नागरिकांनी प्राण गमावले आहेत. दरम्यान, या युद्धात एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याचा एक नातेवाईक गंभीर जखमी झाला आहे. मृत तरुणाचं नाव बिनिल टी. बी. असं असून तो ३२ वर्षांचा होता. बिनिल हा केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथील रहिवासी होता. तर जैन टी. के. (वय २७) हा तरुण जखमी झाला आहे. तो देखील वडक्कनचेरी भागातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी बिनिलच्या कुटुंबीयांना माहिती मिळाली होती की एका ड्रोन हल्ल्यात केरळमधील दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर बिनिलच्या कुटुंबाने अधिक माहिती मिळवण्याचा व बिनिलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बिनिलची माहिती मिळाली नाही, तसेच त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही.

Shreyas Iyer Captain: 17 हंगामात श्रेयस ठरला 17 कॅप्टन! बिग बॉसमधून केली पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची घोषणा

17 हंगाम... 17 कॅप्टन

आयपीएल 2025च्या लिलावात श्रेयस अय्यरने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. त्याला पंजाब किंग्सने 26.75 कोटीला संघात सामिल करून घेतले. याचसोबत आता श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जच्या कॅप्टन्सीवर आपलं नाव जोडल आहे. पंजाब किंग्जने आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. 2024 मध्ये झालेल्या आयपीएलच्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ स्पर्धेची ट्रॉफीवर आपल्या संघाचं नाव कोरलं होत. एका वेगळ्या अंदाजासह त्याने आपल्या कर्णधार पदाची घोषणा केली.‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये अभिनेत्री प्रिती झिंटाच्या संघामधील काही खेळाडू उपस्थित होते ज्यामध्ये श्रेयस अय्यर, फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि शशांक सिंह हे दोघेही उपस्थित होते. यावेळी शोमध्ये नव्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं गेल. रविवारी 12 जानेवारी रोजी बिग बॉसचा वीकेंड वार होता या स्पेशल एपिसोडमधून सलमान खानने पंजाब किंग्जच्या कर्णधारपदी श्रेयसचं नाव जाहीर केलं.

पंजाब किंग्जचा संघ

फलंदाज

श्रेयस अय्यर, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, हरनूर सिंग, मुशीर खान, पायला अविनाश, जोश इंग्लिश (ऑस्ट्रेलिया), प्रियांश आर्या.

ऑल राउंडर

मार्कस स्टॉयनीस (ऑस्ट्रेलिया), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), सुयश शेडगे, मार्को जेन्सेन (द. आफ्रिका), ऍरॉन हार्डी (ऑस्ट्रेलिया), अझमतुल्लाह ओमरझाई (अफगाणिस्तान ), प्रवीण दुबे.

गोलंदाज युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, वैशाख विजयकुमार, यश ठाकूर, हरुप्रीत ब्रार, कुलदीप सेन, झावियर बार्नेट (ऑस्ट्रेलिया), लोकी फर्ग्युसन (न्यूझीलंड)

श्रेयस ठरला नवा कर्णधार, बिग बॉसमधून घोषणा

आयपीएल 2025: श्रेयस अय्यरने घेतली पंजाब किंग्जच्या कॅप्टनपदाची कमान घेतली

Kumbh Mela 2025: कुंभमेळ्यानंतर दिसेनासे होणारे नागा बाबा आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांचे जीवन

प्रयागराज येथे सोमवारपासून महाकुंभमेळ्याला सुरूवात झाली आहे. त्यापूर्वी श्री पंचायती आखाडा बडा उदासीनचे महंत आणि संतांनी महाकुंभात प्रवेश केला. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कालपासून कुंभ मेळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान महा कुंभाच्या वेळी त्रिवेणी घाटावर स्नान केल्याने मनुष्याला जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे आत्मा आणि शरीर दोन्ही शुद्ध होतात अशी मान्यता आहे. तर साधूंची मांदियाळी उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यासाठी देशविदेशांतून असंख्य साधुसंत आले असून, ते भाविकांच्या आकर्षणाचा विषय बनले आहेत.

कुंभमेळ्यातील दोन सर्वात मोठे नागा साधूंचे आखाडे आहे. कुभमेळ्यात येणारे नागासाधु हे शरीर राख लावून आलेले असतात ज्यामुळे त्यांच शरीर झाकले जाते. महाकुंभमेळा आखाड्यातील बहुतेक नागा साधू हिमालय, काशी, गुजरात आणि उत्तराखंडमध्ये राहतात. कुंभमेळ्यात प्रथम स्नान करण्याचा अधिकार नागा साधुंना दिला जातो. मात्र कुंभमेळ्याचा शेवटचा दिवस लोटल्यानंतर हे नागासाधु दिसेनासे होतात. हे आपापल्या गुढ दुनियेत परत जातात.

नागा साधु यांच्या नावाचा अर्थ आहे विवस्त्र ईशान्य भारतात विवस्त्र राहणाऱ्या लोकांना नागा असे म्हटले जाते. हे नागा साधु त्यांच्या गुप्त ठिकाणी विवस्त्र राहून तपश्चर्या करतात. नागा साधुंचे काही कठोर नियम असतात ज्यात त्यांना त्यांची ओळख लपवावी लागते, तसेच नागा साधू झोपण्यासाठी पलंग, खाट किंवा इतर कोणतेही साधन वापरू शकत नाहीत. नागा साधू फक्त जमिनीवरच झोपतात. जर एखाद्या तरुणाला नागा साधु बनायचं असेल तर त्यांना स्वत:चं श्राद्ध कराव लागतं. ज्यामुळे ते सांसारिक जीवनापासून पूर्णपणे अलिप्त होतात आणि सर्व प्रकारच्या इच्छांचा अंत होतो. त्यामुळे त्यांचे इंद्रियांवर नियंत्रण राहते तसेच त्यांचे जीवन आखाडे, संत परंपरा आणि समाजासाठी समर्पित होते. अनेक ठिकाण बदलत भोलेबाबांच्या भक्तीत तल्लीन झालेले नागा आपले संपूर्ण आयुष्य वनौषधी आणि कंदमुळांच्या साहाय्याने घालवतात. नागा साधू काही दिवस एका गुहेत राहतात आणि नंतर दुसऱ्या गुहेत जातात. त्यामुळे त्यांची नेमकी स्थिती शोधणे कठीण असते.

AI Robot Girlfriend: आता एकाकी जीवन सोडा, ही मैत्रिण कायमची साथ देणार, 'आरिया' नेमकी कोण?

https://www.lokshahi.com/news/ai-robot-girlfriend-now-leave-the-lonely-life-this-friend-will-be-with-you-forever-who-exactly-is-arya

सध्या एखाद्यासोबत प्रेमसंबंध ठेवले की ते काही कालावधीपुर्ते सोबत असते मात्र काही गैरसमामुळे या नात्यात दुरावा येतो आणि काही काळाने दोन व्यक्तींमध्ये ब्रेकअप किंवा डिवोर्स ही प्रक्रिया होऊन दोन्ही प्रेम करणारे व्यक्ती एकमेकांपासून वेगळे होतात. यामध्ये एक कोणी तरी पुर्णपणे एकटा पडून जातो. मात्र काही लोक याच भितीमुळे कोणासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास थोडे घाबरतात. अशा वेळी ते एकटे पडतात त्यामुळे अशा लोकांचा एकटेपणा आणि दुर करुन त्यांच्या देखील आयुष्यात एक रोमँटिक साथीदार यावा म्हणून एआयने एक स्वप्नसुंदरीची निर्मिती केली आहे.

आयुष्याच्या प्रवासात जोडीदार चांगला मिळाला तर तो प्रवास अधिक आनंदी आणि सुखकर होतो मात्र हाच साथीदार आता तुमची आयुष्यभर साथ देणार असेल तर... अशी एक जोडीदार तुम्हाला मिळू शकते मात्र तिचासाठी तुम्हाला दीड कोटी मोजावे लागु शकतात. तिच नाव आहे 'आरिया' ही आरिया कधीच तुमचं हृदय तोडणार नाही, त्यासोबत तुमच्या सुख दुःखाच्या क्षणी नेहमी साथ देईल, तसेच कधीच तुमचा हात सोडून जाणारी नाही, आणि प्रेमाच्या खोट्या आणाभाका न घेता शेवटपर्यंत तुमची साथ निभवेल. ही आरिया एक एआय रोबोट असून ती तीन वेरियंट मिळेलं फक्त चेहरा असणाऱ्या रोबोट गर्लफ्रेंडची किंमत 8,6000, दुसऱ्या मॉड्युलर आवृत्तीची किंमत एक कोटी 29 लाख असून पुर्ण आकाराच्या मॉडेलची किंमत सुमारे 1 कोटी 50 लाख रुपये

'आरिया'ची वैशिष्ट्ये काय?

अमेरिकन कंपनी रिअलबोटिक्सने यावर्षी लास वेगासमधील २०२५च्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये आरिया हा एआय रोबोट लॉंच केला. आरियाला मान फिरवण्यास आणि इतर हालचाली करण्यास मदत होण्यासाठी तिच्या संपूर्ण शरीरात 17 मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. आरियाची बुद्धिमत्ता अगदी जिवंत माणसासारखी आहे तर चेहरा, केसांचा रंग आणि केशरचना कस्टमाइज करता येणार आहे. तिने कोणता चेहरा धारण केला आहे याचा अंदाज येण्यासाठी तिच्यामध्ये आर.एफ.आय.डी. टॅग्ज जोडलेले आहेत. या आधारावर ती तिच्या हालचाली आणि व्यक्तिमत्त्वात बदल करते.

Bhaskar Jadhav On Shivsena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेची जवळ जवळ कॉंग्रेस झाली, जाधवांच मोठं वक्तव्य

ठाकरेंच्या शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांचे खडेबोल आहेत. शाखा प्रमुख आहेत कुठे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 10 ते 15 वर्ष झाली पदाधिकारी एकाच जागेवर आहेत असं देखील भास्कर जाधव म्हणाले आहेत. भास्कर जाधवांच्या भाषणाची ऑडियो क्लिप आता समोर आली आहे. मात्र या सर्व संदर्भात लोकशाही मराठी या ऑडियोची पुष्टी करत नाही.

यादरम्यान या भाषणात भास्कर जाधव म्हणाले की, एकवेळेस बाळासाहेबांच्या विचारानुसार पद ही येतील आणि जातील पण सर्वश्रेष्ठ पद कोणी कोणाचं काढून घेणार नाही ते म्हणजे शिवसैनिक हे पद... शाखा प्रमुख,तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा... भास्कर जाधव यांचे विनायक राऊत यांना सल्ला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत.... जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही...काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं...चिपळूण मधील पदाधिकारी बैठकीत भास्कर जाधवांनी मनातली सल काढली. मात्र या सर्व संदर्भात लोकशाही मराठी या ऑडियोची पुष्टी करत नाही.

BCCI New Rules: आता काम तसा दाम! टीम इंडिया खेळाडूंच्या कामगिरीवर दिला जाणार पगार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 च्या मालिकेची समाप्ती झाली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-1 या स्कोरने विजय मिळवत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. या विजयाने ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली असून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 च्या शर्यतीतूनही बाहेर झाली आहे. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांची निराशा केली. मात्र भारतीय संघाच्या घसरणीचा परिणाम त्यांच्या उदरनिर्वाहावर झाला आहे. BCCI ने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यासह बैठकी दरम्यान काही नियम लागू केले जाणार आहेत. या बैठीत खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा झाली ज्यामध्ये खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार पगार देण्यात येणार असा प्रस्ताव ठेवण्यात आला. बीसीसीआयची कठोर पाऊलं सर्व खेळाडूंसाठी समान असणार असणार आहेत. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली या प्रमुख खेळाडूंना 'काम तसा दाम' हा नियम लागू होणार आहे.

खेळाडूंना त्यांच्या कामगिरी सुधारावी लागेल अन्यथा त्यांना पूर्ण पगार दिला जाणार नाही. कॉर्पोरेट हाऊसमध्ये ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीनुसार पगारवाढ दिली जाते, तसाच नियम आता भारतीय क्रिकेटमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळाडूची कामगिरी समाधानकारक न झाल्यास त्याचा परिणाम त्याच्या पगारावर होईल.'खेळाडूंना याची जाण असायला हवी की, त्यांनी कामगिरी न केल्यास त्यांच्या पगारात कपात होईल. त्यांना त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील,'असे सूत्रांनी सांगितले.

शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत चर्चा झालेल्या इतर मुद्द्यांमध्ये काही खेळाडू कसोटी क्रिकेटला कमी महत्त्व देत आहेत आणि त्यासाठी "इच्छेचा अभाव" दाखवत आहेत, व्हाईट-बॉल फॉरमॅटला प्राधान्य देत आहेत. पुढील पिढीला कसोटी क्रिकेट आणि भारतीय कसोटी कॅपचे मूल्य कळावे, याची खात्री करण्यासाठी बोर्डाने या समस्येवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे संघ व्यवस्थापनाला वाटते.

गेल्या वर्षीच बीसीसीआयने त्यांच्या कसोटी खेळाडूंसाठी प्रोत्साहन भत्ता देण्यास सुरू केले होते. त्यानुसार, २०२२-२३ पासून एका हंगामात ५० टक्क्यांहून अधिक कसोटी सामन्यांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना प्रति सामना ३० लाख रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन मिळेल. एका हंगामात किमान ७५ टक्के सामन्यांमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी ही रक्कम प्रती सामना ४५ लाख रुपयांपर्यंत वाढेल.

खेळाडूंच्या कुटुंबियांबाबत घेतला मोठा निर्णय

यासह बीसीसीआय आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जर भारतीय संघ एखाद्या दौऱ्यावर जात असेल आणि तो दौरा ४५ दिवसांपेक्षा अधिक असेल. तर केवळ २ आठवडे पत्तीला सोबत ठेवता येईल. याहून अधिक वेळ पत्नीला सोबत ठेवता येणार नाही.

खेळाडूंसह प्रशिक्षकांच्या नियमांमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ हा ३ वर्षांचा असणार आहे. यासह खेळाडूंना आता टीम बससोबत प्रवास करणं सक्तीचं असणार आहे. कुठल्याही खेळाडूला टीम बस सोडून प्रवास करता येणार नाही.

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

https://www.lokshahi.com/aajch-rashibhavishya/horoscope-11

Mumbai-Goa flight: गोव्याहून मुंबईला येणाऱ्या विमानात बॉम्बची चिठ्ठी सापडल्याने खळबळ

https://www.lokshahi.com/news/mumbai-goa-flight-bomb-note-found-on-flight-from-goa-to-mumbai-causing-panic

गोव्यावरून मुंबईत येणाऱ्या विमानांमध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडल्याने खळबळ, सोमवारी या घटनेनंतर सर्व यंत्रणा झाल्या सतर्क. तपासात काहीच संशयीत सापडले नसून याप्रकरणी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अभिजीत सावंत एका खासगी विमान कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक(सुरक्षा) पदावर कार्यरत आहेत. सोमवारी रात्री गोव्यावरून मुंबईला येणाऱ्या विमानाच्या शौचालयात एक चिठ्ठी सापडली. त्यात इंग्रजीत काळजी घ्या, बॉम्ब असे लिहिण्यात आले होते. तर दुसऱ्या बाजूला सूड असे लिहिण्यात आले होते. विमान मुंबई विमानतळावर पोहोचण्यापूर्वी २० मिनिटे आधीही चिठ्ठी सापडली. गोव्याहून मुंबईला जाणारे इंडिगो फ्लाइट 6E5101 हे मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर एका वेगळ्या खाडीत नेण्यात आले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. याबाबतची माहिती विमान कर्मचाऱ्यांना दिली. वैमानिकांनी याबाबतची माहिती मुंबई विमानतळ नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे विमानतळावर बॉम्ब शोधक व नाशक पथक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, विमानतळ सुरक्षा पथक तैनात करण्यात आले. विमान एअरपोर्टवर उतरताच ते आयसोलेट ठिकाणी उभे करून सर्व प्रवाश्यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमानाची तपासणी केली असता कोणतीही संशयीत वस्तू सापडली नाही. प्रवाश्यांमध्ये भीती निर्माण करण्याच्या हेतून आरोपीने हा प्रकार केला असून त्याबाबत एअरपोर्ट पोलीस तपास करत आहेत.

माधुरीकडे स्पोर्ट्स कारपासून ते मर्सिडीजपर्यंत महागडं कलेक्शन

Madhuri Dixit new car: माधुरीच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका महागड्या कारचा समावेश, किंमत जाणून व्हाल थक्क

https://www.lokshahi.com/entertainment/madhuri-dixit-new-car-another-expensive-car-added-to-madhuris-car-collection-you-will-be-shocked-to-hear-the-pric

अभिनेत्री माधुरीकडे स्पोर्ट्स कारपासून ते मर्सिडीजपर्यंत अशा महागड्या आणि आलिशान कारचं कलेक्शन आहे. काल मकरसंक्रांत होती आणि याच मुहुर्तावर माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक लक्झरी कार अॅड केली आहे. त्यांनी नवीन फेरारी 296 जीटीएस कार घेतली आहे, या कारची किंमत 6.24 कोटी एवढी आहे. या कारची स्टेबॅलिटी व डाउनफोर्स वाढावी यासाठी या कारमध्ये अ‍ॅक्टिव्ह स्पॉयलरसारखे अ‍ॅडव्हान्स अ‍ॅरोडायनामिक्स आहे. तसेच ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी चांगला येतो. त्याचसोबत या कारमध्ये रिअर मिड-इंजिन व रियर व्हील ड्राइव्ह आहे. फेरारी 296 जीटीएसच्या आधी तिने पोर्श 911 टर्बो एस घेतली होती. या कारची किंमत सुमारे 3.08 कोटी आहे.या कारचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माधुरीच्या या आलिशान कारची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हाल. माधुरीकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन पाहायला मिळते. तिच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-मेबॅक S560, रेंज रोव्हर वोग अशा अनेक महागड्या आणि आलिशान कारचा समावेश आहे.

माधुरी दीक्षितच्या या नव्या कारचा रंग रोसो कोर्सा आहे. की कार खूपच आकर्षक आहे. एका पापाराझी अकाउंटवरून या कारचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत माधुरी आणि श्रीराम एका इमारतीतून बाहेर येताना दिसत आहेत. माधुरीने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर तिचे पती काळे शर्ट, काळी पँट व ब्लेझर घालून दिसत आहेत. या दोघांनी पापाराझींशी संवाद साधला व त्यानंतर ते नव्या कारमध्ये निघून गेले.

: राजस्थान उच्च न्यायालयाने मंगळवारी २०१३ च्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. एका आठवड्यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने आसारामला बलात्काराच्या दुसऱ्या प्रकरणात ३१ मार्चपर्यंत जामीन मंजूर केला. आसाराम अनेक आजारांनी ग्रस्त आहे. न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर यांच्या खंडपीठाने आसारामला अंतरिम जामीन मंजूर केला. या याचिकेचे स्वरूप सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसारखे होते, असे खंडपीठाने सांगितले.

Harsha Richaria In Mahakumbh2025: मॉडेलिंग ते सर्वात सुंदर साध्वी, महाकुंभातील हर्षा रिछारिया कोण? जाणून घ्या

https://www.lokshahi.com/maha-kumbh/harsha-richaria-in-mahakumbh2025-most-beautiful-sadhvi-who-is-harsha-richaria-in-mahakumbh-know

जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तब्बल 45 दिवस या महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर 'शाही स्नान' सह महाकुंभाची सुरुवात झाल्यानं प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं.

याचपार्श्वभूमीवर उत्तराखंडची मॉडेल असलेली हर्षा रिछारिया सध्या चर्चेत येताना दिसते आहे, हर्षा रिछारिया साध्वी बनलेली आहे. यादरम्यान हर्षा रिछारियाचे इंस्टाग्रामवरील व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहेत. त्यामुळे मॉडेल आणि साध्वी या दोन्ही गोष्टींमुळे सध्या महाकुंभाची जोरदार चर्चा सुरु आहे. महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी साध्वी हर्षा रिछारिया रथावर आरूढ होत पोहोचली होती. हर्षा रिछारियाचे गुरु आचार्य महामंडळेश्वर स्वामी श्री कैलाशानंद गिरीजी महाराज आहेत. ते निरंजनी आखाड्यातून येतात. यावेळी तिने माथ्यावर टिळा आणि गळ्यात फुलांची माळ घातली होती. हर्षा रिछारिया प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी ठरलेली आहे. तसेच दोन महिन्यात हर्षा रिछारिया साध्वी कशी बनली असा प्रश्न देखील सोशल मीडियवर तिला विचारला जात आहे. हर्षा साध्वी होण्यापूर्वी एक अँकर होती त्याचसोबत ती सोशल इन्फ्लूएन्सर देखील होती.

Saffron Benefits: गरोदरपणात करा केशराचे सेवन, आरोग्य आणि मानसिक संतुलनासाठी ठरेल उपयुक्त

गर्भसंस्काराची व्याप्ती खूप मोठी आहे. गर्भधारणा पटकन आणि नैसर्गिक पद्धतीनी होण्यापासून, गर्भाचा सर्वपरीनी विकास होण्यापासून ते सामान्य प्रसूती होण्यापर्यंत आणि बाळ बाळंतीणीची तब्येत व्यवस्थित राहण्यापर्यंत सर्व गोष्टी गर्भसंस्कारांच्या योगे अनुभवता येतात. आणि सुरुवातीपासून शास्त्रशुद्ध गर्भ संस्कार केले तर त्याचे परिणाम ही अप्रतिम येतात. हो अगदी खरंय, गर्भसंस्कार केल्यामुळे गरोदारपणातील प्रत्येक दिवस साजरा झाला, असं अभिमान सांगणाऱ्या आई पाहिल्या की गर्भ संस्कारांचं महत्त्व अजून अजून मनात ठसत जातं. बाळ बाळंतिणीला उपयुक्त आणि संपूर्ण गरोदारपणात तसंच प्रसूतीमध्ये समर्थन करणारं आपल्या सर्वांच्या परिचयाचा द्रव्य म्हणजे केशर. 

आयुर्वेदात केशर त्रिदोष हर म्हणजे वात पित्त कफ या तिन्ही दोषांना संतुलित करणारं, विषनाशक आणि चेहऱ्याचा मुळचा रंग सुधारण्यास मदत करणारं म्हणून सांगितलेलं आहे. गरोदारपणात आर्यन आणि हिमोग्लोबिनसाठी पूरक घेण्याचा कल आपल्या सर्वांना माहिती आहे. पण रासायनिक हिमोग्लोबिनच्या गोळ्या किंवा कॅप्सूल घेण्याचे दुष्परिणामसुद्धा विसरून चालणार नाही आणि म्हणूनच गरोदारपणात चांगल्या प्रतीच्या म्हणजे शुद्ध केशराचा नियमित सेवन हा खूप फायदेशीर असतो. 

विषनाशक आणि रक्त शुद्धीकर असणारं केशर नियमित घेण्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते, सर्दी खोकला ताप सहसा येत नाही. खऱ्या केशराचा रंग आणि सुगंध इतका सुंदर असतो की त्या सुगंधामुळे मन प्रसन्न होतं, मनातली नकारात्मकता, नैराश्य दूर होण्यासाठी मदत मिळते. गरोदारपणात कमी जास्त होणाऱ्या हार्मोन्समुळे भावनिक चढ-उतार स्थिर होण्यासाठी सुद्धा केशर उपयोगी पडतं. गर्भ संस्कारात शुद्ध, उत्तम गुणवत्ताच्या केशराचं स्थान अढळ आहे हेच खरं, मंडळी हे ऐकून तुमच्या मनात आलं असेल की कसं आणि किती प्रमाणात केशर घ्यायला हवं? 

बाजारात सहसा केशराचे पट्ट्या मिळतात. मिठाईमध्ये केशर टाकताना सहसा ते तसेच्या तसे टाकले जातात. आम्ही केशर नक्की टाकलं आहे, हे दाखवून देण्याचा हा एक मार्ग असला तरी केशराचं शोषण होण्यासाठी त्याचं बारीक चूर्ण करणं आवश्यक असतं. यासाठी जाड बुडाच्या पॅनमध्ये अगदी मंद आचेवर केशर थोडं भाजून घ्यावं. खलाच्या मदतीनी त्याचं बारीक चूर्ण तयार करावं. गरोदारपणात रोज सकाळी पंचामृतात किंवा दुधात चिमूटभर केशराचं चूर्ण टाकून घ्यावं. 

Suresh Dhas On CM Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास; आमची कामं करणार

https://www.lokshahi.com/video/suresh-dhas-on-cm-fadnavis-i-have-faith-in-chief-minister-fadnavis

सुरेश धस यांची फूड अ‍ॅण्ड ड्रग्स अ‍ॅडलट्रेशन अ‍ॅक्ट या कायद्याबाबत चर्चा करणार त्याचसोबत मराठवाड्याच्या विकासाच्या बाबत बोलताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांवर पुर्ण विश्वास दाखवला आहे. याचपार्श्वभूमीवर सुरेश धस म्हणाले की, आयुष्यातला सर्वात मोठा क्षण एवढा चांगला क्षण आज आहे. आजच्या सारखा सुंदर क्षण आम्हाला पुन्हा भेटू शकत नाही आणि फेस टू फेस बोलून फूड अ‍ॅण्ड ड्रग्स अ‍ॅडलट्रेशन अ‍ॅक्ट बाबत जर काही बोलता आलं तर बोलू, कारण केंद्र सरकारने त्याच्यामध्ये 2006ला मनमोहन सिंग असताना हा कायदा आला. याच्यामध्ये 1954नंतर एकही अमेंडमेंट या कायद्यामध्ये नव्हती. जी अमेंडमेंट झाली ती जनतेच्या बाजूने होण्याऐवजी या युपीएच्या सरकारमध्ये चुकीची झाली होती, आणि ती दुरुस्ती आता करावी. कारण, त्याचे रिझल्टस 2011 पासून पुढे आलेले आहेत. त्याच्याबाबतीत आम्ही बोलू.. मराठवाड्याच्या विकासाच्या बाबतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे... आमचे मुख्यमंत्री काम करतील... असं सुरेश धस म्हणाले आहेत.

IIT Bombay Baba in Mahakumbh 2025: कोट्यवधींचं पॅकेज सोडलं अन् झाला साधू, आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण घेतलेले साधू थेट पोहचले महाकुंभातील

https://www.lokshahi.com/maha-kumbh/iit-bombay-baba-in-mahakumbh-2025

जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तब्बल 45 दिवस या महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर 'शाही स्नान' सह महाकुंभाची सुरुवात झाल्यानं प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. याचपार्श्वभूमीवर अनेक साधू-संत आणि महंत पाहायला मिळाले आहेत. मुंबईमधून असेच एक आयआयटी शिक्षण घेतलेले साधू कुंभमेळ्यात सामिल झाले आहेत. या तरुणाने कोट्यावधींची ऑफर नाकारली आणि आध्यात्माचा मार्ग निवडला असल्याची माहिती न्यूज 18च्या मुलाखतीमधून समोर आली आहे. या तरुणाने बॉम्बेमधून आयआयटी म्हणजेच एरोस्पेस इंजिनियरिंग केलेल्या आयआयटी बॉम्बे बाबाचं नाव मसानी गोरख असं आहे. हे बाबा मुळचे हरियाणा येथील आहेत.

न्यूज 18च्या मुलाखतीमध्ये बाबा मसानी गोरख उर्फ आयआयटी बॉम्बे बाबा म्हणाले की, आयुष्यात काहीही करा, अखेर तुम्हाला इथेच यायचं आहे... मला फोटोग्राफीची आवड होती, पण रोजगारासाठी मी टिचिंग करायचो त्यामध्ये मी फिजिक्स शिकवलं आहे. मी पैसे तर कमवू शकलो असतो, पण आयुष्यात करायचं काय? असा प्रश्न मला देखील पडला होता... मी काशी, ऋषिकेश, मनाली, तिथून चारधाम करत आयुष्य जगण्याचा मार्ग निवडला. हा मार्ग निवडल्यानंतर मी बारक्या बारक्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला लागलो... आता मला कळलं आहे की, खरं ज्ञान तरआध्यात्माच्या मार्गावर आहे... लोक काय बोलतील याने आता मला काही फरक पडत नाही, असं म्हणत बाबा मसानी गोरख उर्फ आयआयटी बॉम्बे बाबा यांनी साधू होण्याच्या मार्गाचा खुलासा केला आहे.

Mahakumbh2025: महाकुंभ मेळ्याच आगळावेगळा प्रचार! स्कायडायव्हिंग करतं तरुणीने फडकवला महाकुंभाचा ध्वज

https://www.lokshahi.com/ampstories/web-stories/mahakumbh2025-mahakumbh-melas-unique-campaign-skydiving-girl-hoists-mahakumbh-flag

सध्या देशभरात प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याची चर्चा सुरु आहे.

साधू-संतांसह अनेक कलाकार देखील कुंभमेळ्यात सहभागी झाले आहे.

मात्र जे लोक सहभागी होऊ शकले नाही ते सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात कुंभमेळ्याचा प्रचार करत आहेत.

असाच प्रचार बँकॉकमध्ये राहणाऱ्या अनामिका शर्मा या तरुणीने केला आहे.

तिने चक्क 13 हजार फूट उंचावरून स्कायडायविंग करत कुंभमेळ्याचा ध्वज फडकवत प्रचार केला आहे.

तिची ही व्हिडिओ सोशल मीडियवर तुफान गाजत आहे.

आतापर्यंत तिच्या व्हिडिओला 1 लाख 20 हजार पेक्षा अधिक व्हूज आणि लाईक्स आले आहेत.

बापाचं अमानुष कृत्य, पोटच्या मुलाला संपवलं

अभ्यास करत नाही म्हणून मुलाचा गळा दाबला, भिंतीवर डोकं आपटलं; चिमुकल्याचा जागीच मृत्यू

https://www.lokshahi.com/lokshahi-crime/the-boy-was-strangled-his-head-hit-the-wall-for-not-studying-the-child-died-on-the-spot

बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्या वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही, म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला आहे. 14 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलघडले. वडील विजय भंडलकर, पियुषची आजी शालन भंडलकर आणि संतोष भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आजीकडून घटना लपवण्याचा प्रयत्न,दिली खोटी माहिती

वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला, तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसत आहे, असं म्हणत त्याला हाताने मारहाण केली. राग अनावर झाला अन् त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले यात त्याचा मृत्य झाला. पियुषची आजी हे सर्व पाहत होती, पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही. त्यानंतर विजयच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येवून पडला आहे, अशी खोटी माहितीही तिने दिली.

मुलगा चक्कर येवून पडल्याचा बनाव....

संतोष भंडलकर याने डॉ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तेथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पियुषला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचे वडिल त्याला तेथे घेऊन गेले नाही आणि गावातील पोलीस पाटील तसेच इतर कोणालाही काहीही न सांगता, नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पियुषचे शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली. पोलिसांना एका माणसाकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

Khel Ratna Award 2024: मनू भाकर, डी. गुकेश यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

https://www.lokshahi.com/sports/khel-ratna-award-2024-manu-bhakar-d-gukesh-was-felicitated-by-the-president

शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला. ज्यामध्ये दुपारी राष्ट्रपती भवनात जगतातील काही नामवंत खेळाडूंचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. या दोन्ही खेळाडूंना टाळ्यांच्या कडकडाटात हा सन्मान प्रदान करण्यात आला. मनू भाकरने ऑलिम्पिकमध्ये देशाला नाव लौकिक मिळवून दिला, तर डी गुकेशने नुकतेच बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन या क्रिडारत्नांचा गौरव केला गेला.

पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू अमन सेहरावत, नेमबाज स्वप्नील कुसाळे, सरबज्योत सिंग आणि पुरुष हॉकी संघाचे सदस्य हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, संजय आणि अभिषेक यांना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांना सन्मान करण्यात आला, असून अशा 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्यामध्ये 17 पॅरा ऍथलीट होते. या खेळाडूंनी त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि संघर्षाने देशाचा गौरव केला आहे. या खेळाडूंच्या यशाने हे सिद्ध होते की, भारतीय क्रीडा संस्कृतीच्या मजबूत पायाचे प्रतीक हे खेळाडू आहे.

Shah Rukh Khan House: सैफच्या आधी शाहरुख टार्गेटवर! किंग खानच्या मन्नतभोवती संशयास्पद हालचाली

https://www.lokshahi.com/news/suspicious-movements-around-shah-rukh-khan-house

अभिनेता सैफ अली खान यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर बॉलीवुड हादरलं आहे. अभिनेता सैफ अली खान याच्या बांद्रा येथील घरी १६ जानेवारी रोजी मध्यरात्री हल्लेखोर घुसला. हल्लेखोराबरोबर झालेल्या झटापटीत सैफवर हल्लेखोराने धारदार चाकूने वार केले, त्यामुळेया हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. ज्यामुळे त्याला मध्यरात्री लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्लेखोराने धारदार चाकूने केलेले वार खोलवर होते. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफवर झालेल्या हल्ल्यामुळे सैफ अली खानचे संपुर्ण कुटुंबीय चिंतेत आहेत. तर सैफचं हल्ला प्रकरण तापलेलं असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सैफच्या आधी बॉलिवूडचा किंग खान हा टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला होण्याआधी अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याभोवती संशयास्पद हालचाली आढळून आल्या.

बॉलीवूडचा किंग अभिनेता शाहरुख खानच्या घरात अज्ञात व्यक्तीकडून घुसण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं आहे. शाहरुखच्या मन्नत बंगल्यात गेल्या 2 ते 3 तीन दिवसांपूर्वी एकाने घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शाहरुखच्या मन्नत बंगल्याच्या भिंतीवर जाळी असल्यामुळे त्या अज्ञात व्यक्तीचा आत घुसण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि शाहरुखच्या घरात घुसणारा एकच असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र घरात घुसण्यामागचं नेमक कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील सिनेसृष्टीत सध्या खळबळ माजली आहे. सैफच्या हल्ल्याच्या प्रकरणानंतर आता शाहरुख खानच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Pakistan Boat Accident: स्पेनला घेऊन जाणारी बोट उलटली, 40 हून अधिक जणांचा मृत्य

https://www.lokshahi.com/news/pakistan-boat-accident-boat-to-spain-capsizes-over-40-dead

प्रवाशांना स्पेनला घेऊन जात असलेली बोट मोरोक्कोजवळ उलटल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 40 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. 50 हून अधिक प्रवासी बुडाल्याची शक्यता आहे. या बोटीत एकूण 80 प्रवासी होते, असे समजते. मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसआधी एका बोटीवरून 36 जणांना वाचवले होते. 2 जानेवारीला मॉरिटेनिया येथून ही बोट 86 प्रवाशांना घेऊन निघाली होती ज्यात 66 पाकिस्तानी प्रवाशांचा समावेश होता. तसेच यादरम्यान वॉकिंग बॉर्डर्सचे सीईओ हेलेना मालेनो यांनी सोशल मीडियावर एक मोठी अपडेट दिली आहे ती म्हणजे, बोट उलटणाऱ्या घटनेत बुडणाऱ्यांमध्ये 44 जण पाकिस्तानी आहेत. दरम्यान पाकिस्तानी दूतावासाकडून एका टीमला पाकिस्तानी नागरिकांच्या मदतीसाठी दखला येथे पाठवण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

याचपार्श्वभूमीवर उत्तराखंडची मॉडेल असलेली हर्षा रिछारिया सध्या चर्चेत येताना दिसते आहे, हर्षा रिछारिया साध्वी बनलेली आहे. यादरम्यान हर्षा रिछारियाचे इंस्टाग्रामवरील व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहेत.

AI वापराला गती मिळणार, AI धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती

https://www.lokshahi.com/video/appointment-of-task-force-to-formulate-ai-policy-to-accelerate-ai-use

राज्यात एआय धोरण तयार करण्यात येणार आहे. यासाठी टास्क फोर्स नियुक्त करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत टास्क फोर्स शिफारस करणार असून राज्यात एआय वापराला गती देण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती मिळत आहे. माहिती तंत्रज्ञान संचालनालय विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यात 16 सदस्य असतील, गुगल, महिंद्रा ग्रुप, एचडीएफसी लाईफ अशा खासगी संस्थांवरील अधिका-यांचाही समावेश असणार आहे.

Beautiful Girl In Mahakumbh2025: कुंभमेळ्यात दिसली आणखी एक 'सुंदरी'! पण ही आहे कोण? जाणून घ्या...

https://www.lokshahi.com/maha-kumbh/beautiful-girl-in-mahakumbh-2025

जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे. पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर 'शाही स्नान' सह महाकुंभाची सुरुवात झाल्यानं प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. या महाकुंभसाठी साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. यादरम्यान या महाकुंभ मेळ्यात अनेक साधू संत पाहाया मिळत आहेत. ज्यामध्ये त्यांना पाहून संपूर्ण देश थक्क झाले आहे. ज्यामध्ये सर्वात आधी हर्षा रिछारिया जी उत्तराखंडची मॉडेल आणि एक अँकर होती मात्र महाकुंभमध्ये ज्यावेळेस ती दिसली त्यावेळेस तिचे इंस्टाग्रामवरील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हयरल होऊ लागले. त्याचसोबत काही दिवसातच मुंबईमधून असेच एक आयआयटी शिक्षण घेतलेले साधू कुंभमेळ्यात दिसले, आयआयटी बॉम्बे असलेल्या बाबांच नाव अभय सिंह असं आहे. या बाबांनी कोट्यावधींची ऑफर नाकारुन आध्यात्माचा मार्ग निवडला. यानंतर आता आणखी एक मुलगी सोशल मीडियवर पाहायला मिळत आहे. या मुलीच्या सौंदर्याने संपुर्ण महाकुंभ मेळ्यातील लोकांना भुरळ पाडली आहे. घारे डोळे, रंग सावळा आणि चेहऱ्यावर अनोख तेज असणारी ही मुलगी खरं तर एक फुलं विकणारी तसेच माळा विकणारी आहे. या मुलीची तुलना लोक मोनालिसासोबत करू लागले आहे. कुंभमेळ्यात आलेले लोकही या मुलीसोबत सेल्फी घेत आहेत. सोशल मीडियावर हर्षा रिछारियानंतर आता या मुलीची व्हिडिओ देखील सोशल मीडियवर जबरदस्त व्हायरल होत आहे.

Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवारांचे सूर बदलले?; महायुती सरकारलाचं दिला घरचा आहेर

https://www.lokshahi.com/video/sudhir-mungantiwar-sudhir-mungantiwars-tune-changed-the-grand-coalition-government-was-given-a-home-run

सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. चंद्रपूरच्या जनतेने वीज निर्मितीसाठी सहकार्य करायचे आणि सरकारने आम्हाला माती खायला लावायची, असे चालणार नाही, असा खरमरीत इशारा भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला दिला. चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर गावातून वीज केंद्राला रोप वे च्या माध्यमातून कोळसा पुरवला जातो. हा रोप वे चाळीस वर्षे जुना आहे. त्यामुळे कोळशाची धूळ आणि आवाज याचा त्रास येथील लोकांना सहन करावा लागतोय. स्थानिकांनी यासंदर्भात मुनगंटीवार यांना तक्रार केल्यावर आज ते प्रत्यक्ष घटनास्थळी पोचले. त्यांनी रोप वे आणि ध्वनी प्रदूषणाची स्थिती अनुभवली. त्यांनी लगेच वीज केंद्राच्या वरिष्ठांशी बोलून समस्या मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. मात्र हे करताना त्यांनी आपल्याच पक्षाला इशारा दिला. आम्ही शंभर वाघांचे सहाशे वाघ करू शकतो, तर वाघाचा पंजा पण मारू शकतो, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

Rinku Singh Engagement: यूपीचा पठ्ठ्या चक्क खासदारासोबत बांधणार लग्नगाठ? कोण आहे ती जाणून घ्या...

सध्या क्रिकेट क्षेत्रात अनेक गोष्टी घटताना पाहायला मिळत आहेत. काही गोड बातम्या तर काही वाईट बातम्या अशातच टीम इंडियाचा धुव्वाधार प्लेअर रिंकू सिंह सध्या चर्चेत येताना पाहायला मिळत आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वैयक्तिक आयुष्याची म्हणजेच त्याच्या लव्ह लाईफमुळे सध्या तो चर्चेत आला आहे. उत्तरप्रदेशमधील खासदार प्रिया सरोजसोबत तो लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. उत्तरप्रदेशच्या खासदार प्रिया सरोज ही वकील तसेच समाजवादी पार्टीची सदस्य आहे. प्रिया सरोज दुसऱ्या क्रमांकाची सर्वात तरुण खासदारही आहे. 2024मध्ये तिने मछली शहरातून लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपच्या भोलानाथ सरोज यांना पराभूत करत विजय मिळवला होता.

रिंकू हा 2023मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा टीम इंडियाचा नावाजलेला खेळाडू आहे. नुकतेच इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी झालेल्या भारतीय संघाच्या घोषणेत रिंकूचं नाव देखील घेण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट संघात रिंकुचा स्ट्राईक रेट 160 पेक्षा जास्त असून आयपीएलमध्ये तो केकेआर संघातून खेळाताना दिसला आहे. केकेआरकडून खेळताना एका षटकात सलग 5 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने केला आहे. तसेच त्याने भारतासाठी 2 वनडे खेळले असून त्यात त्याने 55 धावा केल्या आहेत, तर 1 विकेट घेतली आहे. त्याचसोबत त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 30 सामन्यांत 507 धावा केल्या तसेच 2 विकेट्स घेतल्या आहेत.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना वसूलीची भीती! फेरतपासणीआधीच लाडक्या बहिणींनी घेतली माघार

https://www.lokshahi.com/news/ladki-bahin-yojana-beloved-sisters-fear-recovery-beloved-sisters-withdrew-before-re-examination

विधानसभा निवडणुकी आधी सुरु केलेली लाडकी बहिण योजना महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीवर विजय मिळवण्यासाठी उजवा कौलचं ठरली. राज्यातील महिला सक्षम व्हायला हव्यात असा या योजनेचा उद्देश असल्याचं पाहायला मिळलं. निवडमुकीच्या पार्श्वभूमिवर या योजनेत अनेक बदल होताना पाहायला मिळाले, काही वेळा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देखील या योजने अंतर्गत मिळत होत्या, मात्र आता याचपार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. योजना सुरु झाली त्यावेळेस सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत सरसकट पैसे मिळत होते, पण आता निवडणुकीनंतर फेरतपासणी होणार याची चर्चा सुरू झाली. आता लाडकी बहिण योजनेच्या अर्ज आणि डॉक्युमेंटची फेरतपासणी होणार अशी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेमुळे अर्ज पडताळणी होण्याआधीच राज्यातील तब्बल 4000 महिलांनी आपला अर्ज या योजनेतून मागे घेतला आहे. वसूलीच्या भीतीने लाडक्या बहिणींनी फेरतपासणी सुरू होण्याआधीच माघार घेतली. यामध्ये महिलांनी सरकारला अर्ज करतं असं लिहलं आहे की, जर का फेरतपासणी झाली तर अपात्र ठरू आणि लाभाची मिळालेली रक्कम दंडासह वसूल केली जाईल त्यामुळे महिला माघार घेत आहेत. महिलांच्या वाढत्या तक्रारींवर मंत्री अदिती तटकरेंनी स्पष्ट केले की, 26 जानेवारीला सातव्या हप्त्याचं वितरण सुरू होईल. पुढील चार ते पाच दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील.

फेरतपासणी कशी होणार?

ज्यांच्याकडे पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड आहे अशा महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार.

ज्या महिला मनो शेतकरी सन्मान योजनेत येतात अशा महिलांना 500 रुपये मिळणार.

ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेत असताल अशा महिलांना पूर्णपणे वगळण्यात येणार.

पुढे अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हस्तांतर योजनेशी संलग्न खात्यातून वसूल करण्यात येईल.

Mahakumbh2025: प्रयागराजसह या तीन शहरांमध्ये देखील होते कुंभमेळ्यांचे आयोजन, जाणून घ्या...

https://www.lokshahi.com/maha-kumbh/mahakumbh2025-kumbh-melas-are-also-being-organized-in-these-three-cities-along-with-prayagraj-know

प्रयागराजमधील संगमच्या पवित्र भूमीवर आयोजित जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, महाकुंभ, सोमवार, १३ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्नान उत्सवाने सुरू झाला. पहिल्या स्नान महोत्सवात, १.५० कोटी भक्तांनी त्रिवेणीत स्नान करण्याचा पवित्र लाभ घेतला. या महाकुंभसाठी साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. यादरम्यान या महाकुंभ मेळ्यात अनेक साधू संत पाहाया मिळत आहेत. मात्र हा कुंभमेळा प्रयागराजसह इतर तीन ठिकाणी देखील आयोजित केला जातो. भारतातील प्रमुख चार तीर्थक्षेत्रांवर आयोजित केला जातो. कुंभमेळे चार ठिकाणी आळीपाळीने आयोजित केले जातात ज्यामध्ये प्रयागराज (उत्तर प्रदेश), हरिद्वार (उत्तराखंड), उज्जैन (मध्य प्रदेश), नाशिक (महाराष्ट्र) या चार ठिकाणी महाकुंभ आयोजित केले जातात. सूर्य, चंद्र आणि गुरु या ग्रहांची स्थिती कुंभमेळ्याचे स्थान ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रयागराजमध्ये कुंभमेळा त्यावेळेस भरतो ज्यावेळेस सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतात आणि गुरु हा वृषभ राशीत असतो. त्याचसोबत सूर्य मेष राशीत असतो आणि गुरु कुंभ राशीत असतो त्यावेळेस हरिद्वारमध्ये कुंभमेळा भरतो. जेव्हा सूर्य सिंह राशीत असतो आणि गुरू ग्रहही सिंह राशीत असतो तेव्हा उज्जैनमध्ये कुंभमेळा आयोजित केला जातो, आणि नाशिकमध्ये कुंभमेळा त्यावेळेस भरतो ज्यावेळेस सूर्य सिंह राशीत आणि गुरु सिंह राशीत किंवा कर्क राशीत असतात. या चार ठिकाणी कुंभमेळा भरण्यामागे एक धार्मिक कथा आहे.

धार्मिककथे नुसार,

ज्यावेळेस समुद्रमंथन झाले त्यावेळेस समुद्रमंथनातून 14 रत्ने बाहेर आली... यामध्ये जो शेवटचा होता त्याला अमृत कुंभ मिळाला. आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी देव ते हातात धरून समुद्रातून बाहेर पडले. त्यावेळेस देव आणि राक्षसांमध्ये स्पर्धा लागली होती. त्यावेळी राजा बळीचा सेनापती स्वरभानूने क्षणात धन्वंतरी देवांच्या हातून अमृतकुंभ हिसकावून घेतला आणि आकाशाकडे नेला. स्वरभान हा जल, जमीन आणि आकाशात प्रचंड वेगाने धावू शकत होता. यानंतर इंद्राचा मुलगा जयंत याने स्वरभानूला अमृताकडे धावताना पाहिलं आणि तो लगेच कावळ्याचे रूप धारण करून त्याच्या मागे उडून गेला आणि त्याच्या हातातील अमृताचे भांडे त्याने हिसकावले. जयंतला एकटा प्रयत्न करताना पाहून देवांचे गुरू सूर्य, चंद्र आणि बृहस्पतिही त्याला सामील झाले. यानंतर देव आणि राक्षसांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. या सगळ्यामध्ये अमृताचा पहिला थेंब हरिद्वारमध्ये पडला. यानंतर अमृताचा दुसरा थेंब गंगा-यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर प्रयागमध्ये पडला. यानंतर अमृताचा तिसरा थेंब उज्जैनमधील क्षिप्रा नदीत पडला आणि चौथ्यांदा अमृताचा थेंब नाशिकच्या गोदावरी नदीत पडला, ज्यामुळे हे चार ठिकाण तीर्थक्षेत्र बनले. या नद्यांमध्ये स्नान करून नंतर त्यांच्या तीरावर दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. या नद्यांच्या काठावर केवळ कुंभसारखे मोठे कार्यक्रमच होत नाहीत, याशिवाय प्रत्येक शुभ तिथीला येथे स्नान करण्यासाठी लोक येतात. ज्यामध्ये पौर्णिमा, अमावस्या आणि एकादशी या तिथी महत्त्वाच्या आहेत.

Sanjay Gandhi National Park | Lion | तब्बल 14 वर्षांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जन्मला छावा

https://www.lokshahi.com/video/after-14-years-a-tent-was-born-in-sanjay-gandhi-national-park

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तब्बल १४ वर्षांनंतर सिंहाचा जन्म झाला असून 'मानसी सिंहिणीने गोंडस बछड्याला जन्म दिला आहे. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास नॅशनल पार्कमध्ये ही आनंदाची बातमी आली. जन्मलेल्या छाव्याचे वजन १ किलो ३०० ग्रॅम असून त्याची आणि आईचीही प्रकृती उत्तम असून दोघांनाही डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या स्थापना दिवशीच ही गोड बातमी आली.

Kundatai On Wankhede Stadium Exclusive : 'वानखेडे'ला 50 वर्षे पूर्ण, कुंदाताईंकडून आठवणींना उजाळा

http://lokshahi.com/sports/cricket/kundatai-on-wankhede-stadium-exclusive-wankhede-completes-50-years-kundatai-reminisces

नागपूरचे सुपुत्र असणाऱ्या बॅरिस्टर शेषेराव वानखेडे यांनी मुंबईत भव्य वानखेडे स्टेडियम बांधले, आता त्या स्टेडियमवर आज मोठे मोठे सामने पाहायला मिळत आहे, त्याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या तसेच मंत्र्यांच्या शपथविधी देखील या स्टेडियमवर पाहायला मिळत आहेत. अशा ऐतिहासिक वास्तूला म्हणजेच वानखेडे स्टेडियमला उद्या या 50 वर्ष पुर्ण होत आहे. मराठी माणसाच्या अपमानाला उत्तर म्हणून वानखेडे स्टेडियम तेरा महिन्यात बांधून उभे करण्यात आले आहे. त्यावेळी काही टिकाकार म्हणायचे की, हे स्टेडियम घाईघाईने बांधल्याने ते कोसळेल पण पन्नास वर्षे झाले तरी वानखेडे स्टेडियम दिमाखात उभे आहे अशी प्रतिक्रिया दिवंगत बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची मुलगी कुंदा विजयकर यांनी दिली आहे. वानखेडे स्टेडियम पुर्ण झाल्यावर या स्टेडियम मधील षटकार मारला तर बॅाल थेट मरिन लाईन्सच्या रुळावर जाईल आणि फिल्डरला बॅाल घ्यायला रेल्वे रुळावर जावे लागेल अशी टीकाही तेव्हा झाली होती, असे कुंदा विजयकर यांनी सांगितले. पण रेल्वे रुळावर बॅाल गेला तर दहा हजार रुपये बक्षिस अशी घोषणाही बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी त्याकाळी केली होती. वानखेडे यांच्या हयातीत एकदाही बॅाल रेल्वे रुळावर गेला नाही . त्याच्या जाण्यानंतर एकदा क्रिकेटर संदिप पाटील यांनी लावलेला सिस्करचा बॅाल रुळावर केला होता अशी आठवण कुंदा विजयकर यांनी सांगितली. कुंदा विजयकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी.

मुंबईत भव्य वानखेडे स्टेडियम बांधला कसा? काय म्हणाल्या कुंदाताई

कुंदाताई म्हणाल्या की, ज्यावेळेस मुंबईत भव्य वानखेडे स्टेडियम बांधला त्यावेळेस बाबा हे विधानसभेचे स्पीकर होते, आणि त्यावेळेस की मंत्री होते ज्यांना फ्रेंडली मॅच खेळायची होती... त्यावेळेस बाबा स्पीकर ही होते आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते... त्यावेळेस त्यांना हे सगळे लोक मास्टर विजय मर्चंट यांच्याकडे घेऊन गेले... आणि विजय मर्चंट यांना रिकवेस्ट केली की, त्यांना सीसीआयला म्हणजे स्टेडियमवर एक फ्रेंडली मॅच खेळू द्यावी... पण त्यांनी परवानगी दिली नाही, त्यावेळेस त्यांना समजवण्यात देखील काहीच अर्थ नव्हता म्हणून मग बाबा म्हणाले की, आम्ही आमच्या स्टेडियमवर मॅच खेळू.... आणि एक मराठी माणूस देखील स्टेडियम बांधू शकतो असं त्यांना दाखवण्यासाठी बाबांनी स्टेडियम बांधला, त्यावेळेस मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक हे बाबांचे चांगले मित्र होते... त्यामुळे बाबांनी त्यांना सांगितलं की आम्हाला ही जागा हवी आहे, कारण ती जागा सरकारची होती... त्यावेळी त्यांना देखील थोडी शंका होती की हे खरचं तिथे स्टेडियम बांधणार आहेत का? पण बाबांनी त्यांना सांगितलं की त्यांना ती जागा हवीचं आहे आणि त्यांनी ती जागा स्टेडियमसाठी दिली. ही आठवण कुंदाताईंनी लोकशाही मराठी सोबत संवाद साधत असताना सांगितलं आहे.

कुंभ आयोजित करताना राशींचे महत्त्व

कुंभमेळ्याच्या आयोजनामागील ग्रह आणि राशींचे रहस्य

कुंभमेळ्याच्या आयोजनामागील राशींचे महत्त्व

Mahakumbh2025: कुंभमेळा आयोजन करताना ग्रहस्थिती आणि राशींचे महत्त्व काय? जाणून घ्या...

https://www.lokshahi.com/maha-kumbh/mahakumbh2025-what-is-the-importance-of-planetary-positions-and-zodiac-signs-while-organizing-the-kumbh-mela-know

प्रयागराज हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. सध्या प्रयागराजमध्ये दुर्मीळ महाकुंभ मेळ्याची तयारी सुरु आहे. हा मेळा १३ जानेवारीपासून सुरू होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र, यावेळी तो अधिक विशेष आहे, कारण १४४ वर्षांनंतर होणाऱ्या दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे या कुंभमेळ्याला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र हा कुंभमेळा दर 12 वर्षांनी का आयोजित केला जातो? यामागचं कारण माहित आहे का? त्यामागे मुख्य आधार सूर्य, चंद्र आणि गुरू ग्रहाची स्थिती आहे. जेव्हा गुरु ग्रह मेष किंवा सिंह राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे एक विशेष योग तयार होतो, तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.

गुरू ग्रह सूर्याभोवती फिरण्यासाठी सुमारे १२ वर्षे इतका कालावधी घेतो. त्यामुळे दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे स्थान निश्चित करण्यासाठी या ग्रहांची स्थिती आणि राशी यांचे फार महत्त्वाचे योगदान आहे. अशी मान्यता आहे की, ग्रहांची स्थिती आणि राशीतील बदलामुळे नद्या देखील दर 12 वर्षांनी स्वतःला पुनरुज्जीवित करतात, ज्यामुळे त्यांचे पाणी अमृतसारखे होते. त्यामुळे 12 वर्षांच्या अंतराने विविध चक्रांमध्ये एक मेळा आयोजित केला जातो. तसेच 144 वर्षांच्या चक्रात महाकुंभाचे आयोजन केले जाते.

कुंभ आयोजित करताना राशी महत्त्वाच्या का आहे?

कुंभचा संपूर्ण उत्सव ताऱ्यांच्या स्थितीवर आणि ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थानावर अवलंबून असतो. पौराणिक कथेच्या मान्यतेनुसार ज्यावेळेस इंद्राचा मुलगा जयंत अमृत भांडे घेऊन उडाला तेव्हा तो १२ दिवसांत स्वर्गात पोहोचू शकला. देवतांचा एक दिवस मानवाच्या एका वर्षाच्या बरोबरीचा असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे 12 वर्षांच्या अंतराने कुंभ आयोजित केला जातो. कुंभाच्या अमृताचे रक्षण करण्यात सूर्य, चंद्र आणि गुरु यांचा सहभाग होता. त्यामुळे कुंभ आयोजित करताना त्यांच्या राशीच्या स्थानाला विशेष महत्त्व आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा

Icc Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज, रोहित शर्मा कर्णधार तर उपकर्णधार म्हणून 'या' खेळाडूचं नाव आलं समोर

क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेकडे लागलं आहे. असं असताना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ लवकरच जाहीर केला गेला आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि रोहित शर्मा आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघ निवडीसाठी बैठक सुरू असताना काही वेळाने खेळाडूंची नावे घोषित केली आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी 'हायब्रिड मॉडेल' अंतर्गत पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. तर भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल.

आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 साठी 15 सदस्यांसह भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात रोहित शर्मा कर्णधार, तर शुभमन गिल उपकर्णधार असेल. तसेच यात यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग यांचा समावेश असणार आहे

मुलांना सारखा सर्दी खोकला होत

सध्या आजाराचे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे मुलांना सारखा सर्दी खोकला होत असतो. मुलांना आहारात घरी बनवलेले साजूक तूप देणं, मुगाचा अधिकाधिक वापर करणं, प्यायचं पाणी सुवर्णसिद्ध आणि 20-25 मिनिटांसाठी उकळलेलं असणं हे चांगलं.  श्वसन संस्थेचं आरोग्य सुधारण्यासाठी आयुर्वेदात अनेक उत्तमोत्तम औषधं असतात. शुद्ध वंशलोचनयुक्त सितोपलादी चूर्ण सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा या प्रमाणात मधासह मिसळून देण्याचा मुलांना नक्की उपयोग होईल. 

त्याशिवाय सर्दी खोकला होईल असं वाटू लागेल की, लगेच रुईच्या पानांनी शेक करण्याचाही उपयोग होईल. यासाठी छातीवर अगोदर थोडसं तेल लावावं आणि तव्यावर तीन ते चार रुईची पानं ठेवून ती गरम झाली की शेक लागेल पण चटका लागणार नाही अशा बेतानी छाती शेकावी. आहारात दही, पनीर, चीज, अंडी, सिताफळ, फणस, पेरू, रेडीमेड मिठाया टाळणं सुद्धा चांगलं. 

या उपायांनी शारीरिक आरोग्य सुधारलं की त्यामुळे मन एकाग्र होण्याची ताकदही आपोआप वाढेल. बरोबरीनी सकाळ-संध्याकाळ ज्योती ध्यान करण्याचाही अप्रतिम उपयोग होऊ शकेल.अशा सोम ध्यानामुळे मन एकाग्र होण्यासाठी तर मदत मिळतेच पण हार्मोन्स संतुलन होण्यासाठी आणि एकंदर शरीर तसंच मनाची शक्ती वाढण्यासाठी मदत मिळते असा अनुभव आहे. 

Mahakumbh2025: घरदार सोडले पण कार सोडली नाही! महाकुंभात आलेले टारझन बाबा कोण?

प्रयागराजमधील संगमच्या पवित्र भूमीवर आयोजित जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, महाकुंभ, सोमवार, १३ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्नान उत्सवाने सुरू झाला. पहिल्या स्नान महोत्सवात, १.५० कोटी भक्तांनी त्रिवेणीत स्नान करण्याचा पवित्र लाभ घेतला. या महाकुंभसाठी साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत अनेक लोक पाहायला मिळाले ज्यात सर्वात आधी उत्तराखंडची मॉडेल हर्षा रिछारिया फेमस झाली त्यानंतर काही दिवसातच मुंबईमधून असेच एक आयआयटी शिक्षण घेतलेले साधू कुंभमेळ्यात दिसले, आयआयटी बॉम्बे असलेल्या बाबांच नाव अभय सिंह असं आहे. हे दोघे ही चर्चेत असतानाच एक माळा विकणारी मुलगी तिच्या सौंदर्यामुळे खास म्हणजे तिच्या डोळ्यांमुळे महाकुंभात चर्चेचा विषय ठरली, तिच्या सौंदर्याने संपुर्ण महाकुंभ मेळ्यातील लोकांना भुरळ पाडली. असं असताना आता आणखी एक बाबा त्यांच्या कारमुळे सध्या महाकुंभात चर्चेत येताना दिसत आहेत. इंदूरहून महाकुंभासाठी आलेल्या महंत राजगिरी यांनी महाकुंभात आपली झोपडी उभारली असली तरी त्यांच्यासोबत उभी असलेली जुनी भगवी रंगाची ॲम्बेसेडर कार सर्वाधिक चर्चेत राहिली आहे. या बाबांना टारझन बाबा किंवा ॲम्बेसेडर कार असेही म्हणतात. बाबांनी असं म्हटलं आहे की, या जीवनशैलीने त्याला सांसारिक संकटांपासून दूर ठेवले आणि स्वावलंबी आणि आत्मकेंद्रित केले. 35-40 वर्षांपूर्वी महंत राजगिरी यांना ही कार दान करण्यात आली होती. तेव्हापासून बाबा जिथे जातात तिथे या गाडीतच जातात. या गाडीमध्ये त्यांना आत्मिक शांती आणि समाधान मिळते.

'सा रे ग म प' शोची विजेती ठरला!

Vinod Kambli Birthday: विनोद कांबळींचा वाढदिवस उत्साहात साजरा! पत्नीकडून मिळालं ‘हे’खास गिफ्ट

https://www.lokshahi.com/sports/cricket/vinod-kamblis-birthday-celebrated-at-aakriti-hospital#google_vignette

सर्वसामान्य घरात जन्माला आलेल्या विनोद कांबळीचा जन्म 18 जानेवारी 1972 रोजी मुंबईतील कांजूर मार्ग येथील इंदिरा नगर येथे झाला. विनोद कांबळींनी त्यांचा बालपणीचा मित्र सचिनसोबत मुंबईच्या प्रसिद्ध कांगा लीगमध्ये पदार्पण केले. एक काळ होता ज्यावेळेस विनोद गणपत कांबळी हे नाव क्रिकेटच्या जगात धुमाकूळ घालत होते.16 वर्षांच्या विनोद कांबळींनी 349 नाबाद धावा काढल्या होत्या. डावखुऱ्या फलंदाजाच्या रूपात भारतीय संघाला एक स्टार खेळाडू मिळाला होता. विनोद कांबळीची कारकीर्द जरी लहान असली तरी ती खूप विक्रमांनी भरलेली होती.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या विनोद कांबळी यांना चार दिवसांपूर्वी भिवंडीतील आकृती रुग्णालयात रुटीन तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. तपासणी दरम्यान त्यांना अशक्त वाटत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून, डॉक्टरांनी उपचारांवर समाधान व्यक्त केले आहे.

काल विनोद कांबळी यांचा 53 वा वाढदिवस साजरा केला गेला. 18 जानेवारी रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात एक खास समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारीवर्ग आणि विनोद कांबळी यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी केक कापून आणि पुष्पगुच्छ तसेच फोटो फ्रेम देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . या प्रसंगी विनोद कांबळी भावुक झाले आणि त्यांनी रुग्णालय प्रशासन तसेच त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले.

Praniti Shinde On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार; कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच खळबळजनक वक्तव्य

https://www.lokshahi.com/video/praniti-shinde-on-ladki-bahin-yojana

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान हे देशाला वाचवू शकत नाही आहेत उलट बिघडवतायत त्यामुळे प्लिज माझ्या देशाला वाचवा म्हणून विनंती केली, असं टीकास्त्र प्रणिती शिंदेंनी डागल आहे. माझ्या देशाला आणि माझ्या मातृभूमीला वाचवा,हे तुमच्याच हातात आहे, असं प्रणिती शिंदेंनी नागरिकांना आवाहन केलं. तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावाही प्रणिती शिंदेंनी केला आहे. सोलापूर शहरातील शास्त्री नगर भागात विकास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात प्रणिती शिंदे यांनी या टीका केल्या आहेत.

लाडकी बहीण पण बंद होणार... प्रणिती शिंदे

लाडकी बहीण योजनेवर बोलत असताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आता संजय गांधी निराधार पण बंद झाल आणि लाडकी बहीण पण बंद होणार... लाडकी बहिणीमुळे तुम्ही त्यांना मतदान केलं, मात्र आता लाडकी बहिणही सावत्र झाली आहे. पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास आणि सौरक्षण मिळणार आहे का? असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

पुढे प्रणिती शिंदे म्हणाल्या की, पैसे घेऊन तुम्हाला दोन दिवसांसाठी आनंद मिळेल नंतर खा मार नवऱ्याचा.. पैसे घेऊन दारू थांबणार नाही, मग काय उपयोग..? पैसे घेऊन बिनधास्त जगायला मिळणार आहे? सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाहीत. मात्र भाजपला वाटत तुम्हाला ते पैशाने खरेदी करू शकतात. मी बोलून बोलून थकले आता तुम्हाला समजायला पाहिजे. देशाला वाचवा एवढी विनंती करते, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी या टीका केल्या आहेत.

Pontoon Bridges Mahakumbh2025: महाकुंभ मेळ्यातील पोंटून पूलाचे वैशिष्ट्ये, अन् ऐकून खर्च किती? जाणून घ्या

https://www.lokshahi.com/ampstories/maha-kumbh/how-much-does-the-pontoon-bridge-cost-in-mahakumbh-mela-find-out

सध्या सर्वत्र प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्याची चर्चा सुरु आहे.

या महाकुंभात अनेक आकर्षणाच्या गोष्टी पाहायला मिळत आहेत.

असचं एक आकर्षण म्हणजे महाकुंभात बांधण्यात आलेला पोंटून पूल.

या पोंटून पूलाला अभियांत्रिकीचा चमत्कार का मानले जाते.

15 महिन्यांच्या कालावधीत जवळपास 30 पोंटून पूल बांधण्यात आले.

दिवसाचे 14 तास परिश्रम करून 1000 हून अधिक कामगारांनी हा पूल उभारला.

महाकुंभातील 30 पोंटून पूल 17.31 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहेत.

हे 30 पोंटून पूल महाकुंभ क्षेत्राच्या विविध भागांना जोडतात.

Mahakumbh2025: महाकुंभमेळ्यात अग्नितांडव! आगीत तंबूसह इतर सामान जळून खाक

https://www.lokshahi.com/maha-kumbh/mahakumbh2025-fire-at-mahakumbh-mela-the-tent-and-other-belongings-were-burnt-in-the-fire

प्रयागराजमधील संगमच्या पवित्र भूमीवर आयोजित जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, महाकुंभ, सोमवार, १३ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्नान उत्सवाने सुरू झाला. तसेच हा महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तब्बल 45 दिवस या महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभ महोत्सवात, १.५० कोटी हुन अधिक भक्तांनी त्रिवेणीत स्नान करण्याचा पवित्र लाभ घेतला. या महाकुंभसाठी साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर 'शाही स्नान' सह महाकुंभाची सुरुवात झाल्यानं प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. महाकुंभ मधून अनेक बातम्या ऐकायला मिळत होत्या अनेक आगळे-वेगळे साधू संत या कुंभमेळ्यात पाहायला मिळत आहेत. अशातच आता प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रयागराजमधील मकुंभमेळ्यात भीषण आग लागली आहे. ही आग शास्त्री पूल सेक्टर १९ मध्ये लागली आहे. तर सिंलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तावली जात असून या आगीत तंबू आणि अनेक लोकांच बरच सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरु आहे.

Mumbai Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियमचा आज सुवर्ण महोत्सव, खास कार्यक्रमाचे आयोजन

https://www.lokshahi.com/sports/cricket/mumbai-wankhede-stadium-wankhede-stadium-celebrates-its-golden-jubilee-today-special-program-organized

भारतीय क्रिकेटची पंढरी असलेला वानखेडे स्टेडियम आता सज्ज आहे. भारतीय क्रिकेटर्ससह क्रिकेटप्रेमींच देखील सगळ्यात आवडत स्टेडियम म्हणजेचं मुंबईमधील वानखेडे स्टेडियम, आणि या स्टेडियमला आज ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. रविवारी म्हणजेच आज वानखेडे स्टेडियमच्या ५० वर्ष पूर्ण होण्यानिमित्ताने एक भव्यदिव्य सोहळ्याच आयोजन करून तो सोहळा स्टेडियममध्ये पार पाडण्यात येणार आहे.

यावेळी सोहळ्याला मुंबईचे दिग्गज खेळाडू ज्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आशा सर्व कर्णधारांचा सत्कार सोहळा पार पाडण्यात येणार आहे. तसेच सुनील गावस्कर , दिलीप वेंसरकर , रवी शास्त्री , भारतरत्न सचिन तेंडुलकर , रोहित शर्मा , अंजिक्य राहणे , सुर्यकुमार यादव या सर्वांचा सन्मान या वेळी करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे भारताचे दिग्गज खेळाडू पद्मभूषण सुनील गावस्कर यांचा ७५ वा वाढदिवस देखील या वेळी साजरा केला जाणार आहे. याचसोबत महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजय-अतुल आणि रोकस्टार अवधूत गुप्ते यांचा कॅान्सर्ट ही या वेळी पार पडणार आहे. एक कमाल लाईट आणि साऊंड शो पण यावेळी पाहायला मिळणार आहे.

उदय सामंत पालकमंत्रीपदी

Uday Samant: रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा उदय सामंत यांची वर्णी, कार्यकर्त्यांकडून जल्लोष

https://www.lokshahi.com/news/uday-samant-uday-samant-once-again-appointed-as-guardian-minister-of-ratnagiri

खाते वाटप झाल्यावर महिनाभर पालकमंत्रीपदाची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकमंत्री पदाची निवड कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील पालकमंत्र्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे. अखेर महाराष्ट्रातील पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. पालकमंत्री पदाच्या निवडीची यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान रत्नागिरीच्या पालकमंत्री निवडीची घोषणा करण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्योग तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची वर्णी लागण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उद्योग व मराठी भाषा या दोन खात्यांच्या कार्यभार सांभाळणारे मंत्री उदय सामंत यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज रत्नागिरी जयस्तंभ येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने महिलावर्ग तसेच कार्यकर्ते उपस्थित होते

Mahakumbh 2025: महाकुंभात ७ कोटी 'रुद्राक्ष' मण्यांपासून तयार केली रुद्राक्षांची 12 ज्योतिर्लिंग

https://www.lokshahi.com/maha-kumbh/mahakumbh-2025-12-rudraksha-jyotirlingas-made-from-7-crore-rudraksha-beads-in-mahakumbh

प्रयागराजमधील संगमच्या पवित्र भूमीवर आयोजित जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, महाकुंभ, सोमवार, 13 जानेवारी रोजी पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्नान उत्सवाने सुरू झाला. तसेच हा महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तब्बल 45 दिवस या महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभसाठी साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान महाकुंभातील सेक्टर-6 मध्ये 7 कोटी 51 लाख रुद्राक्ष मण्यांचा वापर करून 12 ज्योतिर्लिंग तयार केली आहेत. ही शिवलिंग साधू महंतांनी हजारो गावांना भेट देत गोळा केलेल्या रुद्राक्षांचा वापर करून तयार करण्यात आली आहे. महाकुंभाच्या सेक्टर 6 मध्ये बांधण्यात आलेले प्रत्येक ज्योतिर्लिंग 11 फूट उंच, 9 फूट रुंद आणि 7 फूट जाड असून त्याभोवती 7 कोटी 51 लाख रुद्राक्षाच्या मण्यांची माळा बांधलेली आहे. 10,000 गावातून भीक मागून आणि फिरून हे मणी गोळा केले गेले. उत्तर दिशेकडे मुख असलेली सहा आणि दक्षिण दिशेकडे मुख असलेल्या सहा अशी शिवलिंगाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.

नेपाळचा दारुण पराभव अन् भारतीय महिला खो खो संघाने पटकावले विजेतेपद

Kho Kho Women's World Cup 2025: चक दे इंडिया! नेपाळचा दारुण पराभव अन् भारतीय महिला खो खो संघाने खो खो स्पर्धेत मारली बाजी

https://www.lokshahi.com/sports/indian-womens-kho-kho-team-won-the-world-cup

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे झालेल्या खो-खो वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाने दणक्यात प्रवेश केला होता. भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून सातत्याने विजय मिळवत असलेल्या भारतीय संघाने उपांत्य फेरीतही आपले वर्चस्व कायम राखले. दक्षिण आफ्रिकेचा 50 पाईंटच्या फरकाने पराभव केला. आणि आता भारतीय टीमनं एकही मॅचमध्ये न गमावता भारतीय महिला खो खो संघानं जागतिक खो खो स्पर्धा जिंकत हा पराक्रम केला. यावेळी भारतीय महिला खो खो संघाने नेपाळचा 78-40 अशा अंकांनी पराभव केला तसेच त्याआधी भारतीय टीमनं ईराण, द. कोरिया, मलेशिया यांचा देखील पराभव केला.

भारतीय महिला खो खो संघाची उत्कृष्ट खेळी

भारताने ग्रुप स्टेजमध्ये त्यांचे तिन्ही सामने जिंकून उत्कृष्ट धावा केल्या होत्या. केवळ 54 गमावून त्यांनी एकूण 375 गुण मिळवले. भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशला 109-16 च्या जबरदस्त स्कोअरसह पराभूत केले. यानंतर उपांत्य फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अप्रतिम कामगिरी करत 66-16 असा विजय मिळवला. शेवटी अंतिम फेरीत, भारताने नेपाळविरुद्ध आपले श्रेष्ठत्व दाखवून आणखी एक प्रभावी कामगिरी करून विजेतेपद पटकावले. हा विजय भारतीय महिला खो खो संघासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला कारण त्यांनी अपवादात्मक मोहिमेनंतर प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली.

Vijay Wadettiwar: उद्धव ठाकरे आणि शिंदेंना संपवल्यानंतर आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा रोख कुणाकडे?

https://www.lokshahi.com/video/vijay-wadettiwar-after-eliminating-uddhav-thackeray-and-shinde-now-a-new-uday-who-has-vadettiwars-money

उद्धव ठाकरेंना संपवल्यानंतर आता शिंदेंना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे का? असा प्रश्न विजय वडेट्टीवारांनी विचारलेला आहे. अशातच आता शिंदेंच्या शिवसेनेत नवा 'उदय' होण्याची शक्यता वर्तावली जात आहे असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे वडेट्टीवारांचा रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. काही असे उदय आहेत जे दोन्ही डग्यावर पाय ठेवून आहेत. नेमकं वडेट्टीवार काय सांगू पाहत आहेत.

दरम्यान विजय वडेट्टीवार म्हणाले की, उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं आता शिंदेंना संपून नवीन' उदय' पुढे येईल... तो उदय कुठला असेल? त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल... ही शिवसेनेच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती महाराष्ट्रात येईल... मला असं वाटत की, उद्याचा शिवसेनेचा तिसरा नवा उदय जो येईल तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही... कारण काही उदय दोन्ही डब्यल्या हात मारून आहे. संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच आहे. त्यामुळे आता विजय वडेट्टीवारांचा रोख कोणाकडे आहे हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Uday Samant: शिवसेनेत राजकीय 'उदय'? मंत्री सामंतांचा थेट वार; संजय राऊत, वडेट्टीवारांना म्हणाले...

https://www.lokshahi.com/news/uday-samant-on-vijay-wadettiwar-and-sanjay-raut

राजकीयवर्तुळात सध्या विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच एक ठिणगी टाकली आहे. त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांसोबत बोलताना उद्धव ठाकरेंना संपवल्यानंतर आता शिंदेंना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेत नवा 'उदय' होण्याची शक्यता वर्तावली जात आहे असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे वडेट्टीवारांचा रोख नेमका कुणाकडे? याकडे देखील सर्वांच लक्ष लागलेलं आहे. याचपार्श्वभूमीवर वडेट्टीवारांनी केलेल्या या वक्तव्यावर उद्योगमंत्री उदय सामंतांनी वडेट्टीवार यांच्यासह संजय राऊत यांच्यावर देखील थेट वार केला आहे.

दरम्यान मंत्री उदय सामंत म्हणाले की, विजय जी मला असं वाटत की, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबामधून मोठे झाले आहेत. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालेलो आहे. त्याचसोबत तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झालेले आहात. त्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातील लोक एकत्र येत असतील तर त्यांना बाजूला करण्याचा षडयंत्र करु नक. कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटलात याची पुर्ण माहिती माझ्याकडे आहे. परंतु मी काही राजकीय नैतिकता पाळतो आणि राजकीय नैतिकता पाळत असल्यामुळे मी कधीही वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही. परंतु जर एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र जर कोणी करु नये हीच माझी सुचना आहे. पुन्हा एकदा सांगतो जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोट आहे. हे निषेध करण्यासारख आहे. त्यामुळे मी या गोष्टीचा निषेध करतो आणि मी एकनात शिंदेंसोबत होतो आणि पुढे देखील त्यांना जेव्हा माझी गरज लागेल मी त्यांच्यासोबत असेन. अशा प्रकारच्या षडयंत्रांना मी भिक घालत नाही, असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.

Akshay Shinde Badlapur Case Update: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात पोलीस जबाबदार?

https://www.lokshahi.com/video/akshay-shinde-badlapur-case-update-is-the-police-responsible-in-akshay-shindes-encounter-case

बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद असल्याच म्हटलं जात आहे. बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या कथित चकमकीचा दंडाधिकारी चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. मृत व्यक्तीशी झालेल्या झटपटीत 5 पोलिसांकडून वापरलेला बळ अनावश्यक होता. आरोपीच्या मृत्यूसाठी 5 पोलीस जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण न्यायालयीन चौकशी समितीचीचा अहवाल हायकोर्टात सादर अक्षयचा स्वरक्षणासाठी एन्काऊंटर केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट नाहीत, तसेच अक्षयवर गोळीबार केलेला अन्यायकारक आणि संशयास्पद आहे, असा फॉरेन्सिकचा अहवाल आहे. यादरम्यान पोलीस एन्काऊंटरमध्ये आरोपी अक्षय शिंदेंचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू, सरकारी वकिलांची कोर्टात अशी माहिती आहे.

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात हुरडा पार्टीचा जोर; पार्टी करण्यासाठी पर्यटकांची गर्दी

https://www.lokshahi.com/video/solapur-news-hurda-party-in-full-swing-in-solapur-district-tourists-flock-to-party

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यासह सर्वत्र ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. यावर्षी ज्वारीचे पिक देखील जोमात आले आहे. ज्वारी फेब्रुवारी मध्ये काढली जाते. कवळ्या हुरडा पार्ट्यांचा जोर सध्या ग्रामीण भागात वाढलेला दिसतो आहे. सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात सर्वत्र हुरडा पार्ट्यांचा जोर वाढलेला असतो. सोलापूर जिल्ह्यातील हुरड्याला विशेष अशी मागणी आहे. पूर्वी शेतकरी आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना आपल्या शेतामध्ये हुरडा पार्टी देत असतं. आता या हुरडा पार्टीला व्यवसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हुरडा पार्ट्यांचे आयोजन केले जाते. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पुणे सांगली धाराशिव या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक हुरडा पार्टीसाठी सोलापूर जिल्ह्यात येतात.

हुरडा करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ज्वारीशी कणसं कोळशावर भाजले जातात. ती गरम गरम कणसं हाताने चोळून त्यातील हुरडा वेगळा केला जातो. गरम गरम हुरडा शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, पेरू, बोर, गुळ, भाजलेले वांगे, भाजलेला कांदा, गोड शेव, खोबऱ्याची चटणी, फरसाणासोबत खायला दिला जातो. सोबत ताकाचा ग्लास ही असतो. आंबट - गोड हुरडा त्याबरोबर विविध प्रकारच्या चटण्या आणि फळांवर खवय्ये ताव मारतात. फाइव स्टार संस्कृतीच्या काळात देखील हुरडा पार्टी आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे.

Hurda: हिवाळ्यात करा हुरडा पार्टी, अन् जाणून घ्या हुरड्याचे हेल्दी फायदे...

https://www.lokshahi.com/ampstories/web-stories/hurda-have-a-hurda-party-in-winter-and-know-the-healthy-benefits-of-hurda

हिवाळा सुरु झाली आहे त्यामुळे सर्वत्र थंडी वाढल्याचे जाणवते.

अनेक लोक थंडीत आपल्या कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासह हुरडा पार्टीचा बेत करतात.

हुरडा म्हणजे ज्वारी बारीक दाणे, हे दाणे पचनक्रिया चांगली करतात.

तसेच हुरडामध्ये लोहासह मॅग्नेशियम, कॉपर असते.

हुरडामध्ये अँटी ऑक्सीडन्ट असल्यामुळे हृदयविकार आणि कर्करोग दुर राहण्यासाठी मदत होते.

तसेच शरीरातील वाढलेले कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील हुरडा फार फायदेशीर ठरतो.

तसेच हिवाळ्यात हुरडा खाल्यामुळे शरीराला उब मिळण्यास मदत होते.

तसेच हुरडा कोमल त्वचा, मजबूत हाडं तसेच वाढ होण्यास मदत करते.

Walmik Karad: कराडच्या जामीन अर्जाची सुनावणी लांबणीवर, देशमुख कुटुंब नाराज

https://www.lokshahi.com/news/walmik-karads-bail-application-hearing-postponed-deshmukh-family-upset

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे संशयित म्हणून वाल्मीक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या सोबतच वाल्मीक कराड यांच्यावर खंडणीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. यावर आज न्यायालयात सुनावणी होती, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. तर ही सुनावणी आता पुन्हा 23 जानेवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यावर बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे, पोलिसांनी तपासात ढील दिल्याने पुढची तारीख मिळाल्याच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी ते अकोल्यात आयोजित जन आक्रोश मोर्चा दरम्यान बोलत होते. तर जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढलं पाहिजे अशी मागणी ही धनंजय देशमुख यांनी यावेळी केली आहे.

Kolkata Sanjay Roy: कोलकाता अत्याचार प्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा

https://www.lokshahi.com/lokshahi-crime/kolkata-sanjay-roy-accused-sanjay-roy-sentenced-to-life-imprisonment-in-kolkata-atrocity-case

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट 2024 रोजी 31 वर्षीय महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून त्या महिला डॉक्टरवर क्रूरपणे हल्ला करण्यात आला होता ज्यामध्ये त्या महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या महिला डॉक्टरच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमाच्या खुणा होत्या. या घटने दरम्यान गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी सीबीआय कोर्टाने बंद खोलीत सुनावणी सुरू केली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय जो वैद्यकीय स्वयंसेवक होता त्याच्या विरोधात बीएनएस धारा 64,66, 103/1 च्या कलमांतर्गत पाच महिन्यात आरोपपत्र दाखल होऊन त्याला अटक झाली होती. यादरम्यान सीबीआय आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी रॉयला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या घटनेने संपुर्ण देश हादरलं होत.

याचपार्श्वभूमीवर आता कोलकाता महिला डॉक्टरच्या झालेल्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपी संजय रॉयला 18 जानेवारी रोजी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचसोबत पीडित महिलेच्या कुटुंबाला न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला 17 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तर न्यायालयाने 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. नकोलकात्यातल्या सियालदह कोर्टाने हा निर्णय देताना असे म्हटलं आहे की, हा घडलेला प्रकार किरकोळ गुन्हा नसून त्याला दुर्मिळातील दुर्मिळ असे म्हटले नाही.

IPL 2025 LSG New Captain: आयपीएल 2025 च्या सर्वात महागडा खेळाडू झाला लखनऊचा नवा कर्णधार

आयपीएल 2025 च्या लिलावात श्रेयस अय्यरनंतर ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला लखनौने ऋषभसाठी २७ कोटी ही किंमत ठेवली आणि ऋषभला आपल्या संघात घेतले. त्यामुळे आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर आता लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाचा आयपीएल 2024चा कर्णधार केएल राहुल होता. मात्र आता केएल राहुलची रिप्लेसमेंट म्हणून रिषभ पंतला संघात घेतलं आणि रिषभ पंतच्या नेतृत्व संघाची खेळी पाहायला मिळणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाचे संघमालक संजीव गोयंका यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा आयपीएल २०२५ साठी संघ

ऋषभ पंत, निकोलस पूरन, आर्यन जुयाल, आकाश दीप, शमार जोसेफ, प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रिट्झके, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, आयुष बदोनी, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, डेव्हिड मिलर, एडन माक्ररम, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, अब्दुल समद.

Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानवर चाकू हल्ल्याचा पोलिसांकडून सीन रिक्रिएशन

Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार?

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एक रुपयात पिक विमा योजना अत्यंत महत्त्वाची असून शासनाने ही योजना बंद करू नये. निवडणूक काळामध्ये शेतकऱ्यांना मोठमोठे आश्वासन दिली गेली, शेतकऱ्याच्या जीवावर निवडणुका लढवल्या आणि शेतकऱ्यांची महत्त्वाची योजना एक रुपयात पिक विमा ही योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू असून हे अत्यंत चुकीचं आहे. ही योजना बंद करू नये अन्यथा रस्त्यावर उतरून याचा निषेध करू अशी प्रतिक्रिया जालन्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे..

याचपार्श्वभूमीवर राजकीयवर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Crop Insurance Update: एक रुपयात मिळणारा पीकविमा बंद होणार? महायुती सरकार काय निर्णय घेणार?

https://www.lokshahi.com/video/crop-insurance-update-will-the-crop-insurance-available-for-one-rupee-be-discontinued

काही दिवसांपूर्वी लातूरमधील पीकविमा घोटाळा उघडकीस आला होता. यात लातूरमधील शेतकऱ्यांचे पैसे बीडमधील लोकांनी ठापल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर योजनेच्या उपयुक्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली एक रुपयातील पीकविमा योजना बंद करावी, अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला केली आहे. ओडिशा सरकारने गैरव्यवहारांनंतर ही योजना बंद केली होती. या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कोणता निर्णय घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. याचपार्श्वभूमीवर राजकीयवर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेले निर्णय निवडणुकीच्या नंतर आता त्याच्यावर पुन्हा काही निर्णय घेण्यात येत आहेत. यावर आपण सगळ्यांनीच गांभर्याने पाहिलं पाहिजे. पीकविमामधून पैसे काढणे, त्याला हमी भाव न देणे त्यांनी शब्द दिला होता की, सरसकट कर्ज माफी करून सातबारा कोरा करु. त्यामुळे अशे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत त्यामुळे अतिशय गंभीर असे हे विषय आहेत राज्यासमोर आव्हान आहेत. त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की, आता आलेल्या नव्या सरकारने या विषयांवर बोललं पाहिजे.

तसेच सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या क्षेत्राकडे जर आपण गंभीरपणे लक्ष दिले नाही, आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी जर शेती करण सोडून दिलं तर, तुम्हाला सोन इम्पोर्ट करण्यासाठी जेवढे पैसे लागतात ना, त्याच्यापेक्षा दहा हजारपट धान्य इम्पोर्ट करण्यासाठी लागतील. आपल्याला अतिशय काळजीपूर्वक मिशन जय किसान करण्याची आवशक्यता आहे. तुम्ही एक रुपया पीक विमावर गैरप्रकार झाले असतील तर त्याला शिक्षा करा... सर्व पीक विमा ही योजनाच बंद करणे हा काही त्यावरचा मार्ग नाही. मला वाटतं की हे करण योग्य नाही आता तर आपल्याला काळजीपूर्वक शेती या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

तसेच पुढे शंभूराज देसाई म्हणाले की, मी काही दिवसातचं साताऱ्यात जाणार आहे. त्याआधी मी जिल्हाअधिकाऱ्यांसोबत आणि कृषी अधिकाऱ्यांसोबत बोलेन आणि जर का अशा तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर त्याची स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून चौकशी करु आणि त्याचसोबत त्यांच्याकडून चौकशीचा अहवाल देखील मागू आणि जे कोणी याच्यामध्ये असेल ज्यांनी सरकारची फसवणूक केली असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Nana Patole on Walmik Karad CCTV: बीडमध्ये काय चाललंय, सगळे एकत्र - नाना पटोळे

https://www.lokshahi.com/video/nana-patole-on-walmik-karad-cctv-video

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्या अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहे. कारण वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले, बालाजी तांदळे, महेश केदार यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यावरच नाना पटोळे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याचपार्श्वभूमीवर नाना पटोले म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललं काय आहे? हे सगळ्यांनाच माहित आहे. सगळे गुन्हेगार आणि सत्तेत बसणारे हे सगळे यात सामील आहेत. त्यामुळे तिथला कारभार कसा चालू आहे सगळ्यांनाच माहित पडलेलं आहे. गृहविभागाकडून ते माहिती घेऊन सर्वांना सांगत आहेत.

पुढे नाना पटोले म्हणाले की, सरकार बधिर का आहे? हे सरकार जनतेच्या मताने निवडून आलेले नाही, तर बेईमानीने निवडून आले आहेत. आमचं कोणी ही वाकडं करू शकत नाही, हे त्यांना आता वाटू लागलं आहे. आमचं म्हणणं जनतेपर्यंत पोहोचवण आहे. या राज्यात सिनेअभिनेते देखील सुखरूप नाही. फिल्म सिटी देखील इथून जाईल अशी शंका येते, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

Ranji Trophy: तब्बल 10 वर्षांनंतर रोहित-विराट रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी उतरणार

https://www.lokshahi.com/sports/cricket/ranji-trophy-rohit-virat-to-play-ranji-trophy-match-after-10-years

ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पराभवानंतर फिटनेसच्या समस्या नसल्यास आपल्या सर्व करारबद्ध खेळाडूंना BCCIने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास अनिवार्य केलं आहे. त्यामुळे तब्बल 10 वर्षांनंतर मुंबईसाठी रणजी ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट विराट कोहली पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यास तयार झाले आहेत. रणजी ट्रॉफी 2024-2025 चा हंगाम यावेळी दोन भागात विभागून आयोजित केला आहे. रणजी ट्रॉफीची पहिली फेरी 11 ऑक्टोबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पार पडली होती. यादरम्यान आता दुसरी फेरी 23 जानेवारी ते 2 मार्च या कालावधीत खेळवली जाणार आहे. तसेच रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरी नंतर 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत साखळी सामने खेळवले जाणार आहेत.

त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे खेळाडू अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळणार आहेत. तसेच शुभमन गिल पंजाबकडून आणि ऋषभ पंत दिल्लीकडून रणजी सामना खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा देखील दिल्लीविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आता या दुसऱ्या हंगामातील सामने फारच रोमांचक असणार आहेत. रणजी ट्रॉफी 2024-2025 मध्ये एकुण 38 संघांची पाच गटात विभागणी करण्यात आली असून चार एलिट गट आहेत. त्या प्रत्येक गटात 8 संघ आहेत. तसेच उर्वरित 6 संघांना वेगळ्या प्लेट गटात ठेवण्यात आले आहे.

रणजी ट्रॉफी 2024-2025 साठी तयार केलेल गट

एलिट ( A) : मुंबई, बडोदा, सेवा दल, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा, महाराष्ट्र, ओडिशा, मेघालय

एलिट (B) : विदर्भ, आंध्र, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, पाँडिचेरी, हिमाचल प्रदेश, हैदराबाद

एलिट (C) : मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार

एलिट (D) : तामिळनाडू, सौराष्ट्र, रेल्वे, दिल्ली, झारखंड, छत्तीसगड, आसाम, चंदीगड

प्लेट : गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश.

ICC Women's T20 World Cup: भारताच्या पोरींचा नाद! Under-19 वर्ल्ड कपमध्ये सुपरहिट कामगिरीसह जिंकली ट्रॉफी

https://www.lokshahi.com/sports/cricket/icc-womens-under-19-t20-world-cup-won

क्वालालंपूर येथील बाय्युमास ओव्हल येथे आयसीसी अंडर 19 महिला टी20 विश्वचषक 2025 स्पर्धेला सुरुवात झाली असून भारत विरुद्ध मलेशिया सामन्यात भारताने मलेशियाचा दारुण पराभव केला आहे. भारतीय संघाने 17 बॉलमध्ये हा सामना जिंकला असून मलेशियाच्या 10 विकेट घेत हा पराभव केला आहे. भारताने वेस्ट इंडीजचा 9 गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे या स्पर्धेतील हा भारताचा सलग दुसरा विजय आहे. मलेशियामधील कोणताच खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकला नाही तसेच भारतीय संघाने अवघ्या 2.5 षटकांत बिनबाद 32 धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर मलेशियन संघाचा डाव चांगलाच गारद झाला. तर या सामन्यामध्ये टीम इंडियासाठी वैष्णवी सलामीवीर ठरली. वैष्णवीच्या दमदार कामगिरीमुळे भारताने मलेशियावर विजय मिळवत ऐतिहासिक विजयाची कामगिरी बजावली आहे.

भारत अंडर महिला संघ

गोंगडी त्रिशा, जी कमलिनी(wk),सानिका चाळके, निकी प्रसाद (c), भाविका अहिरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता VJ, पारुनिका सिसोदिया, शबनम मो. शकील, सोनम यादव, वैष्णवी शर्मा, धृती केसरी, आनंदिता किशोर

अग्निकांडात ५१ जण जखमी

तुर्कीतील स्की रिसॉर्टमध्ये आगीचा भडका, अग्निकांडात ६६ जणांचा मृत्यू, तर 51 जण जखमी

Fire At Turkey Ski Resort: तुर्कीतील स्की रिसॉर्टमध्ये आगीचा भडका, अग्निकांडात ६६ जणांचा मृत्यू, तर 51 जण जखमी

https://www.lokshahi.com/desh-videsh/fire-at-turkey-ski-resort

तुर्कीतील बोलू डोंगरांमध्ये असलेल्या ग्रँड कार्टल हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा आग लागली तेव्हा रिसॉर्टमध्ये 234 लोक या हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. या अग्नितांडवामध्ये 66 जण मृत्यूमुखी पडले. तर 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. तर आगीचा वनवा पाहून तिथे अडकुन घाबरलेल्या लोकांनी हॉटेलच्या खिडक्यांमधून उड्या टाकत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ही आग सकाळच्या सुमारास आग लागली असून अतिशय वेगाने सर्वत्र पोहचली होती. ज्यामुळे हॉटेलमध्ये धूर पसरल्यानं लोकांमध्ये खळबळ उडाली. आगीमध्ये जखमी झालेल्या दोन पीडितांनी आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीमधून बाहेर उडी मारली ज्यामध्ये त्या दोघांचा मृत्यू झाला. तसेच हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लोकांनी खाली उतरण्यासाठी बेडशीट्सच्या दोऱ्यांसारखा वापर केला. पण या प्रयत्नात काही जण जखमी झाले. हॉटेलातील अग्निरोध यंत्रणा निष्क्रिय असल्यानं दुर्घटनेची तीव्रता वाढली. आगीमुळे हॉटेलचं प्रचंड नुकसान झालं आहे. वायव्य तुर्कीतील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या कार्तलकाया स्की रिसॉर्टमध्ये ही घटना घडली.

Jayant Patil on CM Fadnavis: भारताशी संबंध नसलेल्या कंपनीची गुंतवणूक घेऊन या- जयंत पाटील

https://www.lokshahi.com/video/jayant-patil-on-cm-fadnavis-bring-investment-from-a-company-that-has-no-connection-with-india-jayant-patil

वर्ल्ड इकोनॉमीच्या फोरमच्या अनुशंगाने सध्या स्वित्झर्लंडच्या दावोस दौऱ्यावर असलेले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 38,750 कोटींची गुंतवणूकीच्या अनुशंगाने एक मोठी कामगिरी केल्याच पाहायला मिळत आहे. पहिल्या १ तासात दावोस मध्ये 3 सामंजस्य करार झालेले आहेत. दावोसमध्ये आजचा आणि उद्याचा दिवस महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. आज कल्याणी समूह: 5200 कोटींचा करार झाला असून हा करार गडचिरोलीसाठी असणार आहे. तर रिलायन्स इन्फ्रा: 16,500 कोटींचा करार झाला. तसेच बालासोर एलॉय: 17,000 कोटी करार झाला.

याचपार्श्वभूमीवर जयंत पाटील म्हणाले की, मागच्या वेळेस एकनाथ शिंदे गेले होते दावोसला यावेळेस देखील असचं भारतातील लोकांना तिथे नेऊन करार करण्यात आले. पैसा कोणता ही असो त्याचसोबत भांडवल कोणत ही असो आम्ही महाराष्ट्र मधील वाढलेली जी बेरोजगारी आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ठीक आहे इथे भेटायला वेळ नसेल मिळाला म्हणून दावोसला गेले आणि तिथे जाऊन हा करार केला जात असेल, तर त्यावर आमच काही म्हणणं नाही. पण, जे करार होत आहेत ते भारतासाठी होत असतील तर भारतासाठी आलेली गुंतवणूक ही राज्याची गुंतवणूक म्हणून सांगू नका त्याची गणना केली तरी आमची काही हरकत नसेल. भारतातील कंपन्यांची जी गुंतवणूक आहे ती देखील वाढली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

Sachin Ahir: 'स्वबळावर लढायचं की नाही हे ठाकरे ठरवणार' - आहिर

https://www.lokshahi.com/video/sachin-ahir-thackeray-will-decide-whether-to-fight-on-his-own-or-not-ahir

आगामी काळात होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की महाविकास आघाडी म्हणून लढायच्या हे उद्धव ठाकरे 23 तारखेला जाहीर करणार आहेत. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी दिली आहे. ज्यांच्यासोबत आघाडी केली आहे, तेच आघाडीत राहतील का? माहीत नाही त्यामुळे निवडणुका स्वतंत्र लढाव्यात असाही एक मतप्रवाह असल्याचंही अहिर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान याचपार्श्वभूमीवर सचिन अहिर म्हणाले की, आज पिंपरी-चिंचवडमध्ये देखील सर्व नेत्यांसोबत चर्चा झाली आहे, अर्थात यानंतर 27 तारखेला संपर्क नेत्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका स्व बळावर की महाविकास आघाडी म्हणून लढायच्या हे 23 तारखेला स्वतःता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर करणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये दोन प्रवाह आहेत की, मविआसोबत लढा आणि दुसर म्हणजे ज्यांच्यासोबत आघाडी करायची तेच आघाडीत राहतील का? हे माहीत नाही त्यामुळे निवडणुका स्वतंत्र लढाव्यात असाही एक मतप्रवाह आहे, यादरम्यान एक बैठक घेऊन यावर निर्णय घेतला जाईल.

इथे कायद्याचे राज्य आहे कुठे ..

हत्येचे प्रकरण तुम्ही जातीवर नेता .. लाज नाही वाटत ..

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणाचा बच्चू कडूंनी जोरदार समाचार घेतलाय..इथं कायद्याचं राज्य आहे कुठं? हत्येचं प्रकरण तुम्ही जातीवर नेता लाज नाही वाटत अशा शब्दांत बच्चू कडूंनी सरकार आणि विरोधकांना चांगलचं झापलंय...

एखाद्याचा जीव जातो आणि त्याच्यावर तुम्ही आपली राजकीय पोळी भाजून घेता .. लाज वाटायला पाहिजे

एखाद्याच्या घरचा माणूस मेल्यावर तुम्ही वरिष्ठ पातळीवर राजकीय कट काढायचा प्रयत्न करत आहात असे म्हणत बच्चू कडू यांनी संतोष देशमुख प्रकरणात राजकारण करणारे दोन्ही बाजूंच्या नेत्यांवर सडकून टीका केली .. त्यांचा संपूर्ण रोख मुंडे आणि त्यांचे विरोधक असणारे भाजपा आमदार सुरेश धस व इतर सर्वांवर होता .. कोणाचा तरी कट काढायचा म्हणून त्या पद्धतीने राजकीय पोळी भाजली जात असेल तर तुमच्यासारखे नालायक राज्यकर्ते कोणी नाहीत अशी सडकून टीकाही कडू यांनी केली. हा प्लॅन मर्डर होता , गुन्हा केलेल्याची जात नसते ज्याने खून केला तो नालायकच पण त्यावर आपली राजकीय पोळी भाजणारे त्यापेक्षा नालायक आहेत असा टोलाही कडू यांनी लगावला

एवढा वेळ लागतो का असे सांगत कशात काही नसताना लगेच ईडीची नोटीस येते आणि या वाल्मीक कराड कडे एवढी प्रचंड संपत्ती सापडून सुद्धा आता इडी कुठे आहे असा सवाल ही बच्चू कडू यांनी केला. अशा शब्दात संतोष देशमुख प्रकरणात सुरू असलेल्या राजकारणावर बच्चू कडू यांनी सडकून टीका केली

Special Report Priyanka Ingle: प्रियंका इंगळेची खो-खोमध्ये झेप, कसा होता प्रवास?

https://www.lokshahi.com/sports/special-report-priyanka-ingle-priyanka-ingles-leap-into-kho-kho-how-was-the-journey

महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ खो-खोने यंदा जागतिक दर्जाचा मान मिळवला आहे. एरवी या खेळाकडे गांभीर्यानं न पाहणा-यांनी आता जागतिक स्पर्धांच्या निमित्तानं आपला मोर्चा या खेळाकडे वळवल्याचं चित्र आहे. तब्बल 23 देशांनी खो-खोच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला. पिंपरी-चिंचवडच्या मराठमोळ्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील संघान भारताला पहिल्याच जागति स्पर्धेत पहिला विजय मिळवून दिला. नेपाळचा मोठ्या फरकानं पराभव करत भारतीय खो-खो संघानं विजयश्री खेचून आणली. भारतीय महिला खो - खो संघाला पहिल्यांदाच आयोजित केलेल्या वर्ल्ड कप मध्ये विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधार प्रियंका इंगळे चा कसा होता खडतर प्रवास जाणून घ्या.

महाराष्ट्राच्या शाळेमध्ये तसेच गल्लीत खेळला जाणारा खो - खो खेळाचे आंतर राष्ट्रीय सामने होतील , अस कोणाच्या ध्यानी मनी ही नसेल याच खेळाने जागतिक पातळीवर आपली ओळख मिळवली ,पहिल्यांदाच आयोजित केलेल्या खो - खो वर्ल्ड कप मध्ये 23 देशांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत भारतीय महिलांच्या संघाचं नेतृत्व केलं ते पिंपरी चिंचवड च्या मराठमोळ्या प्रियंका इंगळे ने अन् तिच्याच नेतृत्वाखाली भारताच्या संघान फायनल मध्ये 78- 40 च्या फरकाने नेपाळच्या संघाचा पराभव केला अन् भारताला खो - खो मध्ये पहिला वर्ल्ड कप मिळवून दिला.

मूळच्या बीडमधील केज गावच्या इंगळे परिवाराने पोटाची खळगी भरण्यासाठी उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराची वाट धरली, प्रियांकाच्या जन्मानंतर शहरात स्थायिक झालेल्या प्रियांकाच्या कुटुंबाने सुरूवातीला तिच्या खेळला विरोध दर्शविला मात्र तिला मिळते यश पाहता त्यांचा खेळा बद्दल असलेला गैरसमज दूर होत गेला अन् कालच्या निकाला नंतर तर त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद काय लपत नव्हता..

पिंपरी चिंचवड शहरातील वरमुखवाडी परिसरात असलेल्या श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात शिकत असताना प्रियंकाच्या जीवनाला आकार

देणाऱ्या खो - खो मध्ये करिअर करण्याचा मार्ग सापडला. सुरवातीला प्रियांकाला रानिंगमध्ये आवड होती , त्यात टी निपुण ही होती परंतु तिझे शाळेतील क्रीडा प्रशिक्षक अविनाश करवंदे यांनी तिची खेळातील चपळता ओळखून तिला खो - खो खेण्यासाठी प्रोत्साहन दिले.त्यासाठी त्यांनी तिच्या कुटुंबीयांना ही राजी केलं. अन् आज तिच्या प्रशिक्षकांनी पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. शाळेतल्या लाल मातीत सुरू झालेल्या प्रियंकाचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोचलाय, पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत विजेते पदांना ते सर्वोच्च शिखर गाठण्यापर्यंतचा प्रियंकाचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे.

Sanjay Raut On Mahayuti: ते जिंकले कसे, आजून सावरले नाही, आम्ही जिंकलो कसे; राऊतांचा महायुतीला टोला

https://www.lokshahi.com/video/sanjay-raut-on-mahayuti-they-won-but-they-are-still-in-shock-rauts-attack-on-mahayuti

संजय राऊत आणि उत्तमराव जानकर सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. तर ते निवडणूक आयोगाची भेट देखील घेणार आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीवर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, मारकवाडीनं देशाला दाखवून दिलं भाजप कसा जिकतो ते, तसेच भाजपला ईव्हीएमच्या माध्यमातून चोरी करुन देणार नाही. असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत, ही लढाई राजकीय पक्षाची आहेच तसेच ही लढाई देशाची आहे असं म्हणत विधानसभेच्या निकालावरुन संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. तसेच ते 25 जानेवारीला जंतर मंतरवर 1 दिवसाचा आंदोलन देखील करणार आहेत.

याचपार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की, मी त्यांना विनंती केली की पुढल्या अधिवेशनामध्ये आम्ही सगळे एकत्र असू... आपण त्या संदर्भात मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबत बसून एक चर्चा करु... आणि पुढल्या महिन्यामध्ये जे 30 दिवसांच अधिवेशन होईल, त्या काळात आपल्याला जो महाराष्ट्राचा उद्रेक आहे तो पुन्हा एकदा जंतर मंतरला बसून एकत्र आंदोलन करु... आणि लोकांसमोर आणू आमचा नक्कीच पाठिंबा राहिल... पाठिंबा का नसणार? जे जिंकलेले आहेत ते अजून धक्क्यातून सावरलेले नाही की, ते कसे जिंकले... आणि जे जिंकणार होते ते हरले आहेत , त्यामुळे ते सुद्धा धक्क्यात आहेत... दोन्हा बाजूने धक्के बसले आहेत. जिंकणाऱ्याला ही धक्का बसला आणि हरणाऱ्यांना ही धक्का बसला आहे. हा ईव्हिएमचा धक्का आहे... असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दावोसचा दौरा उदय सामंत

Uday Samant: दावोसचा दौरा कशासाठी? उद्योजकांचे महाराष्ट्राबाबत अनुभव काय? सामंत काय म्हणाले?

वर्ल्ड इकोनॉमीच्या फोरमच्या अनुशंगाने सध्या स्वित्झर्लंडच्या दावोस दौऱ्यावर असलेले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 38,750 कोटींची गुंतवणूकीच्या अनुशंगाने एक मोठी कामगिरी केल्याच पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा दौरा असल्याचं कळत आहे. याचपार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी दावोसचा दौरा कशासाठी होता तसेच उद्योजकांचे महाराष्ट्राबाबत अनुभव काय याबद्दल सांगितल आहे.

दरम्यान मंत्री उदय सामंत म्हणाले की. मला असं वाटत की स्थिर क्षेत्रातील ज्यांना आपण पौलादी पुरुष म्हणतो ते लक्ष्मी मित्तल मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. या सगळ्यामध्ये मला असंवाटत की उद्योजकांना विश्वास देण आणि उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये आणणं हा प्राधान्यक्रम घेऊनचं हे दावोस दौरे केले जात आहेत. यादरम्यान जे एमओयु होत आहेत त्याच्या नंतर आमच्यातले काही हितचिंतक त्याची अंबलबजावणी होते की नाही याकडे लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी चार लाख ९९ हजार ३२१ कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले. या गुंतवणुकीमुळे राज्यात सुमारे ९२ हजार २३५ इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. या गुंतवणुकीतील सर्वांत मोठी गुंतवणूक जेएसडब्ल्यू उद्योगसमूहाने तीन लाख कोटी रुपयांची केली आहे. दावोस दौऱ्यात महाराष्ट्र सरकारला मोठं यश आलं असून डेटा सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक विमानतळांच्या निर्माणाधीन कामाचा आढावा केंद्रिय नागरी उड्डयन मंत्र्यांनी आमच्या पॅव्हेलियनमध्ये येत घेतला. दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली दावोस दौऱ्याची यशस्वी परंपरा तिसऱ्या वर्षात देंवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. असही मंत्री उदय सामंत यांनी म्हटल

Sambhaji Raje On Dhananjay Munde: दोषी आहे म्हणूनच धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद दिलं नाही !

https://www.lokshahi.com/video/sambhaji-raje-on-dhananjay-munde-he-is-guilty-thats-why-dhananjay-munde-was-not-given-the-post-of-guardian-minister

संभाजीराजे यांनी बीड हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नैतिकदृष्ट्या धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा,अशी मागण त्यांनी केली आहे. दोषी आहे म्हणूनच धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं नाही,असा दावाही संभाजीराजे यांनी केला आहे.

याचपार्श्वभूमीवर संभाजीराजे म्हणाले की, धनंजय मुंडे एवढं मोठ मोठ बोलतात मात्र त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा... मंत्रीपदाचा एवढा गोडवा धनंजय मुंडेंना का आहे? हे मला अजून ही कळत नाही... एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा... त्याचसोबत त्यांनी वाल्मीक कराडसोबत असलेले त्यांचे संबंध सांगावे... जग जाहीर आहे की, त्यांनी स्वतःताचं पॉवर ऑफ अटॉर्नी वटमुकत्यार पत्र वाल्मिक कराडला दिसल आहे. यापेक्षा आणखी काय हव... एवढ स्ट्रॉंग कनेक्शन आहे, राज्यातच नव्हे तर देशात चर्चा सुरू आहे तरी देखील तुम्हाला मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचा आहे... मग तरी देखील त्यांना सरकारकडून का संरक्षण दिलं जात आहे मला माहित नाही. असं संभाजीराजे म्हणाले आहे.

Mahakumbh Mela 2025: त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी !

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या ४५ दिवसांच्या महाकुंभमेळ्याचा आजचा 10 वा दिवस आहे. १४४ वर्षांतून एकदाच हा दुर्मिळ खगोलीय सोहळा येतो. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा पवित्र संगम असलेल्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी संगमच्या घाटांवर हजारो भाविकांची गर्दी जमली आहे. आतापर्यंत सुमारे ८.८१ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आहे.

कुंभमेळ्यातील आग प्रकरणात 'या' दहशतवादी संघटनेने

Kumbh Mela Fire: कुंभमेळ्यातील स्फोटाबाबत मोठा खुलासा! आग प्रकरणी 'या' दहशतवादी संघटनेच आलं नाव समोर

महाकुंभ हा हिंदू धर्माच्या पवित्र तीर्थयात्रेतील सर्वात महत्त्वाचा मेळा. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील पवित्र स्थानावर १३ जानेवारीपासून या सोहळ्याची शाही थाटात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवापैकी हा एक उत्सव असल्याच म्हटलं जात. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

अशातच प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातून एक मोठी बातमी समोर आली होती. प्रयागराजमधील मकुंभमेळ्यात रविवारी भीषण आग लागली होती. ही आग शास्त्री पूल सेक्टर १९ मध्ये लागली होती. तर सिंलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तावली जात होती. या अग्निकांडात 20 ते 25 तंबू आणि अनेक लोकांच बरच सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली होती. ही आग मोठ्या प्रमाणात पसरु लागल्याने त्वरित अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरु झालं होत. दरम्यान सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बाबतीत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. कुंभमेळ्यातील ही आग सिलेंडर स्फोटामुळे लागलेली नसून ती आग एका दहशतवादी संघटनेकडून लावण्यात आल्याचं समोर आलं आहे. कुंभमेळ्यातील स्फोटाची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ई-मेल पाठवला आहे. हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे त्यांनी म्हटलं असल्याची माहिती समोर आहे. हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच आहे. ही सुरुवात आहे, असंही दहशतवाद्यांनी इमेलमध्ये म्हटलं आहे.

मासिक पाळीच्या समस्यांसाठी कोहळ्याचा रस ठरेल दमदार उपाय, कसा ते जाणून घ्या

स्त्री रूग्णावर उपचार करताना तक्रार कोणतीही असो, त्यावरचे उपचार हे गर्भाशयाच्या माध्यमातूनच केले जातात. अर्थात गर्भाशय शुद्ध आणि निरोगी असेल तर स्त्रीला सहसा कोणता रोग होत नाही. मासिक पाळी वेळेवर म्हणजे दर 28 - 30 दिवसांनी येणं, चार-पाच दिवस व्यवस्थित अंगावरुन जाणं, इतर दिवसात पांढरा स्त्राव वगैरे नसणं ही गर्भाशय निरोगी असल्याची काही मुख्य लक्षणं असतात. पण जर पाळी चार आठवड्याऐवजी दोन ते तीन आठवड्यांमध्ये येऊ लागली, तसेच अंगावरून 15-15 दिवस जाऊ लागलं तर त्याचा अर्थ गर्भाशय अशक्त झालं आहे. म्हणजेच स्त्री संतुलनात बिघाड झाला आहे. स्त्री शरीरातील वात-पित्त दोष असंतुलित झालेले आहेत असा त्याचा अर्थ होत असतो.

त्यामुळे यावर फक्त रक्तस्त्राव थांबवणारे उपचार न घेता गर्भाशयाला आतून मजबूत करण्याची आवश्यकता असते. यावर एक सोपी घरगुती उपाय देखील केला जाऊ शकतो. कोहळा ही फळभाजी यावर उपयुक्त ठरेल. आयुर्वेदात पिकलेला कोहळा सर्वदोष शामक, विशेषतः पित्तास्रनूत् म्हणजे पित्तदोष वाढल्यामुळे होणारा रक्तस्त्राव, कमी करण्यात फार फायदेशीर ठरतो. याशिवाय कोहळा बृंहण म्हणजे शरीराला यथोचित पोषण देणारे फळभाजी आहे. तसेच कोहळा थकलेल्या, क्षीण झालेल्या अवयवांना शक्ती देणारा असल्यामुळे गर्भाशयाची अशक्तता दूर करण्यास देखील मदत करतो.

त्यामुळे ज्या स्त्रीयांना लवकर मासिक पाळी येते, बरेच दिवस अंगावरून जातं, त्यामुळे थकवा जाणवतो, उत्साह वाटत नाही, चिडचिड होते. त्यांच्यासाठी हा उपाय उपयुक्त आहे. यासाठी 100 ग्रॅम कोहळा घ्यावा. कोहळ्याची वरची साल काढून किसणीच्या सहाय्यानी कोहळा किसून घ्यावा. यानंतर फडक्याच्या मदतीनी त्याचा रस गाळून घ्यावा, यातून साधारण पन्नास मिली म्हणजे पाव ग्लास रस मिळतो. आता यात अर्धा चमचा खडीसाखर मिसळावी आणि सकाळी उपाशी पोटी हा रस घ्यावा. मासिक पाळीचे पहिले तीन दिवस वगळता एरवी दररोज हा उपचार करता येतो.

Vijay Wadettiwar On Beed Case: "आका"ला पोलिस कोठडी द्या; आजून प्रकरण बाहेर येतील

वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणी आणि मकोका या दोन्ही गुन्ह्यांतर्गत कराडला न्यायालयालयीन कोठडी सुनावली आहे. व्हिडिओ कॉलद्वारे वाल्मिक कराडला ही सुनावणी देण्यात आली आहे. वाल्मिक कराडला कोठडीत सी पॅप मशीन वापरण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे. याचपार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा तपास ज्या दिशेने चालला आहे. ती दिशा आता योग्य आहे असं मी समजतो... हे प्रकरण पुर्ण मुळासकट बाहेर काढण्याची गरज आहे, तरचं बीड स्वच्छ होईल... खरं तर आकाला पोलिसांनी नवीन पोलिस कोठडी द्यायला हवी होती म्हणजे तपासाद्वारे नव्या गोष्टी समोर आल्या असत्या, असं कॉंग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Jalgaon train accident: जळगावमध्ये मोठी दुर्घटना! रेल्वेमध्ये धूर पाहून प्रवाश्यांनी उड्या मारल्या,

जळगाव जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे धुर आला. मात्र, हा धुर एक्सप्रेसमधून येत आहे अशी आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उड्या मारल्या. पुष्पक एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. ज्यामध्ये समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. ज्यामध्ये अनेक प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे.

मासिक पाळीच्या त्रासावर घरगुती आणि नैसर्गिक उपाय, कोणते ते जाणून घ्या...

अनेकांना मासिक पाळीचा त्रास होतो. ज्यात मासिक पाळी आली की 20 दिवस अंगावरून जातं. त्यानंतर मध्ये चार-पाच दिवस गेले की पुन्हा पाळी येते आणि पुन्हा अंगावरून जातं. यावर अनेक उपाय केले तरी त्याचा काही फरक नाही पडत अशावेळी काय कराव जाणून घ्या... यासाठी घरच्या घरी दिवसातून दोन वेळा तांदळाचं धुवण घेतल्याने तुम्हाला या त्रासातून आराम मिळेल. यासाठी दोन चमचे कच्चे तांदूळ, कपभर पाण्यात पाच ते सहा तासांसाठी किंवा रात्रभर भिजत घालावेत. त्यानंतर सकाळी हातानी कुस्करून पांढर झालेलं पाणी गाळून घेऊन प्यावं. उरलेले तांदूळ स्वयंपाक घरात वापरायला हरकत नाही. 

रस्त्याच्या कडेला उंच सरळ वाढणारा अशोक आणि सीतेचा अशोक ही दोन वेगवेगळी झाडं असतात. सीतेचा अशोक ही वनस्पती गर्भाशयाला ताकद देऊन अशा प्रकारच्या त्रासावर उत्तम परिणाम देणारी आहे. खऱ्या अशोकाची साल मिळाली, तर सहाणेवर थोडं दूध घेऊन त्यात ही साल उगाळून तयार केलेली पेस्ट चमचाभर घेऊन सकाळ संध्याकाळ घेतल्याने देखील तुम्हाला त्याचा उपयोग होईल.

याशिवाय हाता पायाला शुद्ध नैसर्गिक मेंदी लावणे, आहारात साळीच्या लाह्या, मुगाचं वरण-भात, ज्वारीची भाकरी, दुधी, तोंडली, कोहळा, पडवळ, परवर अशा थंड गुणांच्या फळभाज्या, घरी बनवलेले साजूक तूप यांचा अधिकाधिक समावेश करा हे सुद्धा आवश्यक आहे.

GBS Virus In Pune: पुण्यात आणखी एका GBS बाधित रुग्णाचा मृत्यू

पुण्यात आणखी एका GBS बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपुर्वीच या तरुणाला GBSची लागण झाली होती, त्यादरम्यान त्याच्यावर उपचार सुरु होते मात्र या उपचारा दरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. श्वसनाच्या त्रासामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मुळचा सोलापुरचा असणारा हा तरुण पुण्यातील धायरी परिसरात वास्तव्यास होता. यापार्श्वभूमिवर आता राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यादरम्यान आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, आपल्याकडे सध्या GBSया नावाचा आजार पसरला आहे. या रुग्णांची वाढ होत आहे, त्यामुळे पुणे शहरातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले जात आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम हॉस्पिटलमध्ये या रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. या आजारामुळे मोठे बिल होत आहेत. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण पडू नये यासाठी काही ठिकाणी औषध महाग देत आहेत नागरिकांचा आरोग्य चांगलं ठेवणं ही राज्य सरकारची देखील जबाबदारी... त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या पेशंटसाठी ससून मध्ये देखील मोफत उपचार सुरू करण्याचा निर्णय उद्या मुंबई गेल्यावर चर्चा करून घेणार आहे. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच तिथे लक्ष आहे.

Lokshahi News Channel 5th Anniversary: लोकशाही मराठीच्या पाचव्या वर्धापनदिनी राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

https://www.lokshahi.com/lokshahi-special/lokshahi-marathi-5th-anniversary

प्रजासत्ताक दिनाचा शभु मुहूर्त साधून २६ जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्रात 'लोकशाही मराठी' या न्यजू चॅनलची सरुवात झाली. न्यजू इंड्रस्ट्रीत असलेली मरगळ, पक्षपातीपणा आणि कोणा बद्दलही सॉफ्ट कॉर्नर न ठेवता, बातमी आणि घडणारी प्रत्येक घटना जशीच्या तशी दाखवत पदार्पणातच 'लोकशाही'ने इतरांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. या सोबतच रोज उभ्या राहणाऱ्या नव्या आव्हानांना तोंड देत लोकशाहीने या स्पर्धात्मक युगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आपल्या प्रगतीचा आलेख कायम चढता राखला. याचपार्श्वभूमीवर लोकशाही मराठीच्या पाचव्या वर्धापनदिनी राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकशाही मराठी या न्यजू चॅनलला शुभेच्छा देत म्हणाले की, लोकशाही मराठी या वृत्तवाहिनेला आज 5 वर्ष पुर्ण होत आहेत, यादरम्यान मी प्रेक्षक संपुर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो... या पत्रकारितेच्या माध्यमातून तळागळातील जनतेचे प्रश्न तसेच राज्यातील महत्त्वाच्या घटनांवर वार्तांकन करताना, अतिशय चांगली कामगिरी बजावली आहे... लाकशाही मराठीच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...

https://youtu.be/-ya3gZoF4Fc

शंभूराज देसाई यांच्या कडून 'लोकशाही मराठी'चे कौतुक

तसेच पर्यटन, खनिकर्म, स्वतंत्र्य सैनिक कल्याण मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील 'लोकशाही मराठी'चे कौतुक केले आहेत.. याचपार्श्वभूमीवर शंभूराज देसाई म्हणाले की, राज्यामध्ये अल्पकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लोकप्रिय झालेलं हे चॅनेल यांना मी मनापासून शुभेच्छा देतो.... अशीच उत्तोरोत्तर प्रगती या वाहिनीची व्हावी, अशा आपल्या सर्वांगीन चांगल्या कामाला मी शुभेच्छा देतो...

https://youtu.be/VWaAg0JmYq0

https://youtu.be/H7r1NHU6p80

Uday Samant: 'रायगडचे पालकमंत्री पद गोगावलेंनाच मिळायला हवं ; शिंदेसाहेबांकडे भावना मांडली': सामंत

https://www.lokshahi.com/news/uday-samant-gogawale-should-get-the-post-of-guardian-minister-of-raigad-samant

रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना आजही आग्रही आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळायला पाहिजे ही माझी भावना आहे, असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दाओसमध्ये 15 लाख 70 हजाराची एमओयू झाली असून त्यात 40 हजार कोटीची गुंतवणुक रत्नागिरीत झाल्याबद्दल मी समाधानी असल्याच वक्तव्य देखील उदय सामंत यांनी केलेलं आहे. तसेच 40 हजार कोटीच्या गुंतवणुकीमुळे कोकणात सुबत्ता येईल असं आश्वासन उदय सामंत यांनी दिल आहे. मुस्लिम मतं काँग्रेसकडे होती, ती UBTकडे ट्रान्सफर झाली असं मोठ वक्तव्य देखील उदय सामंत यांनी केलेलं आहे. UBTचं राजकीय धोरण काय आहे हे नेमकं कळत नाही असं देखील उदय सामंत म्हणाले आहेत.

पुढे उदय सामंत म्हणाले की, संविधानाच्या बाबतीत फेक नेरेटीव्हचा फुगा आम्ही फोडून टाकलेला आहे... संविधानाच्या बाबतीत आमची आदराची भूमिका आहे, संविधान बदलण्याचा प्रयत्न करण्याचा विचार जो करेल त्याच्य विरोधात शिवसेना उभी राहील... अनेक आमदार हे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकाराण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना कोणती आहे, लोकांना कळायला लागले आहे...

देवेंद्र फडणवीसांनी केलं लोकार्पण! मुंबईकरांसाठी

Bandra-Worli Sea Link: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! वांद्रे- वरळी कोस्टल रोड उद्यापासून सुरु

मुंबई किनाऱ्यावरून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणारे पुलाचे काम पुर्ण झालं असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड आणि वरळी बांद्रा सी लिंकला जोडणाऱ्या मार्गिकचे लोकार्पण पार पडले आहे. सी लिंकला जोडणाऱ्या पुलावरून उद्यापासून दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे. मुंबईकरांसाठी अवघ्या १२ मिनिटात थेट वांद्रे ते मरीन ड्राईव्ह प्रवास शक्य होणार आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन आदी भागातील प्रवाशांसाठी देखील तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. तसेच मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सी लिंक ते मरीन ड्राईव्ह १०-१२ मिनिटात शक्य झाल्यामुळे वेळेची बचत होईल इंधनाची बचत होईल असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तसेच पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, आत्ता तिसऱ्या टप्प्यात काम पूर्ण होईल... वरून बघितलं तर परदेशातील पुल आहे असं वाटतं, ही अतिशय गर्वाची बाब आहे... तसेच मविआला टोला देत एकनाथ शिंदे म्हणाले की, आत्ता १० मिनिटात मरीन ड्राईव्ह ला पोहचू त्यामुळे काही लोकांना वरळीत लवकर पोचता येईल अधिकचा वेळ मिळेल. जर सरकार बदललं नसते, तर MTHL, मेट्रो हे काहीच दिसलं नसते... कामात खोडा घालणारे ते लोक आहेत. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात टीका केली आहे.

Uday Samant On Narhari Zirwal: झिरवळांच्या नाराजीवर सामंतांची प्रतिक्रिया, म्हणाले...

https://www.lokshahi.com/news/uday-samant-on-narhari-zirwal

पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या विषयावर बोलण्यासाठी आता हिंगोलीमधून नरहरी झिरवळ हे देखील मागे राहिलेले नाहीत. नपहरी झिरवळ यांनी पालकमंत्री पदावरून मिश्किल वक्तव्य केल्याच पाहायला मिळालं होत. गरीब माणसाला गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केला आहे असं बोलत नरहरी झिरवाळ यांनी काल एका सत्कार कार्यक्रमांमध्ये जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. याचपार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रील सर्वात छोटया जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो मी असंच म्हणायचं का? आपण पालकमंत्री म्हणून विकासात्मक जनतेचे देन लागतो, झिरवाळांच्या नाराजीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया...

काय म्हणाले उदय सामंत

नरहरी झिरवळ यांनी गरीब असल्याने गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री पद दिलं असल्याची खंत व्यक्त करून दाखवली, यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील वेळेस मी देखील महाराष्ट्रातील सर्वात छोट्या जिल्ह्याचा म्हणजेच सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो, मी देखील असेच म्हणायचं का? मात्र आपण पालकमंत्री म्हणून विकासात्मक जनतेच देन लागतो... आणि त्यामुळे ते त्या जिल्ह्यात नाविन्यपूर्ण आणि विकासात्मक काय आहे? ते भाग्य आपल्या नशिबी आलं... असं समजून कामाला सुरुवात करायची, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे

मला लहान जिल्ह्याचे पालकमंत्री केल- नरहरी झिरवळ

मला लहान जिल्ह्याचे पालकमंत्री केल आहे. गरीब माणसाला गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केला आहे, असं बोलत नरहरी झिरवाळ यांनी काल एका सत्कार कार्यक्रमांमध्ये जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली आहे... त्यानंतर आता मुंबईत गेल्यानंतर या संदर्भात वरिष्ठांची भेट घेणार असल्यास सुद्धा झिरवाळ काल म्हणाले होते... त्यानंतर आज पत्रकारांनी झिरवाळ यांना नाराजी बद्दल विचारले असता, झिरवाळ यांनी सारवा सारव केली असून झिरवाळ आणि नाराजगी याचा काहीही संबंध नाही... अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Kolhapur School News: बदलापूर घटनेनंतर कोल्हापूर प्रशासन सतर्क! 1958 शाळांमध्ये बसवले CCTV

बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या तसेच सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. बदलापूरमधील एका शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने ज्याचं नाव अक्षय शिंदे असं होत त्याने हे दृष्कृत्य केलं होत. ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने संताप व्यक्त केला होता. बदलापूर अत्याचार घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 1958 जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. तसेच राज्य शासनाने सूचना दिल्यानंतर केवळ पाच महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व 1958 प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची कामगिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने करून दाखवली आहे. त्यामुळे कोल्हापूर हा विद्या सुरक्षित जिल्हा म्हणून राज्यात पहिला आल्याची माहिती राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान मिशन शाळा कवच ही मोहीम युद्ध पातळीवर हाती घेतली असून आता जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये 7832 कॅमेरे बसवण्यात आले आहे.यासाठी ग्रामपंचायत लोकसहभागातून साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले.

Gulabrao Patil | ... तर भाडेवाढीचा भार सहन करावा लागेल, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य

एसटीच्या तिकीट दरात 15% ची वाढ करण्यात आली असून यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. एसटीच्या भाडेवाढीवरून प्रवाशांनी व्यक्त केलेल्या नाराजी वरून गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया दिली आहे. एसटी बसची स्पर्धा जर लक्झरीसोबत करायची असेल, तर भाडेवाढीचा भार हा प्रवाशांना सहन करावा लागणार असल्याचं, मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान राज्यात नव्या 5000 गाड्या आणि ई बसेस येणार असून त्यामुळे 10 ते 15% भाडेवाढ ही सहन करावी लागणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही प्रवाशांचा यामुळे फायदा होणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे..

पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले यांचे महत्वाचं विधान ..... तुम्ही जर व्यवस्थित राहिला असतात तर त्याचाही विचार केला असता ...... भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना सुनावले .......

अँकर - रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी आज महत्वाचं विधान केलंय. पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित राहिला असतात तर आम्ही त्याचाही विचार केला असता असं गोगावले म्हणालेत. तुम्ही तुमची असलियत दाखवली आता आम्ही आमची असलियत दाखवतो अस गोगावले यांनी सुनील तटकरे यांना सुनावलं आहे. आम्ही कुणाच्या पायाला पाय लावत नाही पण आम्हाला कुणी जाणून बुजून पाय लावला तर त्याचा जय महाराष्ट्र केल्याशिवाय रहात नाही असा इशाराही गोगावले यांनी दिलाय.

Mumbai Corruption: Lokशाहीकडून घोटाळ्याची पोलखोल, मुलुंडमध्ये 10 वर्षांत 33 कोटींच्या संरक्षक भिंती

https://www.lokshahi.com/news/mumbai-corruption-lokshahis-scam-exposed-protective-walls-worth-rs-33-crore-in-mulund-in-10-years

मुंबईमध्ये संरक्षक भिंतीच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचं लोकशाही मराठीनं उघड केलं आहे...रोज एका ठिकाणच्या संरक्षक भिंतीची पोलखोल लोकशाही मराठी करत आहे... मुलुंडमध्ये अमरनगर परिसरात लोकशाहीच्या टीमने संरक्षक भिंतींची पाहणी केली. दरम्यान येथील वास्तव वेगळंच असलेलं पाहायला मिळालं आहे. मुलुंडमध्ये 10 वर्षांत कागदोपत्री अनेक संरक्षक भिंती असून 10 वर्षांत 33 कोटींपेक्षा अधिकच्या संरक्षक भिंती आढळून आलेल्या आहेत. 2016 साली ही संरक्षक भिंत कलंडली होती, त्यानंतर या संरक्षक भिंतीचं काम पूर्ण व्हायला 2022 साल उजाडल्याचं स्थानिकांनी सांगितल आहे. हे सांगताना स्थानिक त्यांचे कटू अनुभवही सांगत होते. भिंत कलंडली होती, त्यावेळी स्वत:च्या घरात झोपतानाही त्यांना भिती वाटत होती असं स्थानिक सांगत होते.

मुलुंड परिसरात 2014 ते 2024 या कालावधीत अनेक संरक्षक भिंतींचे काम झाल होत. त्यासाठी 32 कोटींपेक्षा अधिक निधी खर्च झाल्याचं झोपडपट्टी सुधार मंडळाच्या लेखाजोख्यावरून निदर्शनास आलं होत. मात्र, प्रत्यक्षात 2016 साली कलंडलेली संरक्षक भिंत 2022 साली बांधून पूर्ण झाली होती. त्याचबरोबर या भिंतीची रंग रंगोटीही नुकतीच दहा दिवसांपूर्वी झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. झोपडपट्टी सुधार मंडळानं म्हाडाच्या कोट्यवधी पैशांवर डल्ला मारल्याचं भयाण वास्तव लोकशाही मराठीनं समोर आणलं आहे.

Lokशाही मराठीचा दणका

21 जानेवारी विक्रोळीतील 38 कोटींच्या संरक्षक भिंतींची पाहणी

24 जानेवारीला अंधेरी महाकाली केव्हज येथे 8 कोटींच्या संरक्षक भिंती

25 जानेवारी दहिसर येथे 55 कोटींचा संरक्षक भिंत घोटाळा

27 जानेवारी मुलुंडमध्ये 33 कोटींच्या संरक्षक भिंतींची पाहणी

मुलुंडमध्ये 10 वर्षांत 33 कोटींच्या संरक्षक भिंती

2014-2015 - 3 कोटी 99 लाख

2016-2017 - 5 कोटी 67 लाख

2017-2018 - 3 कोटी 63 लाख

2018-2019 - 2 कोटी 92 लाख

2019-2020 - 5 कोटी 78 लाख

2020 -2021 - 1 कोटी 27 लाख

2021-2022 - 6 कोटी 92 लाख

2022-2023- 3 कोटी 14 लाख

2023-2024 - 47 लाख

एकूण - 33 कोटी 79 लाख

Kailash Mansarovar Yatra: आनंदाची बातमी, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु होणार

https://www.lokshahi.com/news/kailash-mansarovar-yatra

एकीकडे प्रयागराजमध्ये पवित्र महाकुंभ सुरू आहे, तर दुसरीकडे भारतातील भाविकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून सोमवारी एक माहिती देण्यात आली आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांची चीनचे परराष्ट्र सचिव सुन वेईडाँग तसेच इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, ज्यात दोन्ही देशांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नोव्हेंबरमध्ये गेल्या वर्षी पूर्व लडाखमधून सैन्यमाघारीच्या निर्णयानंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा दिसून आली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या रशियाच्या कझान येथे झालेल्या बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांचा सर्वंकषपणे आढावा घेतला गेला असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

सोमवारी भारताचे परराष्ट्र सचिव मिस्राी यांनी चीनचे परराष्ट्र सचिव सुन वेईडाँग यांची भेट घेण्यापूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही देशांनी एकमेकांबद्दल संशय आणि परकेपणा बाळगण्याऐवजी परस्पर सहाय्य असावे, त्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात असे वांग यांनी सुचवले. पूर्व लडाखमधील लष्करी संघर्षानंतर चिनी कंपन्यांना भारतामध्ये गुंतवणूक करणे अवघड झाले होते. अनेक लोकप्रिय चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली आणि प्रवासी हवाई वाहतूक बंद करण्यात आली. मात्र, व्यापारी वाहतूक सुरू होती.

Mohit Kamboj and Zeeshan Siddiqui: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मोहित कंबोज यांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

https://www.lokshahi.com/news/mohit-kambojs-name-in-baba-siddique-case

बाबा सिद्दीक हत्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. चार्जशीटमध्ये माझं नाव नाही असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. सिद्दीकींचं स्टेटमेंट तोडून वापरलं जातेय, झिशान सिद्दीकीने बाबा सिद्दीकी यांची जी घटना झाली त्यादिवशी बाबा सिद्दीकी यांचे माझ्याशी बोलणे झाले होते. बाबा सिद्दीकी आणि मी बोलत असायचो, जी घटना झाली ते माझ्यासाठी धक्कादायक आहे. मी आणि ते वांद्र्याचे रहिवाशी असल्याने बोलायचो तसेच आम्ही NDA चे घटक असल्याने राजकीय मुद्द्यांवर ही आमच्या चर्चा व्हायच्या. मी सांगू इच्छितो की बाबा सिद्दीकी यांच्या सोबत जी घटना घडली ते बाहेर यायला हवे तसेच कारवाई झालीच पाहिजे मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढावे, आणि त्यांच्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागिणी देखील मोहित कंबोज यांनी केली आहे.

Dhananjay Munde: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे- धनंजय मुंडे

देशमुखांच्या मारेकऱ्यांसोबत संदीप क्षीरसागरांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप मंत्री धनंजय मुंडेंनी केला आहे. त्यांना देशमुख हत्या प्रकरणाची एवढी मायक्रो माहिती कशी काय? त्यांच्या माहितीवरुन आरोपींसोबत संबधं दिसतात.. असं मुंडे म्हणालेत. तर देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा मारेकऱ्यांना फाशावर लटकवलं पाहिजे. आधीपासून हीच भूमिका असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिल आहे.

यापार्श्वभूमिवर धनंजय मुंडे म्हणाले, या विषयावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया कागदपत्रांसहित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्या... त्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे यावर स्पष्ट उत्तर देतील...हे उत्तर त्यांनी द्यावे...

तुम्ही राखे संदर्भात 2006 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहिला तर तो कचरा आहे....थर्मल पॉवर स्टेशनची जी राख आहे. जो कचरा थर्मल पॉवर स्टेशनने पसरवला आहे, तो थर्मल पॉवर स्टेशनकडून पैसा खर्च करून उचलला गेला पाहिजे... हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे सरकार सोबत संलग्न नाही... महानिर्मिती हे वेगळे मंडळ आहे, त्यामुळे मूलत: प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा बिझनेसचा विषय कुठे येत नाही...

संदीप क्षिरसागर यांनी असं म्हटलं होत की, कृष्णा आंधळे या आरोपीसोबत काही तरी वाईट घटलं असेल असं सापडलं आहे.. यावर धनंजय मुंडे म्हणाले की, संदीप क्षिरसागर यांना एवढे माहिती असेल, तर मी असं समजतो की त्यांचे आणि त्या आरोपींचे कुठे तरी संबंध असतील... ते संबंध असल्याशिवाय त्यांना ही माहिती मिळू कशी शकते? पोलिसांना जे माहिती नाही...एवढी मायक्रो माहिती त्यांना आहे... त्यामुळे त्यांचे संबंध असल्याचं दिसतय... सध्या आपण पाहिल तर माध्यमांवर बीडशिवाय इतर कोणतीही बातमी पाहायला मिळत नाही... संतोष देशमुख यांची ज्यांनी निघृणपणे हत्या केली, त्या हल्लेखोरांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन फासावर लटकवले पाहिजे... ही मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका आजही कायम आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा मारेकऱ्यांना फाशावर लटकवलं पाहिजे. आधीपासून मी माझ्या भूमिकेवर कायम असल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं होत. यानंतर सुरुवातीला राजिनाम्याच्या विषयावर मी उत्तर देणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले होते.

जीबी सिंड्रोम फैलाव रोखण्यासाठी प्रशासन सज्ज.

राज्यात जीबी सिंड्रोमचा फैलाव वाढला आहे. पुणे नागपूर सारख्या शहरात जीबी सिंड्रोमचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या आजाराचे रुग्ण आढळून आले, तर त्या रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान नागरिकांनी पाणी उकळून प्यावं. स्वतःची स्वच्छता राखावी, सरकार आणि प्रशासन या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी सज्ज असल्याची माहिती आरोग्य राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. त्या नांदेडमध्ये एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

.स्मृतीशिवाय, श्रीलंकेची चमारी अटापट्टू, दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोलवॉर्ट आणि ऑस्ट्रेलियाची ॲनाबेल सदरलँड सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडूच्या पुरस्काराच्या शर्यतीत होत्या, परंतु भारताच्या मंधानाने या सर्वांना मागे टाकत हे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले.

ICC ODI Cricketer Of The Year: स्मृतीची जबरदस्त कामगिरी! ICC क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्काराची मानकरी

https://www.lokshahi.com/sports/cricket/smriti-winner-of-the-icc-cricketer-of-the-year-award

भारतीय संघातील स्मृती मंधाना ही क्रिकेट विश्वातील चाहत्यांची नॅशनल क्रश देखील बनली आहे. याच नॅशनल क्रशने पुन्हा एकदा स्वतःच नाव भारताची स्टार क्रिकेटपटू म्हणून उंचावलं आहे. स्मृती मंधानाने भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून आपले योगदान दिले आहे. भारताची स्टार क्रिकेटपटूआणि उपकर्णधार स्मृती मंधानाला ODI क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यावेळी स्मृतीसोबत श्रीलंकेची चमारी अटापट्टू, दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोलवॉर्ट आणि ऑस्ट्रेलियाची ॲनाबेल सदरलँड सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडूच्या पुरस्काराच्या शर्यतीत होत्या, मात्र स्मृती मंधाना या सर्वांना मागे टाकत ODI क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

ODI क्रिकेटर ऑफ द इअर पटकावला

भारताची डावखुरी सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने तिच्या करिअरमध्ये हा पुरस्कार दुसऱ्यांदा मिळवला आहे. तसेच स्मृतीने 4 आयसीसी पुरस्कार जिंकण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारी ती जगातील दुसरी महिला फलंदाज आहे. स्मृती मंधानाने 2018 मध्ये पहिल्यांदा ODI क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला होता. जूनमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या निर्भेळ मालिकेच्या विजयात स्मृतीने एकामागे एक अशे शतकं झळकवण्याचा विक्रम केला होता. यानंतर डिसेंबर महिन्यात पर्थमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारत सामन्यात स्मृतीने लागोपाठ शतक झळकावत आपली महत्त्वाची भूमिका दाखवली होती.

पुरस्कार जिंकल्यानंतर स्मृतीची प्रतिक्रिया

पुरस्कार जिंकल्यानंतर स्मृती आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाली की, मी ICC चे मनापासून आभार मानते की, त्यांनी मला ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केले... मला याचा आनंद आहे की गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय फॅार्मेटमध्ये टीम इंडियाची चांगली कामगिरी पाहायला मिळाली, आणि यामध्ये मी सुद्धा माझे योगदान देऊ शकले. मी आज या पुरस्काराची मानकरी ठरली आहे, त्यादरम्यान मी माझ्या सहकाऱ्यांचे जे सर्व चढ-उतारांमध्ये माझ्यासोबत असतात. तसेच माझ्या कुटुंबियांचे आणि सर्व प्रकारच्या पाठिंब्याबद्दल माझ्या प्रशिक्षकांचे मी आभार मानते. मला फक्त क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे त्यामुळे मी जास्त पुढचा विचार करत नाही...

स्मृती मंधानाची 2024 मधील जबरदस्त कामगिरी

स्मृती मंधानाचा वर्षभरात एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा रेकॅार्ड ठरला आहे. 2024मध्ये स्मृती मंधानाने एकूण 13 एकदिवसीय सामने खेळले आणि या सामन्यात तिने 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकवली असून 57.46 च्या सरासरीने 747 धावा केल्या. स्मृती मंधाना 96.15 स्ट्राईक रेटसह 2024 मधील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली.

Kailash Mansarovar Yatra: तब्बल पाच वर्षांनंतर सुरू होणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेचे महत्त्व जाणून घ्या...

https://www.lokshahi.com/ampstories/web-stories/know-the-importance-of-the-kailash-mansarovar-yatra

सध्या महाकुंभमेळा सुरु आहे, जिथे भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

असं असताना आता भाविकांसाठी कैलास मानसरोवर यात्रा सुरु होणार आहे.

21,778 फूट उंच असलेला कैलास पर्वत आणि मानसरोवर यात्रा ही एक पवित्र तीर्थयात्रा आहे.

भाविक या यात्रेदरम्यान मानसरोवराभोवती कैलास कोरा किंवा कैलास परिक्रमा करतात.

ही परिक्रमा पुर्ण करण्यास भाविकांना तब्बल अडीच ते तीन दिवस लागण्याची शक्यता असते.

ही तीर्थयात्रा भारत, चीन, नेपाळच्या सीमेलगत असणाऱ्या कैलाश पर्वत, मानसरोवर तलावाला भेट देण्यासाठी केली जाते.

या तीर्थयात्रेचा प्रवास पूर्ण करण्यासाठी किमान 25 दिवस लागतात.

तसेच सध्या कैलास पर्वत चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात आहे.

नवी अपडेट

Saif Ali Khan: सैफ अली खान हल्ल प्रकरणी नवी अपडेट, वेस्ट बंगालमधील महिलेला अटक

https://www.lokshahi.com/news/saif-ali-khan-new-update-in-saif-ali-khan-lynching-case-woman-arrested-in-west-bengal

सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे, यादरम्यान अनेक खुलासे समोर येत आहेत. अशातच आता या हल्ल्याप्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. सैफ अली खान प्रकरणात मुंबई पोलिसांनी वेस्ट बंगालमधील नादिया जिल्ह्यातून एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस वेस्ट बंगालमधील नादिया जिल्ह्यातील छपरा गावी चौकशीसाठी पोहचली होती. त्यावेळी ज्या महिलेला अटक करण्यात आले होते तिचे नाव खुखुमोनी जहांदीर शेख असे आहे. बांग्लादेशी हल्लेखोर शरीफुल इस्लाम शहाजाद वापरत असलेलं सिमकार्ड महिलेच्या नावाने रजिस्टर होतं.आता महिलेला मुंबईत आणण्यासाठी ट्रांजिट रिमांडची मागणी करण्यात येऊ शकते.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर खळबळ उडाली. सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या वांद्रे येथील राहत्या घरी अज्ञात इसमाने हल्ला केला. बुधवारी रात्री अडीच वाजता मुंबईतील खार येथील राहत्या घरी त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकूचे ६ घाव होत्या. सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यात २ जखमा फार खोलवर झाल्या होत्या. तर सोमवारी त्याला रुग्णालयातून डिसचार्ज देण्यात येणार आहे. सैफच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे.

Dinesh Waghmare: दिनेश वाघमारे यांनी स्वीकारला पदभार; वाघमारे राज्य निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त

राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यासंदर्भातील अधिसूचना 20 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार त्यांनी आज राज्याचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. श्री. यू. पी. एस. मदान यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबर 2024 रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होते.

दिनेश वाघमारे हे विविध शासकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सदस्य सचिव; तसेच नवी मुंबई व पिंपरी- चिंचवड महानरपालिकेचे आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली होती. वाशीम आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारीपद मिळवले होते. तसेच ते नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष देखील होते. अमरावतीचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. वैद्यकीय शिक्षण विभागासह सामाजिक न्याय, ऊर्जा, गृह इत्यादी विभागांतही त्यांनी विविध पदे मिळवली आहेत.

Navi Mumbai: नवी मुंबईत पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी वाद

नवी मुंबईत एका परप्रांतीय महिलेनं मराठी कुटुंबावर अरेरावी केल्याचा प्रकार घडलाय....पनवेलच्या भोकरपाडातील हिरानंदानी सोसाटीत ही घटना घडलीय...यावेळी महिलेनं घर सोडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मराठी कुटुंबानं केलाय...दरम्यान घटनेची माहिती मिळताच मनसेनं महिलेला विचारला जाब विचारलाय...तर सोसायटीच्या चेअरमन वसुंधरा शर्मा ह्या महिलेनं माफी मागितली आहे.

पनवेल मधील भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीत भाडोत्री कुंटुंबाला त्रास दिला जात असल्याचा आरोप गायकवाड कुटुंबाने केलाय. इथे हे कुटुंब भाड्याने राहत होतं. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर ते दुसऱ्या रुमची शोधाशोध करत असल्याने त्यांनी त्या संदर्भात घर मालकाला कळवलं होतं, त्यांच मुल लहान असल्याने घरमालकाने त्यांना रहाण्याची पवरानगी दिली होती, तरीही या सोसयाटीच्या महिला चेअरमन कडून रुम सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला गेलाय. शिवाय भांडंण करुन मराठी माणसांची इथे राहण्याची लायकी नाही असं म्हणत शिविगाळ केली गेल्याचं गायकवाड कुटुंबाचं म्हणणं आहे, या वादात गायकवाड यांना हृदयाचा त्रास होऊ लागल्यांने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

या घटनेची माहिती मिळताच मनसेने जाब विचारला, मनेसेच्या रायगड जिल्हाध्यक्ष अदिती सोनार आणि मनसेचे कार्यकर्ते तिथे पोहचल्यावर त्यांनी मराठी माणसांवर होत असलेल्या अरेरावीचा जाब विचारला, त्यानंतर सोसायटीतल्या इतर मराठी रहिव्याश्यांनीही याच स्वरुपाच्या तक्रारी केल्यात. त्यानंतर वसुंधरा शर्मा चेअरमन ह्या महिलेने माफी मागितल्याचं कळतंय...

Dhananjay Munde: "अजित पवार म्हणाले तर, लगेच राजीनामा देईन"; धनंजय मुंडे यांची राजीनाम्यावर भूमिका

https://www.lokshahi.com/news/if-ajit-pawar-says-so-i-will-resign-immediately-dhananjay-mundes-stance-on-resignation

देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा मारेकऱ्यांना फाशावर लटकवलं पाहिजे. आधीपासून मी माझ्या भूमिकेवर कायम असल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं होत. यानंतर सुरुवातीला राजिनाम्याच्या विषयावर मी उत्तर देणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले होते. तर आता धनंजय मुंडे यांनी पुन्हा माध्यमांसोबत संवाद साधताना राजिनाम्याबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले तर, लगेच राजीनामा देईन, असं स्पष्ट मत यावेळी धनंजय मुंडेंनी दिलं आहे. देवगिरीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर धनंजय मुंडेंनी ही प्रतिक्रिया मांडली आहे.

पुढे धनंजय मुंडे म्हणाले की, फडणवीस आणि अजितदादांना सांगितल्यावर मी राजीनामा देईन... माझा बाबत काय निर्णय घ्यायचा आहे ते अजित दादा ठरवतील... काही जण वैयक्तिक रागातून आरोप करतात... मुख्यमंत्र्यांना दोषी वाटत असेल, तर मी राजीनामा देईन मला नैतिकदृष्ट्या मी दोषी वाटत नाही.... देशमुख हत्या प्रकरणात मी प्रामाणिक बोललो, 51 दिवसांपासून मी टार्गेटवर आहे. असं महत्त्वाचं वक्तव्य यावेळी धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

Suresh Dhas On Karuna Munde: करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तुल कोणी ठेवलं?, साडीमधला "तो" व्यक्ती कोण?; सुरेश धस यांचा सवाल

करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तुल आढळून आली आहे, यामुळे त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले मात्र ज्यावेळी याबाबतीची तपासणी करण्यात आली त्यावेळी एक महत्त्वाची माहिती समोर आली. याचपार्श्वभूमीवर सुरेस धस यांनी त्यांची प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली आहे.

यावेळी सुरेश धस म्हणाले की, करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये कोणत्या पोलिस अधिकाऱ्यानी पिस्तुल ठेवलं आहे, आणि त्या साडीमधला तो व्यक्ती कोण? हे जे कटकारस्थान केलेलं आहे... परळी येथे जे हे झालेलं आहे, ते माध्यमांच्या मदतीनेच उघडकीस आलेलं आहे... त्यामध्ये कोणी तरी पोलिस अधिकारी दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत साडीमधला कोणी तरी व्यक्ती दिसत आहे... त्यांच्या गाडीत बंदुक ठेवणारे लोक स्कार्फ बांधून होते ते पोलिस अधिकारी आहेत, आणि ते बीडमधील पोलिस अधिकारी आहेत.. त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे. तसेच सुरेश धस म्हणाले की, त्यांना सस्पेंड कराव, आणि दोषी सापडले तर त्यांना रिमुव्ह फॉर्म सरव्हिस कराव.. यातला एक भास्कर केंद्रे नावाचा पोलिस 15 वर्ष झाली तिथेच आहे, त्याचे स्वतःचे 15 जेसीपी आहेत.. 100 राखेची टिपर आहेत. एवढचं नाही तर तिथला जो मटके वाला आहे त्याच्यासोबत पण पार्टनरशीप आहे... आणि हे जे काय मी बोललो ते खर आहे की, नाही ते तिथे जाऊन तपासा, असं विधान सुरेश धस यांनी केलेलं आहे.

Mulund: मुलुंड नाही तर नवीन धारावी, झळकले बॅनर, पोलिसांकडून बॅनर्स उतरवण्याची कारवाई

https://www.lokshahi.com/news/mulund-not-mulund-but-the-new-dharavi-banners-were-displayed

मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयाच्या लगत असलेल्या मिठागराच्या साडे 58 एकर जमिनीवर धारावीतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलं जाणार आहे. याला प्रकल्पला मुलुंडकरांनी वेळोवेळी विरोध देखील केला होता. परंतु, अखेर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस आधी मिठागराची ही जागा अदानीच्या प्रोजेक्टसाठी वर्ग करण्यात आली. त्यानंतर मुलुंडमध्ये धारावीकरांचं पुनर्वसन होणार यामुळे अखेर आता मुलुंडमध्ये 'मुलुंड नाही तर नवीन धारावी', अशा आशयाचे बॅनर झळकवले गेले आहे. मुलुंडचे हे नामांतरण नाकर्ते राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्या शुभहस्ते होणार असल्याची उपहासात्मक टीका, या बॅनरवर करण्यात आलेली आहे. मुलुंड मध्ये विविध ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले होते, त्यानंतर पोलिसांनी बॅनर्स उतरविण्यास सुरुवात केली आहे.

Rohit Pawar Mahakumbha: राष्ट्रवादीचे रोहित पवार आपल्या पत्नीसह महाकुंभमेळ्यात लावणार उपस्थिती

https://www.lokshahi.com/maha-kumbh/mahakumbha-2025

भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, अर्थात महाकुंभ मेळा हा प्रयागराजमध्ये सुरु आहे. महाकुंभमेळा हा दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. तीन पवित्र नद्यांच्या संगमासह भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांचा अद्भुत संयोग जुळून येतो. पौष पौर्णिमेच्या दिवशी 13 जानेवारीला प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरु झाला आहे, तर 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला शाही स्नानाने महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. शाही स्नानाच्या दिवशी प्रयागराजमध्ये भाविक मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते.

हिंदू धर्म-संस्कृतीत कुंभमेळ्यादरम्यान शाही स्नान करणं हे पवित्र मानलं जातं आणि त्यातही सहा स्नानांपैकी आजची मौनी अमावस्येची तिथी ही सर्वांत शुभ मानली मानली जाते. कुंभमेळ्यातील स्नानामुळं सर्व दुःख दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. सध्या सुरु असलेल्या प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर मौनी अमावस्येला होणाऱ्या अमृत स्नानास विशेष महत्त्व असून महाकुंभाच्या निमित्ताने बॉलीवूड आणि टेलिव्हिजन जगतातील अनेक दिग्गज कलाकार प्रयागराजमधील कुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत. याच शुभ मुहूर्तावर आज प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील आमदार रोहित पवार आपल्या पत्नीसह महाकुंभमेळ्यात लावणार उपस्थिती आहेत. तसेच महाकुंभमेळ्यात अमृत स्नान करण्याचं आणि अर्घ्य देण्याचं भाग्य मिळालं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

रोहित पवार यांनी 2017 मध्ये बारामती मतदारसंघातून पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर ते 2019 मध्ये कर्जत -जामखेड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. हा विजय त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा महत्त्वाचा टप्पा ठरला. तसेच रोहित पवार यांनी 2022 पासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम सांभाळले आहे.

Nitesh Rane: "...तर मग मुस्लिम समाजाने पण धर्म शाळा-कॉलेज मध्ये आणू नये!"

https://www.lokshahi.com/news/nitesh-rane-then-the-muslim-community-should-not-bring-religion-into-schools-and-colleges

बुरखा घालून परिक्षा केंद्रात नको असं मत्स्य मंत्री नितेश राणेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहलेलं आहे. राज्यातील दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या पार्श्वभूमिवर नितेश राणेंनी हे पत्र लिहलेलं आहे. कॉपीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करत त्यांनी या संदर्भात दादा भुसेंना पत्र लिहलेलं आहे. दरम्यान नितेश राणे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की,

मुस्लिम विद्यार्थ्यांना बुरखा घालून परिक्षेला बसण्याची परवाणगी देण्यात यावी यावर मी मंत्र्यांना पत्र देखील पाठवलं होत. मी त्यांना स्पष्ट केलं आहे की, असं कोणतही प्रकारचं कुठल्याही लागून चालण्याचा प्रकार, आपलं हिंदुत्त्ववादी सरकार असताना होऊ नये. या देशात राहत असताना जो नियम अन्य धर्मियांना लागू होतो, तो मुस्लिम विद्यार्थ्यांनी देखील पाळला पाहिजे... माध्यमिक शाळेत उच्च माध्यमिक शाळेत परिक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता देण्याचं प्रमाणपत्र दिल्याचं परिपत्रक आहे..

असं लांगुलचालन चालणार नाही, अशी भूमिका शिक्षण मंत्र्यांकडे मांडली आहे. बुरखा घालून परीक्षेला बसल्याचे इतरही धोके आहेत. याचे धोके लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केली. हा निर्णय 2024 सालचा लागू झाला असून हे निर्णय रद्द करण्यासाठी मान्य केली. परिक्षेसोबतच मतदानाच्या वेळीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत... बुरखा घालून आलेले विद्यार्थ्यी नेमकी तेच विद्यार्थी परीक्षेला आहेत का? हे देखील पाहावं लागेल... इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये...

Chandrakant Khaire: चंद्रकांत खैरेंची बावनकुळेंसह शंभुराज देसाईंवर टीका

https://www.lokshahi.com/news/chandrakant-khaires-criticism-of-bawankule-along-with-shambhuraj-desai

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महायुतीमधील नेत्यांवर घणाघाती टीका केल्याच समोर आलं आहे. महायुती भाजप पक्षातील मंत्री चंद्रकांत बावनकुळे आणि महायुती शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री शंभुराज देसाईंवर टीकास्त्र केलेलं आहे. 'कोण बावनकुळे?, ठाकरेंवर बोलण्याची त्यांची पात्रता नाही' तसेच उद्धव साहेबांसोबत बावनकुळे यांची योग्यता तरी आहे का ? तसेच बावनकुळे यांनी जास्त बोलू नये एवढचं मी त्यांना म्हणेन, असं म्हणत त्यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे, त्याचसोबत शंभूराज देसाईंचा 'बोगस' असा उल्लेख करत त्यांच्यावर देखील टिप्पणी केली आहे.

Raigad Guardian Minister:...पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा दावा

रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद मुथा दिल्ली दौऱ्यावरून आल्यावर मिटवतील असा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. रायगड पालकमंत्री पदाबाबत २ दिवसात निर्णय होणार, असं मंत्री भरत गोगावले यांनी वक्तव्य केल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदार मंत्रालयात पोहचले आहेत. रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन ही आमदार मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहचले आहेत. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले मंत्रालयात दाखल झालेत. तसेच शिवसेना व राष्ट्रवादी वादावर पडदा पडण्याची शक्यता देखील वर्तावली जात आहे.

Pune Daund: शिक्षकांना तक्रार केल्याचा राग डोक्यात! अन् विद्यार्थ्याने दिली 100 रुपयांची सुपारी

पुण्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. कॉलेज, दवाखाना किंवा कोणत्याही ठिकाणी मुली सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दौंड शहरातील पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याची तक्रार एका विद्यार्थीनीने शिक्षकांना केली आणि हेच त्या विद्यार्थीनेच्या जीवावर बेतल. शिक्षकांना आपलं नाव सांगितल्याचा राग मनात धरून इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करून नंतर तिला जीवे मारण्याची सुपारी दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 100 रुपयांची सुपारी देऊन हे घृणास्पद कृत्य करण्याचा आदेश त्या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली. दरम्यान त्या विद्यार्थ्याने सर्व काही त्या मुलीला सांगितले आणि तिने याबाबत तिच्या पालकांना सांगितले आणि अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्गशिक्षकांसह मुख्याध्यापकांकडे याबाबत तक्रार केली. मात्र, आपल्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून केला गेला. त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाण्यात जाऊन फिर्यादी दिली आणि मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक व शिक्षिका, अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने शाळेतील मुलांची मानसिकता कुठल्या थराला गेली आहे याची चर्चा सुरू झाली असून राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Mahakumbha 2025: महाकुंभातील चेंगराचेंगरीदरम्यान जखमींच्या संख्येत वाढ

प्रयागराजमधील सुरु असलेल्या महाकुंभमेळ्या चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. मंगळवारी रात्री 1:30 च्या सुमारास हा अपघात झाला. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन, गर्दीमुळे संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली. रात्री 2 वाजता गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आलेले बॅरेकेडींग तुटले आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याविषयी अधिक माहिती प्राप्त झाली आहे.

महाकुंभादरम्यान संगम तीरावर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या आतापर्यंत 35 वर पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 17 तासांनंतर 35 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी सरकारने केली. यापैकी २५ जणांची ओळख पटली आहे. 90 जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.

अव्वल स्थान

ICC T20I Ranking: तिलक वर्माचा मोठा पराक्रम, ICC रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप

https://www.lokshahi.com/sports/cricket/tilak-vermas-great-feat-jumps-to-the-top-position-in-icc-rankings

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत मालिका झाल्यानंतर आता भारत विरुद्ध इंग्लंड अशी 5 टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्या 2 सामन्यात टीम टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार बॅटिंग करत, टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अशातच आता ICCने टी-20 रँकिंगची घोषणा केली आहे. या फलंदाजांमध्ये तिलक वर्मा याचं नाव आघाडीवर आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तुफान अर्धशतकी खेळी खेळल्यानंतर त्याने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तिलक वर्माने 844 रेटिंगसह दुसऱ्या स्थावर उडी मारली आहे.

ICCरेटिंगमधील खेळाडूंचे स्थान

ICCरेटिंगमध्ये सध्या ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रेव्हिस हेड 855 रेटिंगसह अव्वल स्थानी आहे. तसेच तिलक वर्मा 844 रेटिंगसह दुसऱ्या स्थावर आहे त्यामुळे तिलक वर्माकडे आता ट्रेविस हेडलाही मागे सोडण्याची संधी आहे. तसेच इंग्लंडचा वेगवान फलंदाज फिल सॉल्ट हा 782 रेटींग पॉईँट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज आणि भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव 763 रेटींग पॉईंट्ससह चौथ्या स्थानावर आहे. त्याचसोबत इंग्लंडचा कर्णधार 749 रेटींगसह पाचव्या स्थानी आहे.

Raj Thackeray On Chhava: 'महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने छावा चित्रपट पाहिला पाहिजे'

https://www.lokshahi.com/news/raj-thackeray-on-chhava-movie

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. छत्रपती संभाजी राजांचा 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वादात सापडलेला पाहायला मिळाला. छावा' चित्रपटातील नृत्यामध्ये 'छत्रपती संभाजी महाराज यांना लेझीम खेळताना दाखवले गेले आहेत. छावा चित्रपटातील हा वादग्रस्त भागावर राजकीयवर्तुळातून पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. याचपार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी छावा चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, परवा संभाजी महाराज यांच्यावर चित्रपट करणारे लक्ष्मण आले होते, उत्तम दिग्दर्शक महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे... छत्रपती शिवाजी महाराज हे आमची प्रेरणा आहे, तर संभाजी राजे हे आमचे बलिदान आहेत... अमेय खोपकर यांनी सांगितलं की, त्यांना मला भेटायचं आहे... त्या चित्रपटात महाराज लेझीम खेळत आहेत असं काहीतरी दृश्य आहे... संभाजी महाराज यांनी लेझीम घेतली सुद्धा असेल हातात इतिहासाच्या पानात नाही, पण मनात तरी त्यांनी लेझीम हातात घेतली असेल... हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागला आहे, सगळ्यांच्याच भावना उफाळून यायला लागले आहेत... त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, औरंगजेबाने केलेला अत्याचार डोक्यात ठेवून लोक चित्रपट पाहायला जातील. म्हणून, मी त्यांना बोललो की हे दृश्य चित्रपटातून काढून टाका... महात्मा गांधींवर चित्रपट बनवला असता... तर आपण असं डोक्यात ठेवून गेलो असतो की, महात्मा गांधी आंदोलन करत आहेत... पण ते दांडिया खेळताना दिसले असते तर कसं वाटलं असतं... महात्मा गांधींच्या हातात एकच दांडी आहे ते कसे खेळणार... आपण असं गृहित करतो ते चित्रपटांमध्ये पाहायचा प्रयत्न करतो, असं म्हणत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray: 'माझ्या डोक्यावर मी तलवारी घेऊन नाही फिरत' - राज ठाकरे

मुंबईत आज मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “निवडणुकीचा निकाला लागल्यावरती, ज्या दिवशी निकाल लागला महाराष्ट्रात निकालानंतर सन्नाटा पसरला. हे पहिल्यांदा मी बिघतलं. जो जल्लोष व्हायला पाहिजे होता. तो झाला नाही. लोकांमध्ये संभ्रम होता. असा निर्णय कसा आला प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्याचा संबंध नरेंद्र मोदी यांच्यासोबत लावण्यात आला याचपार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कोहिनूर मिल आणि ईडीची कहाणी स्पष्ट केली आहे.

याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले की, ज्या दिवशी मला ईडीची नोटीस आली, मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस काय आहे नेमकं प्रकरण... ज्यावेळेस मी ती नोटीस पाहिली तर त्यात कोहिनूर विषयी लिहलेलं होत, पण मला एक कळलं नाही माझा या सगळ्यासोबत काय संबंध? त्यावेळी ती माणसं मला भेटली आणि मला बोलले की, तुम्हाला पैसे आले आणि तुम्ही ते घेतले.. पण आम्ही त्याचा टॅक्स भरला होता, आणि तिथेच आम्ही त्यातून बाहेर पडलो.. मग मी माझ्या सीएला विचारलं की नेमकं प्रकरण काय आहे? तेव्हा तो मला म्हणाला की, तुम्ही पैसे दिले पण तुमच्या पार्टनरने ते बाहेरच्या बाहेर फिरवले ते कंपनीपर्यंत गेलेच नाही... मग आम्हाला परत टॅक्स भरावाला लागला, इथेच विषय संपला...

पुढे राज ठाकरे म्हणाले ती, एवढ्या कारणावरून राज ठाकरे ईडीला घबरले आणि मोदींची स्तुती करायला लागले अशा बातम्या कानावर पडायला लागल्या... पण मला काय देण घेण आहे त्या गोष्टींशी, मी माझ्या डोक्यावर तलवारी घेऊन नाही फिरत... माझं बाकीच्यांसारख नाही आहे, 6 दिवस आधी मोदी म्हणाले की, 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही आत टाकू आम्हाला हे नव्हतं माहित की, ते मंत्रिमंडळात टाकण्याबाबत म्हणत होते... आतमध्ये टाकू याचा अर्थ हा होतो हे मला आज समजल असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली आहे.

भूमिका बदलण्यावर राज ठाकरे म्हणाले की,

Rja Thackeray On BJP: आधी भ्रष्टाचाराचे आरोप, नंतर भाजपमध्ये एन्ट्री, ठाकरेंनी नेत्यांची यादी वाचली

राज ठाकरेंवर निवडणुकीदरम्यान ते भूमिका बदलतात असे आरोप करण्यात आले होते, याच आरोपांवर राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी भाजप पक्षाने केलेल्या अनेक घडामोडी भाषणादरम्यान मांडल्या आहेत. यावेळी हिम्मत विश्वा शर्मा हे भ्रष्टाचाराचे पहिले मुर्तिमंत्त प्रतिक आहेत अशी संभावना भाजपने केल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

तसेच पुढे राज ठाकरे म्हणाले की, हिम्मत विश्वा शर्मा हे आधी दुसऱ्या पक्षात होते त्यानंतर त्यांना स्वतःच्या पक्षात घेतल्यानंतर त्यांना अर्थ, आरोग्य आणि शिक्षणासारखी खाती दिली एवढचं नाही तर 2021मध्ये त्यांना मुख्यमंत्री केलं. आधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि नंतर त्यांना मुख्यमंत्री केलं, इथे त्यांची भूमिका नाही बदलली... मुकुल रॉय पुर्व भारतात भरमसाट रिर्टन्स देतो असं सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांचे पैसे बुडवले या घोटाळ्याचे शिल्पकार असं भाजपने त्यांच्यावर आरोप केला होता, आणि त्यानंतर त्यांना देखील भाजपने पक्षात घेतलं होत. त्यानंतर बी एस एडी रोप्पा यांना खान घोटाळा प्रकरणी त्यांना दुर केलं आणि सत्ता येत नाही हे पाहून त्यांना पुन्हा पक्षात घेतलं आणि मुख्यमंत्री पद दिलं. अजित पवारांबद्दल तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे, त्याबद्दल काही नवीन सांगण्यासारख नाही असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांना देखील धारेवर धरलं आहे..

तसेच पुढे राज ठाकरेंनी अशोक चव्हाण यांचं नाव पुढे केलं, आदर्श घोटाळा प्रकरणी भाजपने त्यांच्यावर आरोप केले आणि त्यानंतर त्यांना पुन्हा पक्षात घेत राज्यसभेवर खासदार केल... भाजपचा 370 कलमाला सुरुवातीपासूनचं विरोध होता, असं राज ठाकरेंनी सांगितले तसेच नारायण राणे, किरिट सोम्या, हर्षवर्धन पाटिलं, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सारख्या अनेक नेत्यांवर आरोप केले होते, आणि आता हेच सगळे नेते ज्यांच्यावर आरोप करण्यात आले होते.. ते आता मंत्रिमंडळात आहेत किंवा भाजप पक्षात आहेत.. आज कित्येक नेते देव पाण्यात ठेवत आहेत की आमच्यावर आरोप करा... कराण, आरोप करून थेट मंत्रिमंडळात जाता येत, असा आरोप मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी भाजपवर केला आहे.

प्रत्येक पक्ष त्या-त्यावेळेनुसार आपले निर्णय घेतो, युती करतो, प्रवेश करतो, पण शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेस हे पक्ष जे काही करतील ती त्यांची परिस्थिती आणि आम्ही केलं की भूमिकेत बदल, असं का? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 'यांनी केलं की प्रेम, आम्ही केला की अत्याचार' मी लोकसभेच्या वेळेस मोदींना देखील म्हणालो की मी एकदा बोललो तर बोललो, तुम्ही जे कराल ते आम्ही बोलणार.. अनेक जण म्हणतात की, राज ठाकरेंनी भाजपमधल्या नेत्यांना भेटलं नाही पाहिजे, पण ज्यावेळेस मी त्यांना भेटतो तेव्हा मी तुम्हाला विकत नाही... असं म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

Devendra Fadnavis: धनंजय मुंडेंच्या राजिनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

https://www.lokshahi.com/news/fadnavis-reacted-to-dhananjay-mundes-resignation-said

बीड सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हे सध्या पोलिस कोठडीत आहेत, वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडेंकडून त्यांच्य मंत्रिपदाच्या राजिनाम्याची मागणी केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी यावर सुरुवातील राजिनाम्याच्या विषयावर मी उत्तर देणार नाही, असं म्हटलं होत. मात्र 29 जानेवारीला दिल्लीत माध्यमांशी बोलताना कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंडेंनी त्यांच्या राजिनाम्याची दोरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात दिली आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले तर, लगेच राजीनामा देईन, असं स्पष्ट मत यावेळी धनंजय मुंडेंनी दिलं आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहिले होते. त्यादरम्यान माध्यमांशी बोलतना फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "असं आहे की, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की, ते त्यांच्या कामासाठी आले होते. मी माझ्या कामाने आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण, सकाळी आमची भेट झाली होती. कारण, धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात. मी त्यांना कधीही भेटू शकतो. कुठल्याही कामाकरता मी त्यांना भेटू शकतो. त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजित पवारांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

धनंजय मुंडेंनी राजिनाम्याचा चेंडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे ढकलला

धनंजय मुंडे म्हणाले की, फडणवीस आणि अजितदादांना सांगितल्यावर मी राजीनामा देईन... माझा बाबत काय निर्णय घ्यायचा आहे ते अजित दादा ठरवतील... काही जण वैयक्तिक रागातून आरोप करतात... मुख्यमंत्र्यांना दोषी वाटत असेल, तर मी राजीनामा देईन मला नैतिकदृष्ट्या मी दोषी वाटत नाही.... देशमुख हत्या प्रकरणात मी प्रामाणिक बोललो, 51 दिवसांपासून मी टार्गेटवर आहे. असं महत्त्वाचं वक्तव्य यावेळी धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

Manisha Kayande On Raj Thackeray: "भूमिका बदलणं हा राज ठाकरेंचा स्वभाव, काय बोलतील याचा नेम नाही" मनिषा कायंदे यांची टीका!

राज ठाकरेंवर निवडणुकीदरम्यान ते भूमिका बदलतात असे आरोप करण्यात आले होते, याच आरोपांवर राज ठाकरेंनी त्यांच्या मुंबईत झालेल्या सभेत सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांची यादी वाचून दाखवली आहे. तसेच त्यांनी शिवसेना आणि कॉंग्रेसवर देखील हल्लाबोल केला आहे. इतर पक्ष काही करतील ती त्यांची परिस्थिती आणि आम्ही केलं की भूमिकेत बदल, असं का? असा प्रश्न राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भूमिका बदलणं हा राज ठाकरेंचा स्थायीभाव आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राज ठाकरेंवर केली आहे. शिवसेनेवर बोलून ते एक प्रकारे बदलत्या भूमिकांच समर्थनचं करत आहेत. राज ठाकरे आज काय बोलतील आणि उद्या काय बोलतील याचा अंदाज लावता येत नाही... त्यांचा स्वभाव हा भूमिका बदलणारा आहे, ते 2014 नंतर 2019 आणि आता बिनशर्त पाठिंबा नंतर विधानसभेला ते म्हणाले की, आमच्या शंभर जागा निवडून येतील आणि पुढचं सरकार आम्हीच ठरवू त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर काय बोलायचं

Amol Mitkari On Raj Thackeray: अजित पवारांप्रमाणे कामं करा, मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

https://www.lokshahi.com/news/amol-mitkari-on-raj-thackeray-3

काही महिन्यापासून मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुरू असलेलं वाक्य युद्ध थांबलं होतं. मात्र, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अजित पवारांवर निशाणा साधला आहे. आपल्या भाषणातून राज ठाकरे यांनी लोकसभेत एक जागा मिळवणाऱ्या अजित पवारांना 42 जागा विधानसभेत कशा मिळाल्या? असा सवाल उपस्थित केला होता. यावर आता अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिल आहे. स्वतःच्या मुलाला विधानसभेत निवडून आणू न शकणारे राज ठाकरे, यांनी सकाळी लवकर उठून अजित पवारांप्रमाणे काम करावं, असा टोला लगावला आहे. त्यामुळे आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुन्हा दिसून येत आहे .

अजित पवारांप्रमाणे लवकर उठून कामं करा

आपल्या भाषणातून राज ठाकरे यांनी लोकसभेत एक जागा मिळवणाऱ्या अजित पवारांना 42 जागा विधानसभेत कशा मिळाल्या? असा सवाल उपस्थित केला आहे. यावर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्योत्तर दिल आहे. स्वतःच्या मुलाला विधानसभेत निवडून आणू न शकणारे राज ठाकरे यांनी सकाळी उठून अजित पवार ज्याप्रमाणे काम करत आहेत त्याप्रमाणे काम कराव असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

राज ठाकरेंचा निकालावरुन अजित पवारांवर निशाणा

भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या ठीक आहे. पण अजित पवार 42? चार-पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42 जागांवर आले. चार-पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42 जागांवर आले, कोणाचा तरी विश्वास असेल का? ज्यांच्या जीवावर सगळे मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात. शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले त्यांचे दहा आमदार येतात. आणि लोकसभेला अजित पवार यांचा एक खासदार निवडून आला त्यांचे 42 आमदार येतात. लोकांनी आपल्याला मतदान केलं, पण ते केलेला मतदान कुठेतरी गायब झालं, अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुकांना लढवल्या तर बरं, असं देखील मनसे पक्षप्रमुखे राज ठाकरे म्हणाले आहेत.

Elon Musk: युरोपीय संसदेतून 2025 च्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी इलॉन मस्क यांना नामांकन!

https://www.lokshahi.com/desh-videsh/elon-musk-nominated-for-the-2025-nobel-peace-prize

युरोपियन संसदेतून शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी इलॉन मस्कला नामांकित करण्यात आलं आहे. डॉजकाईन क्रिप्टोकरेन्सीच्या एका डिझायनरनं सोशल साईटवर देखील त्याची माहिती जाहीर केली आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी इलॉन मस्कच्या प्रयत्नांची दखल इलॉन मस्क यांना २०२५ च्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केलं गेल्याचं म्हटलं आहे. दरम्यान इलॉन मस्कच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Ashish Shelar On Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या टीकेला आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

राज ठाकरेंवर निवडणुकीदरम्यान भूमिका बदलल्याच्या आरोपांवरून त्यांच्या मुंबईत झालेल्या सभेत सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांची यादी वाचून दाखवली आहे. तसेच त्यांनी शिवसेना आणि कॉंग्रेसवर देखील हल्लाबोल केला आहे. इतर पक्ष काही करतील ती त्यांची परिस्थिती आणि आम्ही केलं की भूमिकेत बदल, असं का? असा प्रश्न राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.

मंत्री आशिष शेलार यांनी सोशल मीडियवर पोस्ट करत राज ठाकरेंना धारेवर धरल आहे. आशिष शेलार पोस्ट म्हणाले की, भाजपने कधीही तडजोडीचं राजकारण केलं नाही.. राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अर्धवट माहितीच्या आधारावर आहे. असं म्हणत मंत्री आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर पलटवार केला. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आणि त्यामुळे राष्ट्र निर्माणाच्या आधारावर आम्ही तडजोड केली नाही. भूमिका बदलल्याच्या आरोपांवरून शेलारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अथिया शेट्टी हिची लग्नगाठ २०२३ ला टीम इंडियाचा खेळाडू केएल राहुलसोबत बांधली गेली होती.

अथियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली.

अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या घरी लवकरच चिमुकल्याचे आगमन होणार आहे.

८ नोव्हेंबरला के एल राहुल- अथिया यांनी गोड बातमी चाहत्यांना दिली होती.

अथिया शेट्टी यांनी सोशलमिडियावर प्रेग्नेंसीचे फोटो केले आहेत.

फोटोमध्ये अथिया शेट्टी काळ्या पांढऱ्या रंगाच्या गाउनमध्ये दिसत आहे

अथियाने एक पांढऱ्या रंगाचे हार्ट आणि फुलांसह या फोटोला कॅप्शन दिले आहे.

तिच्या या पोस्टवर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.

आजचा सुविचार

https://www.lokshahi.com/aajcha-suvichar/aajcha-suvichar-32

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

https://www.lokshahi.com/aajch-rashibhavishya/horoscope-of-31th-january-2025

Budget 2025: आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात

https://www.lokshahi.com/news/budget-2025-budget-session-of-parliament-begins-today

1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल. तर आजपासून म्हणजेच 31 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभेपुढे आर्थिक पाहणी अहवाल ठेवतील. या पाहणी अहवालामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवण्यात येतात. तसेच हा अहवाल केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी दाखवला जातो. अधिवेशनाच्या आधी गुरुवारी केंद्रीय संरक्षणमंत्री व लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये 36 पक्षांचे 52 नेते सहभागी झाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनचा पहिला टप्पा कधीपर्यंत

अर्थसंकल्पीय अधिवेशनचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा टप्पा पार पाडला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्या टप्प्यात महागाई, बेरोजगारी तसेच आर्थिक मुद्द्यांवर विरोधकांकडून मांडणी केली जाते. या व्यतिरिक्त नुकतीच झालेली प्रयागराजमधील महाकुंभ सोहळ्यातील चेंगराचेंगरी आणि त्यामध्ये समजलेली मृतांची तसेच जखमींची संख्या या विषयावर देखील विरोधकांकडून आक्रमक मुद्दे मांडले जातील. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि वक्फ विधेयक प्रश्नावरही विरोधकांकडून केंद्र सरकार प्रश्नांची कोंडी केली जाऊ शकते.

Kalyan Shilpata Road: कल्याणशिळफाटा रस्ता पाच दिवस बंद, निळजे रेल्वे उड्डाणपुलासाठी विशेष ‘ब्लॉक’

https://www.lokshahi.com/news/kalyan-shilphata-road-closed-for-five-days-special-block-for-nilje-railway-flyover

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शनजवळ निळजे रेल्वे उड्डाणपुलाचे काम ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून ते १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत शिळफाटा रस्त्यावर पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातची अधिसूचना शुक्रवारी प्रसिध्द केली जाणार आहे.वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली-जेएनपीटी समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. हा रेल्वे मार्ग शिळफाटा येथे पलावा जंक्शन एक्सपिरिया मॉलजवळील निळजे रेल्वे उड्डाणपुलाखालून जाणार आहे. पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. शिळफाटा रस्त्यावरील सततच्या वर्दळीत ही कामे करणे शक्य नसल्याने ५ ते १० फेब्रुवारी दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्यायी मार्ग

● कल्याण भागातील प्रवाशांनी मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी प्रवास करावा.

● शिळफाटामार्गे नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांनी काटई नाका येथे डावे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्याने जावे.

● बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहनांनी काटई नाका येथे न येता खोणी गावात वळण घेऊन तळोजा काँक्रीट रस्त्याने पनवेल, नवी मुंबईकडे जावे.

● हलक्या, मध्यम वाहनांनी काटई गाव, काटई गाव कमान येथून लोढा पलावा दिशेने विरुध्द मार्गिकेतून जावे. तेथून पलावा जंक्शन येथे नियमित मार्गिकेत येऊन इच्छित स्थळी जावे

Maghi Ganeshotsav 2025: माघी गणेशोत्सवात पीओपी मूर्तीच्या विसर्जनावर बंदी, उच्च न्यायालयाचे कडक आदेश

https://www.lokshahi.com/news/maghi-ganeshotsav-2025-ban-on-immersion-of-pop-idols-during-maghi-ganeshotsav-strict-order-by-high-court

यंदा माघी गणेशोत्सव 1 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. असं असताना उच्च न्यायालयाने माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर काही नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. माघी गणेशेत्सवात पीओपीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीची विक्री आणि विसर्जन न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. हे निर्णय गुरुवारी घेण्यात आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पर्यावरणास हानीकारक असणाऱ्या पीओपी गणेशमूर्ती बनविणे, त्यांची विक्री करणे आणि विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री झाली, तर त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश दिले. तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने लागू केलेल्या नियमांचे पालन करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासह राज्य सरकार तसेच मुंबई महापालिका आणि इतर अन्य महापालिकांना दिले.

खंडपीठाने उपरोक्त अंतरिम आदेश देताना उच्च न्यायालयाच्या 2022 सालच्या निर्णयाचाही हवाला दिला. कोणाही व्यक्तीला पीओपीपासून मूर्ती तयार करण्याचा अधिकार नसल्याचा निर्णय मद्रास न्यायालयाने दिला होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. या निर्णयाचा दाखलाही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने माघी गणेशोत्सवात पीओपी बंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देताना दिला.

Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे भगवान गडावर दाखल; कारण अद्याप अस्पष्ट

https://www.lokshahi.com/news/dhananjay-munde-minister-dhananjay-munde-arrives-at-bhagwan-gad

मंत्री धनंजय मुंडे हे रात्री भगवानगडावर दाखल झाले असून त्यांनी संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी रात्री चर्चा देखील केली मात्र या दोघात काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर मुंडे यांचा अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला भेट देण्यासाठी नियोजित दौरा होता मात्र तो रद्द करून रात्री उशिरा धनंजय मुंडे हे भगवानगडावर दाखल झाले..भगवान गडावरील दौऱ्याचे कारण अस्पष्ट असून आता थोड्या वेळात ते पूजा देखील करणार आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर सर्व स्तरातून राजीनाम्याची मागणी होत आहे त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Budget 2025: आतापर्यंत 'या' महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला; जाणून घ्या...

https://www.lokshahi.com/ampstories/web-stories/budget-2025-so-far-these-women-finance-ministers-have-presented-the-union-budget-know

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे.

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी मांडला आहे.

निर्मला सितारामन यांच्या आधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प मांडला होता.

यावेळी मोरारजी देसाई हे अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते.

मोरारजी देसाई यांना काही पक्षांतर मतभेदांमुळे पक्षाबाहेर काढण्यात आलं.

त्यामुळे 28 फेब्रुवारी 1970साली इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.

त्यांच्या नंतर 2019 मध्ये पहिल्यांदा निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला.

आता निर्मला सीतारामन आठव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Mumbai Budget 2025: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 'या' दिवशी होणार सादर

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून आज केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील, आणि उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ज्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. तर आजपासून म्हणजेच 31 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा टप्पा पार पाडला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्या टप्प्यात महागाई, बेरोजगारी तसेच आर्थिक मुद्द्यांवर विरोधकांकडून मांडणी केली जाते. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि वक्फ विधेयक प्रश्नावरही विरोधकांकडून केंद्र सरकार प्रश्नांची कोंडी केली जाऊ शकते.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 'या' दिवशी होणार सादर

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमिवर आता मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत एक महत्त्व बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला सादर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी पहिल्यांदाच सादर करणार आहेत. तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण आणि बेस्टसाठी योग्य ती उपाययोजना आखण्याची शक्यता वर्तविण्यात जात आहे. तसेच देवनार डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करण्यासाठी साधारण सात ते आठ वर्ष लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. तर यंदाचा अर्थसंकल्प 65 हजार कोटींचा आकडा ओलांडणार असल्याची शक्यता आहे.

Narendra Modi On Budget 2025: भारत मिशन मोडमध्ये, अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा होणार; पंतप्रधान मोदी

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे, तर आज केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील, आणि उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांच्या तिसर्‍या कार्यकाळातील संपुर्ण अर्थसंकल्प सादर होत आहे. पंतप्रधान मोदींनी लक्ष्मीला वंदन करत भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी महिला वर्गासाठी आवश्यक निर्णय होणार, स्वतंत्र्याच्या 100 व्या काळात भारत पुर्ण विकसित होणार, बेरोजगारीवर तोडगा काढला जाणार अशा अनेक विषयांवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज बजेट सत्राच्या प्रारंभी मी समृद्धीची देवी, लक्ष्मी मातेला वंदन करतो. अशा वेळी लक्ष्मी मातेचे स्मरण करणे ही आपली जुनी परंपरा आहे. लक्ष्मी माता ही सिद्धी देते. आई लक्ष्मी गरीब, मध्यम वर्गावर विशेष कृपा ठेवेल, असं म्हणत मोदींनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.

पुढे मोदी म्हणाले की,गेल्या काही वर्षात महागाईने हा मध्यम वर्गाची मोठ्या प्रमाणात ओढाताण झाली. त्यातच करांचे ओझे कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. येणाऱ्या तिसऱ्या कार्यकाळात सरकारचे मिशन मोडवर आहे. सर्वांचा विकास हेच आपल्या सरकारचे मिशन असल्याचे मोदी म्हणाले. स्वतंत्र्याच्या 100 व्या काळात म्हणजे 2047 मध्ये विकसीत भारताचा संकल्प पूर्ण विकसित होईल. नाविन्य हीच आपल्या आर्थिक धोरणांचा आधार आहे. सरकार रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मवर लक्ष्य देत असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

Shardul Thakur In Ranji Trophy: रणजी ट्रॉफीमध्ये पहिल्यांचा असा रिकॉर्ड! मुंबईच्या गोलंदाजांचा भेदक मारा अन् मेघालयचे वाजवले बारा

https://www.lokshahi.com/sports/cricket/shardul-thakur-in-ranji-trophy

रणजी करंडक स्पर्धेत मेघालयविरुद्ध मुंबई यांच्यात अनोखा सामना पाहायला मिळाला असून हा सामना पहिल्या अडिच तासातच मुंबईने संपवला. शार्दूल ठाकूरच्या तुफान गोलंदाजीने मेघालयच्या फलंदाजांची धर का पळ अशी अवस्था केल्याचं पाहायला मिळालं. मेघालय संघाच्या स्कोअरबोर्डवर 2 धावा असताना 6 विकेट घेत शार्दूल ठाकूरने त्याच्या दुसऱ्या षटकात हॅटट्रिक केली आहे. मात्र, या सामन्यात मेघालय संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. जम्मू-काश्मीरकडून पराभव पत्करल्यानंतर मुंबई संघाला स्पर्धेत कायम राहण्यासाठी मेघालयविरुद्धचा सामना बोनस गुणांसह जिंकावा लागणार आहे. मेघालयच्या संघाने अवघअया 2 धावांवर 6 विकेट गमावत 86 धावा केल्या. मोहित अवस्थीने तीन फलंदाजांना गारद केलं. डिसूझानं दोन विकेट घेतल्या. मेघालयचे सहा फलंदाज शून्यावर बाद झाले. फक्त चार फलंदाज दोन आकडी धावा करू शकले. मात्र, संघाला १०० धावांची मजल मारून देण्यात अपयशी ठरले. मेघालयकडून हिमन याने 24 चेंडूंवर 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावांची खेळी केली.

Mamta Kulkarni In Mahakumbh 2025: महाकुंभ मेळ्यातून महत्त्वाची बातमी! ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवलं

https://www.lokshahi.com/maha-kumbh/mamta-kulkarni-was-removed-from-the-post-of-mahamandaleshwar

अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली होती. याविषयी तिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ शेअर केले होते. किन्नर आखाडाचे आचार्य नारायण त्रिपाठी यानी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली. ज्यामुळे तिला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं होत. ज्यामध्ये ममता कुलकर्णी यांना चादर पोशी विधी करून महामंडलेश्वर ही पदवी स्विकारली होती. ममता कुलकर्णीला यादरम्यान नवीन नाव आणि ओळख देण्यात आली होती. ममता कुलकर्णी श्री यामाई ममता नंद गिरि नावाने ओळखली जात होती. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र धारण केले होते. ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला आहे अशा चर्चा सुरु असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठी यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलं आहे. यादरम्यान किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाई देखील करण्याती आल्याची माहिती समोर आली. ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवल्यापासून, या निर्णयावरील वाद थांबण्याचे नाव घेत नव्हते. ममता महामंडलेश्वर झाल्यानंतर किन्नर आखाड्यातील संघर्ष वाढला आहे. तर किन्नर आखाडा लवकरचं नवे आचार्य महामंडलेश्वर घोषित करणार आहेत.

Budget 2025 Expectations : निर्मला सीतारमण सादर करणार देशाचं बजेट, सर्वसामान्यांच्या अपेक्षा काय?

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवार, ३१ जानेवारीला सुरू झाली असून, काल सुरु झालेल्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. आज १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये सकाळी ११ वाजता २०२५-२६चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये बेरोजगारी, महागाई व इतर आर्थिक मुद्दे विरोधकांकडून आक्रमकपणे मांडले जातील. याशिवाय, प्रयागराजमधील महाकुंभ सोहळ्यातील चेंगराचेंगरीमध्ये झालेले मृत्यू, तसेच वक्फ विधेयक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही विरोधकांकडून केंद्र सरकार व भाजपवर निशाणी साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आज देशाचं अर्थसंकल्प सादर होणार आहे, ज्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. समाजातील प्रत्येक घटकाला या बजेटमधून खूप अपेक्षा आहेत. महिला,तरुण,शेतकरी यांना अर्थसंकल्पात काय मिळणार? त्याच बरोबर या बजेटमधुन शेतकर्यांची काय अपेक्षा आहे हे जाणून घेण महत्त्वाचं ठरणार आहे.

काल झालेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर देशाचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे देखील अभिभाषण झाले ज्यात त्यांनी भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल तसेच तिसऱ्या कार्यकाळात भारताचा तीनपट विकास होणार आणि गरिबांना घर देण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. त्याचसोबत मुद्रा लोन आता 10 लाखांऐवजी 20 लाखात मिळणार असल्याच देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पंतप्रधान मोदींनी लक्ष्मीला वंदन करत भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी महिला वर्गासाठी आवश्यक निर्णय होणार, स्वतंत्र्याच्या 100 व्या काळात भारत पुर्ण विकसित होणार, बेरोजगारीवर तोडगा काढला जाणार अशा अनेक विषयांवर चर्चा केली.

Nirmala Sitharaman Budget 2025: अर्थसंकल्पात महिलांसाठी 'या' खास योजनांची भर, तर वैज्ञानिक संशोधनाला चालना

आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत, यादरम्यान या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या गोष्टी महाग होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुढची 5 वर्षे विकासाची संधी देणार असं म्हटलं आहे, तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट ठेवत, मेक इन इंडियावर भर देण्याचा प्रयत्न करणार असं निर्मला सीतारामण म्हणाले आहेत. या बजेटमध्ये गरीब, युवक आणि महिलांकडे लक्ष दिले जाणार आहे.

विज्ञान क्षेत्रासाठी काय?

एससी आणि एसटी महिलांसाठी विशेष योजना

१.५ लाख कोटींचा पायाभूत सुविधांसाठी राज्यांना निधी

वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षात १० हजार जागा वाढवणार

वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी ५ वर्षांचा कार्यक्रम

आयआयटींची क्षमता वाढवली, ६५०० जागा वाढवल्या

२०४७ पर्यंत १०० गीगावॅट आण्विक ऊर्जेचं लक्ष्य

तंत्रज्ञानातील संशोधनासाठी आयआयटीद्वारे फेलोशिप

पुढील ५ वर्षात १० हजार फेलिशीप

महिलांना 2 कोटी रुपयांचा मध्यम मुदतीचे कर्ज नव्याने लघुउद्योजक देण्यात येणार

महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार

चामड्यांची पादत्राणे बनवणाऱ्यांसाठी योजना, 5 लाख महिलांना योजनेचा घेता लाभ येणार

महिलांना 2 कोटींची स्टार्टअपसाठी मदत

इंडिया पोस्ट महिला बँकेचे नूतनीकरण करणार

स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटींची तरतूद

देशभरातील एक कोटी गर्भवती, स्तनदा मातांना तसेच किशोरवयीन मुलींना 1 लाख पोषणमूल्य वाढवणार, ईशान्य भारतातही विशेष लक्ष

केंद्रीय अर्थसंकल्पात युवक, रोजगार, शिक्षण क्षेत्रासाठी काय-काय मिळालं? वाचा बजेटमधील 10 मोठे मुद्दे

Nirmala Sitharaman Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात युवक आणि शिक्षण क्षेत्रासाठी 'हे' महत्त्वाचे मुद्दे

https://www.lokshahi.com/news/these-are-the-important-issues-raised-for-the-youth-and-education-sector-in-the-union-budget

आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गरीब, युवक आणि महिलांकडे लक्ष दिले जाणार आहे, असं म्हटलं आहे. त्यांनी युवक, रोजगार, शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

युवकांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी कोणत्या गोष्टी सांगितल्या जाणून घ्या...

युवकांना उत्पादन क्षेत्रात काम करता यावे म्हणून कौशल्य विकास तसेच कौशल्य प्रशिक्षणाकरता 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची उभारणी करणार

शाळा व उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये भारतीय भाषा पुस्तक योजना सुरु होणार, याद्वारे पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे विषय त्यांच्या भाषेत समजून घेता येतील आणि शिक्षण सोपं जाईल.

वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षात 10 हजार जागा वाढवणार तसेच पाच वर्षात 75 हजार मेडिकलच्या जागांमध्ये वाढ

एआयच्या अभ्यासासाठी तीन केंद्र उभारणार त्याचसोबत कृषी आरोग्य आणि इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर होणार

गेल्या 10 वर्षांत 23 आयआयटींमधील विद्यार्थी क्षमता 65 हजाराहून 1.35 लाखांपर्यंत वाढली आहे. ही वाढ 100 टक्के इतकी आहे.

2014 नंतर सुरू झालेल्या 5 आयआयटींमध्ये अतिरिक्त सोयी-सुविधा उभारल्या जाणार

पाटणा आयआयटीमधील हॉस्टेल सुविधांध्ये वाढ

पुढच्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये ५० लाख अटल टिंकरिंग लॅब उभ्या केल्या जाणार.

सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल.

Nirmala Sitharaman Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार क्षेत्रासाठी काय मिळालं? जाणून घ्या...

https://www.lokshahi.com/news/what-was-achieved-in-the-employment-sector-in-the-union-budget-find-out

रोजगार क्षेत्रात काय मिळालं?

उद्योगक्षेत्रासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेसवर सर्वाधिक भर

नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी संबंध नाही

जन विश्वास विधेयक आणणार

5.7 कोटी लघुउद्योग देशात येणार

लघुउद्योगाद्वारे 7.5 कोटी रोजगार उपलब्ध होणार, त्यातून 36 टक्के उत्पादन

45 टक्के निर्यात सूक्ष्म व लघू उद्योगातून केली जाते.

सूक्ष्म व लघू उद्योगांचं वर्गीकरण होणार असून सूक्ष्म व लघू उद्योगांना रोजगार निर्मितीसाठी मदत केली जाणार.

एमएसएमईला 20 कोटींपर्यंतचे टर्म कर्ज, एमएसएमईला सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देणार

स्टार्टअपची 10 कोटींवरून 20 कोटींची क्रेडिट लिमिट

छोट्या उत्पादकांसाठी स्मार्ट क्रेडिट कार्ड

ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या कामगारांची ई श्रम पोर्टलवर नोंदांनी होणार

Nirmala Sitharaman Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रावर विशेष लक्ष, जाणून घ्या कोणत्या गोष्टी मांडल्या

जहाज निर्मिती क्षेत्राकडे विशेष लक्ष

२५ हजार कोटी खर्च करून मेरिटाईम बोर्ड स्थापना

अतिविशाल जहाजांचाही योजनेत समावेश

उडान योजना नव्याने स्थापन, पुढील १० वर्षात १२० नवी ठिकाणं जोडणार

नव्या उडान योजनेत पूर्वोत्तर राज्यांकडे विशेष लक्ष

जहाज निर्मिती 4 क्षेत्राकडे विशेष लक्ष

५० नवी पर्यटन स्थळं विकसित करणार

पर्यटनस्थळ विकासातून नवा रोजगार

भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांनाही व्हिसा सोय

हील इन इंडिया योजना मेडिकल टूरिझमसाठी

महाबोधी आणि विष्णूपद मंदिरासाठी खास कॉरिडोअरची निर्मिती केली जाणार आहे.

तसेच नालंदा टूरिस्ट क्षेत्र म्हणून विकासित केले जाणार

ओडिशातील समुद्रकिनारे तसेच इतर धार्मिक स्थळांना आणखी देशपातळीवर नवे पर्यटन मिळवून देणार आहे.

Devendra Fadnavis On Budget: मध्यमवर्गीय, नोकरदारांसाठी ड्रीम बजेट; देवेंद्र फडणवीस

याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे, फडणवीस म्हणाले की, यावेळी अर्थसंकल्पाने मध्यम वर्गासाठी एक ड्रीम बजेट दिले आहे.12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता टॅक्स भरावा लागणार नाही. अशी जी इनकमटॅक्सची योजना करण्यात आली आहे, याचा फायदा आता मध्यम वर्गीय आणि तरुणांना होणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती होणार असून अतिशय धीराने घेतेलेला हा निर्णय आहे. हा निर्णय देशाच्या आर्थिक विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे. शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळण्यासाठी तेल बियांच्या बाबत देखील निर्णय घेतला गेला आहे. तसेच पाच लाखाचे कर्ज शेतकऱ्यांना मिळाले तर त्यांना अधिक फायदा होणार आहे. मासेमारी करणार्यांना देखील चांगला फायदा होणार आहे. शेतीसाठी देखील मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. स्टार्ट अपसाठी 20 कोटी रुपयाची क्रेडिट लिमिट करण्यात आली असून, पीपीपी प्रकल्पासाठी नवीन योजना करण्यात सुरु करण्यात आलेली आहे. युवाच्या स्वप्नांना भरारी देणारा हा अर्थ संकल्प आहे. सर्व समावेशक अर्थ व्यवस्थेकडे चाललेला हा अर्थ संकल्प आहे.

तसेच पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या वेळी देखील विरोधकानी आरोप केले होते, राज्याला काही दिले नाही. पण मी मागच्या वेळी प्रमाणे यावेळी देखील काय काय राज्याला मिळाले याची आकडेवारी देईन. विमा क्षेत्रात 100 टक्के एफडीआय महत्वाच आहे. विमा क्षेत्रात जो पैसा असेल तो भारतात गुंतवावा लागेल. मागच्या काळात Lic ने मदत केली, तशी आता विमा कंपनीला मदत करावी लागेल. कॅन्सर सारख्या आजराला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 200 डे केअर सेंटर काढण्यात येणार आहेत. 36 औषधे ड्युटी फ्री करण्यात आली आहे. जास्त व्याज मिळते म्हणून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका एवढं मी नवीन तरुणाना सांगतो. मी फार काही गुंतवणूक केली नाही मी लोकांमध्ये गुंतवणूक करतो असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना सुनावले आहे.

Nirmala Sitharaman Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय

आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर केले. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केले, या अर्थसंकल्पात अनेक मुद्दे मांडण्यात आले. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुढची 5 वर्षे विकासाची संधी देणार असं म्हटलं आहे, तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट ठेवत, मेक इन इंडियावर भर देण्याचा प्रयत्न करणार असं निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत असताना म्हणाल्या आहेत. या बजेटमध्ये गरीब, युवक आणि महिलांकडे लक्ष देण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे.

आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रासाठी घेतलेले निर्णय

कस्टम्स ड्युटीतून 36 महत्त्वाची औषधं वगळली

सरकारी रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे-केअर केंद्रे स्थापन, तर कॅन्सरच्या औषधांवरील कस्टम्स ड्युटी हटवणार

6 औषधांवर कस्टम ड्युटी 5% करण्यात येणार

200 डे-केअर कॅन्सर केंद्रे उघडणार

नव्या योजनांसाठी 10 लाख कोटींची गुंतवणूक

जल जीवन मिशन 2028 पर्यंत वाढवण्यात आले

न्युक्लिअर एनर्जी मिशन

खासगी क्षेत्रासोबत भागीदारी करणार

2047 पर्यंत 100 गिगावॉट न्युक्लिअर एनर्जी निर्मितीचे लक्ष

अणू क्षेत्रात संशोधन आणि विकाससाठी 20 हजार कोटींची तरतूद

2033 पर्यंत अणुभट्ट्या कार्यरत होणार, तर स्वदेशी बनावटींनी तयार केलेल्या अणू भट्ट्यांसाठी 20 हजार कोटी

Devendra Fadnavis On Budget 2025: 'अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भरभरुन तरतूद' मुख्यमंत्री दिली ट्वीट करत माहिती

आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर केले. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केले, या अर्थसंकल्पात अनेक मुद्दे मांडण्यात आले. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुढची 5 वर्षे विकासाची संधी देणार असं म्हटलं आहे, तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट ठेवत, मेक इन इंडियावर भर देण्याचा प्रयत्न करणार असं निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत असताना म्हणाल्या आहेत. या बजेटमध्ये गरीब, युवक आणि महिलांकडे लक्ष देण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भरभरुन तरतूद केल्याची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोस्ट

'मुंबई मेट्रोसाठी 1255.06 कोटी'

'पुणे मेट्रोसाठी 699.13 कोटी'

'मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी 4004.31 कोटी'

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र!

मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी

पुणे मेट्रो : 699.13 कोटी

एमयुटीपी : 511.48 कोटी

एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी

सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी

महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी

महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी

नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी

मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी

ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी

Sanjay Shirsat: 'दोन्ही शिवसेना एकत्र येणं आता शक्य नाही'; मंत्री शिरसाठ यांचं मोठं विधान

https://www.lokshahi.com/video/sanjay-shirsat-it-is-not-possible-for-both-shiv-sena-parties-to-come-together-now-minister-shirsats-big-statement

मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिंदेंच्या शिवसेनेतून मंत्री संजय शिरसाठ यांनी मोठं विधान केलं आहे. मनपा निवडणूक झाल्यावर त्यांना (उद्धव ठाकरे) कळेल की खूप मोठी चूक झाली आहे. आता पुलाखालून पाणी फार वाहून गेले आहे. आता दोन्ही शिवसेना एकत्र येणे शक्य नाही. एकत्र आले तर हरकत नाही, मात्र आता हे एकत्र येणार नाही. असं म्हणत त्यांनी शिवसेना फुटीवरून ठाकरेंना निशाण्यावर धरल आहे.

संजय शिरसाठ म्हणाले की, काल मी जे वक्तव्य केलं ते मला नाही वाटत मी चुकीच काही बोललो आहे. शिवसेना फुटू नये या मताचे आम्ही होतो. मी काही वेगळे प्रयत्न करेन असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांना सत्तेचा मोह होता, सत्तेच्या मोहापायी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. त्यांना सत्तेचा मोह होता, सत्तेच्या मोहापायी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. उद्धव ठाकरे यांनी राजा म्हणून राज्य करावे आणि आम्ही सेवक म्हणून कारभार केला असता..सत्तेसाठी शिंदे बाहेर पडले न्हवते. त्यांना राग होता तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याचा. येणारी मनपा निवडणूक झाल्यावर त्यांना (उद्धव ठाकरे) कळेल की खूप मोठी चूक झालिये.आता पुलाखालून पाणी फार वाहून गेले आहेत. आता दोन्ही शिवसेना एक येणे शक्य नाहीं. एकत्र आले तर हरकत नाही मात्र आता हे एकत्र येणार नाही. पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे.

Budget News: "4 वर्षांपर्यंत अपडेटेड टॅक्स रिटर्न भरता येणार ; मर्यादा वाढवली" : निर्मला सीतारमण

आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर केले. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुढची 5 वर्षे विकासाची संधी देणार असं म्हटलं आहे. या अर्थसंकल्पात अनेक मुद्दे मांडण्यात आले. याचपार्श्वभूमीवर नवीन आयकर विधेयकामुळे गुंतागुंत कमी होणार असून टीडीएसमध्ये सुलभता आणणार आहे. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा 1 लाखांपर्यंत वाढवली. रिटर्न न भरलेल्यांसाठी मर्यादा ४ वर्षांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून 4 वर्षांपर्यत अपडेटेड टॅक्स रिटर्न भरु शकता अशी घोषणा केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केलेली आहे. ज्यांना कर भरता येणार नाही त्यांना मोठा दिलासा यावेळी मिळत आहे. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात वाढ करणं हे नव्या विधेयकाचं उद्दिष्ट आहे.

Rahul Gandhi: कॉंग्रेसचं सरकार असत, तर राष्ट्रपतींचं भाषण असं नसत- राहुल गांधी

https://www.lokshahi.com/news/rahul-gandhi-if-there-was-a-congress-government-the-presidents-speech-would-not-have-been-like-this-rahul-gandhi

लोकसभेत आज नेत्यांची चर्चा झाली या चर्चेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. लोकसभेत राहुल गांधींकडून मतदारांच्या आकडेवाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तसेच राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर लोकसभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी उत्तर दिले आहे.

यापार्श्वभूमिवर राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढले, त्याचसोबत शिर्डीतल्या 7 हजार मतदारांचे पत्ते एकाच इमारतीचे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. पुढे लोकसभेतील अर्थसंकल्पावरील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नवीन काहीच नव्हत... मागच्या वेळीही आम्ही असेच भाषण ऐकले होते... हे आपल्याला मान्यच करावं लागेल की, राष्ट्रपतींनी लोकसभेत अर्थसंकल्प दरम्यान जे अभिभाषण केलं त्यात बेरोजागारी, बेकारी हे शब्द देखील नव्हते... आज देशात सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे बेरोजगारीचा.... इंडिया आघाडीचं सरकार असत, तर राष्ट्रपतींचं भाषण असं नसत, असं राहुल गांधी म्हणाले..

तसेच राहुल गांधी पुढे म्हणाले की, मेक इन इंडिया ही चांगली कल्पना होती.... 'मेक इन इंडियाची' आयडिया चांगली पण योजना पूर्णपणे फेल गेली आहे... देश उत्पादन वाढवण्यात अपयशी ठरला, त्याचा परिणाम अर्थातच नोकऱ्यांवर म्हणजेच रोजगारांवर झाला... देशात बेरोजगारीचे प्रमाण जस होत तसचं आहे, मागील दहा वर्षात कुठलाही बदल झालेला दिसत नाही... देशाचे भविष्य तरुणांवर अवलंबून आहे... या देशातील मोबाईल देशाअंतर्गत बनत नाही, तर फक्त असेंबल होतात... कॉम्प्युटर क्रांतीवरुन देशात कॉंग्रेसची खिल्ली उडवली जात आहे... देशातील बेरोजगारीचा मुद्दा मांडत राहुल गांधींनी केंद्र सरकार तसेच राष्ट्रपतींवर जोरदार टीका केली आहे.

Guardian Minister of Raigad: रायगड पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही तसाच, गोगावलेंनी दिलेली मुदत संपली

https://www.lokshahi.com/video/the-controversy-over-the-post-of-raigad-guardian-minister-is-still-ongoing

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं चित्र आहे. रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला अवघ्या 24 तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. मात्र, काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात गेला होता. चार दिवसांपुर्वी मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर भरत गोगावले यांनी दोन दिवसात तुम्हाला गोड बातमी मिळेल, असे सूचक विधान केले होते. भरत गोगावलेंनी सांगितलेली 2 दिवसाची मुदत संपली, तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेना अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं दिसून येत आहे.

Ayodhya Crime News: अयोध्येत 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार; अत्याचार करत तरुणीची अमानुषपणे हत्या!

सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालेल्या आहेत. अशातच अयोध्येमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रभू श्रीरामांच्या अयोध्येत अत्याचारी रावण मोकाट फिरत आहेत. अयोध्येतून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय लेकीवर सामूहिक बलात्कार करून तिची अमानुषपणे निघृण हत्या करण्यात आली. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. एका नाल्यात हात-पाय बांधून निर्वस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. तिचे दोन्ही डोळे काढण्यात आले आहेत. त्याचसोबत तिच्या शरीरावर गंभीर जखमा करण्यात आलेल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, भागवत कथेसाठी ही तरुणी घरातून गेली होती आणि घरी परतलीच नाही.

BMC Budget 2025: मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार, मुंबईकरांच्या अपेक्षा काय?

https://www.lokshahi.com/%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%202025/mumbai-municipal-corporation-budget-2025

1 फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला. या दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुढची 5 वर्षे विकासाची संधी देणार असं म्हटलं. या अर्थसंकल्पात अनेक मुद्दे मांडण्यात आले. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट ठेवत, मेक इन इंडियावर भर देण्याचा प्रयत्न करणार असं निर्मला सीतारामण म्हणाल्या बजेटमध्ये गरीब, युवक आणि महिलांकडे विशेष लक्ष दिले गेले.

याचपार्श्वभूमीवर आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या म्हणजेच 4 फेब्रुवारीला सादर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तसेच उद्याच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी कर वाढीची शक्यता असून पर्यावरण, प्रदूषण आणि बेस्टसाठी ठोस उपाययोजना करण्याची शक्यता वर्तावली जात आहे. करवाढ वगळता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात सामान्य मुंबईकरांसाठी अनेक सरप्राईजेस असण्याची शक्यता आहे. तसेच यंदाचा अर्थसंकल्प साधारण 65 हजार कोटी पार करणार अशी शक्यता वर्तावली जात आहे. त्याचसोबत सकाळी ११ वाजता मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुपारी 1 वाजता आयुक्त भूषण गगराणी यांची पत्रकार परिषद होणार आहे.

मुंबईत विविध योजनांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात असेल असं सांगितलं जातंय. शिवाय मागील वर्षात तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी यावर्षी बजेटमध्ये वाढ होणार असल्याची माहिती आहे. मुंबईकरांना नेमकं या बजेट मधून काय मिळणार?याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Ambernath Crime News: अंबरनाथमध्ये महिलेची चाकूने भोसकून हत्या; पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात !

अंबरनाथमध्ये भर दिवसा एका महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. हुतात्मा चौकाकडून स्टेशनकडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या रस्त्यावर ही घटना घडली. पुरुषाने महिलेच्या पोटात चाकू भोसकून तिथून पळ काढला. यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी या महिलेला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेलं, मात्र तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत हल्लेखोर इसमाला ताब्यात घेतलं. अंबरनाथमध्ये महिलेची हत्या करणाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल भिंगारकर असं त्याचं नाव असून आर्थिक वादातून त्याने महिलेची हत्या केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.

नेमकी घटना काय घडली

अंबरनाथ पूर्वेतील उड्डाणपुलाच्या बाजूला भीम नगरकडे, साईबाबा मंदिराच्या शेजारील पायऱ्यांवर एक महिला आणि पुरुष असे दोघे बोलत बसलेले असतानाच अचानक त्यांच्यात वाद झाला आणि पुरुषाने महिलेच्या पोटात चाकू भोसकून तिथून पळ काढला. यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी या महिलेला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेलं, मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करत, हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी राहुल ताब्यात घेतलं आहे. त्याच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याला उद्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सीमा कांबळे या ४२ वर्षीय मृत महिलेसोबत राहुल याचे आर्थिक देवाण-घेवाणीचे संबंध होते आणि त्यातूनच त्यांनी ही हत्या केल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे.

GBS News: राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर पोहोचली; काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन !

राज्यातील जीबीएसबाधितांची संख्या 158 वर पोहोचली आहे. गुईलेन बॅरी सिंड्रोम बाधित रुग्णांची संख्या 158 वर पोहोचली आहे. त्यापैकी 127 रुग्णांमध्ये या आजाराचे निदान झाले आहे. GBS बाधित 5 संशयास्पद रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून यापैकी 31 रुग्ण पुणे मनपा आणि 83 रुग्ण हे पुणे उपनगरातील आहेत. त्याचसोबत 18 रुग्ण पुणे ग्रामीण आणि 8 इतर शहरात आहे. तसेच 18 रुग्ण हे पिंपरी चिंचवड मधील आहेत. यातील 48 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत, तर 21 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू ठेवले आहेत. GBS बाधित परिसरातील 64576 घरांचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात 14 वर्षीय मुलीला GBSची लागण

राज्यभर खळबळ माजवणाऱ्या जी.बी.एस या आजाराचा एक संशयित रुग्ण आढळल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीला GBS सारखी लक्षणे दिसल्याने डॉक्टरांनी खबरदारी घेतली आहे. जिल्हा रुग्णालयात सर्व तपासणी केल्यानंतर पुढील तपासणीसाठी त्या रुग्णाला पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी खबरदारी घेण्याचे जिल्हावासियांना आवाहन केले आहे.

कोल्हापुरात GBSचा 70 वर्षीय रुग्ण झाला बरा

सीपीआर रुग्णालयात कर्नाटकातील एक 70 वर्षीय वृद्ध GBS लक्षणांमुळे दाखल झाला होता. सलग सहा दिवसाच्या उपचारानंतर त्याची GBS मधून सुटका झाली त्याला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे.

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

मेष (Aries Horoscope)

आज तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांमुळे चिंतित राहू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्यावा. या राशीच्या लोकांना आज स्वतःसाठी भरपूर वेळ मिळेल. तुम्ही या वेळेचा वापर तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, पुस्तक वाचण्यासाठी किंवा तुमचे आवडते संगीत ऐकण्यासाठी करू शकता.

वृषभ (Taurus Horoscope)

तुमची ऊर्जा अशा स्व-सुधारणेच्या प्रकल्पांमध्ये लावा ज्यामुळे तुम्ही चांगले बनू शकाल. तुमच्यात जलद पैसे कमविण्याची इच्छा असेल. जर तुम्ही तुमचे आकर्षण वाढवले ​​आणि तुमची बुद्धिमत्ता वापरली तर तुम्ही लोकांसोबत स्वतःचे मार्ग काढू शकाल.

मिथुन (Gemini Horoscope)

जरी तुम्ही दिवसभर पैशाच्या समस्या सोडवत राहिलात तरी संध्याकाळी तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रियजनांशी वाद निर्माण करणारे वादग्रस्त मुद्दे तुम्ही टाळले पाहिजेत. तुमचे स्वरूप आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न तुमच्या समाधानासाठी ठरतील

कर्क (Cancer Horoscope)

भावनिक आश्वासन मिळवणाऱ्यांना त्यांचे वडील मदतीला येऊ शकतात. आज प्रेमात तुमची विवेकशक्ती वापरा. ​​पैसा, प्रेम किंवा कुटुंबामुळे निराश होऊन, तुम्ही आज दैवी आनंदाच्या शोधात आध्यात्मिक गुरूला भेटायला जाऊ शकता.

सिंह (Leo Horoscope)

आर्थिक अडचणी टाळण्यासाठी तुमच्या बजेटचे काटेकोर पालन करा. पत्नीशी भांडणामुळे मानसिक ताण येऊ शकतो. अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. दिवस आनंदाने आणि आनंदाने भरलेला असतो आणि एक सुंदर संदेश असतो.

कन्या (Virgo Horoscope)

आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही दानधर्म आणि देणग्या कराव्यात, कारण त्यामुळे मानसिक शांती मिळेल. वैवाहिक संबंधात प्रवेश करण्यासाठी चांगला वेळ आहे. आज तुमचा दिवस असल्याने तुम्ही नक्कीच भाग्यवान व्हाल, यासाठी अधिक प्रयत्न करा. काही मनोरंजन आणि मनोरंजनासाठी चांगला दिवस आहे.

तूळ (Libra Horoscope)

कौटुंबिक आघाडी समस्याग्रस्त असू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना राग येऊ शकतो. तुमचे जुने भांडण आजच सोडवा कारण उद्या खूप उशीर होऊ शकतो. एकटे वेळ घालवणे चांगले आहे, परंतु तुमच्या मनात चाललेल्या एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही चिंताग्रस्त होऊ शकता.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

तुमचे पैसे तुमच्या कामात तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही स्वतःला अनावश्यक खर्च करण्यापासून रोखता, आज तुम्ही हे चांगले समजू शकता. आज प्रत्येकजण तुमचा मित्र बनू इच्छितो - आणि तुम्ही त्यांना वचन देण्यास खूप आनंदी असाल. आज प्रेमाच्या आनंदात तुमची स्वप्ने आणि वास्तव मिसळतील. या राशीच्या राशीच्या लोकांना आज लोकांना भेटण्यापेक्षा एकटे जास्त वेळ घालवायला आवडेल.

धनु (Sagittarius Horoscope)

आज पैशांचा सतत ओघ सुरू राहील आणि आज तुम्हाला संपत्ती जमा करण्यात अडचणी येऊ शकतात. पोस्टाने लिहिलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. तुम्हाला एक काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. या राशीचे लोक आज त्यांच्या मोकळ्या वेळेत एखाद्या समस्येवर विश्वसनीय उपाय शोधण्याचा प्रयत्न करू शकतात.

मकर (Capricorn Horoscope)

प्रेमसंबंध तुमच्या आनंदात आणखी भर घालतील. तुमचा जोडीदार फक्त तुमच्यासोबत थोडा वेळ घालवू इच्छितो, परंतु तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाही, ज्यामुळे ते अस्वस्थ होतात. आज, तुम्हाला त्यांची निराशा स्पष्टपणे दिसेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

आज तुम्हाला असे संगीत ऐकायला मिळेल जे तुम्हाला या जगातील सर्व गाणी विसरून जाईल. कर आणि विम्याच्या बाबींवर थोडे लक्ष देण्याची आवश्यकता असेल. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील तणाव वाढण्याची शक्यता आहे आणि ते दीर्घकाळात तुमच्या नात्यासाठी चांगले ठरणार नाही. इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा काय समजतात याची काळजी करू नका.

मीन (Pisces Horoscope)

एक नवीन आर्थिक करार निश्चित होईल आणि नवीन पैसे येतील. तुमच्या संततीसाठी काहीतरी खास योजना करा. काही वास्तववादी योजना करा जेणेकरून तुम्ही त्या साध्य करू शकाल/अंमलबजावू शकाल. तुमची भावी पिढी तुम्हाला भेटवस्तू म्हणून नेहमीच लक्षात ठेवेल. प्रेम तुमच्या हृदयावर आणि मनावर राज्य करते. आज, तुम्ही विनाकारण कोणाशी तरी वाद घालू शकता.

Ashish Shelar On Rahul Gandhi: "दारुण पराभवानंतर विरोधी पक्ष बेशुद्ध अवस्थेत": आशिष शेलार

राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभेत आज नेत्यांची चर्चा झाली या चर्चेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. लोकसभेत राहुल गांधींकडून मतदारांच्या आकडेवाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तसेच राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर लोकसभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी उत्तर दिले. राहुल गांधींनी केलेल्या याच टीकेवर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसला मतदारांनी जोरदार फटका दिला आहे, मात्र दारुण पराभवानंतर विरोधी पक्ष बेशुद्ध अवस्थेत आहेत अशी टीका आशिष शेलार यांनी राहुल गांधींवर केली आहे. आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाच प्रदर्शन विरोधक करत आहेत, असा टोला देखील आशिष शेलारांनी लगावला आहे. मतदार वाढले तर त्यात चुक काय आहे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे.

राहुल गांधी म्हणाले होते की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढले, त्याचसोबत शिर्डीतल्या 7 हजार मतदारांचे पत्ते एकाच इमारतीचे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. पुढे लोकसभेतील अर्थसंकल्पावरील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नवीन काहीच नव्हत... मागच्या वेळीही आम्ही असेच भाषण ऐकले होते... हे आपल्याला मान्यच करावं लागेल की, राष्ट्रपतींनी लोकसभेत अर्थसंकल्प दरम्यान जे अभिभाषण केलं त्यात बेरोजागारी, बेकारी हे शब्द देखील नव्हते... आज देशात सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे बेरोजगारीचा.... इंडिया आघाडीचं सरकार असत, तर राष्ट्रपतींचं भाषण असं नसत, असं राहुल गांधी म्हणाले..

Marathi Language: शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य; सरकारचा मोठा निर्णय !

https://www.lokshahi.com/news/speaking-marathi-is-mandatory-in-government-and-semi-government-offices

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले आहेत. महाराष्ट्रातच होणारी मराठी होणारी गळचेपी थांबायचं नाव घेत नसल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. तरुणांना ते मराठी असल्यामुळे नोकरी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार देखीस समोर आला आहे. याचपार्श्वभूमीवर आता मराठी भाषा संवर्धनासाठी सरकारने मोठा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक लावावा लागणार आणि शासकीय कार्यालयातील संगणकावरील कळफलक ही मराठी भाषेतच असणार, तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई होणार असा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Jaya Bachchan: 'कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर लोकांचे मृतदेह नदीत टाकल्यामुळे पाणी दूषित

मौनी अमावस्येच्या पवित्र दिनी गंगा घाटावर स्नान करण्यासाठी भाविकांचा प्रचंड मोठा जनसमुदाय उसळला होता. यावेळी ३० भाविकांचा महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. या परिसरातील बॅरिकेट्स हटल्याने भाविक एकमेकांवर पडले. आणि एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरीत ९० हून अधिक भाविक जखमीही झाले आहेत. महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन राजकारण तापलेलं पाहायला मिळालं. या घटनेवरून अनेक आरोप-प्रत्यारोप होत असताना पाहायला मिळाले. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकल्याचा खळबळजनक दावा समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी केला आहे. जया बच्चन म्हणाल्या की, या घटनेनंतर महाकुंभात जल प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे, परंतु सरकार यावर कोणतेही ठोस उत्तर देत नाही. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाण्यात टाकण्यात आल्याने पाणी प्रदूषित झाले, परंतु सरकार या मुद्द्यावर मौन बाळगत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Ramdas kadam On Uddhav Thackeray: " ठाकरे हे काळ्या जादूचे बादशहा'; रामदास कदम

वर्षा बंगल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला होता, त्यांच्या या प्रश्नावर महायुतीतील रामदास कदम आणि संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे काळ्या जादूचे बादशहा आहेत असं वक्तव्य रामदास कदम यांनी केल आहे. त्याचसोबत मंत्रा संजय शिरसाट यांनी देखील ठाकरेंवर निशाणा साधला आहे, ठाकरेंनी केलेली काळी जादू आम्ही पाहिली आहे. असं मंत्री शिरसाट म्हणाले आहे.

रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे हे काळ्या जादूचे बादशहा आहेत, ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, त्यावेळी वर्षा बंगलामध्ये एक टोकरी लिंबू भेटली होती.... त्यामुळे काळ्या जादूचे बादशाह उद्धव ठाकरे आहेत असा विधान रामदास कदम यांनी केला आहे. संजय राऊत आणि सामना कडून एकनाथ शिंदे यांची सातत्याने बदनामी केली जात आहे... त्यामुळे एकनाथ शिंदे संजय राऊत यांच्या विरोधात कोर्टात जाव असं देखील महत्त्वाच वक्तव्य रामदास कदम यांनी केल आहे.

याचपार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाठ म्हणाले की, ठाकरेंची काळी जादू आम्ही पाहिलेली आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा आम्ही काय काय सहन केले हे आम्हाल माहित आहे... तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा, देवेंद्र फडणवीस हे सगळं मानत नाही.... काही रेनोवेशनचे काम सुरु असते. रामदास कदम यांचं ही व्यक्तिक मत आहे आणि माझे ही व्यक्तिक मत होत... पण आता पक्षाची लाईन आहे, त्यामुळे आता माझे मत आहे की शिवसेना एकत्रित येणार नाही...

Mumbai BMC Budget 2025: मुंबईचा अर्थसंकल्प जाहीर, कचरा संकलनबाबत कायदेशीर निर्णय घेणार

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा ७४४२७.४१ कोटींचा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी यांनी पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प सादर केला आहे, तर प्रशासकीय राजवटीतील तिसरा अर्थसंकल्प आहे.‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षणाचा भाग म्हणून मुंबईकरांना कचरा संकलन शुल्क लावले जाण्याची शक्यता आहे. हा अर्थसंकल्प ९२४६.६२ कोटींनी जास्त असून आगामी अर्थसंकल्प १४.१९ टक्क्यांनी अधिक आहे. रस्त्यांचे सुरू असलेले काँक्रीटीकरण तसेच मोठ्या प्रकल्पांसाठी महापालिकेला मोठा निधी खर्च करावा लागला आहे. यामुळे विविध विकास कामांसाठी ४३१६५.२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पर्यटनवाढीबाबत मुंबई महापालिकेने जाहीर केल्या 'या' योजना

पर्यावरण खात्याकरिता 113.18 कोटींची तरतूद

राणीच्या बागेत पेंग्वीन आणि वाघानंतर आता जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार या विदेशी प्राण्यांचा समावेश करणार

संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीखालील बोगदा करून वाघाचे शिल्प उभारणार

लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारणार

मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटी देण्यात येणार

काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल तसेच रिगल जंक्शन परिसराचा विकास केला जाणार

'या' कामासाठी एवढा खर्च

बेस्ट साठी 1000 कोटींची तरतूद

बेस्ट उपक्रमासाठी 11304.59 कोटी इतक्या रकमेचे अर्थसहाय्य

रस्ते व वाहतूक खात्याकरिता 5100 कोटींची तरतूद करणार

दहिसर ते भाईंदरपर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्पासाठी 4300 कोटींची तरतूद करणार

गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958 कोटींची तरतूद करणार

आरोग्य खात्याचे बजेट 7379 कोटी

शिक्षण खात्याचे बजेट 3955 कोटी

मिशन व्हिजन 27, मिशन संपूर्ण हे दोन मिशन शिक्षण खात्याकडून राबवणार

झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांना कर लागणार आहे.

झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून 350 कोटींचा महसूल अपेक्षित

बांधकाम प्रकल्पांसाठी 28 मुद्द्यांची मार्गदर्शक सूचना

सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 5545 कोटी, मल निसारण प्रचालनासाठी 2477 कोटी.

Dhananjay Munde vs Anjali Damania: 'अंजली ताई शेतकरी आहेत की नाही? माहित नाही, पण...'

अजली ताई शेतकरी आहेत की नाही ते मला माहित नाही, पण जो खरा शेतकरी असतो त्याला माहित असतं की शेतीच्या पूर्वी फार मशागत करावी लागते. पेरणी तसेच पेरणी उत्तरकार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सूनपूर्वी तयार करून ठेवाव्या लागतात. म्हणूनच एप्रिल आणि मे महिन्यातील लोकसभेची आचारसंहिता आणि जून महिन्यात सुरु होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन, लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे. शेतकऱ्याला पेरणीच्या आधी लागणाऱ्या गोष्टी त्यानंतर पेरणीनंतर फवारणी कधी करावी लागते त्यादरम्यान काय लागतं काय नाही.. टण कधी काढावा लागतो हे अंजली ताईंना कदाचित माहित नाही... त्यांनी जे आरोप केले त्यात एक आरोप होता नॅनो खताचा... आता आपल्याला सगळ्यांना माहित असेल की, नॅनोच्या खतामध्ये नॅनो फर्टिलाईजर, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, नॅनो एमएपी याबाबतचा सर्वात जास्त प्रोत्साहन देशाचे पंतप्रधान मोदी यांनी मागच्या दोन-तीन वर्षापासून चालू केला आहे. या देशात पहिल्यांदा असं झालं असेल की मोदींनी प्रोत्साहन दिल्यानंतर देशातील 4 लाख शेतकऱ्यांना नॅनो दिला गेला... तसेच नॅनो खताची खरेदी ही इस्को कडून झालेली आहे. जी सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंतर्गत असणारी कंपनी आहे.

अंजली दमानियांनी बदनामी करण्यापेक्षा केलेला आरोप सिद्ध करावा... त्यांना पुन्हा राजकारणात यायचं असल्याने सनसनाटी आरोप... मंत्री धनंजय मुंडेंचा दमानियांवर गंभीर आरोप... मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर सनसनाटी आरोप...सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण...अंजली दमानियांच्या आरोपांवर विश्वास राहिला नाही...धनंजय मुंडेंची टीका...

Dhananjay Munde On 'Anjali Damania: अंजली दमानि यांनी बीड जिल्हा बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न केले; मुंडेंचा आरोप

बीडमध्ये घडलेल्या सरपंच देशमुखांच्या हत्याप्रकरणामुळे संपुर्ण राजकीयवर्तुळात अजून देखील आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. ज्यात अंजली दमानिया आणि सुरेश धस यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यांच्या राजिनाम्याची मागणी केली जात आहे. असं असताना आता मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर अंजली दमानिया यांच्या आरोपांवर पुर्ण विराम लावण्याचा प्रयत्न केला आहे. स्वत:ची प्रसिद्धी यासाठी केलेले हे आरोप आहेत असा पलटवार मंत्री धनंजय मुंडे यांनी केल आहे.

गेले 50 दिवस माझ्यावर खोटे आरोप होत आहेत, आज 59 वा दिवस तरी आहे. माझ्यावर कोण मीडिया ट्रायल करतंय माहिती नाही.. त्यात अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करण्याचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम केल असे अनेक प्रयत्न त्यांनी आतापर्यंत केले. मला एक कळत नाही, त्यांच्या बुद्धीची कीव करावी का? एवढ्या हुशार आहेत त्या, मला त्यांच्याबद्दल आदर आहे... पण, जे आरोपी पकडायचे राहिले आहेत त्यांना सोडून त्या माझ्यावर माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. त्यांनी आरोप केला की, 'देशमुखांच्या आरोपींची हत्या झाली' त्यांचा हा आरोप खोटा ठरला... मला सांगाव त्यांनी आजपर्यंत केलेल्या आरोपांमध्ये एक तरी आरोप खरा ठरला आहे की? त्यांना परत पुन्हा राजकारणात यायचं असेल म्हणून त्या न्यूज वॅल्यू वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे तुम्ही अशे खोटे आणि धादांत आरोप करून नका... मध्येच ऑफिसच्या प्रॉफिटचा विषय काढला, माझ्या ऑफिसच्या प्रॉफिटचा विषय कसा काढू शकतात त्या? असा प्रश्न उपस्थित करून धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधला आहे.

Anjali Damania on Dhananjay Munde: तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली, दमानियांचा मुंडेवर पलटवार

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्या खळबळजनक आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्रीपदाच्या काळात नॅनो युरिआ, नॅनो डीएपी, बॅट्री स्पेअर, मेटाल्डे हाईट आणि कापूस बॅगा यांच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. याचपार्श्वभूमिवर आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांना प्रत्योत्तर दिले आहे. यादरम्यान त्यांनी अंजली दमानिया यांना बदनामिया असं म्हटलं आहे, तसेच त्यांनी अनेक टीका केल्या. यावर आता दमानियांनी मुंडेवर पलटवार केला आहे. तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली असं म्हणत अंजली दमानिया यांनी देखील मुंडेंना प्रत्योत्तर दिलं आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, आता थोड्यावेळापुर्वी धनंजय मुंडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली... जसं सगळेच नेते पत्रकार परिषद घेतात त्याचप्रमाणे धनंजय मुंडेंनी देखील घेतली, ज्यात ते थाटात एका खुर्चीवर एक पांढरा टॉवेल पसरवलेला होता आणि अशा थाटात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली... या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मला वाटतेल ती नावं देखील ठेवली... धनंजय मुंडेंनी मला बदनामिया असं म्हटलं होत, पण खरं तर त्यांनी मला पुरावीया म्हणायला हवं होत...बदनाम लोकांचे पुरावे देत असताना मला त्यांच्याकडून कोणतही नाव आलं तरी मला चालेलं... त्यांना जे म्हणायचं आहे म्हणू देत, मला फरक पडत नाही... त्यांचे एक एक पुरावे बाहेर काढून मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली आहे... जेवढा वेळ तुम्ही कराडसोबत काढला, जर तितका वेळ तुम्ही मंत्री म्हणून काढला असता तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती... मीडिया ट्रायल कोण करत असेल तर त्यांनी मीडियाला विचारावा मला विचारू नये...माझ्याकडेच जे पुरावे असतील तेथे मी यापूर्वी दिलेत आणि पुढेही देणार..

Eknath Shinde: करवाढ, दरवाढ मुक्त मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प! एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा ७४४२७.४१ कोटींचा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी यांनी पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प सादर केला आहे, तर प्रशासकीय राजवटीतील तिसरा अर्थसंकल्प आहे. याचपार्श्वभूमिवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“कुठलीही करवाढ नाही, शुल्कवाढ नाही, भुर्दंडवाढ नाही असा हा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर झाला.... तब्बल 74 हजार 427 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प मुंबईकरांना दिलासा देणारा आहे. हा अर्थसंकल्प ९२४६.६२ कोटींनी जास्त असून आगामी अर्थसंकल्प १४.१९ टक्क्यांनी अधिक आहे. याचा अर्थ मुंबई वेगाने कात टाकत आहे तसेच वेगाने काम करत आहे. मला आजही आठवतय, मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी आणि देवेंद्र फडणवीसांनी मुंबईकरांचा खड्डेमुक्त प्रवास बंद करण्याच्या निर्णय घेतला.. आणि आम्ही दोन टप्प्यात मुंबईच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण केले... जनतेचा पैसा कोणाच्या खिशात आणि घशात गेला हे सगळ्यांना माहित आहे, सिमेंट आणि काँक्रिटीच काम सुरू आहे.. खड्डेमुक्त मुंबई होईल पण भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न केला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तसेच, अर्थसंकल्पात 43 हजार कोटी विकासकामांवर खर्च होणार आहे. त्यावरून मुंबईचा विकास राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने किती गांभीर्याने घेतला आहे, हे दिसून येते. भांडवली खर्चातली ही वाढ विक्रमी आहे... बेस्टसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील पर्यटनाला चालना देतानाच इथला प्रवास वेगवान करण्यावरही भर देण्यात आलेला आहे. प्रदुषणमुक्त, खड्डेमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई हा दिलेला शब्द खरा करून दाखवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात ग्लोबल मुंबई ही देशाचे फिनटेक कॅपिटल म्हणून आकाराला येत आहे. जगाच्या नकाशावर मुंबई दिमाखाने तळपताना दिसेल, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

Supriya Sule: महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, सुळे यांची मागणी

लोकसभेत आज झालेल्या प्रश्नोत्तराच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरलेल्या पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणाबाबत प्रश्न विचारला. पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्र्यानी आज लोकसभेत दिले. सत्ताधारी असलेल्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा तब्बल 5 हजार कोटींचा असल्याचा दावा केला. इतकेच नाही, तर महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली. हा प्रकार अत्यंत गंभीर असून राज्यातील हजारो लाखो शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाचा अपहार झाल्याची कबुली खुद्द सरकारनेच दिली आहे. राज्य शासनाच्या या कबुलीबाबत केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते का? आणि या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश आपण देणार का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान कृषी मंत्र्यांनी पीक विमा योजनेत 500 कोटींच्या घोटाळ्याची कबुली राज्याला दिली. यावर सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी हा घोटाळा 500 ऐवजी 5 हजार कोटींचा असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून तुम्हाला याबद्दल माहित होते का? मी तुम्हाला विनंती करते तुम्ही हो किंवा नाही यामध्ये उत्तर द्यावे आणि जर तुम्हाला याबद्दल काही माहित नसेल, तर घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देऊन यावर योग्य ती कारवाई तुम्ही करणार का? असा प्रश्न सुप्रियाताई सुळे यांनी मांडला.

Ashok Dhodi: अशोक धोडी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; 16 दिवसानंतर फरार आरोपींची कार पोलिसांच्या ताब्यात

https://youtu.be/geCjEsRtEzA

अशोक धोडी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना नेते अशोक धोडी हत्या प्रकरणातील कार सापडली आहे. 16 दिवसानंतर फरार आरोपींची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणी, फरार आरोपींनी राजस्थानकडे पळून जाण्यात वापरलेली स्कार्पिओ गाडी पालघर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मध्यरात्रीच्या सुमारास राजस्थानच्या पाली येथून पालघर पोलिसांनी गाडी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अशोक धोडी यांच्या हत्येनंतर फरार आरोपींनी राजस्थान कडे जाण्यासाठी स्कार्पिओ गाडीचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे.

Shivsena Kokan: कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; वैभव नाईक, स्नेहा नाईक यांना एसीबीची नोटीस

कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, वैभव नाईक आणि स्नेहा नाईक यांना एसीबीची नोटीस आलेली आहे. राजन साळवी देखील ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत, त्यामुळे जर राजन साळवी यांनी ठाकरेंची शिवसेना सोडली तर शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

याचपार्श्वभूमिवर वैभल नाईक म्हणाले की, जनसामान्यामध्ये ज्याप्रकारे लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे... आज एका पक्षामध्ये आपण गद्दारी केली म्हणून दुसऱ्यावर वेळेला सुद्धा गद्दारी करण्यासाठी दबाव आणणे प्रवृत्त करणे, यामध्ये जनतेचं काही हित नाही... आज आपण बघितलं तर 96 हजार पेक्षा जास्त कोटींची ध्येय आज ठेकेदार आणि इतर लोकांकडे आहेत. त्यामुळे आज सगळी विकासाची काम ठप्प आहेत. या संदर्भात तुम्ही काही तरी बोललं पाहिजे, निवडणूकीच्या वेळेस तुम्ही जी आश्वासन दिली ती आश्वासन कशी पुर्ण करणार याकडे बघितलं पाहिजे... आणि ऑपरेशन टायगर पेक्षा ऑपरेशन गद्दारी असं नाव त्याला दिलं पाहिजे, असा खोचक टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.

News Planet With Vishal Patil: आणखी एका संरक्षक भिंतीचा घोटाळा उघड, LOKशाहीकडून मोठा पर्दाफाश

लोकशाही मराठी सातत्यानं मुंबईतील संरक्षक भिंतींचा घोटाळा उघड करत आहे... आणखी एक घोटाळा लोकशाहीनं उघड केलाय.... बोरिवलीच्या एक्सर डोंगरी भागात मुंबई झोपडपट्टी विकास मंडळानं अनेक ठिकाणी संरक्षक भिंती बांधल्याचा दावा केला, मात्र सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे... लोकशाहीच्या टीमनं बोरिवलीच्या एक्सर डोंगरी भागामध्ये सत्य परिस्थिती तपासली, तसंच त्याठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांसोबतही चर्चा केली मात्र नव्यानं या भागात कोणतीही संरक्षक भिंत बांधण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं.... ज्या भिंतींचं काम झालंय त्या पाच ते सहा वर्षांआधीच बांधण्यात आल्या होत्या.. कागदावर या भिंती बांधण्यात आल्याचं दाखवून कोट्यवधी रुपये लाटण्याचं काम मुंबई झोपडपट्टी विकास मंडळाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. केवळ बोरिवली एक्सर डोंगरी विभागात 2013-14 पासून आतापर्यंत जवळपास 14 कोटींच्या संरक्षक भिंती बांधल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं मात्र या भिंती नव्यानं बांधण्यात आलेल्या नाहीत.. सातत्यानं त्याच-त्याच भिंती बांधल्याचं दाखवून अधिकाऱ्यांनी पैसे बळकावल्याचं समोर येतंय....

Sanjeevraje Naik Nimbalkar: संजीवराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयकर विभागाची छापेमारी

https://www.lokshahi.com/news/income-tax-department-raids-sanjeevraje-nimbalkars-house

रामराजे निंबाळकर यांच्या संदर्भात एक महत्त्लाची बातमी समोर आली आहे. रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्या फलटण आणि पुणे येथील निवासस्थानी आज इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांचे छापे पडले आहेत. इन्कमटॅक्स विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. आज सकाळी ६ वाजता इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू आहे. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यासह त्यांच्या गोविंद मिल्क दूध डेअरी या प्रकल्पवर ही आयकर विभागाचे पथक चौकशी करत आहे. विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार याबाबत चौकशी अधिकारी यांच्याकडून सुरू आहे. आयकर विभागाच्या छाप्यांनंतर संजीवराजे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून या कारवाईवर फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आयकर विभागाच्या कारवाईचा चव्हाण यांनी निषेध केला असून राजकीय आकस बाळगून हि कारवाई होत असल्याचा आरोप माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केला आहे.

Shambhuraj Desai On sanjay Raut: संजय राऊत लवकरचं वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाणार

https://www.lokshahi.com/video/shambhuraj-desai-on-sanjay-raut-3

शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातील खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील नेत्यांवर खोचक टोला लगावला होता. संजय राऊत म्हणाले की, मंत्रिमंडळ म्हणजे वेड्यांचा बाजार आहे. संजय राऊतांनी केलेल्या या टोल्यावर प्रत्युत्तर देत असताना शंभुराज देसाई म्हणाले की, त्यांना आता फेस रिडिंग वैगरे येत का.. मी मागे म्हणालं होत चुकीची चिठ्ठी काढणार कोपट, तसंच आता चुकीचं फेस रिडिंग करणारा कुडमुड्या जोशी खेडेगावात असतो... तो त्याचं डुमडुम वाजवत येतो आणि चेहरा बघून भविष्य सांगणार असं बोलत फिरतो आणि ह्याच्या त्याच्या मनातलं सांगत फिरतो... ते सगळं खोट असत... तसंच हे संजय राऊत पण खोटे चेहरे वाचायला लागले आहेत. आता ते चिठ्ठी काढायचे बंद झालेत, आता त्यांना चेहऱ्यावरून समजतं कोण वेडा आहे, कोण शाहणा आहे... संजय राऊतांना आता थोड्या दिवसांनी प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यामध्ये एक मेंल हॉस्पिटल आहे, त्या मेंल हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड बुक करुन ठेवा... कारण तिथे संजय राऊतांना लवकरचं भरती कराव लागणार आहे... त्यांना आता दिवा स्वप्न पडायला लागले आहेत, हळूहळू ठाण्यातील मेंल हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या वाटेवर संजय राऊत आहेत

Pankaja Munde: बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही - पंकजा मुंडे

बीडच्या आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील साठवण तलावाची पाहणी तसेच शिंपोरा ते खुंटेफळ पाईप लाईन बोगदा कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर थेट जनतेतील कार्यक्रमाचा मान आष्टीला मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आष्टीतील नागरिक मोठ्या संख्येने खुंटेफळकडे गेल्याने आष्टी शहर बंद ठेवण्यात आले, प्रकल्पामुळे 28 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे. यावेळी पंकजा मुंडे देखील उपस्थित राहिल्या आहेत. याचपार्श्वभूमिवर पंकजा मुंडे म्हणाल्या की,

देवेंद्रजी तुम्हाला जेव्हा सीएम म्हणून हे सगळे लोक बाहुबली म्हणतात.. खरं तर तुम्ही आमच्या पेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात, आणि आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो.. त्या कॅबिनेटचे तुम्ही प्रमुख आहात.... तुमच्या विषयी आदरभाव हा नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतो आहे... कारण, ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षापूर्वी मला शिवगामी म्हणत होते....कारण, शिवगामी ही बाहुबलीची आई आहे... त्यामुळे तुम्हाला बघताना मला आज वेगळाच भाव आला.... शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस तुम्ही जसे पिक्चर म्हणता, आम्हीही पिक्चरचे वाक्य म्हणतो.... शिवगामीणीचं वाक्य असतं, मेरा वचनही है मेरा शासन, आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिल आहे तेच माझं शासन आहे.... मी गोपिनाथ मुंडेंची लेक आहे, बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही... , असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Arvind Kejriwal: हरियाणा सरकारवर केलेल्या टीकेविरोधात अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल!

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. दिल्ली विधानसभेसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज दिल्लीत निवडणुका होत आहेत. दिल्लीच्या निवडणुकांमध्ये यमुनेच्या विषारी पाण्याचा मुद्दा रंगला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हरियाणात गुन्हा दाखल झाला आहे.हिंदुंच्या धार्मिक भावना भडकावल्याचा केजरीवाल यांच्यावर आरोप केला गेला आहे. 2 राज्यांतील चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. यमुनेच्या विषारी पाण्याचावरुन केजरीवालांनी टीका केली होती. हरियाणा सरकारवर केलेल्या टिके विरोधात हरियाणाच्या मंत्र्यांनी कुरुक्षेत्र जिल्ह्यातल्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Crime: नाशिकमधील धक्कादायक प्रकार! मुलीच्या प्रेमविवाहाचा राग अनावर, अन् पूढे जे घडलं ते...

https://www.lokshahi.com/lokshahi-crime/murder-in-anger-over-love-marriage-of-girl

पत्नीच्या डोक्यात आधी कुकर मारून आणि नंतर कोयत्याने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी पत्नीच्या डोक्यात आधी कुकर मारून आणि नंतर कोयत्याने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक मध्ये घडली आहे गंगापूर रोडच्या प्रमोदनगर मध्ये सविता गोरे या महिलेचा यात मृत्यू झालाय.. आई-वडिलांची संमती नसताना मुलीने त्यांच्या विरोधात जात लग्न केले. याचा राग काही दिवसांपासून छत्रगुण गोरे यांच्या डोक्यात होता याच कारणातून ते नेहमीच त्यांच्या पत्नी सविता गोरे यांच्यासोबत भांडण करत असत. मंगळवारी त्यांना राग अनावर झाला आणि त्यांच्यात जोरदार भांडण झाले आणि त्यांनी सविता गोरे यांच्या डोक्यात कुकर टाकला याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पतीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहे.

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक याचिका दाखल

https://www.lokshahi.com/video/election-petition-filed-against-dhananjay-munde

मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध राजाभाऊ श्रीराम फड यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण आर. पेडणेकर यांनी प्रतिवादींसह मंत्री धनंजय मुंडे आणि इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या निवडणूक याचिकेवर 20 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Shantanu Naidu: शंतनू नायडूा नवा प्रवास सुरू! टाटा ग्रुपने सोपवली मोठी जबाबदारी

https://www.lokshahi.com/news/shantanu-naidus-new-journey-begins-tata-group-entrusts-him-with-a-big-responsibility

भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे विश्वासू सहाय्यक शंतनू नायडू याच्याशी त्यांच्या जवळच्या संबंधांनी लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या १० वर्षात शंतनू नायडू हा रतन टाटा यांचा जवळचा आणि विश्वासू मित्र बनला. शंतनूवर नुकतीच एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शांतनु आता टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर अँड स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्सचा प्रमुख बनला आहे. शांतनुला मिळालेल्या या मोठ्या जबाबदारीच्या पार्श्वभूमिवर त्याने आनंदी आणि भावूक होत एक पोस्ट शेअर केली आहे.

शंतनू पोस्ट करत म्हणाला की, टाटा मोटर्समध्ये स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज हेड - जनरल मॅनेजर म्हणून मी नवीन पदावरुन प्रवास सुरू करत आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे! नोटिफिकेशन्स मिरेसाजेस्ट मला आठवतं जेव्हा माझे वडील टाटा मोटर्स प्लांटमधून, पांढरा शर्ट आणि नेव्ही पॅन्ट घालून घरी जायचे आणि मी खिडकीत त्यांची वाट पहात असे. ते आता पूर्ण वर्तुळात येते...

शंतनूबद्दल आणखी जाणून घ्या..

वयाच्या २८ व्या वर्षी शंतनू नायडू यांनी व्यवसाय उद्योगात पाऊल ठेवले होते. शंतनू नायडू रतन टाटा यांना स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी बिझनेस टिप्स देत होते. शंतनू नायडू यांचा जन्म १९९३ मध्ये पुणे, महाराष्ट्र येथे झाला. ते प्रसिद्ध भारतीय उद्योगपती, अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, डीजीएम, सोशल मीडिया प्रभावकार, लेखक आणि उद्योजक आहेत. टाटा ट्रस्टचे डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून शंतनू नायडू हे देशभरात खूप लोकप्रिय आहेत.

Manoj Janrage Patil: "आरक्षण द्यायला जमत नसेल तर आता रस्त्यावर उतरू" जरांगेचा सरकारला थेट इशारा!

सरकारला आरक्षण द्यायला जमत नसेल तर आता रस्त्यावर उतरणार असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दौरा करणार असून लोकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचंही जरांगे बोलले. तसेच आता यापुढे मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यत गाठी भेटी नियोजन करणार,राज्यातील प्रत्येक गावातील अडचण आम्हाला समजायला हवी. थेट छत्रपती भवनाला जोडणार, आम्हाला लोकांना जोडायच आहे.22मार्च पर्यत आम्हाला भेटण्यासाठी या... एक महिन्याच्या कालावधीत कधीही आम्हाला भेटण्यासाठी या... तुमच्या अडचणी सोडवू.... प्रत्येकाची अडचण छत्रपती भवनातून सोडवू.... आम्ही लोकांच्या कामात हातभार लावू...

Shivneri Fort: शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन

https://www.lokshahi.com/news/hindavi-swarajya-festival-organized-at-shivneri-fort-on-the-occasion-of-shivajis-birth-anniversary

शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन हे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरी किल्ल्यावर १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान महोत्सवाचे आयोजन होणार आहे. महोत्सवासाठी ४.९१ कोटी रुपयांच्या निधीसाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची ओळख करुन देणे, तसेच राज्यातील गडकिल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण करुन देश-विदेशातील पर्यटकांना राज्यात आकर्षित करण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्याचे उद्देश आहे.

Trolley Bag Yojana: राज्यात आणखी एक योजना बंद, आमदारांना वाटप करण्यात येणाऱ्या ट्रॉलीबॅगची योजना बंद

https://youtu.be/CD4g99eSbzw

राज्याच्या तिजोरीतील खडखडाट पाहता आणखी एक योजना बंद होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदारांना वाटप करण्यात येणाऱ्या ट्रॉलीबॅगची योजना बंद करण्यात येणार आहे. आमदारांना 886 लगेज ट्रॉलीबॅग देण्याची योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी 81.92 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, आता कामकाज पेपरलेस झाल्याने ट्रॉलीबॅग ऐवजी ब्रिफकेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्प आणि इतर कागदपत्र पेन ड्राइव मधून देत असल्याने मोठ्या ट्रॉलीबॅकची गरज नसण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका आहे.

Sanjay Raut: सरकारला गोरगरिबांना अन्न देणं परवडत नाही; राऊतांची सरकारवर टीका

https://youtu.be/ovrzrAAL0M0

राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्याने अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. शिवभोजन थाळीसह इतर योजना बंद करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.. जवळपास एक लाख कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी अनेक योजना बंद कराव्या लागणार आहेत. आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या विभागानिहाय बैठकामध्ये या योजना बंद करायच्या का याची ही चाचपणी सुरु आहे.

शिवभोजन थाळी बंद करू नये असं माजी मंत्री छगन भुजबळ यांचकडून मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले. शिव भोजन थाळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात सुरू केली होती. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर सरकारच्या तिजोरीवर भार वाढल्याने या योजना बंद करायच्या का याची चाचपणी राज्य सरकारकडून सुरु आहे. अर्थसंकल्पाच्या आधी यावरती निर्णय घेण्यासाठी सरकारच्याही हालचाली सुरु आहेत.

याचपार्श्वभूमिवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया आहे म्हणाले की, शिवभोजन थाळी ही आधीच्या सरकारनं गोर-गरीब जनतेसाठी सुरु केली होती.. पण आताच्या सरकारला गोरगरिबांना अन्न देणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात याचा उपयोग नाही आहे... पण छगन भुजबळ यांनी हा विषय मांडला आहे आणि आम्ही त्यांच्या मागे उभे राहू, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Hasan Mushrif: लाडकी बहीण योजना बंद होणार? हसन मुश्रीफ म्हणाले 'फसवणूक कशी?'

राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्याने अनेक योजना बंद करणार अशा चर्चा सुरु आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत लोकप्रिय योजना जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात त्यांच सरकार असताना कोविड काळात सुरु केली होती. ती योजना म्हणजे शिवभोजन थाळी ही योजना बंद केल्याच्या निर्णयावर माजी मंत्री छगन भुजबळ यांचकडून मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले ज्यात शिवभोजन थाळी बंद करू नये अशी विनंती करण्यात आली, त्यांच्या भूमिकेला संजय राऊत यांनी पाठिंबा दिल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेमधून समोर आलं. तसेच आता लाडक्या बहिणीला फसवणार नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. याचपार्श्वभूमिवर हसन मुश्रीफ म्हणाले की, लाडक्या बहिणीची फसवणूक कशी होणार? लाडक्या बहिणीसाठी शासनाने निर्णय जो घेतलेला आहे त्याप्रमाणेच अंमलबजावणी सुरू राहणार... आम्ही आता त्यांना 2100 पण देणार आहोत.... लाडक्या बहिणींना फसवणार नाही आम्ही... आमच्या त्या लाडक्या बहिणी आहेत... तसेच दिल्लीमध्ये जी निवडणुक सुरु आहे त्या पार्श्वभूमिवर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, वस्तुस्थिती आहे ती तिथे भाजपची सत्ता येईल

Karuna Sharma Vs Dhananjay Munde: माझं काही बरं वाईट झालं तर..., करुणा शर्माच धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज!

बीड जिल्ह्यातील आघाडीचे नेते धनंजय मुंडे हे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. मात्र, आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा शर्मा यांनी त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप दाखल केला होता. या प्रकरणाची न्यायालयात चौकशी देखील सुरु होती. या प्रकरणाचा निकाल आता समोर आला आहे. धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा शर्मा यांनी केलेल्या घरगुती हिंसाचाराप्रकरणी वांद्रे कौटुंबिक न्यायालया धनंजय मुंडेंना दोषी ठरवले आहे. तसेच त्यांनी करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपयांची पोटगी देण्यात यावी असे आदेशदेखील दिले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. याचपार्श्वभूमिवर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज दिलं आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या की, माझ्या मुलांसोबत माझ्या नवऱ्याचे संबंध चांगले आहेत, माझ्यासोबत पण चांगले होते...पण जे काही आमच्यामध्ये काही लोकांनी वाद केला त्याच्यामुळे आज एवढी मोठी चर्चा होत आहे.. पण, आज जे काही माझ्या मुलाने सांगितलेलं आहे तो त्रास त्यांना कुठे ना कुठे होत आहे... माझा मुलगा ज्या तणावाखाली आहे ती गोष्ट माझ्या नवऱ्याला कळत नाही आहे... अजून तरी मी धनंजय मुंडेंची पोल खोललेली नाही, तर या लोकांनी माझ्या मुलाला प्रेशर दिला की हे बोल ते बोल... त्यामुळे त्याने पोस्ट वैगरे टाकली.. माझी मुलं खुप सहन करत आहेत, आईला दोन वेळा जेलमध्ये टाकणं, मारहाण करण हे सगळं त्यांनी पाहिलेलं आहे.. मला कोणाची हरामची कमाई खायची नाही, मला कोर्टाने 50 करोडची पोटगी दिली होती, पण मी ती नाकारली... मी 15 लाख मागितलेले पण मला 2 लाख पोटगी दिली जाणार आहे... पण ती माझ्या हक्काची रक्कम आहे... अजून तरी मी कोणाबद्दल काही सांगितलेलं नाही पण, माझ्या मुलांना माझ्या विरोधात केलं तर मी सगळ्यांच सगळं बाहेर काढणार... कोणाकडे दलाली करून 25 हजारची प्रॉपर्टी आहे, धनंजय मुंडेंना जर मुलं हवी आहेत, तर त्यांनी घेऊन जाव.. आजचं घएऊन जाव..

त्यांचे ज्या काही गोष्टी मला माहित आहेत त्या सगळ्या गोष्टी मी बाहेर काढणार, माझ्या बहिणीसोबत जे झालं ते अजून तिने कोणाला सांगितलेलं नाही आहे... माझ्या मुलांना धनंजय मुंडे घेऊन गेले तर मी बघेन त्यांना...धनंजय मुंडेनी माझ्यासोबत मारहाण केली तेव्हा मी त्यांची पोलिसांकडे तक्रार केली, त्यावेळी पोलिस त्यांच्या विरोधात नाही गेले तर मुलं कशी जातील... जर राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत तर काय बोलणार...

सदावर्ते माझ्यासाठी वकिल नाही.. धनंजय मुंडेंनी माझ्या आईला विष खाण्यासाठी प्रवृत्त केलं होत... धनंजय मुंडे तेव्हाच शांत होईल जेव्हा मी पण विष घेऊन मरुन जाईन... आणि मी आज माध्यमांसमोर बोलते उद्या जर का माझ्यासोबत काही बरं वाईट झालं, तर त्याचा जिम्मेदार राज घनवट, पुरषोत्तम केंद्र, वाल्मिक कराड, तेजस ठक्कर आणि धनंजय मुंडे हे तिघ असतील... आणि त्यांच्यासोबत राजश्री मुंडे या देखील माझ्या आत्महत्येला जबाबदार असतील... या सगळ्यांना फाशीची शिक्षा द्या.. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तुम्ही पाहिल असेल की, एका आरोपीला देखील व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते...

Karuna Munde on Dhananjay Munde: घेऊन जा मुलांना, मग बघा मी कशी लढते, करुणा मुंडेंना इशारा

...तर मी त्यांच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणार- करुणा शर्मा

मला कोणाची हरामची कमाई खायची नाही, मला कोर्टाने 50 करोडची पोटगी दिली होती, पण मी ती नाकारली... मी 15 लाख मागितलेले पण मला 2 लाख पोटगी दिली जाणार आहे... पण ती माझ्या हक्काची रक्कम आहे... अजून तरी मी कोणाबद्दल काही सांगितलेलं नाही पण, माझ्या मुलांना माझ्या विरोधात केलं तर मी सगळ्यांच सगळं बाहेर काढणार... कोणाकडे दलाली करून 25 कोटींची प्रॉपर्टी आहे, धनंजय मुंडेंना जर मुलं हवी आहेत, तर त्यांनी घेऊन जाव.. आजचं घेऊन जाव.. त्यांचे ज्या काही गोष्टी मला माहित आहेत त्या सगळ्या गोष्टी मी बाहेर काढणार, माझ्या बहिणीसोबत जे झालं ते अजून तिने कोणाला सांगितलेलं नाही आहे... त्यांचे ज्या काही गोष्टी मला माहित आहेत त्या सगळ्या गोष्टी मी बाहेर काढणार, माझ्या बहिणीसोबत जे झालं ते अजून तिने कोणाला सांगितलेलं नाही आहे... माझ्या मुलांना धनंजय मुंडे घेऊन गेले तर मी बघेन त्यांना...धनंजय मुंडेनी माझ्यासोबत मारहाण केली तेव्हा मी त्यांची पोलिसांकडे तक्रार केली, त्यावेळी पोलिस त्यांच्या विरोधात नाही गेले तर मुलं कशी जातील... जर राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत तर काय बोलणार...

Anjali Damania: अंजली दमानिया यांच्याकडून करुणा मुंडे यांचे अभिनंदन; घरगुती हिंसाचारप्रकरणी धनंजय मुंडे दोषी

बीड जिल्ह्यातील आघाडीचे नेते धनंजय मुंडे हे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. मात्र, आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा शर्मा यांनी त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप दाखल केला होता. घरगुती हिंसाचारप्रकरणी धनंजय मुंडे दोषी ठरले आहेत. धनंजय मुंडेंच्या याचं प्रकरणात दमानियांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानियांकडून करुणा शर्मा यांचं अभिनंदन केलं आहे.

करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत

मायदेशी परतलेल्या स्थलांतरितांची चौकशी

अमेरिकेच्या लष्करी विमानाने अमृतसरमध्ये दाखल

अमेरिकेतून 104 बेकायदा भारतीय अमृतसरमध्ये दाखल

महाराष्ट्रातील 3 जणांचा समावेश

मायदेशी परतलेल्या स्थलांतरितांची चौकशी

PM modi America Visit: अमेरिकेतून 104 बेकायदा भारतीय मायदेशी परतले, महाराष्ट्रातील 3 जणांचा समावेश

पीएम मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार

अमेरिकेतून 104 बेकायदा स्थलांतरितांची भारतामध्ये पाठवणी करण्यात आली आहे. बुधवारी अमेरिकेच्या लष्करी विमानाने अमृतसरच्या श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणून सोडल आहे. या स्थलांतरित लोकांमध्ये 30 पंजाबचे, हरियाणा तसेच 33 गुजरातचे आणि उत्तर प्रदेश तसेच चंडीगडचे 2 ते 3 स्थलांतरित आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या भेटीत स्थलांतरितांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

Pune GBS Outbreak: पुण्यात GBS च्या संशयित रुग्णांची संख्या 170 वर, 5 जणांचा मृत्यू

पुणे शहारत गेल्या काही दिवसांपासून जीबीएस या आजाराचे रुग्ण हे वाढत आहे.शहरात या आजाराचे १४९ संशयित रुग्ण आढळून आले होते. आता पुण्यात GBSच्या संशयित रुग्णांची संख्या 170वर पोहचली आहे. ज्यामध्ये 170 पैकी 132 रुग्णांचं GBSबाधित म्हणून निदान झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 33 पुणे पालिका हद्दीतील तर 86 रुग्ण पुणे उपनगरातील आहेत. तसेच पिंपरी चिंचवड मधील 20 रुग्ण आणि पुणे ग्रामीणमधील 21 रुग्णांचा समावेश आहे. त्याचसोबत 8 रुग्ण इतर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली असून यातील 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये 62 रुग्ण ICU मध्ये आहेत व 20 रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत. या पार्श्वभूमीवर आता ससून रुग्णालय आणि महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय येथेही उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहरात चिंतेचा वातावरण निर्माण झालं आहे.

News Planet With Vishal Patil: मुंडे 'चक्रव्युहात'! माझं बरं वाईट झालं तर..., करुणा मुंडे रडल्या

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सातत्याने चर्चेत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना आता मोठा झटका बसला. त्यांच्याविरोधात करुणा मुंडे यांनी केलेले आरोप कौटुंबिक न्यायालयाने मान्य करत त्यांना पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात मुंडे यांच्यावरील आरोप कोर्टाने मान्य केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. करुणा मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत धनंजय मुंडे यांच्याविरोधात वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी दरमहा 15 लाख रुपयांची पोटगी मुंडे यांनी द्यावी, अशी मागणी केली होती. कोर्टामध्ये सुरूवातील करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत का, यावर युक्तीवाद झाला. हा युक्तीवाद कोर्टाने मान्य केला आहे.

निकालचे मुद्दे

कोर्टाने करुणा मुंडे यांना दरमहा 1 लाख 75 हजार आणि त्यांच्या मुलीला 75 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आलेला 25 हजार रुपयांचा खर्च देण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केलेेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत.

कोर्टाच्या निकालावर मीडियाशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, एका मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीविरोधात ही लढाई होती. मी खूप सोसले आहे. मी 1996 पासून त्यांच्यासोबत आहे. माझ्या कुटुंबासाठी 15 लाख रुपये पोटगी मागितली होती. त्यासाठी हायकोर्टात जाणार आहे. मीच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी होती. माझे उत्पन्न काही नाही. माझ्या नवऱ्याने जी गाडी दिली होती, ती माझ्याकडून घेऊन त्यांच्या वकिलाला दिली. येरवडा, बीड कारागृहात मला डांबण्यात आले होते. गाडीत रिव्हॉल्वर ठेवण्यात आले होते.

मुंबईत आढळला जी बी एसचा पहिला रुग्ण

Mumbai Guillain-Barré Syndrome: मुंबईकरांची चिंता वाढली, मुंबईत आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण

मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एका पुरुषाला दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच गुडलेन बॅरे सिंड्रोम जीबीएस आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहणारा हा व्यक्ती असून त्याच्यावर महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंधेरी पूर्व परिसरात जीबीएस चा पहिला रुग्ण आढळला मुळे स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी 50 विशेष बेड राखीव ठेवण्याची सूचना केली शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.

Sanjay Dina Patil: पत्रकार परिषदेला अनुपस्थित का? संजय दिना पाटील यांची 'लोकशाही'ला Exclusive माहिती

मी उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचा खुलासा खासदार संजय दिना पाटील यांनी केला आहे. अरविंद सावंतांच्या दिल्लीतील घरी झालेल्या पत्रकार परिषदेला संजय दिना पाटील दिसले नाही. त्यांना लोकशाही मराठीने संपर्क केला असता त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर संजय दिना पाटील घरगुती विवाहसोहळ्यासाठी मुंबईला गेले होते, आणि दिल्लीत पोहोचताच अरविंद सावंतांची भेट घेणार असल्याचं त्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलं आहे. तसेच आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Sanjay Raut: "हातात बेड्या घालून परदेशी नागरिकांना पाठवलं जात नाही" संजय राऊतांचा सरकारवर आरोप!

https://www.lokshahi.com/news/sanjay-rauts-accusations-against-the-government२८

बुधवारी अमेरिकेच्या लष्करी विमानाने अमृतसरच्या श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर, अमेरिकेतून 104 बेकायदा भारतीय स्थलांतरितांची पाठवणी करण्यात आली आहे. या स्थलांतरित लोकांमध्ये 30 पंजाबचे, हरियाणा तसेच 33 गुजरातचे आणि उत्तर प्रदेश तसेच चंडीगडचे 2 ते 3 स्थलांतरित आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या भेटीत स्थलांतरितांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. याचपार्श्वभूमिवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, एवढा महानदेश आणि या देशाचे महान पंतप्रधान त्यांना अमेरिकेसमोर शरणांगति पत्कारावी लागली. भारताची इज्जत काय हे अमेरिकेनं दाखवून दिलं आहे. टिपोर्ट करणाऱ्या भारतीयांना अमानूष वागणूक दिली गेली. भारताच्या हद्दीतही भारतीयांना बेड्या लावणं हे गंभीर आहे. भारतीयांना हातात बेड्या घालून अतिरेक्यासारखं मायदेशी पाठवण्यात आलं. नरेंद्र मोदींचं हे मोठं अपयश आहे. ऑपरेशन रेड्याची शिंग झाली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस रोज त्यांचं ऑपरेशन करत आहेत आणि रोज त्यांचा अपमान होतो आहे.

Arvind Sawant On BJP: भाजपला फक्त सत्ता हवी, हिंदुत्व महत्वाचं नाही", अरविंद सावंत यांचा भाजपला खोचक टोला !

राज्यात राजकीयवर्तुळात मोठा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरु असताना, आता शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यादरम्यान शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. आमची माणस फुटणार अशी मुद्दम ठिणगी पेटवली गेली, पण आमची वज्रमूठ आहे टायगर अभी जिंदा है असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, सकाळपासून अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. मुळात ज्यांच्यामध्ये एकमत नाही, ज्यांची स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली आहे, सुसंवाद नाही, सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा त्यांच्याच रोज नवीन बातम्या आहेत. अनेक मंत्री गटाकड्या खात आहेत. अशावेळेला या सगळ्या बातम्या सातत्याने येत असताना, कुठे तरी त्यांच्यावर दुर्लक्ष करायला लावायचं म्हणून कुणी तरी हा मुद्दाम केलेला डाव आहे. म्हणून, आम्ही आज एकत्र सगळे आलो आणि हे दाखवण्यासाठी आलो की आमची वज्रमूठ आहे, टायगर अभी जिंदा है... उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं नाही. आमचं हिंदुत्व हे ढोंगी नाही. आमचं हिंदुत्व या राष्ट्रासाठी आहे, जो या राष्ट्रासाठी आपलं प्राण पण पणाला लावू शकतो तो आमच्यासाठी हिंदू आहे.. भाजपला फक्त सत्ता हवी, हिंदुत्व महत्वाचं नाही...

Pankaja Munde: "..तर या जिल्ह्याला आणखी खड्ड्यात घालाल" पंकजा मुंडे पत्रकारांसोबत बोलताना संतापल्या

पंकजा मुंडे माध्यांशी बोलताना म्हणाल्या की, पर्यावरण मंत्री म्हणून आणि संपर्क मंत्री म्हणून मला कोणतीही बंधन नाही की मी कोणत्याही क्षेत्राची बैठक घ्यावी. काही गोष्टी विषयी माझा स्वतःचा आक्षेप होता म्हणजे, प्रदूषणाचा आक्षेप... काही बातम्या आल्या त्यानुसार राखेंचं प्रदूषण, वाळूचा अवैध्य उपसाह हा थांबवण्याचा आदेश मी दिला आहे.. राखेचं ट्रान्सपोर्ट कोण कसं करतो हा आमचा विषय नाही, पण जी राख नेली जाते ती बंद कंटेंनरमधून नेली पाहिजे.. पोलिस घाबरतात या सगळ्याविषयी कारवाई करायला पण, मी त्यांना सरळ बोलले आहे की जे कोणी नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच पंकजा मुंडे म्हणाल्या की, पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही मला आणखी काही विचारणार असाल, तर तुम्ही या जिल्ह्याला आणखी खड्ड्यात घालाल.

Aditi Tatkare: "अपात्र महिलांना लाडक्या बहीण योजनेतून वगळणार" मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती

लाडकी बहिण योजनेबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. अशातच राज्य सरकार लाडक्या बहि‍णींना दिलेली रक्कम परत घेणार का? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला. मात्र अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत तसेच शासनानं कुठलाही लाभ परत घेतला नाही, असं स्पष्टीकरण महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं होतं. असं असताना आता महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करत २८ जून आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार अशी माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांच ट्वीट काय?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !

दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे.

अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - २,३०,०००

वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला - १,१०,०००

कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - १,६०,०००

एकुण अपात्र महिला - ५,००,०००

सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे !

Crossfire With Karuna Munde: "आका वाल्मीक, वाल्मीकचा आका धनंजय मुंडे"- करुणा मुंडे

करुणा मुंडे यांनी आज लोकशाही मराठीला भेट दिली होती आणि त्या दरम्यान त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुरेश धस यांनी आका आणि आकाचा आका असे उल्लेख केले होते. त्यावर आता करुणा मुंडेंनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, आका म्हणजे वाल्मिक कराड आणि "बाप तो बाप रहेगा" आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे, ज्यांच्या सांगण्यावर हे सगळ सुरु आहे... कोट्यवधी रुपये हे सभा आणि अभिनेत्रींवर खर्च करतात, कुठुन येत हे... हे आका लोकं तर त्यांना जमवून देतात... आणि हे आका फक्त एकचं नाही आहेत, पुण्याचा आका वेगळा आहे, सांगलीचा आका वेगळा आहे, हे सगळे भु-माफिया आहेत...

तसेचं पुढे करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडेंची सवय आहे ते स्वतः नाही बोलतं, त्यांनी बोलायला पण लोकं ठेवलेली आहेत... तुम्ही काल पाहिलं असेल की, सदावर्तेंनी माझ्यावर प्रतिक्रिया दिली होती... ते माझ्या माणसांना बोलले की, मी लोकांसोबत बोलायचे पण पैसे घेतो... म्हणजे, समजून जा की धनंजय मुंडेंसाठी किती पैसे घेतले असतील.. ते माझे किंवा माझ्या पतीचे कोणाचे ही वकील नाही, मगं ते आमच्या दोघांमध्ये का बोलत आहेत...

Crossfire With Karuna Munde: "बलात्कारी मंत्री बनू शकतो तर, मी का नाही?": करूणांचा कोणावर निशाणा ?

करुणा मुंडे यांनी आज लोकशाही मराठीला भेट दिली होती. करुणा मुंडे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुरेश धस यांनी आका आणि आकाचा आका असे उल्लेख केले होते. करुणा मुंडे यांनी आका हा वाल्मिक कराड असून आकाचा आका धनंजय मुंडे असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तसेच पुढे करुणा मुंडे म्हणाल्या की, वाल्मिक कराडने मला खुप मारहान केली होती.... बलात्कारी मंत्री बनू शकतो तर, मी का नाही? मी दुसरं लग्न करून मंत्री बनू शकते... माझ्या चारित्र्यावर बोलणाऱ्यांनी आधी स्वतः कडे पहाव... मी देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती करते, त्यांनी सीबीआयची नेमणूक करावी या प्रकरणात...

Ujjwal Nikam: खोट्या आश्वासनांमुळे प्रगती होत नाही, हे दिल्लीच्या जनतेला कळलं, उज्ज्वल निकम

https://www.lokshahi.com/news/ujjwal-nikam-has-given-his-reaction-on-the-results-of-the-delhi-assembly-elections

दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल सध्या पाहायला मिळत आहे. असं असताना दिल्लीमध्ये सत्तापालट होताना दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने अनपेक्षितपणे आपचा पराभव करत, मुसंडी मार सत्ता काबिज केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आता आपचे अरविंद केजरीवाल यांचा 3182 मतांनी परभाव झाल्याची माहिती समोर आली आहे. याचपार्श्वभूमिवर भाजपचे नेते आणि वकील उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उज्ज्वल निकम म्हणाले की, तुम्ही खोटी आश्वान देऊन जाहीरणामा काढून हे फुकटमध्ये देऊ, ते फुकटमध्ये देऊ असं करून दिल्लीची प्रगती करता येत नाही... त्यामुळे आनंद या गोष्टीचा आहे की, दिल्लीच्या मतदारांना कळून चुकलं आहे, त्यामुळे दिल्लीमध्ये भाजपची आघाडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये आता भाजपचीच सत्ता स्थापन होईल. अरविंद केजरीवाल हे फार हुशार व्यक्तिमत्त्वाचे आहेत पण, त्यांनी जनतेला खोटी आश्वासन दिली जे की चांगल नाही आहे. असं म्हणत उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Delhi Election Results Counting | दिल्ली विधानसभेवर Amit Thackeray यांची प्रतिक्रिया | Lokshahi News

PM Narendra Modi On Delhi Election Results: दिल्लीकरांना दिली गॅरंटी! दिल्लीतील विजयावर पंतप्रधान मोदींचं ट्विट

https://www.lokshahi.com/desh-videsh/pm-narendra-modi-on-delhi-election-results

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

आज 8 फेब्रुवारीला या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सुरुवातीच्या आकडेवारीपासूनच, भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत होते. दिल्ली विधानसभेचे 70 जागांचे प्राथमिक कल हाती आले. यामध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसून आलं. 2025 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप वरचढ ठरला आहे. याचपार्श्वभूमिवर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीकरांना दिली गॅरंटी! “दिल्लीचा चौफेर विकास आणि इथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यात आम्ही कोणतीच कसर सोडणार नाही ही आमची गॅरंटी आहे. यासोबतच आम्ही हेही निश्चित करू की विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्लीची महत्त्वाची भूमिका असेल”, अशी प्रतिक्रिया दिल्लीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

मनुष्यबळ सर्वोपरि! विकास जिंकला, सुशासन जिंकला. दिल्लीतील सर्व बंधू भगिनींना

@BJP4India

ऐतिहासिक विजयाला सलाम आणि अभिनंदन! तुम्ही दिलेल्या आशीर्वाद आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून तुमचा ऋणी आहे. दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील लोकांचे जीवन चांगले करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, ही आमची रणनीती आहे. त्याचबरोबर भारताचा विकास होईल, दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावेल, याचीही काळजी घेऊ. चोळण्यात

@BJP4India

तुमचे दिवसभराचे काम अतिशय गौरवास्पद आहे, मुख्य म्हणजे या देशासाठी केळी आहे. आम्ही आणखी ताकदीने येऊन आमच्या दिल्लीकरांची सेवा करू.

Delhi Election Results: दिल्लीत कमळ फुललं, 27 वर्षांनंतर भाजपचा विजय! आपच्या दिग्गजांचा दारूण पराभव; काँग्रेसचा सुपडासाफ

देशामध्ये गेले काही दिवस सर्वत्र दिल्ली निवडणुकांचे वारे वाहत असताना पाहायला मिळाले. 5 फेब्रुवारी 2025 रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. आज सकाळपासून मतदान मोजणीला सुरुवात झाली असून दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले दिसून आले. आज 8 फेब्रुवारीला या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सुरुवातीच्या आकडेवारीपासूनच, भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत होते. दिल्ली विधानसभेचे 70 जागांचे प्राथमिक कल हाती आले. यामध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसून आलं. 2025 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप वरचढ ठरला आहे. त्यामुळे आपची जादूदेखील कमी झाली आहे. कॉंग्रेस पक्ष मात्र पूर्णतः पिछाडीवर गेलेला पाहायला मिळाला आहे. आता हे सिद्ध झालेलं पाहायला मिळत आहे की, दिल्ली जनतेने त्यांचा कौल भाजपला दिलेला आहे. दिल्लीमध्ये भाजपने गड राखला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला घव घवीत बहुमत मिळाल्यानंतर सर्वत्र भाजप कार्यालया बाहेर भाजप कार्यकर्त्यांचा ढोल तशा वाजवत जलोष करण्यात आला असून भाजपकडून दिल्लीपासून मुंबईपर्यंत विजयोत्सव साजरा केला जातो आहे. तब्बल 13 वर्ष आम आदमी पक्षाचे दिल्ली मध्ये वर्चस्व होतं मात्र या निवडणुकीत भाजप पक्षाचा विजय झाला आहे त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच आता आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभूत करणारे भाजपचे नेते परवेश वर्मा जायंट किलर ठरलेत. परवेश वर्मा दिल्ली भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहराही असू शकतो अशी शक्यता आहे.

Sunil Tatkare On Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर सुनिल तटकरेंचं मोठं विधान

आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांची आज पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. या दरम्यान त्यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत काही गोष्टी मांडल्या. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अनेक नेत्यांकडून केल्या जात आहे. याचपार्श्वभूमिवर सुनिल तटकरे म्हणाले की, मी अनेकदा स्पष्ट केलं आहे की, देशमुख यांची हत्या निर्घृण पणे झाली, याचा सखोल चौकशी व्हायला हवी... याप्रकरणात जे दोषी आहेत त्या लोकांवर कठोर करवाई व्हावी अशी मागणी आमची देखील आहे, यातला मास्टर माईंड शोधून काढावा ही आमची मागणी आहे... त्या घटनेचा तापास होणं महत्वाचं आहे, देशमुख यांच्या हत्येचा तपास व्हावा... यादरम्यान तीन समित्या नेमल्या आहेत तसेच राजीनाम्यावर यंत्रणेकडून तपास सुरु आहे... धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलायचं झालं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे... बीडच्या घटनेला राजकीय वळण देऊ नये, आणि त्या संदर्भात कोणतेही राजकीय वक्तव्य मी देणार नाही... जे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत त्याची दखल सरकारने घेतली आहे, जे निर्णय येतील ते आम्ही लवकर सांगू... अजित पवार हे सरकारच नेतृत्व करत आहेत ते जो निर्णय घेतील.. धनंजय मुंडे यांच्याबाबत योग्य निर्णय लवकर घेऊ...

तसेच पुढे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. अजित पवार बोलले असतील, महापालिका निवडणूक स्वबळावर लढलो तर ते फायनल असेल... असं म्हणत सुनिल तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.

Delhi Election Result: दिल्ली निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया!

5 फेब्रुवारी 2025 रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. आज सकाळपासून मतदान मोजणीला सुरुवात झाली असून दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले दिसून आले. आज 8 फेब्रुवारीला या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सुरुवातीच्या आकडेवारीपासूनच, भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत होते. दिल्ली विधानसभेचे 70 जागांचे प्राथमिक कल हाती आले. यामध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसून आलं. 2025 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप वरचढ ठरला आहे. त्यामुळे आपची जादूदेखील कमी झाली आहे. तब्बल 13 वर्ष आम आदमी पक्षाचे दिल्ली मध्ये वर्चस्व होतं मात्र या निवडणुकीत भाजप पक्षाचा विजय झाला आहे. याचपार्श्वभूमिवर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर आला आहे. जनतेचा जो काही निर्णय आहे तो आम्ही विनम्रतेने स्वीकारत आहोत. जनतेचा निर्णय हा शिरसावंद्य आहे. मी भाजपला या विजयासाठी खूप शुभेच्छा देतो. मला आशा आहे की लोकांनी त्यांना ज्या आश्वासनांसाठी मतदान केले आहे, त्या सर्व आशा भाजपकडून पूर्ण केल्या जातील, अशी इच्छा व्यक्त करतो. आम्हाला जनतेने गेल्या 10 वर्षात जी संधी दिली या काळात आम्ही बरीच चांगली कामे केली. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज अशा विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचं काम केलं. तसेच विविध माध्यमातून जनतेला दिलासा देण्यासाठी कामे केली. आता जनतेने निकाल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. आम्ही फक्त सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर आम्ही समाजसेवा, जनतेच्या सुख, दु:खात मदत करणं, ज्यांना मदती हवी असेल त्यांच्या मदतीला आम्ही जावू. आम्ही राजकारणाला फक्त एक माध्यम मानतो, ज्याद्वारे जनतेची सेवा केली जाऊ शकते. आम्ही ते काम करत राहू, आम्ही राजकारणाला फक्त एक माध्यम मानतो, ज्याद्वारे जनतेची सेवा केली जाऊ शकते. आम्ही ते काम करत राहू

PM Narendra Modi: "आज दिल्लीत अराजकता,अहंकार आणि आप पक्षाची हार झाली आहे"- मोदी

आज 8 फेब्रुवारीला या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सुरुवातीच्या आकडेवारीपासूनच, भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत होते. तब्बल 13 वर्ष आम आदमी पक्षाचे दिल्ली मध्ये वर्चस्व होतं मात्र या निवडणुकीत भाजप पक्षाचा विजय झाला आहे. याचपार्श्वभूमिवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जनतेसोबत संवाद साधला. दिल्लीकरांना तसेच भारतमाता आणि यमुना मय्याला वंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.

पुढे नरेंद्र मोदी म्हणाले, आज दिल्लीच्या जनतेने भाजपला भरभरुन प्रेम दिले. जनतेने डबल इंजिन सरकारकडे आपला कल दिला. जी लोक दिल्ली आपल्या मालकीची असल्याचे सांगत होते, त्यांना जनतेने दाखवून दिले की दिल्लीचे खरे मालक फक्त आणि फक्त दिल्लीची जनता आहे. ज्यांना दिल्लीचे मालक होण्याचा अहंकार होता, त्यांचा अहंकार या निवडणुकीत मातीमोल झाला आहे. त्यांचा सत्याशी सामना झाला आहे. दिल्लीच्या जनतेने दिलेल्या कौलामुळे राजकारणात शॉर्टकट अन् खोट्यानाट्यासाठी कोणतेच स्थान नाही, जनतेने शॉर्टकटवाल्या राजकारणाचे शॉर्टसर्किट केले आहे, हे स्पष्ट केले आहे. आज दिल्लीने विकास, दृष्टीकोन आणि विश्वास यांचा विजय झाला आहे. आज अराजकता, अहंकार आणि दिल्लीवरच्या आपदा यांचा पराभव झाला आहे. या निकालाने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस केलेली मेहनत काय आहे ते दाखवून दिलं. तुम्ही सगळे कार्यकर्तेही या विजयाचे वाटेकरी आहात.

Shraddha Walker Father: निर्घृण हत्या केलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचे निधन

श्रद्धा वालकर हत्याकांडाला दोन वर्ष पूर्ण झाले आहे, या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. प्रियकराने निर्घृणपणे हत्या केलेल्या श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीसह संपूर्ण देश हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तेव्हापासून श्रद्धाचे वडील अंत्यसंस्कारासाठी आपल्या मुलीचा मृतदेह देण्याची मागणी करत होते. पण, शेवटपर्यंत त्यांची इच्छा अपुरीच राहिली. श्रद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचे वडील विकास वालकर मृतदेहाच्या अवशेषांची मागणी करण्यासाठी गेल्या वर्षभर दिल्लीत फेऱ्या मारल्या. मात्र, या खटल्याचा जलदगती न्यायालयात निकाल लागला नाही. तसेच पोलिसांच्या तपासातील दिरंगाईबाबत नेमलेल्या विशेष तपास पथकानेही काहीच कारवाई केली नाही, असा आरोप विकास वालकर यांनी केला होता. मात्र आता तिच्या वडिलांची इच्छा अपुर्णचं राहिली.

Anjali Damania VS Dhananjay Munde: "देशमुखांना जाऊन 2 महिने झाले, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का?"; अंजली दमानिया यांचा सवाल

https://www.lokshahi.com/news/anjali-damania-vs-dhananjay-munde

बीड मधील मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपुर्ण बीड तसेच राज्यात या प्रकरणाबाबत अनेक आंदोलन आणि आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळाले आहेत. असं असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणावर आता आणखी एक महत्त्वाची बाब समोर आणली आहे. संतोष देशमुखांना जाऊन दोन महिने पूर्ण झाले, आज तरी राजीनामा होणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत प्रश्न विचारले आहेत.धनंजय मुंडेंवर सगळे आरोप पुराव्या सकट मुख्यमंत्री, लोकायुक्त, अजित पवार, निवडणूक आयोग, सीबीआय, कॅग आणि एसीबीला पाठवत असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फोनचा डाटा अजून का रिट्रीव झाला नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. तो बडा नेता कोण आहे, अजून का कळलं नाही? तर जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत दबाव राहणार त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, असं देखील थेट वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलं आहे.

Bacchu Kadu On Eknath Shinde: "एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत" बच्चू कडू यांची इच्छा

महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि आमदार बच्चू कडू आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली, ज्यात त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.

याचपार्श्वभूमिवर बच्चू कडू म्हणाले की, राजकीय संबंधांमुळे मी एकनाथ शिंदेंना भेटायला आलो नाही, आज त्यांचा वाढदिवस होता म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो आणि एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे... महाराष्ट्रात जुगारच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटी आणि खेळाडूंची संख्या वाढत आहे... कारण, फक्त 2 दिवसांपूर्वी माझ्या मतदारसंघात एका तरुणाने जुगाराच्या व्यसनामुळे आत्महत्या केली होती... इतके मोठे सेलिब्रिटी आणि खेळाडू अशा जुगाराच्या जाहिराती का करतात? यावर चर्चा करण्याची गरज आहे... यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन करावी जेणे करून जुगाराच्या जाहिराती करणाऱ्या अशा सेलिब्रिटी आणि खेळाडूंवर कारवाई करता येईल...

पुढे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मनोज जरंगे पाटील यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी भाजप आमदार सुरेश धस यांना पुढे आणण्यात आले आणि असे म्हटले जात आहे की, महाराष्ट्रात संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे आणि हे सरकार कुठेतरी ते दाबण्याचा प्रयत्न करत आहे...

Mumbai Ganpati Visarjan: गणेश मंडळाचे कार्यकर्ते संतापले! बाप्पाच्या विसर्जनाला प्रशासनाकडून नकार

काल मुंबईमध्ये माघी गणपती विसर्जन पार पडले, याचपार्श्वभूमिवर POPची मूर्ती पालिका प्रशासनाकडून विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली.. मुंबई पश्चिम उपनगरातील मालाड मार्वे येथे गणेश मंडळांच्या पीओपीच्या मूर्ती पालिका प्रशासनाकडून थांबवण्यात आल्या. POP च्या मूर्तीवर बंदी असल्यामुळे त्या विसर्जन करण्यापासून थांबवण्यात आले. या मुर्ती गणेश मंडळांना पोलिसांनी मंडळाला मुर्ती पुन्हा घेऊन जायला सांगितले ज्यामुळे मुंबईसह इतर गणेश मंडळ आणि गणेशभक्त संतापले आहेत. आता या मुर्ती बोरिवली गोराई इथे विसर्जन करण्यात आल्या.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 12 मे 2020 रोजीच्या सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार पीओपी मूर्तींवरील बंदीची अंमलबजावणी करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले. ज्यामुळे मुंबई महापालिकेच्या निर्देशानुसार पीओपी मूर्ती गोराई येथे विसर्जनाला आल्यानंतर मूर्तींचे विसर्जन करू दिले नाही. मात्र, या नियमांच्या अंमलबजावणीची चर्चा कोणत्याही गणेश मंडळाशी तसेच मूर्तिकरांशी न करता पीओपी मूर्ती विसर्जनासाठी थांबून ठेवल्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचसोबत येणाऱ्या गणेशोत्सवात पीओपी मूर्ती बाबत नेमके काय निर्णय आहेत? तसेच आम्ही या गणेश मूर्तीचे विसर्जन कसे आणि कुठे करायचं असा प्रश्न गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका आणि प्रशासनाला विचारला आहे. याप्रकारामुळे मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तीकरांनी बैठक बोलावली.

Atishi Marlena: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा राजीनामा सुपूर्द!

देशामध्ये गेले काही दिवस सर्वत्र दिल्ली निवडणुकांचे वारे वाहत असताना पाहायला मिळाले. 5 फेब्रुवारी 2025 रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. काल सकाळपासून मतदान मोजणीला सुरुवात झाली असून दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले दिसून आले. काल म्हणजेच 8 फेब्रुवारीला या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्यामध्ये भाजप बहुमतांसह वरचढ ठरला. त्यामुळे आपची जादूदेखील कमी झाली आहे. कॉंग्रेस पक्ष मात्र पूर्णतः पिछाडीवर गेलेला पाहायला मिळाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला घव घवीत बहुमत मिळाल्यानंतर सर्वत्र भाजप कार्यालया बाहेर भाजप कार्यकर्त्यांचा ढोल तशा वाजवत जलोष करण्यात आला असून भाजपकडून दिल्लीपासून मुंबईपर्यंत विजयोत्सव साजरा केला गेला. काल झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा राजीनामा सुपूर्द झाला आहे. उपराज्यपाल विनय सक्सेना यांच्याकडे त्यांना आपला राजीनामा सोपवला. दिल्ली निवडणुकीत आतिशी यांचा विजय झाला पण 'आप' पराभूत झाले.

Pimpari: पिंपरीतील मागासवर्गीय वसतीगृहातील विद्यार्थीनीच्या घराबाहेर पिझ्झाचा बॉक्स; विद्यार्थीनीवर कारवाई

पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील मागासवर्गीय वस्तीगृहात पिझ्झाचा बॉक्स सापडला. वसतिगृहात पिझ्झा मागवल्यामुळे विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली असून खोलीतील विद्यार्थिनींना पुढचा एक महिना येण्यास मनाई करण्यात आली. विद्यार्थिनींना मनाई केल्याचे वृत्त वसतिगृहाने फेटाळला. या वस्तीगृहाच्या मुख्यांकडून असा खुलासा करण्यात आला की, त्या विद्यार्थिनींना केवळ नोटीस दिली आहे, एक महिना येण्यास मनाई केल्याचा कोणतीही निर्णय घेण्यात आला नाही. हॉटेलमधील पदार्थाने आरोग्याचे प्रश्न उद्भवतात, त्यामुळे वस्तीगृहात बाहेरचे खाद्यपदार्थ मागवण्याची बंदी आहे. घरुन त्यांना वेगवेगळे पदार्थ वस्तीगृहात आणण्याची मुभा आहे. त्याचसोबत वस्तीगृहात तीन वेळचे जेवण दिलं जातं. असं असताना देखील 31 जानेवारीला पिझ्झाचा बॉक्स वस्तीगृहातील खोलीबाहेर आढळला. 8 फेब्रुवारीपासून एक महिना वस्तीगृहात येण्यास मनाई करण्यात येईल. असं या नोटीसमध्ये नमूद आहे. हिचं नोटिस सध्या व्हायरल झाली असून त्यावरून समाज माध्यमात संताप व्यक्त केला जातो आहे.

Rohit Sharma Century: हिटमॅनची तुफानी खेळी! रोहितनं सेंच्युरीसह मैदान गाजवलं

https://www.lokshahi.com/sports/cricket/rohit-sharma-century-in-ind-vs-eng-2nd-odi-match

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामना कटकच्या मैदानावर पार पडला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात वनडे कारकिर्दीतील 32 वे शतक पूर्ण केले आहे. हिटमॅन त्याच्या फॉर्मच्या शोधात होता. वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये रोहित त्याला हवी तशी कामगिरी करु शकला नाही. ज्यामुळे त्याला सोशल मीडियवर अनेक वेळा ट्रोलर्सकडूम ट्रोल करण्यात आलं, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच रोहित शर्माने झंझावाती आणि वादळी फलंदाजी करत ट्रोलर्सची केली बोलती बंद केली आहे. रोहितने 76 बॉलमध्ये 7 तुफानी षटकार 9 चौकार मारत 101 धावा पूर्ण केल्या असून आपल्या वनडे कारकिर्दीतील 32 वे शतक पूर्ण केले, तसेच इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला 305 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हाला सामोरे जात रोहितने त्याची बॅट तळपवली. यावेळी रोहित शर्माला शुभमन गिलची चांगली साथ मिळाली. या जोडीने सुरुवातीच्या षटकापासूनच इंग्लंडच्या गोलंदाजीवर तुफानी खेळी खेळली. शुभमनने 60 धावांची खेळी खेळली तर रोहितने 119 धावांवर माघार घेतला. असं करत दोघांनी मिळून 136धावांची भागीदारी केली. या खेळीसह रोहितने आपला फॉर्म गाजवला.

Special Report: विक्रोळीत न उभारलेल्या संरक्षक भिंतांचं वास्तव काय? म्हाडा घोटाळ्याचा पर्दाफाश

संरक्षक भिंती उभारण्याच्या नावाखाली म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याचा केला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी संरक्षण भिंती उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लटल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे. याआधीही लोकशाही मराठीने अंधेरी महाकाली गुफा, मुलुंड, दहिसर केतकी पाडा येथील घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. आता विक्रोळी पार्कसाईट मध्येही असाच प्रकार घडला आहे. मुंबईतील विक्रोळी परिसरातील त्रिलोक सोसायटीच्या परिसरात डोंगरावर अनेकांचे संसार वसलेले आहेत. एका दहशतीच्या सावटखाली अनेक पिढ्या इथेच लहानाचे मोठे झाले. कारण, डोंगरावरून कधी एखादा भलामोठा दगड येईल आणि एखादी दरड कोसळेल यांची दहशत इथल्या प्रत्येकाच्या मनात कायम असते. यावर उपाययोजना व्हावी आणि संरक्षक भिंती बांधल्या जाव्या, म्हणून इथल्या रहिवाशांनी अनेकदा अर्ज केले, कार्यालयांचे हेलपाटे मारले. पण प्रशासन ढिम्म ते ढिम्मच. उलट, गेल्या ८ वर्षांपासून सुमारे ८९ संरक्षक भिंती बांधल्याचं फक्त कागदावरच दाखवलं गेलं. धक्कादायक म्हणजे त्यासाठी १९ कोटी रुपयांचा खर्चही दाखवला गेला. लोकशाही मराठीनं त्याचा रिअॅलिटी चेक केला तर दिसलेलं वास्तव वेगळंच होतं. सध्या फक्त 4 ते 5 संरक्षण भिंती आहेत, त्याही अर्धवटच अवस्थेतच असल्याचं आम्हाला दिसलं आणि त्याचा खर्च अवघा १० लाखही झाला नसल्याचं दिसून येत आहे. म्हाडाचं प्रशासन कुंभकर्णासारखं झोपलेलं असल्यामुळे, त्रिलोक सोसायटीतील रहिवाशांनी पुढाकार घेत आणि स्वत: पदरमोड करत इथं काही भिंती बांधल्या आहेत. फक्त विक्रोळीच नाही तर मुंबईतल्या अनेक भागांमध्ये भिंती उभारण्याच्या नावाखाली, तद्दन खोटे कागदी घोडे नाचवत म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचं धडधडीतपणे समोर आला आहे. म्हणूनच निव्वळ संरक्षक भिंतींचे खोटेनाटे बुजगावणे उभे करत रहिवाशांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश लोकशाही मराठी करत राहणार.

Castor Benefits : एरंडेलाच्या सेवनाने पचनसंस्थेला होतील 'हे' निरोगी फायदे, कोणते ते जाणून घ्या...

एरंडेल म्हणजे एरंडाच्या बियांपासून काढलेलं तेल. अगदी आजही एरंडेल अगदी सहजपणे उपलब्ध असतं. आयुर्वेदात तर याचा भरभरून वापर केलेला असतोच, पण घरगुती औषधातही एरंडेल मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. खरं तर एरंडेलाचे अनेक फायदे असतात आणि वेगवेगळ्या रोगांवर वेगवेगळ्या प्रकारांनी एरंडेलाची योजना केली जाते. अन्न सेवन केलं की त्याचं पचन होतं. पचनानंतर तयार झालेला सारभागाचे शरीरामध्ये शोषन होतो, यातूनच आपले सप्त धातू, शक्ती, रोगप्रतिकारशक्ती वैगरे यांना ताकद मिळते. आणि मलभाग मात्र घाम, युरिन आणि मलच्या रूपांनी शरीराबाहेर टाकला जातो.

पण ही आदर्श परिस्थिती झाली, प्रत्यक्षात मात्र आपलं चुकीचं खाणं-पिणं, मानसिक ताण तणाव, वेगांचा आवरोध, जेवणाच्या तसेच झोपण्याच्या सायकलमध्ये झालेले अनैसर्गिक बदल, कृत्रिम पद्धतीनी तयार केलेल्या औषधांचं सेवन अशा अनेक कारणांनी ही प्रक्रिया 100% पूर्ण होतेच असं नाही. पर्यायानी आतड्यांमध्ये मलभाग किंवा अशुद्धी साठत राहते. त्यात रोज सेवन केलेल्या अन्नाची भर पडते आणि हलके हलके आतड्यात साठलेली अशुद्धी आतड्यापुरती सीमित न राहता, अख्या शरीरामध्ये पसरू लागते. यामुळे अनेक अनेक रोगांना आमंत्रण मिळतं. या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी एक अगदी रामबाण आणि सोपा उपाय म्हणजे दर पंधरा दिवसांनी एरंडेल घेणं.

आठ दहा वर्षांच्या बालकापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे जण ही तोडगा घेऊ शकतात. लहान मुलांसाठी साधारणतः एक ते दीड चमचा आणि मोठ्यांसाठी साधारणतः दोन ते अडीच चमचे या प्रमाणात रात्री झोपण्यापूर्वी एरंडेल घेता येतं. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडी लवकर जाग येते आणि दोन-तीन वेळा जुलाब होऊन पोट साफ होऊन जातं. कदाचित दोन-तीन पेक्षा जास्त जुलाब झाले, तर पुढच्या वेळेला एरंडेलाचं प्रमाण थोडं कमी करावं आणि अगदी एखादा जुलाब झाला तर प्रमाण थोडं वाढवावं. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे जर एरंडेल घेतलं, तर ते अगदी हसऱ्या चेहऱ्यानी घेता येतं. यासाठी सुंठ थोडीशी चेचून त्यापासून छान चहा तयार करावा. गरमागरम चहात एरंडेल मिसळावं आणि घरातल्या सगळ्यांनी घेऊन टाकावा.

Rishiraj Sawant : ऋषीराज सावंत यांच्या अपहरणावर गिरीराज सावंत यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण पुणे विमानतळावरुन झालं असून त्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. तानजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच, पुणे पोलिस विमानतळावर दाखल झाले. याप्रकरणी आता पोलिस तपास सुरु करण्यात आला असून या तपासादरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तानाजी सावंत यांचा मुलगा नाराजीमधून मित्रांसोबत परदेशात गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋषीराज सावंत हे परदेशात सुखरुप असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. याचपार्श्वभूमिवर त्यांचे भाऊ गिरीराज सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीराज सावंत काय म्हणाले?

गिरीराज सावंत यांनी या प्रकरणाचा खफलासा करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे म्हणाले, काल साधारण तीनच्या सुमारास आम्हाला एक धक्कादायक मेसेज आला. हा मेसेज माझ्या छोट्या भावाचा होता. तो मेसेजमध्ये म्हणाला की, मी दोन दिवसांसाठी बाहेर जातो आहे, पण आधी असं कधीच झालं नव्हतं. बाहेरगावी असो किंवा परदेशी, आम्ही एकमेकांना सांगूनच जातो. आठ ते दहा दिवसांपूर्वीच तो दुबईला गेला होता. तिथून तो सहा-सात दिवसांनी आला आणि अचानक फोन स्वीच ऑफ करुन निघून गेला, असं गिरीराज यांनी सांगितलं.

तानाजी सावंत काय म्हणाले?

माझ्या मुलाचे अपहरण झाले नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत. त्याचा फोन न आल्याने मला खुप काळजी वाटू लागली. आम्ही एकमेकांना दिवसांतून वीस फोन तरी करतो. मात्र तो अचानक विमानतळावर का गेला? या काळजीपोटी मी पोलिस आयुक्त व अधिकाऱ्यांना फोन केला. ते तिघंही खासगी विमानाने गेले आहेत. त्याच्या मित्रांची नावंदेखील माहीत नाहीत. आमच्यामध्ये नेहमीच संवाद होतो. मात्र आज त्याच्याबरोबर काहीही बोलणं झालं नाही त्यामुळे मी घाबरलो आणि अस्वस्थ झालो". ?

Sanjay Raut: अदानीच्या योजना कशा सुरु राहतात? राऊतांचा सवाल

राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्याने अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. शिवभोजन थाळीसह इतर योजना बंद करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.. जवळपास एक लाख कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी अनेक योजना बंद कराव्या लागणार आहेत. आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या विभागानिहाय बैठकामध्ये या योजना बंद करायच्या का याची ही चाचपणी सुरु आहे. याचपार्श्वभूमिवर संजय राऊत यांनी अंदानी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, शिवभोजन थाळी ही आधीच्या सरकारनं गोर-गरीब जनतेसाठी सुरु केली होती. लाडका भाऊ आणि इतर योजना याच सरकारच्या योजना सरकारच्या आहेत. ज्या योजना एकनाथ शिंदे यांच्या योजना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून बंद करत आहेत. शिवभोजण थाळी सुरू केली तेव्हा उद्धव ठाकरे सरकार मध्ये होते आणि एकनाथ शिंदे मंत्री होते. त्या योजनेचे एकनाथ शिंदेंनी उद्घाटन केले आहे. गरिबांच्या योजना बंद का आणि अदानींच्या योजना सुरू का यावर त्यांनी बोलायला हव. गरिबांच्या योजना का बंद होतात हा प्रश्न सरकारमधील लोकांनी मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हणाले आहे.

Bandra Crime : वांद्र्यातील धक्कादायक घटना, महिलेचे हात-पाय बांधून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

वांद्रे परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सैफ अली खान हल्ल्यानंतर आता वांद्रे परिसरात वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. वांद्रे येथील ज्या परिसरात सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला, त्याच परिसरात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून तिची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. वांद्रे परिसरातील रिक्लेमेशन डेपो परिसरातील कांचन इमारत क्रमांक 13 मधील दुसऱ्या मजल्यावरील 64 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेच्या नातेवाईकावर संशय असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह वांद्रे येथील भाभा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महिलेच्या मृतदेह पाहता तिचे हात-पाय ओढणीने बांधून शस्त्राने महिलेच्या गळ्यावर वार करण्यात आल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वीच महिलेची हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी लावली आहे. रेखा अशोक खोंडे असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्या गळ्यावर गंभीर जखमा आहे. घरातील सर्व वस्तू व दरवाजाची पाहणी केली असता आरोपी घरात जबरदस्तीने शिरलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात महिलेच्या परिचित व्यक्तीचाच सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या माहितीच्या आधारे महिलेच्या एका नातेवाईकाला संशयावरून वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Soyabean Update: केंद्र आणि राज्याच्या असमन्वय; सोयाबीन उत्पादकांना फटका; हमीभाव मिळणार?

केंद्र आणि राज्य सरकारमधील असमन्वयाचा फटका राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांना बसतो आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ दिल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी दिली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळाला मात्र, महाराष्ट्राच्या पणन विभागाकडे चौकशी केली असता, याबाबत कोणतीही माहिती किंवा सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिल्याची कोणतीही सूचना मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकाच विचारांचे सरकार असूनही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असमन्वय असेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत असेल तर, याला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत?

पणन विभागाचे स्पष्टीकरण

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तेलंगणातील सोयाबीन खरेदीला १५ दिवसांची मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी (ता.१०) दिली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती. काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणा मध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे मा. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याची बातमी आज देण्यात आली आहे. तथापि ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

राज्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपस्थित लावली होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात काय आणि त्याचा महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल, यावर मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण झाले. यामध्ये विविध सचिवांनी तासभर सादरीकरण केले तसेच आरोग्य, शिक्षण आणि महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विभागांनी तातडीने तसे प्रस्ताव तयार करावे, असे निर्देश देण्यात आले. जलजीवन मिशन, PM स्वानिधी, जिल्हास्थानी कर्करोग सेंटर्स, भारतनेट, शेतकरी, अमृत अशा विविध योजनेत मोठा निधी केंद्र सरकारने दिला. कोणत्या विषयात कोणता विभाग काय आणि कसा पुढाकार घेऊ शकतो, यांचे सादरीकरण झाले.

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

मंत्रिमंडळ निर्णय - ३ (संक्षिप्त)

(मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी 2025)

1) देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघरसाठी 2599.15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी.

* प्रकल्पातून 69.42 दलघमी पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित

(जलसंपदा विभाग)

2) जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता

* जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात 8350 हेक्टरला सिंचन

* शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात 5730 हेक्टरला सिंचन

(जलसंपदा विभाग)

3) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत 2019 मध्ये दुरुस्ती

(मदत व पुनर्वसन विभाग)

Mumbai Ganpati Visarjan: पीओपी मूर्ती विसर्जनावर तोडगा नाहीच, गणेशमंडळांसमोर नवा पेच निर्माण

मुंबईमध्ये माघी गणपती विसर्जन पार पडले, याचपार्श्वभूमिवर POPची मूर्ती पालिका प्रशासनाकडून विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली. मुंबई पश्चिम उपनगरातील मालाड मार्वे येथे गणेश मंडळांच्या पीओपीच्या मूर्ती पालिका प्रशासनाकडून थांबवण्यात आल्या. POP च्या मूर्तीवर बंदी असल्यामुळे त्या विसर्जन करण्यापासून थांबवण्यात आले. या मुर्ती गणेश मंडळांना पोलिसांनी मंडळाला मुर्ती पुन्हा घेऊन जायला सांगितले ज्यामुळे मुंबईसह इतर गणेश मंडळ आणि गणेशभक्त संतापले. ११ फेब्रुवारीला जनआंदोलन उभे करून कांदिवलीतून मोठ्या प्रमाणावर मिरवणूका काढण्याचा इशारा पीओपी मूर्तीकारांनी व मंडळांनी दिला होता. मात्र सोमवारी रात्री उशीरापर्यंत याबाबत निर्णय झाला नव्हता. पीओपी मूर्तीकारांच्या संघटनेने गणेशोत्सव मंडळांना सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. याचपार्श्वभूमिवर माघी गणेशोत्सवातील गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी पालिककडून कृत्रिम तलावांची सुविधा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कृत्रिम तलावांमध्येच मूर्ती विसर्जन करण्याची मुंबई महापालिकेकडून भाविकांना विनंती करण्यात आली आहे. काही कृत्रिम तलावात मोठ्या मूर्तीचे विसर्जन होऊ शकत नाही, असे सार्वजनिक मंडळ यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पालिका प्रशासनाने कृत्रिम तलावाची खोली वाढवाली असून मोठ्या आकाराच्या मुर्त्याही विसर्जित होऊ शकतात. मुंबईसह उपनगरात पालिकेकडून कृत्रिम तलाव बनवण्यात आले असून योग्य नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

बाप्पाच्या विसर्जन न करण्याचं नेमकं कारण काय?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 12 मे 2020 रोजीच्या सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार पीओपी मूर्तींवरील बंदीची अंमलबजावणी करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले. ज्यामुळे मुंबई महापालिकेच्या निर्देशानुसार पीओपी मूर्ती गोराई येथे विसर्जनाला आल्यानंतर मूर्तींचे विसर्जन करू दिले नाही. मात्र, या नियमांच्या अंमलबजावणीची चर्चा कोणत्याही गणेश मंडळाशी तसेच मूर्तिकरांशी न करता पीओपी मूर्ती विसर्जनासाठी थांबून ठेवले. ज्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचसोबत येणाऱ्या गणेशोत्सवात पीओपी मूर्ती बाबत नेमके काय निर्णय आहेत? तसेच आम्ही या गणेश मूर्तीचे विसर्जन कसे आणि कुठे करायचं असा प्रश्न गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका आणि प्रशासनाला विचारला आहे. याप्रकारामुळे मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तीकरांनी बैठक बोलावली.

Ajit Pawar On Raigad: रायगड DPDC च्या बैठकीवर अजित पवार यांचा खुलासा काय?

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात जिल्हा नियोजनाच्या बैठका पार पडल्या आहेत. त्यातच अर्थसंकल्पीय तरतुदींसाठी आज शेवटचा दिवस असून आज रायगड आणि नाशिकसह मुंबई, ठाणे आणि अहिल्यानगरमध्ये बैठका पार पडल्या. अशातच काल कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गची बैठक पार पडली. मात्र पालकमंत्रीपद रखडलेल्या रायगड आणि नाशिकची बैठक पुढे ढकलण्यात आली. याचपार्श्वभूमिवर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, "आज जवळपास DPDCचे 36 जिल्हे माझे संपले, 6 ते 7 दिवस आमचे ते जिल्हे चालले होते. काल एकनाथ शिंदे यांची तब्येत ठिक नसल्यामुळे रायगड आणि नाशिकसह मुंबई, ठाणे आणि अहिल्यानगरमध्ये बैठका पार पाडल्या. मी नेहमी पत्रकारांना सांगत आलेलो आहे की, मी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी बोलतो. आज रायगड आणि नाशिकमध्ये बैठक घेताना तिथे पालकमंत्री नाही आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत माझ आणि एकनाथ शिंदे आमचं अस ठरल की, तिथे पालकमंत्री नसल्यामुळे तिथल्या मंत्र्यांना बोलवायच. कारण, ही DPDC आहे याच्यामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला त्या जिल्ह्याला किती कोटी त्या जिल्ह्याला द्यायचे आहेत हे ठरतं. ते कसं ठरतं तिथलं भौगोलिक क्षेत्र, तिथली लोकसंख्या, तिथलं उत्पन्न हे सगळं बघावं लागत. मी आता मध्येच एक बातमी पाहिली त्यात असं होत की, रायगडच्या एका ही आमदाराला बोलावलं नाही. अरे.. पण, बोलूनचं नव्हत ना.. त्या बैठकीत दोनच मंत्र्यांना बोलवलं होत, भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांनाच बोलवलं होत. यावेळी DPDCच्या बैठकीत 19 टक्के निधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात शिक्षण, गृह, महसूल आणि असं इतर त्यामध्ये आता 1 टक्का दिवंगत यांच्यासाठी देखईल काढला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत".

Beed Santosh Deshmukh Update: बीड सरपंच हत्याप्रकरणात नवीन अपडेट, फोन करून टीप देणारा पोलीस कोण?

https://www.lokshahi.com/news/beed-santosh-deshmukh-update

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलचं गाजलेलं पाहायला मिळत आहे. आज दोन महिने झाले असून देखील या घटनेचा योग्य तो तोडगा काढलेला नाही. शिवाय या प्रकरणात मंत्री धनंजय देशमुख यांच्या राजीनाम्यावर अजून देखील जोर धरला गेला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं पाहायला मिळत आहे. या प्रकरणासंबंधी वाल्मिक कराडला अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या आरोपीचा पळून जातानाचा व्हिडीओ समोर आला आणि मोठी खळबळ उडाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्हिडीओनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. यादरम्यान धनंजय देशमुखांनी देखील गंभीर आरोप केला आहे. आरोपीला पळून जाण्यासाठी टीप पोलिसांनीच दिल्याचा खळबळजनक दावा संतोष देखमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे. संतोष देशमुखांचे मारेकरी भर रस्त्यात गाडी लावून गाडीतून उतरून पळून गेले. यावेळी हाकेच्या अंतरावर पोलीस होते. गाडीचा पाठलाग करुन देखील हे आरोपी का सापडले नाहीत? पोलिसांच्या अभयामुळेच आरोपी मोकाट आहेत . आरोपींना पुढे पोलीस असल्याची टीप कोणी दिली? तो पोलीस कर्मचारी होता का? असा प्रश्न धनंजय देशमुखांनी उपस्थित केला आहे.

टीप देणारा पोलीस कोण??

सुरुवातीचे काही दिवस तपास कुठल्या पद्धतीने केलेला आहे याच्यावर खूप मोठी शंका आहे. सीआयडी आणि एसआयटीकडे जो तपास दिलेला आहे तोच पुढे व्यवस्थित सुरु आहे. समोरून आरोपी पळताना दिसत आहेत मग या आरोपीचा शोध का लागत नाही? पळून जाणाऱ्या आरोपीमध्ये कृष्ण आंधळे पण आहे. हत्येच्या सुरुवातीच्या वेळी तपास गांभीर्याने घेतला नाही. पुढे पोलीस आहेत याची टीप कोणी दिली. याची माहिती कॉल डिटेल्समधून निघेल. कुठल्या पोलीसाने फोन करून सांगितलं होते का? याचा देखील तपास केला पाहिजे, असे धनंजय देशमुख म्हणाले.

आजचा सुविचार

https://www.lokshahi.com/aajcha-suvichar/aajcha-suvichar-44

Samay Raina Indias Got Latent show: युट्यूबर समय रैनाने आपलं म्हणणं मांडलं, "जे काही घडत आहे ते हाताळणे माझ्यासाठी..."

https://www.lokshahi.com/entertainment/samay-raina-breaks-silence-on-indias-got-talent-controversy

प्रसिद्ध युट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच त्याचा नवीन एपिसोड समोर आला आहे. यामध्ये युट्यूबर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह व रणवीर अलाहबादिया यांनी हजेरी लावली होती. यावेळी राणवीर अलाहबादिया याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमामध्ये रणवीरने आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर रणवीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून समय रैनासह अनेकांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा, समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या वादावर समय रैनाने भाष्य करत इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ त्याच्या चॅनलवरून काढून टाकल्याचे म्हटलं आहे. या सगळ्या वादावर समय रैनाने मौन सोडलं आहे. इन्स्टा पोस्टमधून समय रैनानं आपलं म्हणणं मांडलं आहे.

समय रैनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे की, "हे सर्व घडत आहे ते हाताळणे माझ्यासाठी खूप कठीण होत आहे. मी माझ्या चॅनलवरून इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. लोकांना हसवणे आणि त्यांचा चांगला वेळ जावा हेच माझे ध्येय होते. मी तपास यंत्रणांना सहकार्य करेन जेणेकरून त्यांचा तपास निष्पक्षपणे होईल. धन्यवाद," असं म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बीडचे पालकमंत्री झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या ॲक्शन मोडवर पाहायला मिळत आहेत...उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याशी काल कागदपत्रांसह मुंबईत पाचारण केलं...त्यांच्याशी चर्चा करून मागील दोन वर्षातील निधी वितरणाचा आढावा घेतला...बीड जिल्ह्यातील नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये दुजाभाव झाला असून निधी वाटपामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता...परळीत बोगस काम करून 73 कोटींचा अपहाराचा आमदार सुरेश धस यांनी दावा केला होता... बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीतील सदस्य चौकशी पथक समिती गटीत करण्यात आली असून मागील दोन वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी निधीची चौकशी करण्यात येणार आहे...दरम्यान 2019 पासून याची चौकशी करण्यात यावी मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली आहे आणि याबाबत अजित पावर यांची आज भेट घेणार आहेत...

Ind vs Eng: तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 142 धावांनी विजय; ३-0 ने जिंकली मालिका!

भारताने इंग्लंडला तिसऱ्या वनडे मालिकेत १४२ धावांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारताने या वनडे मालिकेत इंग्लंडवर निर्भेळ मालिका विजय नोंदवला. शुबमन गिलचे शतक, विराट कोहलीचं कमबॅक अर्धशतक, श्रेयस अय्यरची वादळी खेळी आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी हा मालिका विजय खूप महत्त्वाचा ठरला आहे. भारतीय संघ खूप काळानंतर वनडे सामने खेळण्यासाठी उतरला होता, पण भारताच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी स्पर्धेसाठी संघांची तयारी चांगली कशी आहे हे दाखवून दिले.

Shivsena UBT: मीरा भाईंदरसह वसई - वसई मध्ये शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार

https://www.lokshahi.com/news/shiv-sena-ubatha-party-faces-hurdles-in-vasai-virar-along-with-mira-bhayandar

मीरा भाईंदर मध्ये माजी आमदार गिल्बर्ट मिंडोसा यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश केला. त्यांच्याबरोबर शिवसेना उबाठा पक्षाच्या माजी नगरसेविका शर्मिला बगाजी,माजी नगरसेवक बर्नार्ड डिमेलो, माजी नगरसेवक गोविंद जर्जीस यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला. माजी आमदार गिल्बर्ट मिंडोसा यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद आणखीन बळकट झाली आहे असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

वसई - विरार मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात काल विविध पक्षाच्या ८०० पदाधिका-यांनी पक्ष प्रवेश केला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी वसईत फाटक यांच शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं. बहुजन विकास आघाडी, शिवसेना ठाकरे गट, कॉग्रेस, बहुजन वंचित आघाडी, आम आदमी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. वसई विरार मध्ये गेल्या ३५ वर्षापासून बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता होती. माञ या विधानसभा निवडणूकीत मतदार राजानी नालासोपारा, वसई आणि बोईसर विधानसभेत शिवसेना आणि भाजपाने आपले उमेदवार निवडून दिले आहेत. तसेच सध्या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणूकींचे वारे वाहू लागल्याने आगामी दिवसात आणखीन मोठे धक्के देणार असल्याचं शिवसेनचे जिल्हाप्रमुखे निलेश तेंडूलकर यांनी यावेळी सांगितले आहे.

Rajan Salvi: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा धक्का! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला साळवींची सोडचिठ्ठी?

https://www.lokshahi.com/news/rajan-salvi-to-leave-uddhav-thackerays-shiv-sena

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दिप या निवासस्थानी सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यात दोन तास चर्चा झाली. आज माजी आमदार राजन साळवी हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करत आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी दुपारी ३.०० वाजता पक्षप्रवेश करण्यात येईल. याचपार्श्वभूमिवर मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत म्हणाले की, आत्ताची भेट ही मी दहा ते पंधरा दिवसांपूर्वी मी सांगितली होती. काही आमदार UBT सोडून शिवसेनेचा धनुष्यबान हातात घेतील, त्याकरिता बैठक होती. आमच्य जिल्ह्यातील राजापूर लांजा साखरबा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी त्यांच्या संदर्भातली आजची बैठक होती. किरण भैया राजन साळवी आणि मी स्वतः या बैठकीला होतो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय राजन साळवी यांनी घेतला आहे, दुपारी ठाण्यातील टेंभी नाक्याजवळ ते पक्षप्रवेश करणार आहेत. याबाबत आमची चर्चा झाली, अशी स्पष्ट प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

Bhaskar Jadhav On Rajan Salvi: राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

https://www.lokshahi.com/news/bhaskar-jadhavs-reaction-to-rajan-salvis-entry-into-shindes-shivsena-party

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दिप या निवासस्थानी सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यात दोन तास चर्चा झाली. आज माजी आमदार राजन साळवी हे पक्षात प्रवेश करत आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी दुपारी ३.०० वाजता पक्षप्रवेश करण्यात येईल. याचपार्श्वभूमिवर भास्कर जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं ऐकायला मिळालं... काही दिवसांपुर्वी ते भाजपामध्ये प्रवेश करणार होते... साळवींचा भाजप प्रवेश कोणी थांबवला याची मला कल्पना नाही... परंतु इथेही पक्षप्रवेशाला अडचण येईल असं वाटतं. मी राजन साळवींना विनंती करतो की, तुम्ही आहात तिथे थांबावा.. साळवींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला.. खड्ड्यात पडून मरण्यापेक्षा आहे तिथेच थांबावं असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

Dhananjay Munde: आताची मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस, कारवाई होणार?

Aaditya Thackeray On Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरेंकडून "गद्दार" म्हणून उल्लेख

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आज दिल्लीमध्ये आहेत. आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर दिली. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलं. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. .या टीकेनंतर जर आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली तर ही भेट महत्त्वाची असणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीमध्ये असून आदित्य ठाकरे आपल्या दिल्ली दौऱ्यात त्यांची भेट घेतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याचपार्श्वभूमिवर आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हाला जे काही बोलायचं असेल ते आम्ही रोखठोक बोलतो. आम्ही त्यांचं कौतुक केलं नाही. आम्ही आता देखील म्हणतो आहे की, ही जी निवडणुक झाली ती चोरीची निवडणुक होती. आमचा कुणीही नेता गद्दार एकनाथ शिंदेंकडे जाणार नाही. आम्ही प्रत्येक चुकीच्या गोष्टींबद्दल आंदोलन करतो आहे, कोर्टात तसेच संसदेमध्ये देखील आम्ही हे विषय घेतले आहेत. आज आपल्या महाराष्ट्रात दोन उदा. आहेत एक बीडचं आणि एक परभणीचं लोक आंदोलन करत आहेत. रस्त्यावर उतरत आहेत, सगळ्यांना माहित आहे कोण कोणाचा दोषी आहे तरी देखील मुख्यमंत्री काय करत आहेत का? असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

Rajan Salvi: कोण आहेत राजन साळवी? राजन साळवी यांचा राजकीय प्रवास

https://www.lokshahi.com/news/who-is-rajan-salvi-rajan-salvis-political-journey

निसार शेख

विधानसभा निवडणुकीनंतर याचा कोकणात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे ठाकरे गटाचे उपनेते माजी आमदार राजन साळवी हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 19 93 -94 सुमारास राजन साळवी शिवसेनेत सक्रिय झाले इतकच नाही तर रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदाच शिवसेनेचे नगराध्यक्षही झाले त्यानंतर त्यांनी राजकारणात शिवसेनेत अनेक पदं भूषवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद व शिवसेनेचे तत्कालीन नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सहकार्यान राणे यांनीच त्यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुखही केल होत. राजन साळवी यांची जिल्हाप्रमुख पदाची कारकीर्द यशस्वी ठरली होती. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी काम सुरू केलं त्यांनी आजवर अनेक आंदोलनांमध्येही सक्रिय सहभाग घेत नेतृत्व केल आहे. रत्नागिरी जिल्हयाचा जिल्हाप्रमुख सन १९९५-२००४ महाराष्ट्रात उत्कृष्ट जिल्हाप्रमुख म्हणून काम केले. सन २००४ ला मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवतिर्थावर सन्मानाची ढाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.सन २००६ रोजी राजापूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीमध्ये १६०० मतांनी पराभव झाला होता.

मात्र २००९ रोजी राजापूर विधानसभा मतदार संघातून २५,००० मतांनी आमदार म्हणून निवडून आले. पुन्हा एकदा २०१४ रोजी राजापूर विधानसभा मतदार संघातून ४०,००० मतांनी आमदार म्हणून निवडून आले. २०१९ रोजी सलग तिस-यांदा शिवसेना पक्षातून आमदार झाले. सन २०११ मध्ये अणुऊर्जा प्रकल्प आंदोलनामध्ये १९ दिवस जेलमध्ये राहावे लागले होते. शिवसेनेचा एक लढवय्या शिवसैनिक ते नेता असा त्यांचा आजवरचा प्रवास राहिला आहे. ते कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार असतानाही त्यांना आजवर मंत्रीपदाने मात्र हुलकावणी दिली आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंपानंतर शिवसेनेत फूट पडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना ठाकरे गटाचे उपनेता केलं होत. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांनी पराभव केला.

गर्भसंस्काराचा उपयोग फक्त होणाऱ्या बाळापुरता सीमित नसतो. सुरुवातीपासून गर्भसंस्कार केले, तर बाळंतिणीचं आरोग्य सुद्धा सुरक्षित राहतं. सध्या बऱ्याचदा लग्नानंतर लगेचच बाळासाठी प्रयत्न केले जात नाही. यामागे करिअर, आर्थिक स्थिरता वगैरे बरीचशी कारणं असली, तरी एक कारण असंही असतं की नवविवाहित स्त्रीला गर्भधारणा, प्रसूती नंतर वजन वाढण्याची मनात धास्ती असते. बाळ तर हवंय पण फिगर इतक्यात बिघडायला नको अशा विचारातून कुटुंब नियोजनात उगाचंच वाढ केलं जातं.

पण गर्भसंस्कार केलेले असले तर बहुतेक प्रकरणांमध्ये स्त्रीकडे बघून तिला मूळ बाळ झालं असेल असं वाटतही नाही. याचं कारणं असं की, गर्भ संस्कारांची पहिली पायरी असते, स्त्रीचा हार्मोनल बॅवेन्स आणि गर्भाशयाची तयारी. गर्भसंस्कारात गर्भधारणा सहज आणि मुख्य म्हणजे नैसर्गिक पद्धतीनी होण्यावर भर दिलेला असतो, अर्थातच त्यासाठी कोणत्याही कृत्रिम हार्मोन्सचा आधार घ्यावा लागत नाही.

गर्भधारणेसाठी शरीराची तयारी झालेली असल्यामुळे गर्भवतीला रोज रोज उलट्या, अन्नाची अनिच्छा असे त्रास होत नाही. गर्भ संस्कारात सांगितल्याप्रमाणे सुरूवातीपासून नैसर्गिक कॅल्शियम, आहार अधिकप्रमाणात आर्यन आणि औषधांची योजना केली तर संपूर्ण नऊ महिन्यात एकही रासायनिक औषध घ्यायची गरज पडत नाही. त्यामुळे औषध गरम पडलं, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याधाचा त्रास सुरू झाला असंही काही घडत नाही. त्यातही आयुर्वेदातील चरक संहितेत सांगितल्याप्रमाणे मासानुमासी म्हणजे प्रत्येक महिन्यात गर्भाचा जसजसा विकास होत असतो. त्यानुसार विशेष आहार घेतला तर, गर्भवतीचं वजन आवश्यक म्हणजे दहा ते बारा किलो इतकच वाढतं आणि प्रसूती नंतर ते पूर्णपणे उतरतं सुद्धा.

गर्भसंस्कार संगीत, सूर्य उपासना यांचा सुरुवातीपासून रोजच्या दिनक्रमात अंतर्भाव केला तर स्त्रीची मानसिकता उत्तम राहते. गर्भावस्थेत करावयाच्या विशेष योगासनांमुळे प्राणशक्तीला अधिकाधिक आकर्षित करता येतं, शिवाय सामान्य प्रसूती होण्यासाठी शरीराची तयारी होत जाते. सामान्य प्रसूत होणं हे आई आणि बाळाच्या एकंदर आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे आज संपूर्ण जगाला कळून चुकलेलं आहे. तेव्हा गर्भसंस्कार हे बाळासाठी तर आवश्यक असतातच पण स्त्रीचं आरोग्य आणि सौंदर्य टिकून राहण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतात.

Aditya Thackeray: "स्वतःच्या स्वार्थासाठी जे जातात ते जय महाराष्ट्र नाही, जय गुजरात म्हणतात"

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दिप या निवासस्थानी सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यात दोन तास चर्चा झाली. आज माजी आमदार राजन साळवी हे पक्षात प्रवेश करत आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी दुपारी ३.०० वाजता पक्षप्रवेश करण्यात येईल. याचपार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत ऑपरेशन टायगरर टीका करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते भाजपला टोला देत म्हणाले की, "भाजपचं म्हणतो भाजपचे दाग अच्छे है".

आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या सत्तेत बसलेल्या बहूमताने आलेला भाजप पक्ष, मिंधे पक्ष आणि एक राष्ट्रवादी पक्ष या तीन पक्षानी फोडाफोडी शिवाय दुसर काही नाही केल. ठीक आहे, तुम्ही आमचा पक्ष जितका फोडायचा फोडा, ज्यांना घ्यायचं आहे घ्या, जे भ्रष्ट आहेत ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना घ्या. हे जे पळून जाणारे आहेत ते जय महाराष्ट्र नाही, जय गुजरात म्हणतात. जो व्यक्ती पैशासाठी किंवा सत्तेसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी घाबरुन पळून जातो तो कधी जय महाराष्ट्र नाही म्हणू नाही शकणार तो जय गुजरात म्हणार, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

Rajan Salvi: शिवसेना पक्षप्रवेशाआधी साळवींचा राऊतांवर घणाघात, सगळंच सागितलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामंत बंधू यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आमदार राजन साळवी हे शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करत आहेत. याचपार्श्वभूमिवर राजन साळवी यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया लोकशाही मराठीला दिली आहे.

राजन साळवी म्हणाले की, गेले 38 वर्ष मी रत्नागिरीमध्ये जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक आहे. २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला.

एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तिघांना सुद्धा समजवून सांगितल की ही शिवसेना आपल्याला वाढवायची आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत अशा मोठ्या नेत्याबद्दल छोट्या कार्यकर्त्याने बोलणं उचित वाटत नाही. माझ्या मतदार संघातील माणसांना न्याय द्यायचा असेल तर मला योग्य तो निर्णय घेतला पाहिजे, अस मी बोललो होतो. त्यामुळे आता मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. कोणत्याही चौकशीला आम्ही घबरात नाही, तेव्हाही मी घाबरलो नाही आणि आता ही मी घाबरत नाही. चौकशी केली तरी मी सहकार्य करेल आणि मला खात्री आहे मी निर्दोष असेन. जेव्हा निवडणूका असतात तेव्हा आरोप होत असतात, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली.

Vinayak Raut VS Rajan Salvi: शिवसेना प्रवेशाआधी राजन साळवीआणि विनायक राऊतांमध्ये जुंपली

राजन साळवी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामंत बंधूच्या नेतृत्त्वाखाली शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याचपार्श्वभूमिवर राजन साळवी लोकशाही मराठी सोबत बोलताना त्यांनी विनायक राऊत यांच्याविषयी काही गोष्टींचा खुलासा केला होता. विनायक राऊतांमुळे ते 2024ची निवडणुक पराभूत झाले आणि त्यांच्यामुळेच ते पक्ष सोडत आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं होत. यादरम्यान आता लोकशाही मराठीसोबत बोलत असताना विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

विनायक राऊत म्हणाले की, एकदा अपयश मिळाल की, सत्तेच्या हव्यासापोटी कोणावर तरी खापर फोडाव लागत. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी घेतलेली धरसोड भूमिका आणि मतदार संघात असलेली त्यांची डागाळलेली प्रतिमा ही त्यांच्या पराभूताला कारणीभूत ठरली. हे त्यांना मान्य करावचं लागेल. रिफायनरीची दलाली करत असताना तिथल्या लोकांचा आक्रोश त्यांच्या कानावर आला नाही. राजन साळवींबद्दल सांगायचं झालं तर शिंदे गटाचे जे आताचे आमदार आहेत, निलेश राणे यांनी तर प्रत्येक सभेत सांगितल होत साळवींनी त्यांच्याकडून किती पैसे घेतले. फार काही मला आश्चर्य वाटलेलं नाही. त्यांचा विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी भविष्यासाठी मार्ग शोधायचा जो प्रयत्न केला होता त्याच्यातून भाजपमध्ये जाण्याचा सुचना त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन केला होता. पण त्यांचं दुर्दैव की भाजपने त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले आणि त्यामुळे नाईलाज असतो पुनश्च एकदा त्यांच्याशी लढले. त्यांच्या हाताखाली जाऊन शिंदे गटाच्या सामंत कुटुंबीयांच्या हाताखाली जाऊन त्यांना काम करावं लागत आहे हे त्यांचे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया विनायक राऊतांनी दिली आहे.

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आज अनेक फायदे मिळतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

मेष (Aries Horoscope)

तुम्हाला कमिशन - लाभांश - किंवा रॉयल्टीमधून फायदे मिळतील. कुटुंबातील सदस्यांना तुमच्या आयुष्यात विशेष स्थान असेल. तुम्हाला खूप काही करायचे आहे, तरीही तुम्ही आजच्या महत्त्वाच्या सर्व गोष्टी पुढे ढकलत असाल. दिवस संपण्यापूर्वी काही कृती करा, अन्यथा तुम्हाला असे वाटेल की तुम्ही संपूर्ण दिवस वाया घालवला आहे.

वृषभ (Taurus Horoscope)

पैशाशी संबंधित कोणतेही प्रश्न आज सोडवले जाऊ शकतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांना प्राधान्य द्या. त्यांच्या आनंदात आणि दुःखात सहभागी व्हा जेणेकरून त्यांना कळेल की तुम्हाला त्यांची काळजी आहे.

मिथुन (Gemini Horoscope)

आज, जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने, तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगले काम करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा देखील होईल. तुमच्या घरातील वातावरणात बदल करण्यापूर्वी सर्वांची मान्यता असल्याची खात्री करा. आज तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या. हा असा दिवस आहे जेव्हा तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वतःसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न कराल परंतु तो अपयशी ठरेल.

कर्क (Cancer Horoscope)

तुम्हाला वेळेचे मूल्य कळेल आणि तुम्ही काहीही न करता तो कसा वाया घालवला आहे हे कळेल. बाहेरील लोकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतील. तारे जवळच्या ठिकाणी राहण्याचे सुचवतात - ज्यांच्याशी तुम्ही जवळचे आहात त्यांच्यासोबत एक प्रकारची मजेदार सहल.

सिंह (Leo Horoscope)

असा दिवस जेव्हा तुम्ही आराम करू शकाल. स्वतःसाठी पैसे वाचवण्याचा तुमचा विचार आज पूर्ण होऊ शकतो. आज तुम्ही योग्यरित्या बचत करू शकाल. या राशीच्या लोकांना आज स्वतःसाठी भरपूर वेळ मिळेल. तुमच्या सामाजिक जीवनाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढा आणि तुमच्या कुटुंबासह पार्टीला उपस्थित राहण्यासाठी बाहेर जा.

कन्या (Virgo Horoscope)

मनोरंजन आणि मौजमजेचा दिवस. आज पैशाचे आगमन तुम्हाला अनेक आर्थिक समस्यांपासून मुक्त करू शकते. तुमच्या कुटुंबासोबत सामाजिक क्रियाकलाप सर्वांना आरामदायी आणि आनंददायी मूडमध्ये ठेवतील. एखाद्याला प्रेमात यशस्वी होताना पाहण्यास मदत करा.

तूळ (Libra Horoscope)

तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या सभोवतालच्या लोकांना प्रभावित करेल. तुम्ही ऑफिसमधून लवकर निघू शकता. म्हणून, तुम्ही त्याचा फायदा घ्याल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह पिकनिक किंवा बाहेर जाल. तुमचा जोडीदार खरोखर तुमचा देवदूत आहे आणि आज तुम्हाला हे कळेल. आज, जेव्हा तुम्ही खूप दिवसांनी एखाद्या जुन्या मित्राला भेटता तेव्हा वेळ किती लवकर निघून जातो हे तुम्हाला जाणवेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुमच्या जोडीदाराशी चांगली समजूतदारपणा घरात आनंद-शांती आणि समृद्धी आणतो. प्रेमप्रकरणात गुलामासारखे वागू नका. दूरचा नातेवाईक तुमच्या घरी कोणतीही पूर्वसूचना न देता येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा बहुतेक वेळ वाया जाऊ शकतो.

धनु (Sagittarius Horoscope)

तुमचा प्रचंड आत्मविश्वास आणि कामाचे सोपे वेळापत्रक यामुळे आज तुम्हाला आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. आज तुम्ही इतरांच्या सांगण्यावर पैसे गुंतवले तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. घरात दुरुस्तीचे काम किंवा सामाजिक मेळावे तुम्हाला व्यस्त ठेवण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन उत्साही असेल. दिवस फायदेशीर असेल कारण गोष्टी तुमच्या बाजूने जात आहेत आणि तुम्ही जगात शिखरावर असाल.

मकर (Capricorn Horoscope)

मानसिक शांतीसाठी काही देणगी आणि धर्मादाय कार्यात स्वतःला सहभागी करून घ्या. आज एखादा जुना मित्र तुम्हाला आर्थिक मदत मागू शकतो. तथापि, तुमची मदत तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत करू शकते. आज, तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यामुळे तुम्ही तणावात राहू शकता. आज कोणतेही वाद्य वाजवल्याने तुमचा दिवस उजळू शकतो.

कुंभ (Aquarius Horoscope)

आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही दानधर्म आणि देणग्या कराव्यात, कारण त्यामुळे मानसिक शांती मिळेल. वैयक्तिक जीवनाव्यतिरिक्त, काही धर्मादाय कार्यात स्वतःला गुंतवून ठेवा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल पण वैयक्तिक जीवनाच्या किंमतीवर नाही. तुम्ही दोघांकडेही समान लक्ष दिले पाहिजे.

मीन (Pisces Horoscope)

तुमचे व्यक्तिमत्व आज सुगंधासारखे काम करेल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांना आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या नवीन प्रकल्प आणि योजनांबाबत तुमच्या पालकांना विश्वासात घेण्यासाठीही हा काळ चांगला आहे. तुमचा जोडीदार आज तुमच्या आरोग्याबाबत असंवेदनशील होऊ शकतो.

Manoj Jarange Patil: आताची मोठी बातमी! मनोज जरांगेंनी साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं, कारण काय?

मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी 15 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली. याचसोबत त्यांनी सरकारकडे उर्वरीत 2 मागण्या 15 दिवसांत पूर्ण कर अशी मागणी देखईल केली. या 15 दिवसांत म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पर्यंत सरकारने उर्वरीत 2 मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचा ईशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

...अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार, जरांगेंचा सरकारला ईशारा

मनोज जरांगे म्हणाले की, पंधरा तारखेला साखळी उपोषण करण्याच जाहीर केलेल आहे. त्याच कारण असं होत की, सरकारच्या म्हणण्यानुसार आपण ते उपोषण थांबवलं. पंधरा तारखेला साखळी उपोषण राज्यव्यापी करायचं ठरवलं होतं ते दहा-पंधरा दिवस पुढे ढकलतो आहे. सरकार काम करत असेल तर कशाला उपोषण करायचं सरकार काम करत असेल तर सहकार्य केलं पाहिजे या भूमिकेत राहिला पाहिजे. पण, उपोषण सोडताना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होत नव्हती. काल दोन मागण्यांचा शासन निर्णय सरकारने घेतला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच कौतुक करतो चार पैकी दोन मागण्यांसाठी त्यांनी तयारी दाखवली. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, गॅझेट लागू करून म्हणून उल्लेख केला आहे. सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी तीन महिन्याचा वेळ लागणार असल्याच त्यांनी सांगितलं. नुसत शिंदे समितीला मुदतवाढ देऊन उपयोग नाही, तिला मनुष्यबळ द्या आणि कक्ष स्थापन करून द्या. राहिलेले दोन मागणीची आठ पंधरा दिवसात अंमलबजावणी करा.

Manoj Jarange Patil: मुंडेंवर कारवाई न करण्याची अजित पवारांची भूमिका, जरांगेंच वक्तव्य

जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई न करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सरकार सोडून देणार असल्याचा खळबळजनक दावा जरांगे पाटलांनी केला आहे. बीड सरपंच हत्याप्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यात सरकारचा सहभाग आहे का.? असा प्रश्न जरांगे पाटलांनी उपस्थिक केला आहे. त्याचसोबत महादेव मुंडे यांच्या पत्नीनं आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे, यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडेंची भावजय असताना अशी वेळ येऊ नये अस म्हणत, धनंजय मुंडेंसाठी ही शरमेची बाब आहे. मात्र, गरज पडली तर मी महादेव मुंडेंच्या पत्नीच्या पाठीशी उभा राहणार असं महत्त्वाचं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं आहे.

पुढे मोदी आणि फडणवीसांवर बोलत असताना जरांगे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं उद्घाटन केलं. यावर जरांगेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोदी आणि फडणवीस यांनी केलेलं भूमिपूजन फक्त नाटक आहे. तातडीने स्मारकाच काम सुरु करा, शिवाजी पार्कला छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नामकरण करा. हिंदू आणि मराठ्यांच्या नावाखाली यांना सत्ता लागते, तुम्ही स्मारक बनवू शकले नाही त्यामुळे तुमचा निषेध. तुम्ही राज्यातील जनतेच्या भावनांशी जाणून बुजून खेळता आहात, असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलल आहे.

Suresh Dhas Meet Dhananjay Munde: मोठी बातमी! आमदार सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुशपणे हत्या करण्यात आली, या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण प्रचंड तापल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये सामिल असलेल्या आरोपींना आता अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. याचा मोर्क्या वाल्मिक कराड याला देखील मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण पकडून ठेवल्याचं पाहायला मिळालं. सुरेश धस यांनी अनेक आंदोलन केली तसेच वाल्मिक कराड आणि इतर आरोपींचा खुलासा करण्यात हातभार लावला. याप्रकरणात वाल्मिक कराड सामिल असल्यामुळे धनंजय मुंडे देखील अडकल्याचं पाहायला मिळालं आहे. सुरेश धस यांनी पहिल्या दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्यावर जोर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असताना आता आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे. आजारी असल्याने धनंजय मुंडेंच्या भेटीला गेल्याचं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं आहे. त्याचसोबत ही भेट त्यांच्या निवासस्थानी झाली असून ती विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं देखील सुरेश धस म्हणाले आहेत. भेट घेणे ही वेगळी गोष्ट आणि लढा वेगळा आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये समेट झालाय का? याची चर्चा देखील सुरु झाली आहे.

आमदार सुरेश धस म्हणाले, माझी आणि धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थान भेट झाली. धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या तब्बेतेची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. कोणाच्या तब्बेतेची चौकशी करणे यामध्ये काही गैर नाही. या विषयात गजब करण्यासारखे काहीच नाही. आमचा लढा सुरुच राहणार आहे. मी त्यांचा राजीनामा मागितला नाही, त्यांच्या पक्षाचे लोकच त्यांचा राजीनामा मागे मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणे, न घेणे हे अजित पवार यांच्या हातात आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी काही गोष्टी समोर येणार आहेत त्यावेळी मी सगळ काही सांगणार आहे. असं सुरेश धस म्हणाले आहेत.

Suresh Dhas Meet Dhananjay Munde: "मी मुंडे आणि धस यांची भेट घडून आणली", चंद्रशेखर बावनकुळे यांच महत्त्वाचं वक्तव्य

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुशपणे हत्या करण्यात आली, या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण प्रचंड तापल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये सामिल असलेल्या आरोपींना आता अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण पकडून ठेवल्याचं पाहायला मिळालं. संतोष देशमुख यांची हत्याप्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांचे सर्वात जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड हे सध्या कोठडीत आहेत. पहिल्या दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्यावर जोर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असताना आता आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे. आजारी असल्याने धनंजय मुंडेंच्या भेटीला गेल्याचं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं आहे. त्याचसोबत ही भेट त्यांच्या निवासस्थानी झाली असून ती विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं देखील सुरेश धस म्हणाले आहेत. भेट घेणे ही वेगळी गोष्ट आणि लढा वेगळा आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये समेट झालाय का? याची चर्चा देखील सुरु झाली आहे. तसेच आता यावर चंदशेखर बावकुळे यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी सुरेश धस आणि धनंजय मुंडे आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो. मी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट घडून आणली आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस दोघेही भावनिक आहेत, काही काळाने दोघांचे मतभेद दूर होतील. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची पारिवारिक भेट झाली आहे. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे. आम्ही तिघे ही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

Ranveer Allahabadia Went Missing: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया बेपत्ता! पोलिसांच्या संपर्काबाहेर

प्रसिद्ध युट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच त्याचा नवीन एपिसोड समोर आला आहे. यामध्ये युट्यूबर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह व रणवीर अलाहबादिया यांनी हजेरी लावली होती. यावेळी राणवीर अलाहबादिया याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमामध्ये रणवीरने आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर रणवीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

रणवीर अनेकदा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येतो. त्याचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळतात. अनेकदा त्याला ट्रॉलिंगलादेखील समोरे जावे. मात्र यावेळी त्याने शोमधील एका महिलेला आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याने संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा, समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या वादावर समय रैनाने भाष्य करत इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ त्याच्या चॅनलवरून काढून टाकल्याचे म्हटलं आहे. या सगळ्या वादावर समय रैनाने मौन सोडलं आहे. इन्स्टा पोस्टमधून समय रैनानं आपलं म्हणणं मांडलं.

तर आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे रणवीर अलाहाबादियाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. गुरुवारी संध्याकाळी मुंबई पोलिस चौकशी दरम्यान रणवीरच्या घरी गेले तेव्हा घराला कुलूप होते. रणवीर पोलिसांच्या संपर्काबाहेर आहे. त्याचा फोन देखील बंद असल्याचं समोर आलं आहे. त्याचसोबत तो घरातून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रणवीर अलाहाबादिया बेपत्ता, पोलिसांकडून तपास सुरु

Jitendra Awhad : प्रेम Valentine Day ला बाहेर आलं, धस- मुडेंच्या भेटीवर आव्हाडांचा चिमटा

आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेतली आहे. आजारी असल्याने धनंजय मुंडेंच्या भेटीला गेल्याचं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं आहे. त्याचसोबत ही भेट त्यांच्या निवासस्थानी झाली असून ती विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं देखील सुरेश धस म्हणाले आहेत. भेट घेणे ही वेगळी गोष्ट आणि लढा वेगळा आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये समेट झालाय का? याची चर्चा देखील सुरु झाली आहे. तसेच यावर चंदशेखर बावकुळे यांनी एक मोठा खुलासा केला. ही भेट त्यांनीच घडवून आणल्याचं बावनकुळे म्हणाले. त्याचसोबत त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस आणि मुंडे यांच्या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, साडेचार तास भेट झाली चार दिवसापूर्वी भेट झाली..लपून भेटले हे मला तरी योग्य वाटणार नाही...डिसेंबर महिन्यापासून धस धनंजय मुंडे तोफा टाकत होते अचानक म्हणतात मी राजीनामा मागितला नाही...हे सर्व प्रकरण उघडकीस कसा आलं तर बावनकुळे यांनी सांगितलं, हे दोघे भेटले आणि मी होतो साडेचार तास भेट...धस साहेब अतिशय समाजशील झालेत संत परंपरे....संतोष शिंदे च्या आईला जसा त्यांनी सल्ला दिला कोणी काय केला असेल त्यांना माफ करा तसेच त्यांनी धनंजय मुंडेंना देखील माफ करून टाका....एवढ्या प्रामाणिकपणे हा माणूस काम करत होता अचानकपणे यु टर्न का मारलाय हे काय कळायला मार्ग नाही....साडेचार तास भेटले असतील तर मराठीत एक गाणं म्हटले असेल तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्याचा माळा...महाराष्ट्राने जे दोन महिने बघितलं ते सर्व महाराष्ट्राने विसरून जायचं...

एखादा विषय हातात घेतल्यावर तो तडीस नेणे तो स्वभाव गुण समजू शकतो, पण तो सोडून देणे हे दुर्गुण असतं...बीडच्या राजकारणात दोघांचा सख्याच होतं...आका आका आहे अजूनही अजितदादा म्हणताहेत राजीनामा घेणार नाही...एग्रीकल्चरचा घोटाळा बाहेर आला, हार्वेस्टरचा घोटाळा बाहेर आला, दहा रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला घेतल्याचा घोटाळा बाहेर आला, एकनाथ शिंदेंवर टाकून मोकळा झाले...एकनाथ शिंदे यांना काय माहिती नसताना देखील त्यांना ओढून घेतला त्या प्रकरणात...आज अजितदादा म्हणाले राजीनामा घेणार नाही, तुम्हाला कोण सांगतंय राजीनामा घ्यायला राजीनामा घ्यायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री घेतील...विरोधी पक्षाची ठाम भूमिका आहे आम्ही राजीनामा घेणारच....

तुम्ही शेतकऱ्यांना फसवणार तुम्ही कृषी खात्यात भ्रष्टाचार करणार हार्वेस्टर संदर्भात वाल्मीक कराड तुमचे पैसे जमा करणार तुमच्या बंगल्यामध्ये मीटिंग होणार तो वाल्मीक कराड म्हणणार तो माझा माणूस आणि तो तिथे मर्डर करणार तुमच्या इलेक्शनच्या वेळेस कैलास फड नावाचा माणूस भूत कॅप्चर करणार गुना नोंदवला जातो तो तुमचा खास माणूस जो स्टेटस ठेवतो तुमच्याबद्दल चांगलं बोलतो...पोलीस त्याचा नावही घेत नाही पुण्यामध्ये यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे म्हणून आम्ही म्हणतो की राजीनामा घ्यायला पाहिजे...आम्हाला कमी ऐकू येतं...दोघांनी गाणी म्हटले असतील ये दोस्ती हम नही छोडेंगे...दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा....प्रेम व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी बाहेर पडलं रोज डे च्या दिवशी पुष्पगुच्छ देऊन भेटले असतील, आज बाहेर पडला सगळे डे साजरे केले असतील त्यांनी

'LOKशाही' च्या बातमीनंतर वाळू माफियांचे धाबे दणाणले; वाळू आणि गौण खनिज तस्करी करणाऱ्यांवर कारवाई

वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी मदत करणं हे पोलिसांचं काम आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगळाच प्रकार उघडकीस आला. वाळूमाफियांवर कारवाई करण्यास गेलेल्या तहसीलदारांना तीन तास बसवून ठेवल्याची घटना संभाजीनगमध्ये घडली. यात तीन तासांत वाळूमिफियांनी पोबारा केल्यामुळे, पोलिसांनीच वाळूमाफियांना मदत केली का? असा सवाल विचारला गेला. अशातच लोकशाही मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू आणि गौण खनिज तस्करी करणाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. विना क्रमाकांच्या 26 वाहनांवर दंडात्मक कारवाई झालेली आहे.

Degree in Cricket : आता क्रिकेटमध्ये ही होता येणार पदवीधर! मुंबई विद्यापीठात मिळणार क्रिकेटची पदवी, अभ्यासक्रम काय?

क्रिकेटसाठी अनेक क्षेत्रांतून मदत मिळत असते कारण आता क्रिकेट हा व्यावसायिक खेळ झाला आहे. तुम्हाला देखील क्रिकेटचं ज्ञान आहे? क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे? कधी विचार केला आहे का की, क्रिकेटमध्ये तुम्हाला पदवी घेता आली तर? आता ते शक्य आहे, कारण मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने मुंबई क्रिकेट संघटना लवकरच एमसीए पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे. संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला क्रिकेटचा अभ्यास करून पदवीधर होता येणार आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेणारा विद्यार्खी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सदस्य असावा. त्याने अंडर 19, 23 वर्षाखाली खेळले पाहिजे. हे लक्ष्य ठेवून हा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. क्रिकेटमधल्या वेगवेगळ्या टेक्निक शिकवणारे हे हायब्रीड मॉडेल आहे. यामध्ये तुम्हाला मैदानाची निगा, तसेच खेळपट्टी तयार करणारे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच यांसारख्या विविध बाबींमध्ये या अभ्यासक्रमाद्वारे परिपूर्ण होता येईल. यात क्रिकेटपटूंना मैदानावर शिकण्याचा अनुभव मिळेल तसेच खेळताना त्यांना विविध विषयांत व्यावसायिक कौशल्य मिळवता येईल. त्याचबरोबर त्यांना शैक्षणिक पात्रताही मिळेल.

अभ्यासक्रमात काय शिकवणार?

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट नॉलेज सेंटर चालवण्यात येते. क्युरेटर, स्कोरर, अंपायर याचा एक भाग आहे. खेळपट्टी तयार करणारे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच यांसारख्या विविध अभ्यासक्रमाचा समावेश आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई युनिव्हर्सिटीसोबत एकत्र येऊन ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम चालवला जाणार आहे. मुंबई विद्यापीठात हायब्रीड प्रोग्रॅम आहेत. चांगल्या नोकरीसाठी ग्रॅज्युएशन महत्त्वाचा आहे.

Sanjay Raut: धस, मुंडे, वाल्मिक कराड एकच; मुंडे-धस भेटीवर संजय राऊत यांचा संताप

आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेतली आहे. आजारी असल्याने धनंजय मुंडेंच्या भेटीला गेल्याचं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं आहे. त्याचसोबत ही भेट त्यांच्या निवासस्थानी झाली असून ती विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं देखील सुरेश धस म्हणाले आहेत. भेट घेणे ही वेगळी गोष्ट आणि लढा वेगळा आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये समेट झालाय का? याची चर्चा देखील सुरु झाली आहे. तसेच यावर चंदशेखर बावकुळे यांनी एक मोठा खुलासा केला. ही भेट त्यांनीच घडवून आणल्याचं बावनकुळे म्हणाले. त्याचसोबत त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

सुरेश धस, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत

मला बीडमधील एका नेत्याने सांगितलं होत की, सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेवू नका. मला तेव्हा वाटलं होतं की, सुरेश धस संतोष देशमुख हत्या प्रकरणात या लढ्याचे नेतृत्व करतील ते देशमुख कुटुंबीयांना न्याय देतील. पण मला त्यावेळी लोकांनी समजावले की, तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका, धस हे कधीही पलटी मारतील. सुरेश धस, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत, ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. मला वाईट वाटत आहे की, का विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला. ती लहान मुल आणि तिथली लोकं बिचारी सुरेश धसांच्या मागे न्यायासाठी धावत होते या आशेने की हा माणूस आम्हाला न्याय देईल. सुरेश धस यांनी हे कृत्य केले असेल, तर देव त्यांना क्षमा करणार नाही. असा खोटारडेपणा केला असेल आणि देशमुख कुटुंबीयांच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर बीडची जनता नाही, राज्याची जनता लक्षात ठेवेल. तुम्ही जे कृत्य केलेलं आहे ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही. जर त्यांनी तस केल असेल तर, ते विश्वासाघातापेक्षाही पुढचे पाऊल आहे. मवा लोक वारंवार सांगत होते एका नाण्याला दोन बाजू असतात याला तीन बाजू आहेत. पण मी विश्वास ठेवला नाही. तरी मला अपेक्षा आहे की, सुरेश धसांकडून असं कृत्य होणार नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

New India Co-operative Bank: न्यू इंडिया बँकेवर निर्बंध, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

मुंबईमधील अंधेर येथील न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लावले आहेत. याबद्दलचे आदेश गुरुवारी बँकेला देण्यात आले. या आदेशांनुसार बँक पुढील सहा महीने कर्ज देऊ शकणार नाही. तसेच पैसे काढू शकणार नाहीत आणि खात्यावर भरूही शकणार नाहीत. या सगळ्या प्रकारानंतर ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. याचपार्श्वभूमिवर राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान भाजपचे आशिष शेलार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी यादरम्यान आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आशिष शेलार म्हणाले की, आरबीआयने जी कारवाई केली असेल, ती कारवाई आरबीआयच्या नियम आणि कायद्याच्या चौकटीत कारवाई केली आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे अजून लोकांचे पैसे सुरक्षित राहावे, या दृष्टिकोनातून ही कारवाई केली आहे. मला वाटत या विषयामध्ये केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहतील, लोकांना पैसे परत मिळतील याची काळजी घेतील, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बॅंकचं असं काही होण खुप वाईट आहे कारण त्यात एक गरीब फसला जातो. गरीब त्यांचे पैसे बॅंकमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी जमा करतात आणि अस काही झालं तर त्यांच मोठ नुकसान होत. मी सहकार मंत्री अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांच्याशी स्वत बोलणार आहे आणि या प्रकरणी तोडगा काढावा अशी विनंती करणार आहे. मागे देखील पीएनबी बँकेत घोटाळा झाला होता सर्वसामान्य नागरिक भरडले जातायत. यावर योग्य तो मार्ग निघावा यासाठी स्वत प्रयत्न करणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Ramdas Kadam: 'लाज वाटली पाहिजे, उद्धव ठाकरे तुम्ही सगळं गमावलं', रामदास कदमांचा हल्लाबोल

आज रत्नागिरीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची सभा झाली. या सभेत अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून उद्धव ठाकरेंना शिंदे गटाच्या नेत्यांनी सुनावले आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत झालेल्या सत्कारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शरद पवार यांच्यावर देखील टीका केली होती. यावरून आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर देखील टीकांचा वर्षाव केला आहे. लाज वाटली पाहिजे, उद्धव ठाकरे तुम्ही सगळं गमावलं असं म्हणत उद्धव ठाकरेंवर बोलताना रामदास कदम यांनी हल्लाबोल केला आहे. त्याचसोबत राजन साळवींचा पक्ष प्रवेश ही उध्दव ठाकरे यांना राजकीय कानफट असल्याच देखील रामदास कदम म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेवून सर्व काही गमावले - रामदास कदम

रामदास कदम म्हणाले की, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज इथे हे भगवे वादळ पाहून खुप आनंद झाला ही भगवी लाट पाहून आज शिवसेना प्रमुखांची आठवण आली. बाळासाहेबांना आज सांगू इच्छितो कोकणात आजही शिवसेना आपल्या सोबत आहे. शिंदे साहेब बाळासाहेब तुम्हाला आशीर्वाद देतील एकनाथ मी तुझ्या सोबत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार जिवंत ठेवलेत. उद्धव ठाकरेनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले, शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होवू शकले नसते का? पण ते झाले नाही. उद्धव ठाकरे तुम्हाल लाज वाटली पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्री पदी विराजमान झालात आणि शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेवून सर्व काही गमावले. रत्नागिरी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष शिवसेनेचा असेल. एक दिवस असा येईल की रात्री दोन वाजता तुम्हाला हा देश सोडून लंडनला जावे लागेल. लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे. श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे. आम्ही सुद्धा 50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे दहा-पंधरा लोक राहिले आहेत, त्यातील एकही दोन वर्षांत राहणार नाही. एकनाश शिंदे यांच्या विरोधात बोलला तर याद राखा, असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना खरीखोटी सुनावली आहे.

MC Election Mahayuti: निवडणुका भाजप स्वबळावर लढणार? शिवसेनेत कुजबूज सुरु

येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी भाजप आता तयारी करत असल्याची कुजबूज शिवसेनेत आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजून ही महायुतीसोबत निवडणुक लढवण्याच्या वाटचालीवर असल्याच पाहायला मिळत आहेत. ज्या बैठका भाजप घेत आहेत त्या स्वबळावर लढण्याच्या सुचना भाजप देत आहेत. पण महापालिका निवडणुका कशा काढायच्या यामध्ये अजूनही महायुतीचा संभ्रम पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर आता राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.

संजय राऊत म्हणाले की, अमित शाहा यांनी शिवसेनेमध्ये फुट पाडली. आता एकनाथ शिंदेंकडे जी शिवसेना आह ती खरी अमित शाहा यांनी आहे. अमित शाहा जे बोलायला सांगतील तेच एकनाथ शिंदे म्हणती. एकनाथ शिंदे यांचा कोणताही पक्ष नाही, अमित शाहा यांनी आता तो पक्ष एकनाथ शिंदे यांना संभाळायला दिला आहे. अमित शाहा यांना जे हव तेच एकनाथ शिंदे बोलतील. अमित शाहा दुसरी काय भूमिका घेणार जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत तेच अस वागणार, असं म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अमित शाहा यांना टोला लगावला आहे.

पुढे संजय शिरसाट म्हणाले की, भाजपने काय भूमिका घेतली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आमचं मत आहे, आम्ही युती म्हणून सर्व निवडणुका लढवाव्या. भाजपाला वाटत असेल कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्वतंत्र लढायला हवं, तर ही भूमिका शिवसेनेची देखील स्वतंत्र लढण्याची आहे. स्वबळावर लढल्यानंतर निवडणुकीनंतर युती करायची असेल तर युती करायची असेल तर आमची सहमती आहे. काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा. आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल. आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे. आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये. महायुतीमध्ये लढायचं असेल तर हा म्हणा, नाही लढायचं असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत.

Ambadas Danve: उद्धव ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू, अंबादास दानवेंची माध्यमांना प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू आहे अशी चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली ज्यामध्ये विनायक राऊत,अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब यांच्यासह इतर नेत्यांची बैठकीसाठी उपस्थित पाहायला मिळाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताणा पाहता डॅमेज कंट्रोलसाठी काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर विचारमंथन होणार. याचपार्श्वभूमिवर आता उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, ही बैठक संघटनेच्या नियमित कामकाजासाठी होती. लोकसभा विधानसभा निवडणूक झाली सदस्य नोंदणी सुरू झाले. कशा प्रकारे काम सगळ्यांनी करावे यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. संघटना कोणासाठी थांबत नाही संघटन चालत राहते, शिवसेना कोणासाठी थांबणार नाही. ज्यावेळी कोकणातून नारायण राणे गेले त्यानंतर शिवसेना पुढे गेली. राणे मुख्यमंत्री राहिलेले होते निश्चित आताही चांगले लोक जात आहेत मात्र शिवसेना यावर मात करेल. तसेच भास्कर जाधव यांच्या नाराजीवर अंबादास दानवे म्हणाले की, भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत मी त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. त्यांची समजूत पक्षप्रमुख काढतील, मात्र एखादी प्रतिक्रिया दिली म्हणजे नाराज आहेत असे नाही. भास्कर जाधव शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते आहेत पक्षाचे नेते आहेत त्यामुळे या जबाबदाऱ्या मोठ्या आहेत. त्यांचे आणि उद्धवजी यांचे नेहमी बोलणे होत असते त्यांच्यात नियमित संवाद आहे. आज ते बैठकीला व्हिडिओच्या माध्यमातून होते.

भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ... अशा व्यक्तीच्या मार्गदर्शन भविष्यात आम्हाला मिळणार असेल तर आम्ही स्वागत करू... त्यांनी काय करावे आणि नाही हा त्यांचा प्रश्न... पण त्यांच्या अनुभव आणि त्यांची शैली यांचा उपयोग करून घ्यायला काहीजण कमी पडले. भास्कर जाधव नाराज असतील तर ते स्वतः सांगतील... त्यांचा नेतृत्व संघटन कौशल्याचं... त्यांचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचे दुर्दैव भास्कर जाधव यांचा नाही. मी माझ्या आयुष्यात कोणाचाही अनादर करणारा वक्तव्य केला असल्यास राजकीय संन्यास घेईन. भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ... अशा व्यक्तीच्या मार्गदर्शन भविष्यात आम्हाला मिळणार असेल तर आम्ही स्वागत करू... त्यांनी काय करावे आणि नाही हा त्यांचा प्रश्न... पण त्यांच्या अनुभव आणि त्यांची शैली यांचा उपयोग करून घ्यायला काहीजण कमी पडले. भास्कर जाधव नाराज असतील तर ते स्वतः सांगतील... त्यांचा नेतृत्व संघटन कौशल्याचं... त्यांचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचे दुर्दैव भास्कर जाधव यांचा नाही. मी माझ्या आयुष्यात कोणाचाही अनादर करणारा वक्तव्य केला असल्यास राजकीय संन्यास घेईन

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: "साळवींचा पक्ष प्रवेश म्हणजे ठाकरेंना राजकीय कानफट" रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

रत्नागिरीचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडत शिवसेनेत प्रवेश केला. यावर रामदास कदम म्हणाले की, राजन साळवींचा पक्ष प्रवेश म्हणजे उध्दव ठाकरेंसाठी राजकीय कानफटात आहे. राज्यातील अनेक नेते पक्ष प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. अशा अनेक कानफटात त्यांना खायच्या आहेत. उध्दव ठाकरे यांच्या सोबत कोणीही राहणार नाही. त्यांच्यावर शेवटी हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल. राजन साळवी हे उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहिले पण यांच्याकडचे सगळे संपत आहे हे यांच्या लक्षात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला हे महाराष्ट्राला कळले आहे. यापूर्वी मी राजन साळवी यांना फोन केला असता तर ते कधीच शिवसेनेत आले असते. राजन साळवी माझ्या भावाप्रमाणे आहे. पुढे संजय राऊत यांना टोला देताना रामदास कदम म्हणाले की, संजय राऊत एकाच दगडात दोन पक्षी मारत आहेत. एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व आहे, म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. उध्दव ठाकरेंचे कर्तृत्व काय? शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. आपण कोणावर टीका करत आहोत, याचे भान संजय राऊत यांनी ठेवायला हवे. संजय राऊत हे केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात. पुढच्या दोन दिवसात संजय राऊत शरद पवारांची जाऊन माफी मागतील, असेही कदम म्हणाले.

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना मिळेल आधी गुंतवलेल्या पैशांचा फायदा, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

https://www.lokshahi.com/aajch-rashibhavishya/httpswwwlokshahicomaajch-rashibhavishyahttpswwwlokshahicomaajchrashibhavishyawwwlokshahicomnewshoroscope-of-rd-16february-2025

आजचा सुविचार

https://www.lokshahi.com/aajcha-suvichar/aajcha-suvichar-motivation-thought-of-the-day

Delhi Railway : प्रयागराजला जाणाऱ्या गाड्या रद्द झाल्याने नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी

https://www.lokshahi.com/maha-kumbh/stampede-at-new-delhi-station-as-trains-to-prayagraj-cancelled

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी दरम्यान 15 ते 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सोमर आली आहे. तसेच या घटनेत अनेक जण जखमी झाले असून रेल्वे मंत्रालयाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रयागराजला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती, त्यामुळे रेल्वे प्रशासन अडचणीत आले आहे. प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द झाल्यानंतर ही घटना घडली असून रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 14 आणि 15 वर चेंगराचेंगरी झाली. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, रात्री 9:30 वाजता रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 14 आणि 15 वर ही दुर्दैवी घटना घडली. प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे प्लॅटफॉर्मवर गोंधळ उडाला.

यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर ट्वीट करत यासंदर्भात काही माहिती दिली आहे. मोदींनी म्हटलं आहे की, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझे संवेदना आहेत. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. या चेंगराचेंगरीत बाधित झालेल्या सर्वांना अधिकारी मदत करत आहेत".

Karuna Sharma On Suresh Dhas: "धस यांना अडकवलं जातंय", करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप

https://www.lokshahi.com/news/karuna-sharm-makes-serious-allegations-on-meeting-between-suresh-dhas-and-dhananjay-munde

नुकतीच आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाली. ही भेट रुग्णालयात झाली असून चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट घडवून आणल्याचं त्यांनी स्वतः म्हटलं होत. यावर सुरेश धस यांनी आपली बाजू मांडत ही भेट केवळ मंत्री धनंजय मुंडेंची विचारपूस करण्यासाठी करण्यासाठी झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर अनेक राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळाले. अनेक नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया देखील देण्यात आल्या आहेत. याचपार्श्वभूमिवर आता करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधत सुरेश धस यांना अडकवलं जात असल्याचा दावा केला आहे.

याचपार्श्वभूमिवर करुणा मुंडे म्हणाल्या की, राजकारणी लोकांनी तोडाफोडीचं राजकारण सुरु केल आहे. संतोष देशमुख हत्या कांड प्रकरण लोकांनी धरून ठेवल असताना, आता या राजकारणात सुरेश धस यांना अडकल जात आहे. मात्र, सुरेश धस हे माघार घेणार नाही. त्यांनी माघार घेतली तर मी फडणवीसांना भेटायला जाणार. मी सुद्धा तुरुगांत राहीली आहे, मला माहिती आहे तुरुगांत काय चालत. मी तुरुंगात काय होत हे सांगणार आणि मी माझ ब्रम्हास्त्र बाहेर काढेन, असा इशारा करुणा मुंडेंनी दिला आहे. तसेच याबाबत पुर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Ajit Pawar On GBS: जीबीएस आजार पाण्यामुळे नव्हे, कोंबड्यांमुळे; जीबीएसबाबत पवारांचं मोठं वक्तव्य

जीबीएसची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं सध्या समोर येत आहे. या आजाराची लागण होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतचं चाललेली आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीबीएसबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, जीबीएस हा आजार पाण्यामुळे झाल्याची चर्चा होती, मात्र कोंबड्यांचे मांस खाल्ल्यामुळे हा आजार होत असल्याचं पुढे येत आहे, कोंबड्यांचे मांस कच्चे किंवा कमी शिवजवलेले खाल्ल्याने हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. पण लगेच आता तुम्ही कोंबड्या मारण्याची किंवा जाळून टाकण्याची गरज नाही. तुम्ही ते अन्न चांगल्या प्रकारे आणि पुर्ण शिजवून खाल्ल पाहिजे. आता बघायला गेलं तर जीबीएस बाधित रुग्णांची संख्या बऱ्या पेकी आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मी याबाबत मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांसोबत बोलणार आहे. मात्र, तुम्ही देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि अन्न पुर्ण शिजवून खाल्ले पाहिजे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केल आहे.

Elon Musk: "Elon Musk माझ्या मुलाचे पिता"; अमेरिकन Influencer चा एलोन मस्क यांवर गंभीर आरोप

इलॉन मस्क यांच्यावर एका अमेरिकन इन्फ्लूएन्सरने गंभीर आरोप केलेला आहे. इलॉन मस्क हे आपल्या मुलाचे पिता आहेत असा आरोप इलॉन मस्क यांच्यावर करण्यात आलेला आहे. अमेरिकन इन्फ्लूएन्सर अॅशले सेंट क्लेअर यांनी हा दावा केलेला आहे. मुलाच्या सुरक्षेच्या कारणामुळे आधी सांगितलं नाही असं देखील अॅशले सेंट क्लेअर यांनी म्हटलं आहे. इलॉन मस्कला आधीच 12 मुले आहेत. अमेरिकन इन्फ्लूएन्सर अॅशले सेंट क्लेअर यांनी दावा केला आहे की, त्या टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या मुलाच्या आई आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी 5 महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाला गुप्तपणे जन्म दिला पण सुरक्षितता आणि गोपनियतेमुळे ते आधीच जाहीर केलं नाही. अॅशले सेंट क्लेअर यांनी यादरम्यान सोशल मीडियवर पोस्ट शेअर केली आहे. जर अॅशले सेंट क्लेअर यांचा दावा खरा असेल तर हे इलॉन मस्क यांचे 13 वे मुल असेल. इलॉन मस्क यांना 2 बायका आणि 3 गर्लफ्रेंड्स पासून 12 मुल असल्याची माहिती समोर आली आहे.

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना नवीन संधी फायदेशीर ठरतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

मेष (Aries Horoscope)

कुटुंबातील सदस्यांसोबत काही आरामदायी क्षण घालवा. आज तुमचा प्रियकर तुमच्यासमोर त्याच्या भावना उघडपणे शेअर करू शकणार नाही, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. इतरांना अशा गोष्टी करण्यास भाग पाडू नका ज्या तुम्ही करणार नाही. तुमचे चुंबकीय-बाह्य व्यक्तिमत्व तुम्हाला प्रसिद्धीच्या झोतात आणेल. तुमचे वैवाहिक जीवन कंटाळवाणे वाटू शकते.

वृषभ (Taurus Horoscope)

आर्थिक सुधारणा तुम्हाला तुमचे दीर्घकाळचे थकलेले कर्ज आणि बिल भरण्यास सोयीस्कर बनवेल. दूरच्या नातेवाईकाकडून दीर्घकाळापासून वाट पाहत असलेला संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आणि विशेषतः तुमच्यासाठी चांगली बातमी देईल. तुम्ही एखाद्या पिकनिक स्पॉटला भेट देऊन तुमचे प्रेम जीवन उजळवू शकता.

मिथुन (Gemini Horoscope)

आज तुम्हाला आरामात बसून राहण्याची गरज आहे - आणि छंद आणि तुम्हाला सर्वात जास्त आवडणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतून जा. तुमच्या निवासस्थानासंबंधी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक तणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळ आपल्याला बरेच काही देतो. स्वतःवर दया करण्यात वेळ वाया घालवू नका तर जीवनाचे धडे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या व्यत्ययामुळे तुमचा दिवस थोडासा अस्वस्थ होऊ शकतो.

कर्क (Cancer Horoscope)

आर्थिक सुधारणा तुम्हाला आवश्यक वस्तू खरेदी करण्यास सोयीस्कर बनवेल. तुमचा विनोदी स्वभाव तुम्हाला सामाजिक मेळाव्यांमध्ये लोकप्रिय बनवेल. तुमचे प्रेमसंबंध जादुई होत आहेत; फक्त ते अनुभवा. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर असेल परंतु तुम्हाला भागीदारांकडून काही विरोध होण्याची शक्यता आहे. प्रवास आनंददायी आणि अत्यंत फायदेशीर असेल. पाऊस प्रेमासाठी ओळखला जातो आणि तुम्हाला दिवसभर तुमच्या जोडीदारासोबत असाच आनंद अनुभवायला मिळेल.

सिंह (Leo Horoscope)

तुमचा सततचा प्रयत्न, सामान्य ज्ञान आणि समजूतदारपणा तुमच्या यशाची हमी देईल, म्हणून धीर धरा. आज तुम्हाला व्यवसायात प्रचंड नफा मिळू शकतो. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवीन उंची देऊ शकता. धार्मिक स्थळाला किंवा नातेवाईकाला भेट देण्याची शक्यता तुमच्या कार्डवर आहे. तुमचे प्रेम जीवन आयुष्यभराच्या बंधनात बदलू शकते म्हणून लग्नाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. तुमचा बायोडाटा पाठवण्यासाठी किंवा मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी चांगला दिवस आहे.

कन्या (Virgo Horoscope)

आज शांत राहा-तणावमुक्त राहा. पैसे कमावण्याच्या नवीन संधी फायदेशीर ठरतील. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित चांगली बातमी संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणि उत्साह घेऊन येईल. आज तुम्हाला जाणवेल की तुमचा प्रियकर तुमच्यावर किती प्रेम करतो. अशा लोकांशी सहवास करा जे स्थापित आहेत आणि भविष्यातील ट्रेंड्सची माहिती देऊ शकतात. घाईघाईने निर्णय घेऊ नका ज्याचा तुम्हाला नंतर पश्चात्ताप होईल. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत वाटेल, कारण तुमचा पत्नी तुमच्याशी त्यांच्यासारखाच वागणार आहे.

तूळ (Libra Horoscope)

तुम्ही स्वतःला संयमित ठेवा आणि लक्षात ठेवा की ते तुमच्यामध्ये फक्त एक अडथळा निर्माण करेल. तुम्ही लोकप्रिय व्हाल आणि विरुद्ध लिंगाच्या सदस्यांना सहजपणे आकर्षित कराल. आज तुम्ही मिळवलेले अतिरिक्त ज्ञान तुम्हाला समवयस्कांशी व्यवहार करताना फायदा देईल. तुमच्या ताकदी आणि भविष्यातील योजनांचे पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ आली आहे. तुमचा जोडीदार आज खरोखरच चांगल्या मूडमध्ये आहे. तुम्हाला एक आश्चर्य वाटू शकते.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या भावना ओळखा. तुम्ही तुमचे नकारात्मक विचार जसे की भीती, शंका, राग, लोभ इत्यादी सोडून द्यावेत कारण हे तुमच्या इच्छेच्या अगदी विरुद्ध आकर्षित करणाऱ्या चुंबकांसारखे काम करतात. या राशीच्या लोक जे परदेशातून व्यवसाय करतात त्यांना आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त काम करण्याची तुमची क्षमता त्यांच्या कामगिरीत मंद असलेल्यांना चकित करेल. तुम्ही संपूर्ण दिवस मोकळे राहू शकता आणि टीव्हीवर हवे तितके चित्रपट आणि कार्यक्रम पाहू शकता.

धनु (Sagittarius Horoscope)

एखादा मित्र तुमच्या मोकळ्या मनाची आणि सहनशीलतेची परीक्षा घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या मूल्यांना बळी पडू नये आणि प्रत्येक निर्णयात तर्कसंगत राहावे याची काळजी घेतली पाहिजे. आवश्यक घरगुती वस्तूंवर पैसे खर्च केल्याने, आज तुम्हाला निश्चितच आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, परंतु यामुळे तुम्हाला भविष्यातील अनेक संकटांपासून वाचवता येईल. तुमचे हास्य तुमच्या प्रियकराच्या दुःखावर सर्वोत्तम उपाय आहे.

मकर (Capricorn Horoscope)

आज तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील, परंतु तुम्हाला अनावश्यक गोष्टींवर जास्त खर्च किंवा खर्च करू नका हे लक्षात ठेवावे लागेल. घरात उत्सवाचे वातावरण तुमचा तणाव कमी करेल. तुम्हीही यात सहभागी व्हा आणि मूक प्रेक्षक म्हणून राहू नका याची खात्री करा. आनंदासाठी नवीन नात्याची वाट पहा. तुमच्या ध्येयांचा पाठलाग करण्यासाठी शुभ दिवस. तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत राहाल, ज्याचा तुम्हाला दिवसभर फायदा होईल. वेळेअभावी तुमच्या आणि तुमच्या प्रियकरामध्ये निराशा वाढेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

आज अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय आर्थिक नुकसान होऊ शकेल असे कोणतेही पाऊल किंवा कृती उचलू नका. नातेवाईकाकडे जाणारी छोटीशी सहल तुमच्या दैनंदिन धावपळीच्या वेळापत्रकातून आराम आणि विश्रांतीचा क्षण आणते. समाधानकारक परिणाम मिळविण्यासाठी गोष्टींचे नियोजन करा - ऑफिसमधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताना तुमच्या मनात तणाव निर्माण होतो. तुमचा वेळ चांगला वापरायला शिका. जर तुमच्याकडे मोकळा वेळ असेल तर काहीतरी सर्जनशील करण्याचा प्रयत्न करा.

मीन (Pisces Horoscope)

आरोग्याशी संबंधित समस्या अस्वस्थता आणू शकतात. मोठ्या योजना आणि कल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्या व्यक्तीची विश्वासार्हता आणि सत्यता पडताळून पहा. कौटुंबिक तणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळ आपल्याला बरेच काही देतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून लक्ष कमी वाटत असेल, परंतु दिवसाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तो/ती फक्त तुमच्यासाठी व्यवस्था करण्यात व्यस्त होती.

Ranveer Allahbadia: "पळून गेलो नाही, जीवे मारण्याची धमकी" रणवीर अलाहबादियाची खळबळजनक पोस्ट

प्रसिद्ध युट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' शो दरम्यान रणवीर अलाहबादिया वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातून टीका करण्यात आल्या. तसेच नेटकरींकडून रणवीरला संतप्त प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. नुकतीच रणवीर अलाहाबादियाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. गुरुवारी संध्याकाळी मुंबई पोलिस चौकशी दरम्यान रणवीरच्या घरी गेले असता त्याच्या घराला कुलूप दिसले. रणवीर पोलिसांच्या संपर्काबाहेर असल्याचं देखील समोर आलं. त्याचा फोन देखील बंद असल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळे तो घरातून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आलं होत. असं असताना रणवीर अलाहबादिया बाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. यादरम्यान रणवीर अलाहबादियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्याने तो पळून जात नसल्याचं स्पष्ट केले आहे. त्याचसोबत त्याने त्याला मिळत असलेल्या धमक्यांबद्दल देखील सांगितले आहे. त्याला जीवे मारण्याच्या आणि त्याच्या कुटुंबाला हानी पोहोचवण्याच्या धमक्या येत आहेत, याबद्दल देखील तो बोलला आहे.

रणवीर अलाहबादिया पोस्टमधून नेमकं काय म्हणाला?

माझी टीम आणि मी पोलीस आणि इतर सर्व प्राधिकरणांना सहकार्य करत आहोत. मी योग्य प्रक्रियेचे पालन करीन आणि सर्व एजन्सींसाठी उपलब्ध असेल. पालकांबद्दलची माझी टिप्पणी असंवेदनशील आणि अनादर करणारी होती. पोलीस आणि इतर सर्व प्राधिकरणांना सहकार्य करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि मी अधिक चांगले करणे मी मनापासून दिलगीर आहे. मला मारून माझ्या कुटुंबाला दुखवायचे आहे असे म्हणत लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येताना मी पाहत आहे. लोकांनी माझ्या आईच्या दवाखान्यात रुग्ण म्हणून आक्रमण केले आहे. मला भीती वाटते आहे आणि मला काय करावे हे समजत नाही. पण मी पळून जात नाही. माझा भारतातील पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रसिद्ध युट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला. नुकताच त्याचा नवीन एपिसोड समोर आला आहे. यामध्ये युट्यूबर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह व रणवीर अलाहबादिया यांनी हजेरी लावली होती. यावेळी राणवीर अलाहबादिया याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमामध्ये रणवीरने आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर रणवीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा, समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

नवरदेव लग्नाच्याच दिवशी आपले प्राण सोडतो

भर लग्न समारंभात काळाने नवरदेवाचा घात केला.

मध्य प्रदेशातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मध्य प्रदेशातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात, नवरदेव लग्नाच्याच दिवशी आपले प्राण सोडतो.

मृत्यू कधी सांगून येत नाही, असं म्हतात. अगदी ठणठणीत असलेल्या माणूसदेखील अचानक आपला जीवही गमावतो. कधी कुठे आपल्या नशीबी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. त्यात नशीबाने साथ दिली नाही तर अगदी आनंदाच्या दिवशीदेखील वाईट घडू शकतं. असाच प्रकार त्या नवरदेवाबरोबर घडला आणि तो मृत्यूच्या सापळ्यात अडकला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून कोणाची वेळ कधी येईल हे सांगता येत नाही असं तुम्हालाही वाटेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की भर लग्न समारंभात काळाने नवरदेवाचा घात केला. या लग्नसमारंभात नवरदेव घोड्यावर बसून आपला खास दिवस एन्जॉय करताना दिसतोय. पण तो घोड्यावर बसला असतानाच अचानक कोसळतो आणि जागच्या जागी आपले प्राण सोडतो. ही घटना मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील आहे असं या व्हिडीओच्या कॅप्शनमधून दिसून येतंय.

Champions Trophy 2025: टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईकडे रवाना! विराट, रोहित अन् हार्दिकसह इतर खेळाडूंची एअरपोर्टवरील झलक

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया 15 फेब्रुवारीला दुबईकडे रवाना झाली झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानच्या यजमानपदाखाली सुरू होणार असून 8 पैकी 7 संघ पाकिस्तानला पोहोचत आहेत जिथे ते प्रत्येक संघ या स्पर्धेत आपले सामने खेळेल. ए ग्रुपमध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश या तीन संघाचा समावेश असणार आहे. यादरम्यान टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने खेळणार असल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा पहिला सामना हा बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारीला होणार आहे, तसेच 23फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध आणि 2 मार्चला तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाने नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिका सामन्यात इंग्लंडला चारीमुंड्या चीत केल. त्यामुळे आता टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कंबर कसून तयार असल्याच पाहायला मिळालं. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचे कोच, खेळाडूआणि स्टाफ निघाला आहे. यादरम्यान टीम इंडियाचा एअरपोर्टवरील व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर तसेच गोलंदाजीचे कोच मोर्ने मॉर्केल त्याचसोबत विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, शुभमन गिल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग अशी टीम इंडियाची मंडळी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना झाला आहे.

Chhava Movie Review : अक्षरशः अंगावर काटा अन् डोळ्यात पाणी आणणारा चित्रपट! कसा आहे छत्रपती शिवरायांचा 'छावा'

या चित्रपटाने पहिल्या कमाईत 'इमर्जन्सी', 'आझाद' या चित्रपटांना मागे टाकत 2.5 कोटी आणि 1.5 कोटी रुपयांची कमाई केली. त्याचसोबत 5.5 कोटींसह प्रदर्शित झालेल्या 'देवा' या चित्रपटाला देखील छावाने मागे अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'लव्हयापा' आणि 'बॅडएस रवीकुमार' या चित्रपटांना देखील छावाने मागे टाकलं आहे. आता पर्यंत बॉक्स ऑफिसवर छावाने 100 करोडची भरारी घेतली आहे.

Chhaava Movie: छावा चित्रपट पाहिल्यानंतर शरद पोंक्षेंनी व्हिडिओ शेअर करत दिली 'ही' प्रतिक्रिया, म्हणाले...

https://www.lokshahi.com/news/after-watching-the-movie-chhawa-sharad-ponkshe-shared-the-video-and-gave-this-reaction

हा चित्रपट पुर्णपणे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनगाथेवर करण्यात आला आहे. ज्यात संभाजी महारांच्या शौर्याची गाथा दाखवली गेली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनच्या पहिल्याच दिवशी तब्बल 19.08 कोटी रुपये कमवले आहेत. हा चित्रपट बघताना खूप यातना होतील. शेवटच्या अर्ध्या तासात तर खूप रडू येईल. या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांचे पात्र जिवंत डोळ्यासमोर उभे केले आहे. त्यामुळे विकी कौशल याचं नाव आता बॉलिवू़डमध्ये खूप वरच्या स्थानी गेलं आहे. तसेच अक्षय खन्ना याने साकारलेला औरंगजेब हा अंगावर काटा आणणारा आहे. अक्षय खन्नामध्ये हुबेहुब औरंगजेबाची छबी पाहायला मिळते. यासोबतच हंबीरराव मोहिते, कवी कलश आणि इतर मराठा सरदारांच्या भूमिका खूप चांगल्या पद्धतीने साकारण्यात आल्या आहेत. आता पर्यंत बॉक्स ऑफिसवर छावाने 100 करोडची भरारी घेतली आहे. याचपार्श्वभूमिवर मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी या चित्रपटा संदर्भात एक वक्तव्य केलं आहे.

शरद पोंक्षे म्हणाले की, मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘छावा’ हा चित्रपट पाहिला. अतिशय उत्तम चित्रपट बनवला आहे. प्रत्येक हिंदूने, प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहायला हवा. चित्रपट पाहून रक्त खवळतं, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. आपल्या स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या शंभूराजेंनी इतक्या वेदना सहन केल्या आणि त्या नालायक औरंगजेबाने क्रूरतेचा कळस गाठला. लक्ष्मण उतेकर यांनी इतक्या सुंदर पद्धतीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे, की त्यांचं कौतुक कराव तितक कमी. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका खूपच उत्तमरित्या साकारली आहे. या चित्रपटात जेवढे मराठी कलाकार आहेत, सर्वांनी खूप सुंदर पद्धतीने आपलं पात्र साकारल आहे. खूप वर्षांनी एक खूपच उत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळाला. या चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एआर रहमान यांचे बॅकग्राउंड म्युझिक खूप छान आहे. चित्रपटाचा शेवट पाहवत नाही. औरंगजेब शेवटी आपले धर्मवीर संभाजी महाराज यांची एवढ्या क्रूरतेने हत्या करतो, ते पाहवत नाही. कुठे असे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवा यांच्यासारखे महानायक महाराष्ट्रात जन्मले आणि कुठे आजकालचे तरुण, आताच्या तरुणांना हा चित्रपट पाहावा लागेल, आणि आपल्या महानायकांकडून शिकावं लागेल. प्रत्येक तरुण, प्रत्येक भारतीय, प्रत्येक हिंदूने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जो ‘छावा’ नावाचा चित्रपट आहे, तो पाहायला हवा. मी हात जोडून विनंती करतो, प्लीज आताच तिकीट काढा आणि छावा पाहा, असं आवाहन करत शरद पोंक्षे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आज प्रेमाच्या भावनाही वाढतील. कामावर खूप आग्रही असाल तर राग वाढेल- कोणताही निर्णय घेण्यापूर्वी इतरांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मोकळ्या वेळेचा योग्य वापर करण्यासाठी, तुम्ही लोकांपासून दूर जावे आणि तुम्हाला जे आवडते ते करावे. असे केल्याने तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल देखील येतील. जर तुम्हाला खूप दिवसांपासून शाप वाटत असेल, तर आज तुम्हाला धन्य वाटेल.

वृषभ (Taurus Horoscope)

जे लोक लघु उद्योग चालवत आहेत त्यांना आज त्यांच्या बंद व्यवसायांकडून कोणताही सल्ला मिळू शकेल, ज्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होऊ शकेल. आनंदी-उत्साही-प्रेमळ मूडमध्ये - तुमचा आनंदी स्वभाव तुमच्या सभोवतालच्या लोकांना आनंद आणि आनंद देतो. तुमच्या प्रेम जीवनात कटू क्षुल्लक गोष्टींना माफ करा. आज केलेले संयुक्त उपक्रम अखेरीस फायदेशीर ठरतील, परंतु तुम्हाला भागीदारांकडून काही मोठ्या विरोधाचा सामना करावा लागेल. अनुकूल ग्रह आज तुम्हाला आनंदी वाटण्यासाठी भरपूर कारणे देतील.

मिथुन (Gemini Horoscope)

कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील - तुमच्या मनावर ताण येईल. आज प्रेमाच्या भावनांना प्रतिसाद मिळेल. अल्पकालीन कार्यक्रमांमध्ये स्वतःची नोंदणी करा जे तुम्हाला नवीनतम तंत्रज्ञान आणि कौशल्ये शिकण्यास मदत करतील. आज तुमच्याकडे सामाजिकीकरणासाठी आणि तुम्हाला सर्वात जास्त आवडणाऱ्या गोष्टींसाठी पाठपुरावा करण्यासाठी मोकळा वेळ आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जुन्या सुंदर रोमँटिक दिवसांना पुन्हा एकदा जपून ठेवाल.

कर्क (Cancer Horoscope)

तुमचा राग कडवटपणाचा डोंगर निर्माण करू शकतो - जो तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाच त्रास देईल. सावधगिरी बाळगा कारण कोणीतरी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकते. जर तुम्ही तुमचे विचार चांगल्या प्रकारे मांडले आणि कामावर तुमचा दृढनिश्चय आणि उत्साह दाखवला तर तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. मोठ्या खर्चामुळे तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो.

सिंह (Leo Horoscope)

पैशाशी संबंधित कोणत्याही समस्या आज सोडवल्या जाऊ शकतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत तुमच्या समस्या शेअर केल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटेल. हाती घेतलेली नवीन कामे अपेक्षांनुसार नसतील. तुम्ही अपेक्षेपेक्षा लवकर परत येऊ शकता. तुमचा जोडीदार आज तुम्हाला अतिरिक्त खास वेळ देईल.

कन्या (Virgo Horoscope)

व्यावसायिक शक्तीचा वापर तुमच्या करिअरच्या संधी वाढवण्यासाठी करा. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अमर्याद यश मिळण्याची शक्यता आहे. वरचढ होण्यासाठी तुमचे सर्व कौशल्य समर्पित करा. तुमचे काम वेळेवर पूर्ण करणे आणि लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी चांगले ठरेल. यामुळे तुमच्या कुटुंबात आनंद येईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. आज तुमच्या जोडीदाराशी तुम्ही छान गप्पा माराल आणि तुम्हाला एकमेकांवर किती प्रेम आहे हे जाणवेल.

तूळ (Libra Horoscope)

आज तुमचे व्यक्तिमत्व सुगंधासारखे काम करेल. जर तुम्ही घरापासून दूर राहून काम करत असाल किंवा अभ्यास करत असाल तर अशा लोकांपासून दूर राहायला शिका जे तुमचे पैसे आणि वेळ वाया घालवतात. आज जर तुम्ही विनम्र आणि मदतगार असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदारांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान सदस्यांसोबत थोडा वेळ घालवायला शिकले पाहिजे. असे न केल्याने कौटुंबिक शांतीसाठी तुमचे प्रयत्न खंडित होऊ शकतात.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

सकारात्मक विचारसरणीने रोगाशी लढण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करा. जर तुम्ही थोडे जास्त पैसे कमवण्याचे मार्ग शोधत असाल तर सुरक्षित आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करा. नोकर-सहकाऱ्यांशी आणि सहकाऱ्यांशी समस्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही तुमच्या मुलांना वेळेचे व्यवस्थापन आणि वेळेचा सर्वात फलदायी पद्धतीने वापर कसा करायचा याबद्दल सल्ला देऊ शकता. तुमचे वैवाहिक जीवन आज इतके रंगीत कधीच नव्हते.

धनु (Sagittarius Horoscope)

नवीन उपक्रम आकर्षक असतील आणि चांगले परताव्याचे आश्वासन देतील. प्रलंबित समस्या लवकरच सोडवल्या पाहिजेत आणि तुम्हाला माहित आहे की तुम्हाला कुठेतरी सुरुवात करायची आहे - म्हणून सकारात्मक विचार करा आणि आजच प्रयत्न सुरू करा. तुमचा एखादा जुना मित्र तुमच्या जोडीदारासोबतच्या जुन्या सुंदर आठवणी आठवून देऊ शकतो.

मकर (Capricorn Horoscope)

आज तुम्ही खूप सक्रिय आणि चपळ राहाल. तुमचे आरोग्य आज तुम्हाला पूर्णपणे साथ देईल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित चांगली बातमी संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणि उत्साह घेऊन येते. प्रलंबित प्रकल्प आणि योजना अंतिम आकार घेण्यास पुढे सरकतात. जास्तीत जास्त फायदा घ्या. आज तुम्हाला खरे प्रेम काय आहे हे कळेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

तुमचा बॉस आज तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतो. तुमचा जोडीदार फक्त तुमच्यासोबत थोडा वेळ घालवू इच्छितो, परंतु तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाही, ज्यामुळे ते अस्वस्थ होतात. आज, तुम्हाला त्यांची निराशा स्पष्टपणे दिसून येईल. वैवाहिक जीवन चांगले बनवण्याचे तुमचे प्रयत्न आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले रंग दाखवतील.

मीन (Pisces Horoscope)

आज तुम्हाला कळेल की तुमचा प्रियकरच तुमच्यावर अनंतकाळ प्रेम करेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले निर्णय अंतिम होतील आणि नवीन उपक्रमांच्या योजना सुरळीत होतील. या राशीचे लोक आज त्यांच्या भावंडांसोबत घरी चित्रपट किंवा सामना पाहू शकतात. असे केल्याने तुमच्यामध्ये प्रेम वाढेल. तुमच्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीत गोष्टी आश्चर्यकारकपणे तुमच्या बाजूने येऊ शकतात.

Mumbai Indians IPL 2025: पांड्याला 'ती' चूक पडली महागात! CSK विरुद्ध सामन्याला मुकावे लागणार, कोण करणार संघाचे नेतृत्व?

देशभरात आता आयपीएल 2025 ची क्रिकेट प्रेमी आतुरतेने वाट बघत आहेत. यावर्षीचे सामने 22 मार्च 2025 पासून सुरु होणार असून या वर्षीचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये ईडन गार्डनवर होणार आहे. तसेच यावेळचा अंतिम सामना 25 मे रोजी ईडन गार्डनवर खेळला जाणार असल्याचे समोर आले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना होणार आहे. आयपीएल दरम्यान बहू चर्चेत असलेली टीम म्हणजे मुंबई इंडियन्स, या टीमबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या संघाचा पहिला सामना खेळू शकणार नाही. त्यालान मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा होणारा सामन्याला मुकावे लागणार आहे.

हार्दिक पांड्यावर पहिलाच सामना खेळण्यावर बंदी

आयपीएल दरम्यान दुसऱ्या दिवशी होणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा सामना चेन्नई येथे एल क्लासिकोत होणार आहे. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यातून बाद करण्यात आलं आहे. आयपीएल 2024 मध्ये लखनऊ विरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्स त्यांचे ओव्हर्स वेळेतपूर्ण करू शकली नव्हती, तीन ओव्हर-रेट गुन्ह्यांसाठी संपुर्ण टीमसह हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमांनुसार, एखादा संघ जेव्हा एका हंगामात तीन वेळा ओव्हर-रेट राखण्यात अपयशी ठरतो, त्यावेळी त्या टीमच्या कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली जाते. त्यामुळे लीगच्या नियमांनुसार, हार्दिक पंड्यावर एका सामन्याचा बॅन लावण्यात आला. तर त्याच्या ऐवजी आता मुंबई इंडियन्स या संघाचे नेतृत्व स्टार फलंदाज रोहित शर्मा हा करणार असल्याच्या शक्यता आहेत.

IPL 2025 Mumbai Indians Schedule : MIची पलटण IPLसाठी सज्ज! पहिला सामना CSKसोबत, जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक

आयपीएलचा क्रेज देशभरात पाहायला मिळतो, यावर्षीचे सामने 22 मार्च 2025 पासून सुरु होणार असून या वर्षीचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये ईडन गार्डनवर होणार आहे. आयपीएलच्या 18 व्या हंगामातील सामने एकूण 13 शहरांमध्ये खेळवले जातील. आयपीएल 2025 चे सामने लखनौ, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बंगळुरु, न्यू चंदीगड, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाला येथे खेळवले जातील. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा यशस्वी आणि बहु चर्चेत असलेली टीम मुंबई इंडियन्स यांचा पहिला सामना 23 मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना होणार आहे. आयपीएलच्या लिलावापूर्वी फ्रँचायझीने हार्दिक, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा या स्टार्सना संघात कायम राखले होते. त्यामुळे यंदा MI कडून चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. यादरम्यान मुंबई इंडियन्स टीमचे आयपीएल सामन्यादरम्यान संपुर्ण वेळापत्रक जाणून घ्या..

मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक-

23 मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स

29 मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स

31 मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

4 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स

7 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

13 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

17 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद

20 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स

23 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद

27 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स

1 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

6 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स

11 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स

15 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

Anjali Damania Vs Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अंजली दमानिया यांची मजबूत पकड, मुंडेंवर केले गंभीर आरोप

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण सध्या जोरदार चर्चा होत आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. धनंजय मुंडे राजीनाम्यासंदर्भात पहिल्यादांच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं विधान केलं आहे. धनंजय मुंडे हे राजीनामा का देत नाहीत? हे त्यांनाच विचारा असं अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केले आहे. अजित पवार म्हणाले की, "धनंजय मुंडे हे राजीनामा का देत नाहीत? हे त्यांनाच विचारा" तसेच "सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणून मी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला होता", असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल आपली भूमिका सांगितली आहे.

याचपार्श्वभूमिवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सतत मागणी केली जात आहे. मात्र, तरी देखील यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. असं असताना आता अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी परत एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.

अंजली दमानिया पुन्हा मुंडेंवर कडाडल्या...

दरम्यान अंजली दमानिया म्हटल्या की, धनंजय मुंडे यांनी कृषी घोटाळा केल्याचं मी पुरावे देत स्पष्ट केलं होत. प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन वेबसाईटवर विकत घेता येत आहेत, याचे सर्व पुरावे ज्यावेळी मी दाखवले त्यावेळी मी ऑर्डर करून सर्व विकत घेतले. पण, माझी ऑर्डर आली नाही. शिवाय मला सांगण्यात आलं की, कंपनीने हे आता थांबवले आहे. मी दृढमताने सांगू शकते की, हा धनंजय मुंडे यांनी केलेला घोटाळा आहे.

अजित पवारांना चौकशी करण्याचे आव्हान

तसेच यापार्श्वभूमिवर अंजली दमानिया यांनी अजित पवारांना या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आव्हान दिले आहे. पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, अजित पवारांनी आता यावर चौकशी करावी. तसेच अजित पवार दोन दिवसांमध्ये चौकशी पूर्ण होईल, त्यानंतर तातडीने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. जर तुम्ही जर असं म्हणत असाल की, मंत्री स्वतः त्यांचे निर्णय ठरवतील तर हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही सर्व यंत्रणा बंद करा. एक मंत्री हेच ठरवेल की, त्याने त्याच्या भागात किती दहशत करावी, किती पैसे खावे, लोकांना किती त्रास द्यावा, कसा छळ करावा. एवढ सगळ केल्यानंतर त्याचा राजीनामा द्यायचा की नाही हे पण मंत्री ठरवणार? मुख्यमंत्री आणि पक्ष नाही ठरवणार? आता तरी त्यांचा राजीनामा घेणार की नाही? असे प्रश्न उपस्थित करत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आता जोर धरलेला आहे.

पाकिस्तानचे वैफल्‍यग्रस्‍त कृत्य! भारत-पाकिस्तानमध्ये नव्या वादाची ठिणगी...

Ind vs Pak Champions Trophy 2025 : पाकिस्तानने आता हद्द पार केली! चॅम्पियन्स ट्रॉफी उद्घाटन समारंभात भारतीय राष्ट्रध्वज वगळले

हायब्रिड मॉडेलच्या आधारे आंततराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या चॅम्पियन्स ट्रॉफी स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया 15 फेब्रुवारीला दुबईकडे रवाना झाली झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानच्या यजमानपदाखाली सुरू होणार असून 8 पैकी 7 संघ पाकिस्तानला पोहोचत आहेत जिथे ते प्रत्येक संघ या स्पर्धेत सामने खेळेल. ए ग्रुपमध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश या तीन संघाचा समावेश असणार आहे. यादरम्यान टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने खेळणार असल्याचं समोर आलं आहे. 23फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. याचपार्श्वभूमिवर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे उद्घाटन समारंभ रविवारी 16 फेब्रुवारीला लाहोरमध्ये झाला. यादरम्यान लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम आणि कराचीतील राष्ट्रीय स्टेडियम येथे, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या इतर सात संघांचे झेंडे मैदानावर दिसत आहेत. मात्र, भारताचा राष्ट्रध्वज दिसला नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पाकिस्‍तानच्‍या वैफल्‍यग्रस्‍त कृत्यावर भारतीय क्रिकेट चाहत्‍यांकडून तीव्र संताप व्‍यक्‍त केला जात आहे.

Pune Marathi Bank : अभिजात दर्जा मिळूनही माय मराठीला दुय्यम स्थान, पुण्यात ATM मध्ये मराठी भाषाच नाही

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला खरा, मात्र अजूनही काही ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम स्थान असलेलं पाहायला मिळत आहे. पुण्यातील कोथरूड भागात असलेल्या एका बँकेत मराठी भाषेचा वापर कमी असल्याचं पाहायला मिळाले. तसेच या बँकेच्या एटीएममध्ये मराठी भाषाच नसल्याचे समोर आलं आहे. या विरोधात मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली असून बँक मॅनेजरला निवेदन दिले आहे, आणि मराठी भाषा वापरा अशी मागणी केली आहे

Devendra Fadnavis: सरकारचा अर्थसंकल्प 10 मार्चला सादर होणार, सूत्रांची 'लोकशाही' मराठीला माहिती

एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. निर्मला सीतारमण यांनी केंद्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही दिवसांतच मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प भूषण गगराणी यांनी देखील सादर केला. यानंतर आता महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख जाहीर झाली आहे. 2025 च्या विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवल्या नंतर सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प 10 मार्चला सादर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याबाबतच्या पुरवणी मागण्या 3 मार्चला सादर केल्या जाणार असून 4 मार्चला राज्यपाल अभिभाषणावर चर्चा सुरु होणार आहेत. तसेच हा अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 आठवडे चालणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Suresh Dhas On Sanjay Raut: राऊतांवर बोलण्याची माझी कुवत नाही, राऊत इंटरनॅशनल स्पीकर, धसांची टीका

आमदार सुरेश धस यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सुरेश धस यांनी गुप्तपणे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती याचपार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुरेश धस तसेच धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. यादरम्यान आता आमदार सुरेश धस यांनी संजय राऊतांवर बोलण्याची माझी कुवत नाही असं म्हणत राऊतांच्या प्रश्नाला दिले आहे. आष्टी मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यादरम्यान ते माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार सुरेश धस म्हणाले की, खासदार संजय राऊत इंटरनॅशनल स्पीकर आहेत. त्यांच्यावर बोलण्याची माझी कुवत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी संदर्भातील घोटाळ्या बाबत 20 तारखेला मी बोलणार आहे. जरांगे पाटील आमचे दैवत आहेत ते माझ्यावर रागावून बोलले आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही.

Rahul Narvekar | "येणाऱ्या 5 वर्षांत सरकारने जनतेच्या सेवेसाठी ध्येय ठेवली अहेत": राहुल नार्वेकर

लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी आज भव्य संमेलन पार पडत आहे. या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचपार्श्वभूमिवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकशाही मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्र कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला आहे. लोकशाही मराठी

न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' या कार्यक्रमात मुलाखत देत असताना राहुल नार्वेकर म्हणाले की, आपलं सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांना आपण मदत करत आहोत, सोशल सेक्टरमध्ये आपण बदल घडवत आहोत. लाडकी बहिण योजनेअंतर्गत अनेक महिलांना स्वावलंबी केल आहे. या सगळ्या योजना आणून आपण मूलभूत सुधार सामान्य लोकांच्या आयुष्यात सुधार घडवण्यासाठी कार्याबद्दल आहोत. प्रत्येक माणसाला डोक्यावर छप्पर आणि खायला भरपूर अन्न आणि रोजगाराची हमी आपण येणाऱ्या पाच वर्षात देऊ आणि त्यावर आपण काम देखील करू, असा मला विश्वास आहे.

ग्रामीण भागातील विकासावर बोलताना नार्वेकर म्हणाले की, आपण समृद्धी महामार्ग बघितला तर तो दोन शहरांना जोडतो आहे आणि किती गावांना तो रस्ता जात आहे. विकास हवा असेल तर त्यागाची भूमिका घ्यावीच लागेल. ज्यांच्या जमिनी जात असतील तर, त्यांना आपण भरपाई देतो आहोत.

"तुमच्यावर झालेल्या टीकांना कसे सामोरे गेलात?" ; नार्वेकरांनी काय उत्तर दिले?

नार्वेकरांवर होणाऱ्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, मी कोणत्याही टीका टिपणीकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे मी योग्य तो निर्णय घेऊ शकलो. माझ्यावर केल्या जाणाऱ्या टीका या माझं लक्ष विचलित करून कोणता तरी दबाव माझ्या निर्णय प्रक्रियेवर आणण्यासाठी केल्या जात असतील असं मला वाटत. त्यामुळे माझा असा सल्ला आहे की, तुम्ही जेव्हा कोणतीही भूमिका बजावत असता आणि तेव्हा इतरांचे लक्ष असतं त्यावेळेला तुमच्यावर होणाऱ्या टीका टिपणीकडे लक्ष दुर्लक्ष करा, आणि मी तेच केलं. मी घेतलेला निर्णय किती योग्य आहे त्यावर कोर्ट निर्णय घेईल. त्या निर्णयात कोणत्याही प्रकारचा बदल होईल असं मला वाटत नाही, त्या निर्णयामुळे एक संसदीय भक्कमता आपण वाढवत आहोत, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

Eknath Shinde | "लोकं म्हणतात मी नाराज झालो की गावी जातो...": एकनाथ शिंदे काय म्हणाले?

"मी गावी जातो, तेव्हा लोक म्हणतात एकनाथ शिंदे नाराज झाले.. एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने गावी शेती करतात. मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी 10-10 तास प्रवास करून गावी जाऊ का? तेवढ्या वेळेत मी किती काम करेन... ज्यांना काम करायची सवय नाही, ते तर बोलणारचं ना... मी वेळेला महत्त्व देतो माझ्यासाठी वेळ महत्त्वाची आहे".

"शेतकरी आमचा केंद्रबिंदू; 1 रुपयांत आम्ही पिकविमा देत आहोत ": एकनाथ शिंदे

ग्रामीण विकासावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "समृद्धी महामार्ग जो तयार केला आहे तो 14 जिल्ह्यांना जोडणारा आहे तो ग्रामीण विकासासाठीच केलेला आहे. मुंबई कोकण महामार्गासाठी एक्सेस कंट्रोल रस्ता आम्ही करतो. त्याचसोबत सगळे सागरी मार्ग एकत्र करत कोस्टल महामार्ग केलेला आहे. त्यामुळे पर्यटन वाढणार आणि त्याचा फायदा तेथील ग्रामीण लोकांना होणार. लोक म्हणतात शेतकऱ्यांना तुम्ही काय दिल? अडीच वर्षामध्ये आम्ही 45 हजार कोटींची योजना शेतकऱ्यांना दिली. शेतकरी सन्मान योजना आम्ही सुरु केली. आमच्यासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. 12 हजार मोदी सरकार देत त्याचसोबत आमच सरकार देखील 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देत. एक रुपया पिक विमा योजना आम्ही सुरु केली त्यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा होत आहे".

"मुख्यमंत्र्यांच काम काय घरात बसायचं का?" कय म्हणाले शिंदे

पुढे मुंबईच्या विकासावर एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे म्हणून आम्ही मुंबईवर फोकस केलं. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं आणि कमिशनरला बोलावलं... रस्त्यावर खड्डे का आहेत? असं विचारलं... दरवर्षी रिपेरिंग करून काढायचा पांढरा आणि पांढऱ्याचा काळ करतात. हे लोकांचे पैसे आहेत आणि पैसे असताना लोकांना खड्ड्यांमध्ये प्रवास करायला का लावला? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, लोक खड्ड्यांमध्ये प्रवास करून मृत्युमुखी पडली, त्याचवेळी आम्ही सांगितल मुंबईतले सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले पाहिजेत असा मोठा निर्णय आम्ही घेतला. त्यानंतर पहिला फेज दुसरा फेज असे अनेक हजार कोटींचे प्रकल्प काढले. पुढच्या फेसमध्ये खड्डे मुक्त मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई आणि लवकरच ट्रक्समुक्त मुंबई आम्हाला करायचा आहे आणि लवकरच भ्रष्टाचार मुक्त मुंबई देखील आम्ही करणार आहोत. मुंबईचे रस्ते आम्ही धुतले, कधी तुम्ही पाहिलं होतं का? मुख्यमंत्र्यांना रस्ते धुताना. डीप क्लीन ड्राईव्ह हे आम्ही सुरू केलं. त्यामुळे रस्त्यावरच प्रदुषण कमी झालं त्यावेळी लोकांनी विचारल काय रस्ते धुताय? मुख्यमंत्री रस्ते धुतात का? मग आम्ही पण विचारल, मुख्यमंत्री असताना घरी बसायचं असतं का?", अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Prakashrao Abitkar | मंत्री प्रकाश आबिटकर यांचा अजेंडा काय? जाणून घ्या...

महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर मुलाखती दरम्यान म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाचा आरोग्य सुदृढ राहणं आणि त्यासाठी ज्या ज्या उपयोजना करायच्या आहेत, त्यासाठी अर्थसंकल्पातून अतिशय महत्त्वाचा बजेट उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचं आहे. सर्वांची उत्तम आरोग्य परिस्थिती महाराष्ट्रात असली पाहिजे, हेच विजन घेऊन आपण कामाला लागत आहोत. आरोग्य विभागाची जी काही आपली यंत्रण आहे, ती साचेबद्ध पद्धतीने निघाली आहे. राज्याचा बजेट असेल किंवा सर्व सुविधा उपलब्ध करून देणे असेल. या सर्व गोष्टींसाठी हेल्थ पॉलिसी असणे महत्त्वाचा आहे. जे काही अजेंडावरचे विषय आहेत त्यासाठी आपले धोरण उत्तम असावी, यासाठी आम्ही काम करत आहोत. लवकरच या सगळ्याचं सादरीकरण होईल. असं प्रकाश आबिटकर म्हणाले आहेत.

'आमचं रुग्णालय हे गरिबांसाठी, त्यांची सेवा करणं आमचं कर्तव्य'

सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय यांच्याबद्दल बोलताना पुढे प्रकाश आबिटकर म्हणाले की, खरं तर डेडिकेटली काम करण्यासाठी आम्ही खूप चांगलं यंत्रणा राबवत आहोत. राज्य मॉनिटरिंग करणं हे राज्य सरकारचा आणि आमच्या विभागाचे काम आहे. राज्याचा मंत्री हा प्रत्येक वेळेला एकेका हॉस्पिटलमध्ये जाईल आणि आपली जीएसओपी आहे, त्यानुसार काम होतं की नाही हे पाहतील. स्वच्छतेसाठी आम्ही खूप चांगले पैसे खर्च करत आहोत. त्याचसोबत राज्यातील दोन कोटी महिलांच्या आरोग्य तपासण्या आपण करत आहोत. अशा सर्व दोन कोटी महिलांच्या पुढील दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये तपासण्या होतील. त्यासोबतच त्याच्यावर जे उपचार होतील ते सुद्धा मोफत राज्य सरकारच्या वतीने होतील. त्या शंभर दिवसांच्या निमित्ताने जे काम सुरू केले आहे ते पुढील टप्प्यात अधिक गतीने करता येईल, असं प्रकाश आबिटकर म्हणाले आहेत.

पॉलिसी आणि पुढील ॲक्शन प्लॅन बद्दल प्रकाश आबिटकर काय म्हणाले?

पॉलिसी आणि पुढील ॲक्शन प्लॅन बद्दल बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, "आपल्याकडे अनेक हॉस्पिटल आहेत, त्याचा जर विचार केला तर हेल्थ टुरिझमचा उपयोग अनेक देश-विदेशात सुरू आहे. त्यासोबत टुरिझमची कन्सेप्ट आहे त्याचा सगळ्याचा उपयोग यामध्ये होईल. राज्याच्या अर्थकारणामध्ये याचा येत्या काळात मोठा वाटा असेल".

तसेच पुढे ॲक्शन प्लॅन बद्दल आबिटकर म्हणाले की, "मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनामध्ये मला ही कामाची संधी मिळाली. सध्या पाच विषयांवरती आमचं डिपार्टमेंट काम करत आहे. बॉम्बे नर्सिंग ऍक्ट लॉ हा त्याच्यातला पहिला मुद्दा आहे, यामध्ये सर्व खाजगी हॉस्पिटलची नोंदणी होणार. सर्व इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सर्व सुविधांचे दर आहेत, त्याचं कामकाज कशा प्रकारे करावं या संदर्भात तरतूद केली आहे. पण त्याचे पालन होत नाही. जर त्याकडे लक्ष दिल तर त्याचा चांगला उपयोग होईल. त्यासोबतच खाजगी लॅबोरेटरीवर सुद्धा आपलं नियंत्रण असलं पाहिजे हा आपला दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे, राज्यात आपण ज्या प्रकारे रक्त दान करत आहोत त्यामध्ये अधिक पारदर्शकता आली पाहिजे. अत्यंत चांगल्या पद्धतीने मोफत रक्त मिळण्यासाठी राज्य रक्त संकलन करत आहोत. त्यानंतर स्त्रीभ्रूणहत्या यामध्ये त्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी भविष्यात गंभीर समस्या धारण होईल. तेव्हा त्या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी भेटून प्रभावीपणे काम करत आहोत. संदर्भातील महिला असेल किंवा जो खबरी असेल त्याला एक लाख रुपयांचा इनाम देऊन आपण त्या कायद्याचा प्रभावी वापर करता येईल का? हे आम्ही करत आहोत. अशा अनेक गोष्टी या आरोग्य क्षेत्राशी निगडित आहेत त्या गोष्टी करत आहोत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली".

Aditi Tatkare|"लाडकी बहिण योजनेमुळे सरकारची तिजोरी रिकामी": अदिती तटकरेंनी विरोधकांना दिले उत्तर

लाडकी बहिण योजना बंद होणार का? अदिती तटकरेंनी विरोधकांना उत्तर दिले म्हणाल्या, सरकार बहिणींची योजना कधीही बंद होणार नाही. विरोधक जी टीका करत आहेत त्यामध्ये खूप दुतप्पीपणा आहे. त्यांनी आश्वासन दिलं होतं की त्यांचा सरकार आलं तर ते 3000 देऊ. पंधराशे रुपये आणि जर राज्यावर भार पडत असेल तर ते तीन हजार रुपये कुठून देणार होते. पंधराशे रुपये ज्या वेळेला ठेवले तेव्हा आम्ही तीन हजार रुपये सुद्धा ठेवू शकलो असतो. पण सगळ्या बाबींचा विचार करून ती योजना केली. पण जर त्याचा कोणी गैरफायदा घेत असेल त्याला थांबवण्यासाठी त्याच्यावर कारवाई होत असेल तर ती योग्य आहे. आमच्याकडे वेळोवेळी जे काही प्रायमरी स्पुटेनिक केली त्यामध्ये किती महिलांनी फॉर्म भरले किती महिला पात्र होत नव्हत्या हे सगळं त्या त्या विभागाकडे केलेला आहे. ही योजना बंद होणार आहे असं म्हणतात पण ही योजना बंद करायची असतील तर अचानक बंद केली असती या गोष्टी केल्याच नसत्या. ही योजना माहिती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना बंद करण्याचा मनात कोणीही आणू शकतच नाही करणारच नाही, आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

लाडकी बहिण योजने 2100 रुपयांवर मंत्री अदिती तटकरे यांनी दिले स्पष्टीकरण

एखादी योजना आपण ज्या वेळेला आणत असतो त्या वेळा ती सातत्याने त्यामध्ये दीर्घकालीन ती उपलब्ध राहणं ते महत्त्वाचे असते. ते आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. त्यामुळे माहिती सरकार ते निश्चितपणे करणार आहे. त्यावेळेला योग्य त्यावेळी तशी पाऊल उचलण्याचा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात सूचना देतील त्यावेळेला निश्चित होईलच. जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिलं आहे ते येत्या काळात लवकरच होणार आहे.

तृतीयपंथी यांच्यासाठी कोणते धोरण? काय म्हणाल्या अदिती तटकरें..

तृतीयपंथी यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांचे अधिकार त्यांना मिळावेत यासाठी खूप कमी वेळेला प्लॅटफॉर्म त्यांना कमी मिळाले. आधी खूप असे सजेशन यायचे की तृतीयपंथी यांना सुद्धा महिला धोरणात समाविष्ट करा. पण तृतीयपंथी यांच्यासाठी स्वतंत्र धोरण असला पाहिजे. महिला व बालविकास आम्ही धोरण आखत असताना विनंती केली की तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरण आणावं. त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये जगत असताना ज्या काही अडीच अडचणी आहेत. त्यासाठी धोरण आकल्याशिवाय तो बदल दिसणार नाही. जगण्याचा अधिकार हा त्यांना सुद्धा आहे. ज्या सुविधा स्त्री आणि पुरुषांना मिळतात त्या सर्व एक माणूस म्हणून त्यांना मिळणं किंवा त्यांना मागता येणं सुद्धा महत्त्वाचा आहे. संबंधित विभागाने त्या धोरणाची सुद्धा सुरुवात केली आहे. त्यासाठी सूचना मागवल्या जात आहेत. त्या धोरणाची अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही पहाल.

Sanjay Shirsat : लोकशाही मराठीच्या 'ग्लोबल महाराष्ट्र' या कार्यक्रमात संजय शिरसाट यांची मोठी घोषणा

इंदू मिलमध्ये मी गेलो होतो तेव्हा सर्वाधिकारी होते सर्व पाहणी केली. काम व्यवस्थित आणि चांगल्या दर्जाचा चालू आहे. मी अधिकाऱ्यांना विचारलं की टार्गेट काय आहे कधीपर्यंत होईल. त्याने सांगितलं डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. मी म्हटलं नक्की होईल पण म्हटलं एखादा महिना पुढे जाऊ शकतो. मग म्हटलं फेब्रुवारी. मी त्यांना म्हटलं की स्टोरी मार्च आणि एप्रिल आणि दहा एप्रिल पर्यंत मला हे पूर्ण झालेला पाहिजे...हे त्यांचे कमिटमेंट आहे माझी नाही. आणि मग मी म्हटलं 10 एप्रिल पर्यंत त्याचा उद्घाटन सोहळा पार पडू. उद्या मी दिल्लीला जातो आहे जे पुतळा बनवत आहेत त्यांच्याकडे जातो आहे. संपूर्ण ताकद टेक्निकल टीमने त्यामध्ये झुकून दिली आहे. मी सर्व पाहिलं अभ्यास केला तेव्हा बाबासाहेबांच्या बुटाची टाच त्या पुतळ्याची सव्वा सहा फूट फक्त टाच आहे. इतका भव्य दिव्य तो पुतळा आहे. हे स्वप्न भारतासाठी फार महत्त्वाचा आहे. इतक्या मोठ्या उंचीचा पुतळा आपल्या मुंबईत होतो आहे हे आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे...येत्या 12 ते 13 तारखेला हिंदू मिलचा लोकार्पण होईल...तृतीयपंथी यांच्याकडे इतक्या डिग्र्या आहेत की आमच्याकडे त्या डिग्री असत्या तर आम्ही कुठच्या कुठे असतो...अनाथ मुलांचे आश्रम जे असतात त्यामध्ये मला काम करायची इच्छा आहे. अठरा वर्षा पूर्ण झाली की मुलांना बाहेर जावं लागतं ह्या नियम आहे. त्या अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर त्याचं काय होतं हे कोणी पाहत नाही त्यामुळे यावर सुद्धा काम करायचे माझी इच्छा आहे...

#lokshahinews #marathinewslive #globalmaharashtra #lokshahimarathiglobalmaharashtra #globalmaharashtraagenda2030 #maharashtranews

Horoscope | 'या' राशीचे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

मेष (Aries Horoscope)

आज तुम्ही सहजपणे भांडवल उभारू शकता - थकीत कर्जे वसूल करू शकता - किंवा नवीन प्रकल्पांवर काम करण्यासाठी निधी मागू शकता. तुमच्या नातेवाईकांना भेटणे तुमच्या विचारापेक्षा खूपच चांगले होईल. जर तुम्हाला तुमच्या प्रियकराशी लग्न करायचे असेल तर आजच त्यांच्याशी बोलणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी कठीण काळ सहकाऱ्यांच्या वेळेवर मदतीमुळे निघून जाईल. त्यामुळे तुम्हाला तुमचा व्यावसायिक फायदा परत मिळण्यास मदत होईल.

वृषभ (Taurus Horoscope)

व्यावसायिक आघाडीवर जबाबदारी वाढण्याची शक्यता दिसते. या राशीच्या लोकांनी आज स्वतःला थोडे चांगले समजून घेतले पाहिजे. जर तुम्हाला गर्दीत कुठेतरी हरवलेले वाटत असेल, तर स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन करा. तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की ते आपल्या स्वतःच्या विचारांचे आणि कल्पनाशक्तीचे उत्पादन आहे.

मिथुन (Gemini Horoscope)

तुम्हाला नवीन आर्थिक फायदा होईल. काहींसाठी - कुटुंबात नवीन व्यक्तीचे आगमन उत्सव आणि पार्टीसाठी क्षण आणते. तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये भांडणे निर्माण होतील. तुमचे सहकारी आज तुम्हाला दररोजपेक्षा चांगले समजून घेतील.

कर्क (Cancer Horoscope)

जर तुम्ही एका वेळी एक महत्त्वाचे बदल केले तर यश निश्चितच तुमचे आहे. जे लोक त्यांच्या घरापासून दूर राहतात ते त्यांचे काम पूर्ण केल्यानंतर संध्याकाळी त्यांचा मोकळा वेळ एखाद्या उद्यानात किंवा शांत ठिकाणी घालवणे पसंत करतील. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी मिळू शकते.

सिंह (Leo Horoscope)

तुमचा प्रचंड आत्मविश्वास आणि कामाचे सोपे वेळापत्रक आज तुम्हाला आराम करण्यासाठी पुरेसा वेळ देते. तुम्ही तुमचे शरीर पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि तंदुरुस्त होण्यासाठी अविरत योजना आखत असाल. परंतु इतर दिवसांप्रमाणेच, तुम्ही ते अंमलात आणण्यात अयशस्वी व्हाल. आज, तुम्हाला कळेल की एक अद्भुत जीवनसाथी असणे कसे वाटते.

कन्या (Virgo Horoscope)

आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत राहाल. ग्रह आणि नक्षत्रांच्या शुभ स्थानामुळे, आज तुम्हाला पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील. आज तुम्ही उपस्थित असलेल्या सामाजिक मेळाव्यात तुम्ही आकर्षणाचे केंद्र असाल. हा तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्वोत्तम दिवस असणार आहे. तुम्हाला प्रेमाचा खरा आनंद अनुभवायला मिळेल.

तूळ (Libra Horoscope)

तुमचा रिज्युम पाठवण्यासाठी किंवा मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी चांगला दिवस आहे. खेळ हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु जास्त गुंतून राहू नका कारण त्याचा तुमच्या शिक्षणावर परिणाम होईल. तुमचा जोडीदार नकळत काहीतरी अद्भुत करू शकतो, जे खरोखरच अविस्मरणीय असेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

आज तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबतीत सावध राहण्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत काही आरामदायी क्षण घालवा. तुमच्या प्रिय व्यक्तीकडून फोन आल्याने दिवस उत्साहवर्धक असेल. महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण करून तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या मोठे नफा मिळवाल. वेळेची नाजूकता ओळखून, तुम्हाला सर्वांपासून दूर एकांतात वेळ घालवायला आवडेल.

धनु (Sagittarius Horoscope)

आज तुम्हाला हे सत्य कळेल. कामात बदल चांगल्यासाठी होतील. या राशीचे लोक आज त्यांच्या भावंडांसोबत चित्रपट पाहू शकतात किंवा घरी जुळवू शकतात. असे केल्याने, तुमच्या लोकांमध्ये प्रेम वाढेल. तुमच्या वैवाहिक जीवनात आज गोष्टी खरोखरच सुंदर आहेत.

मकर (Capricorn Horoscope)

तुमच्या प्रिय व्यक्तीच्या सहवासाशिवाय तुम्हाला रिकाम्या पोटाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. जे अजूनही बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळविण्यासाठी आज अधिक मेहनत करावी लागेल. कठोर परिश्रम करूनच तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळेल. आनंददायी सहल समाधानकारक असेल. तुमच्या जोडीदाराच्या मागण्या तुम्हाला थोडा ताण देऊ शकतात.

कुंभ (Aquarius Horoscope)

तुम्हाला फक्त आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव असणे आवश्यक आहे. प्रामाणिक आणि तुमच्या दृष्टिकोनात अचूक रहा - तुमचा दृढनिश्चय लक्षात येईल आणि तुमचे कौशल्य देखील लक्षात येईल. काही मनोरंजन आणि मनोरंजनासाठी चांगला दिवस. वैवाहिक जीवनात अनेक फायदे देखील येतात आणि आज तुम्ही ते सर्व अनुभवणार आहात.

मीन (Pisces Horoscope)

या राशीच्या व्यावसायिकांना कामाच्या संदर्भात अवांछित सहलीला जावे लागू शकते. यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमध्ये गप्पा मारणे टाळावे. तुमच्या भूतकाळातील कोणीतरी तुमच्याशी संपर्क साधण्याची आणि तो एक संस्मरणीय दिवस बनवण्याची शक्यता आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त द्या 'या' खास शुभेच्छा

१९ फेब्रुवारी रोजी महाराजांची जयंती तारखेनुसार साजरी करण्यात येते. सर्वांना यानिमित्त शुभेच्छा देताना काही खास बोलावे वाटते. तेव्हा तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

किती राजे आले आणि किती राजे गेले

पण तुमच्या सारखे कोणी नाही…

छत्रपती शिवाजी महाराज की जय

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान

श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

वैकुंठ रायगड केला।

लीक ती देवगण बनला ।

शिवराज विष्णू झाला।

वंदन त्याला ।।

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येक मराठा वेडा आहे...

भगव्यासाठी, स्वराज्यासाठी,

शिवाजी राजांसाठी...

जय भवानी... जय शिवाजी

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

त्या मातीत मिसळावा देह माझा

जीवनाचे असे सार्थक व्हावे

चांगल्या कर्माची फळे नको मला

मरण फक्त त्या रायगडावर यावे

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

Shiv Jayanti 2025 Small Girl Rajvardhini Chavan From Pune Climbed Three Forts Age 1 Month 10 Month News In Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: 1 वर्षाच्या राजवर्धिनीवर कौतुकांचा वर्षाव! महाराजांचे प्रसिद्ध किल्ले यशस्वीपणे केले सर

https://www.lokshahi.com/news/the-1-year-old-rajavardhani-successfully-captured-the-maharaj-three-famous-forts-sinhagad-shivneri-and-raigad

१९ फेब्रुवारीला सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार साजरी करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहेत. अशा या रयतेच्या राजाने आतापर्यंत जिंकलेले गडकिल्ले अनेकांनी सर केले आहेत. आजच्या पिढीला स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती असणे आवश्यक आहे. अशातच पुण्यातून अवघ्या 1 वर्षाच्या चिमुकलीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेत, तिने महाराजांचे तीन प्रसिद्ध किल्ले यशस्वीपणे सर केले आहेत. राजवर्धिनी प्रसाद चव्हाण या 1 वर्षाच्या चिमुकलीने सिंहगड, शिवनेरी आणि रायगड या तीन गडावर आपले भीम पराक्रम दाखवले आहे ज्यामुळे तिच्यावर शिवभक्तांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, या वयात मुल धड चालायला देखील शिकत नाही आणि राजवर्धिनीने ही अविश्वसनिय कामगिरी केली आहे.

राजवर्धिनीच्या साहसी प्रवासाची सुरुवात

राजवर्धिनीचे वडीलांनी आतापर्यंत 400 हून अधिक ट्रेकिंग केल्या आहेत. ते एक अनुभवी ट्रेकर असून त्यांनी पुणे ते रायगड पायी जाण्याची मोहीमसुद्धा फत्ते केली आहे. तिच्या वडीलांच्या याच प्रेरणेतून राजवर्धिनीलाही लहान वयातच किल्ले सर करण्याची आवड निर्माण झाली असावी. राजवर्धिनीने सिंहगडापासून गडकिल्ले सर करण्याचा निर्धार केला. ज्यावेळेस तिला तिचे कुटुंब सिंहगडावर घेऊन गेले त्यावेळेस ती गडाच्या पायथ्याशी पोहोचताच कडेवरून उतरून स्वतःच किल्ला चढायला लागली. तिची छोटी छोटी पाऊले टाकत तिने सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. या एवढ्याशा राजवर्धिनीने तिच्या बालवयात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, किल्ले शिवनेरी, त्याच सहजतेने सर केले. तिचा आत्मविश्वास आणखी बळकट झाला आणि तिचे कुटुंब तिला रायगड किल्ल्यावर घेऊन गेले. रायगडावर तिने "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणा ऐकत महाराजांचे तीन लोकप्रिय आणि प्रसिद्ध किल्ले चढायला सुरुवात केली. किल्ला चढून महाराजांच्या समाधीवर माथा टेकवत तिने आशीर्वाद घेतले. राजवर्धिनीसारख्या चिमुकलीने घेतलेली प्रेरणा खरंच आदर्शवत आहे. तिच्या या कामगिरीमुळे ती महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची ट्रेकर म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

Rahul Gandhi Tweet: शिवरायांच्या जयंतीदिनी राहुल गांधींकडून श्रद्धांजलीचं ट्विट, शिवप्रेमींचा संताप

आज १९ फेब्रुवारीला सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार सर्वत्र साजरी केली जात आहे. राज्यभरात सर्वांकडून महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि सोहळे साजरी केले जात आहेत. राजकीयवर्तुळातून देखील महाराजांना अभिवादन केल जात आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधींच्या एक्स सोशल मीडियावरील पोस्टवरून मोठ्या वादाची शक्यता वर्तावली जात आहे. राहुल गांधींच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शिवजयंती दिनी अभिवादन करण्याऐवजी श्रद्धांजली वाहिल्याने राहुल गांधींच्या पोस्टवर राजकीय वर्तुळातून देखील टीकेची झोड करण्यात येत आहे.

Uday Samant: 21 किंवा 22 फेब्रुवारीला राजकारणात भूकंप होणार, सामंताचा गौप्यस्फोट

लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी काल भव्य संमेलन पार पडल. या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. याचपार्श्वभूमिवर मंत्री उदय सामंत यांनी देखील लोकशाही मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्र कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती. यादरम्यान 21 किंवा 22 फेब्रुवारीला राजकारणात भूकंप होणार, उदय सामंत यांनी असा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा होत असल्याच देखील त्यांनी लोकशाही मराठीच्या 'ग्लोबल महाराष्ट्र' कार्यक्रात सांगितलं आहे. शिवसेनेत आता कोणाची एन्ट्री होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेल आहे.

Supriya Sule: "सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 2100 रुपयेची वचनपूर्ती करणार का?: सुप्रिया सुळे

लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी काल भव्य संमेलन पार पडल. या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. याचपार्श्वभूमिवर सुप्रिया सुळे यांनी महायुती समोर प्रश्न उपस्थित केला आहे. सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 2100 रुपयेची वचनपूर्ती करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 2100 रुपये महिलांना देणार असं त्यांनी सांगितलं होतं ते त्यांनी या बजेटमध्ये करावं. इलेक्शनच्या आधी तुमची एक स्कीम होती, असं काय झालं या इलेक्शनमध्ये की, 5 लाख महिला डिलीट झाल्या. सगळ्यांची फसवणूक किंवा ओव्हर कमिटमेंट झाली. तुम्ही प्रत्येक स्कीमला 30 टक्क्यांचा कट दिला आहे, यालाच फिजिकल मॅनेजमेंट म्हणतात. माझी पहिली आणि मोठी अपेक्षा आहे की सरसकट कर्जमाफी व्हावी जो त्यांचा शब्द आहे. सोयाबीन ची बातमी तुम्हीच दाखवली आहे. बाकी कांदा आणि इतर प्रश्न आहेत त्यावर सुद्धा संशोधन झालं पाहिजे. एकवीसशे रुपये महिलांना देणार असं त्यांनी सांगितलं होतं ते त्यांनी या बजेटमध्ये करावं. या अर्थसंकल्पात त्यांनी ते करावं, त्यांनी भाषणात जे सांगितलं तेवढे त्यांनी सर्व करावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Vicky Kaushal on Raigad

Raigad News: अभिनेता Vicky Kaushal मराठमोळ्या पोशाखात रायगडावर शिवरायांच्या चरणी नतमस्तक

शिवजयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात किल्ले रायगडावरून झाली आहे. सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घालणाऱ्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे विकी कौशल याने या कार्यक्रमास उपस्थित लावली आहे. किल्ले रायगडावर शिवजयंती उत्सव साजरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किल्ले रायगड स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवला जाणार आहे.

याचपार्श्वभूमिवर बॉलिवूड अभिनेता आणि सध्या छावा चित्रपटामुळे प्रत्येकाच्या मनात स्थान करून राहिलेला अभिनेता विकी कौशल याने माध्यमांसमोर प्रतिक्रिया मांडल्या आहेत. विकी कौशल म्हणाला की, मला खुप छान वाटत आहे, महाराजांचे आशीर्वाद घेऊन आज घरी जाईन तर आज त्यामुळे मी आज खुप संतुष्ठ असल्यासारख वाटत आहे. शुटिंगच्या वेळेस खुप अडचणी आल्या पण माझ्यासोबत खुप चांगली टीम होती, असं विकी कौशल म्हणाला. त्याचसोबत पुढे मराठी भाषेत बोलताना विकी कौशल म्हणाला की, शंभूराजेंनी ज्या यातना सहन केल्या त्यांच्यापुढे ही मेहनत तर काहीच नाही. असं म्हणत विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केलें.

Delhi News: उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा; रामलीला मैदानावर होणार शपथविधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाला. जवळपास 27 ते 28 वर्षानी दिल्लीत भाजप सत्तेत आला आहे. दिल्ली शपथविधी सोहळा कधी होणार याबाबत चर्चा सुरु असताना आता उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार शपथविधी सोहळा पार पाडला जाणार आहे. हा समारंभ सकाळी 11 वाजता सुरू होईल. तसेच उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना दुपारी 12:35 वाजता नियुक्त मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला शपथ घेतील.

Rahul Gandhi Tweet: राहुल गांधी यांच्या "त्या" वादग्रस्त पोस्टवर महायुतीच्या नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया; काय म्हणाले?

याचपार्श्वभूमिवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच. परंतू, तमाम देशातील आणि राज्यातील शिवभक्तांना देखील अपमान केलेला आहे. कारण ही सगळी वक्तव्य जाणीवपुर्वक होत असतात. हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपुर्वक हेतू आहे. सावरकरांचा अपमान करणारे आता यांची मजल छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत गेली. हे चुकून झालेलं नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या कृत्यावर त्यांनी माफी मागितली पाहिजे.

त्याचसोबत पुढे निलेश राणे म्हणाले की, या औरंगजेबाच्या पिल्लावळीकडून आणखीन काही अपेक्षा नाही. हे हिरवे साप आहेत, औरंगजेबाच्या विचारावरती हे राजकारण करतात. नेहमी आमच्या शिवरायांचा यांना द्वेषच दिसणार. राहुल गांधींनी देशाची शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे.

Anjali Damania Vs Dhananjay Munde : अंजली दमानिया मुंडेंवर पुन्हा कडाडल्या! मुंडेंवर एक नवा आरोप करत राजिनाम्याची मागणी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांचे आणखी बॉम्ब फोडले आहे. यावेळी त्यांनी कोणते कोणते घोटाळे केले आणि कशा प्रकारे केले याबद्दल सांगितल आहे. IFFCO मध्ये महाघोटाळा केल्याचा आरोप करत, मुंडेंची कोणत्याही पदावर बसण्याची पात्रता नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे.

यावेळी अंजली दमानिया म्हणाल्या की, "धनंजय मुंडे खोटं बोलून दिशाभूल करत आहेत. जोपर्यंत मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही. मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतरच न्याय मिळेल. ऑफिस ऑफ प्रॉपर्टी मी मांडत नाही. मुंडेंची कोणत्याही पदावर बसण्याची पात्रता नाही. धनंजय मुंडे कधीही मंत्री झाला नाही पाहिजे! असं म्हणत धनंजय मुंडेंवर अपेक्षीत कारवाई होत नाही असं अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच दमानियांनी धनंजय मुंडेंना आवाहन केलं आहे की, हातात पेपर घेऊन बोला. तसेच यावेळी त्यांनी मुंडेंवर IFFCO मध्ये महाघोटाळा केल्याचा आरोप केला आहे".

"धनंजय मुंडे खोटे बोलून हे असे पत्र पाठवतात शासन मान्यता असल्याचे खोटे सांगून जीआर मिळवतात आणि ते करून घेत आहेत. इतकी जर यांची लिमिट होत असेल तर त्यांना कुठल्याच मंत्री पदावर कधीही बसता कामा नये, यांची तितकी पात्रताच नाही. कारण इतका भ्रष्ट माणूस मंत्रिमंडळाचे निर्णय झाले आहेत असे दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री कधीही नाही झाला पाहिजे, कृषिमंत्री तर कधीच नाही, अशी माझी थेट मागणी आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवारांनी आता तरी कारवाई करावी.

"कृषी घोटाळा नंबर 2 मध्ये धनंजय मुंडे कुठल्याही पद्धतीने वाचत नाहीत. हे एक पत्र आहे या पत्रावर तारीख नाही. मंत्री लिहितात पण तारीख लिहिलेली नाही. या पत्रात लिहिले आहे की दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत विचारात ठेवलेल्या मंजूर झालेला कृषी विभागाच्या प्रस्तावचे इतिवृत्त कायम करण्यात आले. म्हणजे हा मंत्री किती थराला जाऊ शकतो, याचे हे धडधडीत उदाहरण आहे. मी या दोन्ही तारखांच्या बैठकांचे अटॅचमेंट पाठवले आहेत. कुठेही निर्णय झालेला नाही आणि मंत्री लिहितात काय. महाराष्ट्र शासन कार्य नियमावली व त्या अन्वये दिलेल्या अनूदेशनमधील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी, मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे तातडीने, आता मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेलाच नाहीये".

मुंबई, नवी मुंबई, ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी

मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांतील नागरिकांना परवडणारी घर मिळणार

राज्यासाठी लवकरच नवीन हाउसिंग पॉलिसी तयार करणार

शिंदेंकडून नवीन हाउसिंग पॉलिसीची घोषणा

Eknath Shinde: मुंबई, नवी मुंबई, ठाणेकरांना परवडणारी घर मिळणार; उपमुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

https://www.lokshahi.com/news/eknath-shinde-announces-new-housing-policy

आज नवी मुंबई मधील 21399 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. लोकांसाठी परवडणारी घर तयार करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. राज्यासाठी लवकरच नवीन हाउसिंग पॉलिसी तयार करण्यात येणार आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून मुंबई नवी मुंबई ठाणे यासारख्या शहरांमध्ये नागरिकांना परवडणारी घर मिळतील. लोकांसाठी परवडणारी घर तयार करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. राज्यासाठी लवकरच नवीन हाउसिंग पॉलिसी तयार करण्यात येणार आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून मुंबई नवी मुंबई ठाणे यासारख्या शहरांमध्ये नागरिकांना परवडणारी घर मिळती, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

NCP SP Vs BJP: राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गेलेल्या नगरसेवकांची भाजपमध्ये घरवापसी, संदीप नाईक यांना पक्षात घेणार भाजप?

नवी मुंबईतील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेल्या नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. तुतारी हातात घेणारे सर्व नगरसेवक पुन्हा भाजपात आले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. दरम्यान, संदीप नाईक यांना पक्षात घेण्याबाबत अद्याप चर्चा नाही, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी दिली आहे.

Manoj Jarange यांची Suresh Dhas आणि Supriya Sule यांच्यावर जोरदार टीका | Lokshahi Marathi

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा खासदार सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केलीये...सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यावरून जरांगेंनी टीका केलीये...तर सुप्रिया सुळेंनी देशमुख कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आंदोलन करणार असल्याचं म्हटलं त्यावर जरांगेंनी टीका करत, निवडणुकांपूरतं मतांसाठी सुरू असल्याचं म्हटलंय...

Shivneri: शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा उत्साह; सोहळ्याला फडणवीस, शिंदे यांची उपस्थिती

१९ फेब्रुवारीला सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार साजरी करण्यात येते. ज्यांनी इथल्या रयतेला स्वराज्य दिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहेत. अशा या रयतेच्या राजाने आतापर्यंत जिंकलेले गडकिल्ले अनेकांनी सर केले आहेत. आजच्या पिढीला स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती असणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शिवनेरीसह संपूर्ण राज्यामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी शिवाई देवीची शासकीय महापूजा केली आणि अभिषेक करत शिवजन्मोत्सवास सुरूवात करण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. त्याचसोबत सर्व शासकीय अधिकारींनी देखील आपली उपस्थिती लावली.

Delhi New CM : भाजपचं ठरलं! दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी रेखा गुप्ता यांची निवड

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाला. जवळपास 27 ते 28 वर्षानी दिल्लीत भाजप सत्तेत आला आहे. दिल्ली शपथविधी सोहळा कधी होणार याबाबत चर्चा सुरु असताना आता उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार शपथविधी सोहळा पार पाडला जाणार आहे. हा समारंभ सकाळी 11 वाजता सुरू होईल. तसेच उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना दुपारी 12:35 वाजता नियुक्त मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला शपथ घेतील. याचपार्श्वभूमिवर एक महत्त्वाची बातमी समोर आली. दिल्लीत भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची करण्यात घोषणा आली आहे. दिल्लीत मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आली असून, दिल्लीतील भाजपा कार्यालयातील बैठकी नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.पर्यवेक्षक रवीशंकर प्रसाद आणि ओपी धनगड यांनी मुख्यमंत्री पदाची घोषणा केली. दरम्यान दिल्लीतील भाजपा कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे.

Pandharpur : पंढरपूरच्या दर्शन मंडप आणि स्कायवॉक कामाची 130 कोटींची निविदा रद्द

https://www.lokshahi.com/news/tender-worth-for-pandharpurs-darshan-mandap-and-skywalk-work-cancelled

पंढरपूरच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉकची 130 कोटी रुपयांची निविदा रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कामात समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामाला मूर्त स्वरूप देण्याच्या सूचना होत्या. विठू भक्तांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन व्हावे यासाठी दर्शन मंडप उभारला जाणार होता. मात्र, आता अचानक निविदा रद्द झाल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आल्याच दिसत आहे. वरिष्ठ पातळीवरचे आदेश आणि तांत्रिक अडचणीमुळे निविदा थांबवली असल्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती आहे.

Coastal Road : Lokशाही मराठीच्या बातमीची'पंतप्रधान कार्यालयाकडून दखल, Coastal Roadच्या पॅचवर्कबाबत PMOचे स्पष्टीकरण

https://www.lokshahi.com/news/prime-ministers-office-takes-note-of-lokshahi-marathi-news-pmo-clarifies-on-patchwork-of-coastal-road

मुंबई महापालिकेचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मार्गावरील डांबरी उंचवट्यांमुळे या रस्त्याची दुर्दशा झाल्याची ध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर फिरत होती. या चित्रफितीची पंतप्रधान कार्यालयानेही दखल घेतली असून याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली. कोस्टल रोडवर पॅचवर्कची बातमी लोकशाही मराठीनं दाखवताच त्याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयानं घेतली आहे मुंबईच्या सागरी किना-यावर मास्टिकचं काम करण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यलयानं स्पष्ट केलं आहे. मुंबई किनारी कोणतेही खड्डे नसल्याचंही पंतप्रधान कार्यालयानं म्हटल आहे. मात्र, रस्त्यावर पॅचवर्क केल्यानं उंचवटे तयार झाले असून, त्याचा त्रास वाहन चालकांना होत असल्याचं वृत्त लोकशाही मराठीनं दाखवलं होतं.

Sourav Ganguly Car Accident : माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या कारचा अपघात; गांगुली सुरक्षित !

https://www.lokshahi.com/sports/cricket/former-cricketer-sourav-gangulys-car-accident

माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या कारचा अपघात झाला आहे, मात्र सुदैवाने माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांना गंभीर दुखापत झाली नसून ते आता सुरक्षित आहेत. सौरव गांगुली यांच्या कारचा दुर्गापूर एक्सप्रेस वेवर अपघात झाला आहे. सौरव गांगुली यांच्या कारसमोर अचानक एक ट्रक आल्याने गांगुली यांच्या ताफ्यातल्या गाड्यांनी अचानक ब्रेक लावले. ब्रेक लावल्यामुळे ताफ्यातल्या गाड्या एकमेकांवर धडकल्या. ज्यामुळे ताफ्यातल्या 2 गाड्यांचं मोठं नुकसान झाल आहे. पण गाडीतले सर्व प्रवाशी सुरक्षीत आहेत.

Pune News : पुण्यात कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीचा धुमाकूळ; मारहाण प्रकरणी 3 जणांना अटक

https://www.lokshahi.com/news/3-people-arrested-in-connection-with-assault-on-a-person-in-minister-muralidhar-mohols-office

पुण्यात कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीचा कोथरूड मध्ये धुमाकूळ पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या आँफीसमध्ये सोशल मिडियाचे काम करणाऱ्या एकाला मारणे टोळीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या नाकावर गंभीर जखम झाली आहे. हाँर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडीओ काँल करून जखमींची चौकशी केली. यादरम्यान सर्व आरोपी नुकतेच जामीनावर बाहेर आले आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मारणेचा भाचा फरार आहे.

मारहाण केलेल्या आरोपींची नावे

१)अमोल विनायक तापकीर.

२)ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू .

३)किरण कोंडीबा पडवळ.

4)बाबू पवार (गजाचा भाचा)

Vohra Committee Report: वोहरा समितीचा अहवाल रेकॉर्डवरुन गायब; दाऊद आणि राजकारण्यांच्या कनेक्शनचा तपास !

http://lokshahi.com/news/vohra-committee-report-missing-from-records

वोहरा समितीचा अहवाल रेकॉर्डवरून गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. दाऊद, अंडरवर्ल्ड आणि राजकारण्यांच्या कनेक्शनबद्दल तपास करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. भारतीय राजकारणी, नेते किंवा शरद पवार यांच्या उल्लेखाविषयी कोणतीही माहिती रेकॉर्डवर नसल्याचं केंद्रीय गृहखात्याने म्हटलंय. एका माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना केंद्रीय गृहखात्याने अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. माहितीच अभिलेखावर उपलब्ध नाही, असं गृहखात्याचं उत्तर भुवया उंचावणारं आहे.

Shubman Gill Century : गिलने पुन्हा जिंकल भारतीयांच दिल! सेंच्युरी पुर्ण करत बांगलादेशचा दारुण पराभव

हायब्रिड मॉडेलच्या आधारे आंततराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या चॅम्पियन्स ट्रॉफी स्‍पर्धेचे आयोजन केले असून दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतविरुद्ध बांगलादेश या संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यादरम्यान बांगलादेश या संघाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियासमोर 229 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावा पुर्ण करण्यासाठी सुरुवातीला मैदानात हिटमॅन आणि गिल या जोडीने 69 धावांची भागीदारी करत दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर रोहित फार काळ न टिकता 41 धावांवर माघारी परतला. मात्र, गिलने शेवटपर्यंत रोमांचक असा डाव खेळला. त्यानंतर विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या स्टार खेळाडूंनी गिलला साथ दिली. त्यानंतर अखेर के एल राहुलसह मिळून गिलने कुठेही डगमगता शेवटपर्यंत किल्ला लढवला. त्याने त्याचे शानदार शतक पुर्ण करत टीम इंडियाचे 6 गडी राखून विजय मिळवून दिला. ज्यामुळे गिलने पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांचं मन जिंकलं आहे.

IND vs PAK : "पाकिस्तान भारताचा पराभव करेल" IIT बाबांनी केली भविष्यवाणी, भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आनंदात मिठाचा खडा

https://www.lokshahi.com/sports/cricket/iit-baba-has-predicted-that-pakistan-will-defeat-india-in-the-2025-champions-trophy

सध्या सर्वत्र चॅम्पियन्स ट्रॉफीचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्ध भारत या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 6 गडी राखून विजय मिळवला. हा सामना बराच रोमांचक होताना पाहायला मिळाला. बांगलादेशने टीम इंडियासमोर 229 धावांचे आव्हान ठेवले असताना भारताने 231 धावांसह बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यात शुभमन गिलने त्याच्या धुवाधार फलंदाजीने शानदार शतक पुर्ण करत शेवटपर्यंत किल्ला लढवला. तसेच गिलने पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांचं मन जिंकलं आहे. असं असताना आता 23 तारखेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा थरार रंगणार आहे. या सामन्याची भारतासह सर्वच क्रिकेटप्रेमींना मोठी उत्सुकता आहे. अशातच महाकुंभमेळ्यात प्रसिद्धी मिळवलेल्या IIT बाबाने अनोखी भविष्यवाणी केली आहे. या बाबाच्या भविष्यवाणीमुळे बाबा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेले दिसून येत आहे. मात्र, यावेळेस बाबांवर मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमींचा आक्रोश पाहायला मिळत आहे. बाबाने नेमकी अशी कोणती भविष्यवाणी केली जाणून घ्या.

एका युट्यूब चॅनलला मुलाखत देत असताना IIT बाबा अभय सिंहने एक वादग्रस्त वक्तव्य केलं. बाबा म्हणाले की, "यावेळी भारताचा पाकिस्तानसमोर टिकाव लागणार नाही. विराट कोहली किंवा रोहित शर्मा याने कितीही प्रयत्न केले तरी भारत ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकणार नाही. मी म्हणतोय नाही जिंकणार तर नाही जिंकणार भारत हा सामना, देव मोठा आहे की तुम्ही. आता तुम्हाला काय करायचं ते करा पण भारत हा सामना जिंकण कठीण आहे. पाकिस्तान भारताचा पराभव करेल. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा मी जिंकून दिली होती, मी रोहितला सांगितलं होतं की, कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची. पण आता सगळ उलट केल आहे मी, यावेळेस भारत हरणार". त्यांच्या या भविष्यवाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. त्यांच्या या भविष्यवाणीवर भारतीय क्रिकेटप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. आता ही भविष्यवाणी खरी ठरते की खोटी ते 23 तारखेलाच कळेलच. मात्र, एकीकडे भारतीय क्रिकेटप्रेमी खुश असताना दुसरीकडे IIT बाबा मात्र आनंदात मिठाचा खडा टाकण्याचं काम केल आहेत.

Jalna Copy Case: जालन्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, दहावीचा पहिलाच मराठी विषयाचा पेपर फुटला

देशासह राज्यामध्ये सर्वत्र परीक्षेचे सत्र सुरू झाले असून बारावीची परीक्षा पाठोपाठ आज दहावीच्या परीक्षेला देखील सुरुवात झाली आहे आज दहावीचा मराठीचा पहिला पेपर असून जालन्यात दहावीचा पहिलाच पेपर फुटला आहे. त्यामुळे जालन्यातील कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला आहे. दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. जालन्यातील बदनापुर आणि मंठा तालुक्यात पेपर फुटला आहे. बदनापुरमध्ये चक्क 20 ते 30 रुपयांत पेपरच्या झेरॉक्स काढून त्या वाटण्यात आल्या आहेत. उत्तरपत्रिका वाटण्यासाठी मुलांचा घोळका सेंटरबाहेर पाहायला मिळत होता.

Anna Hazare On Dhananjay Munde : 'आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे'; अण्णा म्हणाले.

बीड सरपंच हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप असताना त्यांच्या राजिनाम्याची मागणी होत आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आरोप झाले तर जबाबदारी म्हणून पहिले आपण राजीनामा दिला पाहिजे. नाव न घेता समाजसेवक अण्णा हजारेंचा माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेवर प्रहार?; मंत्री मंडळातील मंत्र्यांवर बोलतांना अण्णांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अण्णा हजारे म्हणाले की, मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेस आरोप होतात त्यावेळेस एक क्षण सुद्धा पदावर राहण दोष आहे. लगेच राजीनामा देऊन मोकळ व्हायचं ही आपली जबाबदारी आहे. अशे मंत्री जे मंत्रिमंडळात घेतात त्यांनी आधीच विचार करायला हवा. सुरुवातीला हेच चुकत आणि चुकल्यानंतर अशा या घटना घडतात. त्याच्यामुळे राज्याचा नुकसान होतो, देशाचा नुकसान होतो, समाजाचा नुकसान होतो. याचा विचार करण गरजेच आहे.

Mumbai Indians New Jersey : आयपीएल 2025 साठी पलटण सज्ज! चला भेटूया वानखेडेला, MIच्या जर्सीचा नवा लूक आऊट पाहा व्हिडिओ

आयपीएलमधील यशस्वीरीत्या आपल्या संघाच वर्चस्व टिकवून ठेवणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स.

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2024 अत्यंत खराब ठरले होते.

हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सचा परफॉर्मन्स अनपेक्षित पाहायला मिळाला होता.

ज्यामुळे हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल केल जात होत.

यावेळी हार्दिक स्पेशल मेसेज घेऊन आला आहे, त्याचसोबत मुंबईच्या जर्सीचा नवा लूक देखील चाहत्यांसमोर घेऊन आला आहे.

MIच्या अधिकृत सोशल मीडियवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'आयपीएल 2025 साठी आपल्या मुंबईची जर्सी' असं लिहलं आहे.

Horoscope | 'या' राशीचे व्यक्ती सकारात्मक राहतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

मेष (Aries Horoscope)

आज तुमचा एखादा मित्र तुम्हाला मोठी रक्कम उधार मागू शकतो. तुम्ही त्याला मदत केल्याने तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अपंगत्व येऊ शकते. तुमच्या कुटुंबाला योग्य वेळ द्या. त्यांना वाटू द्या की तुम्ही त्यांची काळजी घेत आहात. त्यांच्यासोबत तुमचा दर्जेदार वेळ घालवा. तक्रार करण्याची संधी देऊ नका.

वृषभ (Taurus Horoscope)

या राशीच्या राशीच्या लोकांना आज लोकांना भेटण्यापेक्षा एकटे जास्त वेळ घालवायला आवडेल. आज तुमचा मोकळा वेळ घर स्वच्छ करून घालवता येईल. तुमच्या वैवाहिक जीवनात आज गोष्टी खरोखरच सुंदर आहेत.

मिथुन (Gemini Horoscope)

आज अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय आर्थिक नुकसान होऊ शकेल असे कोणतेही पाऊल किंवा कृती उचलू नका. आनंदी-उत्साही-प्रेमळ मूडमध्ये तुमचा आनंदी स्वभाव तुमच्या सभोवतालच्या लोकांना आनंद आणि आनंद देतो. तुमचा प्रियकर दिवसभर तुमची खूप आठवण काढणार आहे.

कर्क (Cancer Horoscope)

आज तुम्ही तुमचा व्यवसाय मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता, ज्यासाठी तुमच्या जवळची व्यक्ती आर्थिक मदत करू शकते. घरगुती जीवन शांत आणि प्रेमळ असेल. तुमचे चांगले जीवन विकसित होताना प्रेम जीवन चांगले वळण घेईल.

सिंह (Leo Horoscope)

तुमच्या भावंडांच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुमच्या भावंडांचा सल्ला घ्या. जुने संपर्क आणि नातेसंबंध पुन्हा जिवंत करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे. आज प्रेमात तुमच्या विवेकबुद्धीचा वापर करा. दानधर्म आणि सामाजिक कार्य तुम्हाला आकर्षित करतील - जर तुम्ही तुमचा वेळ उदात्त कार्यासाठी दिला तर तुम्ही खूप मोठा फरक करू शकता.

कन्या (Virgo Horoscope)

आज तुम्हाला काही अतिरिक्त पैसे मिळतील. वैवाहिक संबंधात प्रवेश करण्यासाठी हा चांगला काळ आहे. तुम्हाला एक काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत थोडा वेळ घालवण्यासाठी ऑफिसमधून लवकर निघू शकता.

तूळ (Libra Horoscope)

आज तुम्ही कोणत्याही मदतीशिवाय किंवा मदतीशिवाय पैसे कमवू शकाल. नातेवाईक आणि मित्रांकडून अनपेक्षित भेटवस्तू आणि भेटवस्तू. आज तुम्ही तुमचे कोणतेही वचन पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रियकर चिडचिडा होऊ शकतो. आज, घरी जुनी वस्तू सापडल्याने तुम्हाला आनंद होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर एकत्र येण्यास आणि त्यांच्यावर भरपूर पैसे खर्च करण्यास सांगू शकता. घरगुती जीवन शांत आणि प्रेमळ असेल. आज तुमच्या वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने गोष्टी खरोखरच अद्भुत दिसतात.

धनु (Sagittarius Horoscope)

विशेषतः जे लोक तुमच्यावर प्रेम करतात आणि तुमची काळजी घेतात त्यांच्याशी वाजवी राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या प्रेम जोडीदाराची एक नवीन अद्भुत बाजू पाहायला मिळेल. आज रात्री तुमच्या जोडीदारासोबत मोकळा वेळ घालवताना, त्यांना अधिक वेळ देणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला जाणवेल.

मकर (Capricorn Horoscope)

तुमच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल तुमचा वर्चस्व गाजवण्याचा दृष्टिकोन केवळ निरुपयोगी वादांना सुरुवात करेल आणि टीका देखील होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या हृदयाच्या ठोक्यांशी सुसंगत असाल. हो, हे असे लक्षण आहे की तुम्ही प्रेमात आहात! तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या लोकांशी मैत्री करणे टाळा.

कुंभ (Aquarius Horoscope)

तुम्हाला कमिशन - लाभांश - किंवा रॉयल्टीमधून फायदे मिळतील. तुमची अतिऊर्जा आणि प्रचंड उत्साह अनुकूल परिणाम आणेल आणि मैत्री अधिक घट्ट होत असताना तुमच्या मार्गात प्रेम निर्माण होईल. या राशीच्या लोकांनी आज त्यांच्या मोकळ्या वेळेत काही आध्यात्मिक पुस्तके वाचली पाहिजेत. असे केल्याने, तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

मीन (Pisces Horoscope)

आज तुम्ही सकारात्मक आभा निर्माण कराल आणि मनःस्थिती चांगली असेल, पण तुमच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यामुळे तुमचा मूड प्रभावित होऊ शकतो. कुटुंबातील तणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळ आपल्याला बरेच काही देतो. स्वतःबद्दल दया दाखवण्यात वेळ वाया घालवू नका तर जीवनाचे धडे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेध धस पहिल्यांदाच मस्साजोगात

Suresh Dhas : पोलिसांवर गंभीर आरोप, सहआरोपी करण्याची मागणी; सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाचे आका म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुरेश धस यांनी अनेक आरोप केले होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर धस चर्चेत येताना दिसले मुंडेंच्या भेटीनंतर धस आपली भूमिका बदलतात का? असे अनेक प्रश्न धसांसमोर उपस्थित केले जात होते. तसेच त्यांच्यावर विरोधीपक्षाकडून मोठ्याप्रमाणात टीका टिप्पणी केली जात होती. एवढ सगळ झाल्यानंतर आता पहिल्यांदा त्यांनी देशमुख कुंटुंबीयांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत.

सुरेश धस म्हणाले की, 6 तारखेला घडलेली घटना 9 तारखेपुरती मर्यादीत न ठेवता, एका नावाच्या अधिकाऱ्याला उचलून नेले होते. त्यावेळेचे सीडीआर तपासले गेले पाहिजे. त्यासाठी सायबर सेलचे दोन अधिकारी नेमण्याची विनंती केली आहे. महाजन हे बीडवरून येऊन केज पोलीस ठाण्यातील लॅपटॉपमध्ये काम करतो. त्याचा काय संबंध? तो कसं काय बसतो? असा प्रश्न धसांनी केला. तसेच पुढे धस म्हणाले की, त्यामुळे महाजन आणि राजेश पाटील या दोघांवर सहआरोपी म्हणून तत्काळ कारवाई व्हावी. फरार कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करणे गरजेचे आहे. कृष्णा आंधळे हा शातीर आहे, आरोपी तारखेला आल्यावर मोठ बूट घातलेले चित्रविचित्र दिसणारे लोक कसे येतात. ते आरोपींचे मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत. कृष्णा आंधळे यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल असताना पोलीस अधिकारी नित्यनियमाने भेटत होते. 307 च्या फरार आरोपीसोबत पोलीस गप्पा मारत होते. सुरुवातीला देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, ती प्रक्रियेत आहे. धनंजय देशमुख यांना खासगीमध्ये माहिती दिली आहे. डॉ. संभाजी वायभासे आणि त्यांच्या पत्नी यांनी आरोपींना पैसे पाठवले आहे, यांना सहआरोपी करावे अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली.

तसेच पुढे धस म्हणाले की, नितीन बिक्याबद्दल मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो तो महत्त्वाचा आरोपी आहे. नितीन बिक्याबद्दलकड याने धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक घेतली, त्याचसोबत तो तांबोळी आणि शुक्लाला शासकीय निवासस्थानात बैठक घ्यायला गेला होता. हे सगळे आरोपी ज्यावेळी इथून गेले, त्यानंतर वाशीमधून आरोपींना पळून जाण्यात मदत करण्यास नितीन बिक्कडचा वाटा आहे. मग हा आरोपी कसा होत नाही. केसमध्ये आत्तापर्यंत वाल्मिक कराडसह इतर 9 लोक हे 302 मध्ये आले आहेत. 10 वा आरोपी अजून त्यात नाही. त्याचा रोल खंडणी आणि इतर प्रकरणात आहे. मी उद्या नागपूर किंवा मुंबईत मुख्यमंत्री यांची भेट घेणार आणि सर्व मागण्या मुख्यमंत्री यांच्या कानावर घालणार. या मागण्यांची पूर्तता झाली तर 25 तारखेला मस्साजोग करांना आंदोलनाची गरज राहणार नसल्याचे धस म्हणाले.

Nashik : नाशिक मधील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं काम सुरु, मनपाकडून कारवाई; परिसरात तगडा बंदोबस्त

नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं काम सुरु आहे. काठे गल्लीतील मनपाकडून कारवाई सुरु आहे. परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार असा इशारा सुद्धा देण्यात आला होता. 25 वर्ष पाठपुरावा करून देखील मनपा दर्गा हटवत नसल्याने हा इशारा देण्यात आला होता. अनधिकृत दर्गा हटवण्याचा हा इशारा देण्यात आलेला आहे. सकल हिंदुत्त्ववादी संघटनांच्या आधी संपुर्ण पोलिस प्रशासन हे खडबडून जाग झालेलं आहे. त्याचसोबत घटनास्थळी भाजपा आमदार देवयानी फरांदे दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आमदार देवयानी फरांदे यांना अनधिकृत धार्मिक स्थळाची पाहणी करण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला असल्याची देखील सुत्रांची माहिती आहे. तर आता अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण सुरू आहे त्यामुळे आत मध्ये जाऊ नका अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

Karnataka : कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडीगांनी महाराष्ट्राच्या एसटी बसला काळ फासलं

महाराष्ट्रात मराठी भाषेची आणि मराठी माणसाची कोणत्या न कोणत्या कारणाने गळचेपी होताना पाहायला मिळत आहे. अस असताना आता कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात कन्नड येत नाही म्हणून कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्र एसटी बसला आणि बस चालकाला काळे फासल्याच्या घटनेची पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरुवात झाली आहे. हे लक्षात घेऊन कर्नाटकातून महाराष्ट्राकडे जाणारी बस सेवा थांबवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सकाळपासून महाराष्ट्रातून एकही बस बेळगावकडे आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो आहे. यामुळे सीमा भागातील मराठी लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई बंगळुरू बसवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यानंतर बस चालकाला एसटी बसमधून खाली ओढून "कर्नाटकात यायचं असेल तर कन्नड बोलायलाच हवं" असं म्हणत कार्यकर्त्यांनी एसटी बसला आणि चालकाच्या तोंडाला काळे फासले. या घटनेनंतर आता महाराष्ट्र -कर्नाटक आंतरराज्य बस सेवेवर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. काही काळासाठी महाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही राज्याच्या आंतरराज्य बस सेवेवा बंद राहणार आहेत. सकाळपासून महाराष्ट्रातून एकही बस बेळगावकडे गेली नाही तसेच कर्नाटक आणि कोल्हापुरातील आंदोलनामुळे खबरदारी घेण्यात आली आहे.

Fire at Mumbai Marine Line : दक्षिण मुंबईतील मरिन चेंबरजवळ भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मेट्रो सिनेमाजवळ पाचव्या माळ्यावर इमारतीला आग लागली. मेट्रो सिनेमाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या मरीन चेंबरला लागली आग लागलेली आहे. मरीन चेंबर ही पाच माळ्याची इमारत असून या इमारतीच्या पाचव्या मळ्यावर आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु असून रहिवासी इमारतीला आग लागल्याची प्राथमिक माहिती दिली.

Suresh Dhas : मस्साजोगनंतर परळी, देशमुखांनंतर सुरेश धस मुंडे कुटुंबीयांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा?

संतोष देशमुख हत्या प्रकरणा दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर धस चर्चेत येताना दिसले मुंडेंच्या भेटीनंतर धस आपली भूमिका बदलतात का? असे अनेक प्रश्न धसांसमोर उपस्थित केले जात होते. तसेच त्यांच्यावर विरोधीपक्षाकडून मोठ्याप्रमाणात टीका टिप्पणी केली जात होती. एवढ सगळ झाल्यानंतर आता पहिल्यांदा त्यांनी देशमुख कुंटुंबीयांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. तसेच मस्साजोग मध्ये देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या भेटीला गेले.

महादेव मुंडे यांचा खून झाला त्यावेळेस त्यांची गाडी घेऊन जाण्यात आली ज्यात सर्व साहित्य होते. पोलीस आहेत की, पोलिसांच्या वर्दीतील दरिंदे आहेत हेच कळत नाही. पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे पंधरा वर्षांपासून येथे आहे. या हप्त्यात पोलिसांचा हात आहे का? आकाशी संबंधित लोकांनी प्लॉट घेतला. नवीन पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा आहे ते यातील आरोपीला अटक करतील. मुख्यमंत्री आणि रश्मी शुक्ला यांच्याकडे मी या प्रकरणाची लेखी तक्रार करणार. परळी मध्ये कीड्या मुंग्यासारखे माणसं मारली जात आहेत. परळी बदनाम का होते याकडे लक्ष द्या. महादेव मुंडे हा एकटा आहे का प्लॉटिंगचा व्यवसाय करणारा? सुरेश धस यांनी असा प्रश्न केला आहे.

धसांचा निशाणा पोलिस प्रशासनावर

महादेव मुंडेचा खूनी पोलिसांना का सापडत नाही? परळीत 35 लाखात मर्डर प्रकरण मिटते. राजस्थानी मल्टीस्टेटचे संचालक का मिळत नाही? हे सर्व याचा परिपाक आहे. या प्रकरणात आकाचा संबंध आहे किंवा पोलिसांनीच आमचा माणूस मारला आहे. या प्रकरणात पोलिसांची मिली भगत आहे त्याशिवाय एवढा मोठा खून होणार नाही. त्यानंतर त्याच ठिकाणी शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला. राजस्थानी मल्टीस्टेट बँकेमुळे सहा लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. महादेव मुंडे व्यवसायिक असताना देखील त्याचा यात काय संबंध? परळीचे पोलीस दल इथून उचलून दुसरीकडे नेले पाहिजे आणि दुसरे लोक या ठिकाणी आणले पाहिजेत अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असं सुरेश धस म्हणाले आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांवर संशयाची सुई

आकाच्या आवडत्या लोकांनी महादेवचे जीवन संपवले. मी ज्ञानेश्वरी मुंडे यांना विनंती करतो त्यांनी आपले उपोषण चार ते पाच दिवसांनी पुढे ढकलावे. या प्रकरणात काहीतरी प्रगती होईल मी स्वतः यात लक्ष घालत आहे. त्या उपोषणावर ठाम राहिल्या तरी मी त्यांच्याबरोबर राहील. मात्र विनंती त्यांनी आठ दिवसांची मुदत द्यावी. हे पोलीस नेमके कुणाला लागत होते याची देखील चौकशी झाली पाहिजे. जे जुने पोलीस दल जे तीन वर्षांपेक्षा अधिक असतील ते सर्व पोलीस दल परळीतून हलवले पाहिजे. त्यांना परळी मतदारसंघ सोडून बाहेर न्यावे. अन्यथा हे सर्व पोलीस दल बीड जिल्ह्याच्या बाहेर न्यावे अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. मुख्यमंत्र्यांची मी सोमवार किंवा मंगळवारी भेट घेणार आहे. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांची नागपूरला उद्या भेट घेणार. असं देखील सुरेश धस म्हणाले आहेत.

IND Vs PAK Champions Trophy 2025 : 'सुपर संडे'ला रंगणार तगडा सामना! भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला

नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेश विरुद्ध भारत या सामन्यात भारताने आपले 6 गडी राखून विजय मिळवला होता. यानंतर भारताचा पुढचा सामना हा रविवारी 23 फेब्रुवारी कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानसोबत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान म्हटलं की, संपुर्ण देश हातातील सर्व काम सोडून हा तगडा सामना पाहण्यास सज्ज झालेला असतो. याचसोबत आपले भारतीय संघाचे खेळाडू देखील त्यांचा पुर्ण जोर लावून ही मॅच खेळण्यास सज्ज झाले आहेत. पाकिस्तानच्या यजमानपदाखाली दोन कट्टर प्रतिस्पर्धी दुबईच्या मैदानावर आमने-सामने आहेत. पाकिस्तानला त्यांच्याच मैदानात धुळ चारण्यासाठी भारताची प्लेईंग रणनिती ठरली आहे. तसेच या हायहोल्टेज लढतीकडे संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष लागले आहे. जाणून घ्या कधी, कुठे आणि किती वाजता पाहायला मिळेल हा सामना..

कधी, कुठे आणि किती वाजता पाहाल सामना?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमधील हा सुपर सामना क्रिडाप्रेमींना टीव्ही तसेच डिजिटल अॅप्सवर पाहता येणार आहे. रविवारी दुपारी 2: 30 वाजता हा सामना पार पडणार असून यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडेल. टीव्हीवर हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवला जाईल तर JioHotstar च्या अॅप तसेच वेब साईटवर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग होईल. मोबाईवर हा सामना JioHotstar च्या अॅपवर फ्रीमध्ये पाहता येईल.

टीम इंडियाची प्लेइंग 11 संभाव्यता

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.

पाकिस्तानची प्लेइंग 11 संभाव्यता

इमाम उल हक, उस्मान खान, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सलमान आगा, तय्यब ताहिर / कामरान गुलाम, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.

Gulabrao Patil: ...म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांना कोणी हलक्यात घेऊ नये, ते जडच आहेत, गुलाबराव पाटील यांचा ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री पदावरून डावलल्यानंतर एकनाथ शिंदेंना सरकारमध्ये साईडलाईन केलं जात असल्याची चर्चा आहे. मागच्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दरी वाढत असल्याच्या देखील चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे महायुतीत मागील गेले काही दिवसांपासून धुसफूस होत असलेली पाहायला मिळत आहे. असं असताना गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे तसेच एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमक्यांविषयी माध्यमांशी चर्चा केली आहे.

एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमकीच्या प्रकरणावर गुलाबराव पाटील म्हणाले की, अशा लोकांवर तत्कालीन कारवाई करावी. कारण एकनाथ शिंदे हे जनसामान्यांचे नेते आहेत. अशा माणसाला जर कोणी धमक्या देत असेल तर ते सहन करण्याची ताकद आमच्यात पण नाही, आणि वेळ आली तर शिवसेना सगळी रस्त्यावर उतरेल, असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला. तसेच पुढे गुलाबराव पाटील म्हणाले की, जोपर्यंत आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणावर आरोप करण मला तरी योग्य वाटत नाही. पोलिस प्रशासन यावर निश्चित योग्य ती कारवाई करेल आणि दोषीला शिक्षा देईल.

एकनाथ शिंदे यांनी मला हलक्यात घेऊ नका असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी सांगितल होत की आपण पुढच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागा जिंकू आम्ही तिघ मिळून महायुतीच सरकार आणू आणि त्यांनी हे करून दाखवल. त्यामुळे ते जस म्हणाले की, मला हलक्यात घेऊ नका ते बरोबरच म्हणाले आहेत. कारण ते एकनाथ शिंदे हे जडचं आहेत. पुढे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी फक्त संजय राऊत यांना धक्का द्यावा त्यांना कोणताच धक्का लागणार नाही, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलेलं आहे.

Ravindra Dhangekar : पुण्यात काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप? रविंद्र धंगेकर शिवसेनेत जाणार?

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतीच काही दिवसांपुर्वी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीनंतर त्यांनी लगेच स्पष्ट केल की, ही भेट केवळ वैयक्तिक कामासाठी घेतली गेली होती. त्यामुळे या भेटी दरम्यान चर्चांना आलेल उधाण कमी झालेल पाहायला मिळालं. मात्र आता पुन्हा एकदा आमदार रविंद्र धंगेकर चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असताना पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍समधील फोटोत त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेलं आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर लवकरच शिवसेनेत जाणार का? अशा चर्चा सुरु आहेत. रवींद्र धंगेकरांनी दिवसभरात दुसऱ्यांदा स्टेटस बदललं 'राजा हरला काय राजा जिंकला काय, राजा हा राजा असतो...निष्ठेत तडजोड नाही' रवींद्र धंगेकरांच्या नव्या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याचपार्श्वभूमिवर एकनाथ शिंदे शिवसेनचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत म्हणाले की, " रवींद्र धंगेकर यांनी जर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला तर आम्हाला सर्वानांच आनंद होणार आहे. रवींद्र धंगेकर हे हाडाचे कार्यकर्ते आहेत त्याचसोबत लोकांमध्ये जाऊन काम करणारा चेहरा आहे, त्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत माझ्यासोबत सगळ्यांच माहित आहे. त्यामुळे जर असं एखादं नेतृत्त्व आम्हाला मिळालं आणि त्यांनी शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली काम केल, तर आम्हाला सगळ्या आनंदच होणार आहे. त्याचसोबत ऑपरेशन टायगरवर रवींद्र धंगेकर यांच्यासोबत कोणती चर्चा झाली आहे का? यावर उदय सामंत म्हणाले की, मी आजच रवींद्र धंगेकर यांना भेटलो पण, ते एका कामासाठी मला भेटायला आले होते. मी त्याच ट्वीट सुद्धा केलेलं आहे. योगायोगाने त्यांच्या चिरंजीवांचा वाढदिवस देखील काल झाला आणि तो सुद्धा आम्ही साजरा केला. पण आमची राजकारणा संबंधी कोणतीच चर्चा झाली नाही.

रवींद्र धंगेकर यांच्या स्टेटसवर सामंत म्हणाले की, हा स्टेटस त्यांनी ठेवला आहे त्यामुळे त्याच्यामागच्या भावना देखील तेच सांगू शकतात. मी लोकशाही मराठीच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी समाजकल्याणाचा जो वसा हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घ्यावा, अशी मी त्यांना विनंती करतो, असं मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.

आरोग्याची काळजी घ्या आणि गोष्टी व्यवस्थित करा. तात्पुरत्या कर्जासाठी तुमच्याकडे येणाऱ्यांना दुर्लक्ष करा. तणावाचा काळ असू शकतो पण कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची कमतरता भासेल. काळानुसार सर्वकाही बदलते याची काळजी करू नका आणि तुमचे प्रेम जीवनही बदलेल. तुमच्या करिअरच्या संधी वाढवण्यासाठी तुमच्या व्यावसायिक शक्तीचा वापर करा.

मीन (Pisces Horoscope)

आज तुम्हाला पैशांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि तुमच्या वडिलांना किंवा तुमच्यासारख्या प्रिय व्यक्तीला सूचना विचारा. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कामावर कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करत असाल, तर आज तुम्ही भाग्यवान ठरू शकता. बऱ्याच वेळा, फोनवर इंटरनेट सर्फिंग सुरू केल्यानंतर वेळ कुठे गेला हे तुम्हाला कळत नाही.

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांचं अखेर ठरलं..? फेसबुकवर फोटोसोबत मजकूर, नेमकं काय लिहिलं ?

https://www.lokshahi.com/news/dhangekars-possibility-of-joining-shiv-sena-warning-with-photo-on-facebook

रवींद्र धंगेकर यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर फार चर्चेत आले. त्या भेटी दरम्यान त्यांनी हे स्पष्ट केल होत की, ही भेट केवळ वैयक्तिक कामासाठी घेण्यात आली होती. अस असताना रवींद्र धंगेकर यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल. ज्यात त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेलं होत आणि 'राजा हरला काय राजा जिंकला काय, राजा हा राजा असतो...निष्ठेत तडजोड नाही' असा मजकूर देखील लिहलेला होता. या स्टेटसमुळे धंगेकर पुन्हा चर्चेत आले. रवींद्र धंगेकर लवकरच शिवसेनेत जाणार का? अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र आता त्या चर्चांना रविंद्र धंगेकर यांनी पुर्णविराम दिल्याचे त्यांच्या फेसबुक फोटोवरून आणि त्यावरील मजकूरावरून दिसून येत आहे. त्यांनी फेसबुक प्रोफाईलचा फोटो बलला आहे तर या फोटोमध्ये त्यांनी भगवी टोपी आणि भगवा उपरणं परिधान केल्याचं दिसून येत आहे. तसेच त्यांनी मजकूरात 'हे नाव पुन्हा ऐकण्याची तयार ठेवा' असं लिहल आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत धंगेकर पक्षबदल करण्याची शक्यता आहे. पण यामुळे आता राजकीयवर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

Shaktikanta Das : गव्हर्नर पदावरून निवृत्ती घेतल्यानंतर, शक्तिकांत दास करणार पंतप्रधानांसोबत काम

https://www.lokshahi.com/news/after-retiring-from-the-post-of-governor-shaktikanta-das-will-work-with-the-pm-modi

रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे डिसेंबर 2024 रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर पदावरून म्हणून निवृत्त झाले. हा सहा वर्षे सेवा केल्यानंतर शक्तिकांत दास यांनी निवृत्ती घेतली. मात्र आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. शक्तिकांत दास हे तमिळनाडू केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी असून, पंतप्रधानांच्या कार्यकाळापर्यंत किंवा नव्याने आदेश जारी होईपर्यंत ते या पदावर असतील. शक्तिकांत दास यांनी ४२ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील कारकीर्दीत प्रामुख्याने अर्थ, कर, गुंतवणूक तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या समितीने दास यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी पी.के.मिश्रा हे 2019 सालापासून पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्यासोबतीला शक्तिकांत दासही काम करतील. आता प्रधान सचिव या नात्याने ते पंतप्रधानांना प्रमुख आर्थिक धोरणात्मक सल्ला देण्याची भूमिका बजावतील.

Guillain-Barré Syndrome

राज्यात जीबीएसची रुग्णांची वाढ, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

GBS Virus : राज्यभरात जीबीएसच्या रुग्णसंख्यांमध्ये वाढ, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

जीबीएसची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं सध्या समोर येत आहे. या आजाराची लागण होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतचं चाललेली आहे. अशातच राज्यात जीबीएसचे शनिवारी दोन नवीन संशयित रूग्ण मिळाले असून राज्यात आतापर्यंत आढळलेल्या 215 संशयितांपैकी 186 मध्ये जीबीएसची पुष्टी झाली आहे. 29 संशयित रूग्ण आहेत. राज्यातील एकूण 215 संशयितांपैकी 43 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात, 95 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात, 32 रुग्ण पिंपरी-चिंचवड क्षेत्रात, 33 रुग्ण पुणे ग्रामीणमध्ये आणि 12 रुग्ण इतर जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. यापैकी 153 जणांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. याशिवाय 32 जणांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, तर 18 जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, बाधित भागात 7080 पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी 138 नमुने दूषित आढळले. दुसरीकडे, एकूण 88551 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, ज्यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील 46534 पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 28361 आणि ग्रामीण भागातील 13956 घरांचा समावेश आहे. शिवाय, अँटी-गॅग्लिओसाइड अँटीबॉडीजच्या चाचणीसाठी 82 सीरम बंगळुरूमधील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्सेस संस्थेत पाठवण्यात आले

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त विधीमंडळ कामकाज समितीची बैठक, या दिवशी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

केंद्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही दिवसांतच मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला, यानंतर आता महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख जाहीर झाली. आता 2025 च्या विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प 10 मार्चला सादर होणार असल्याची माहिती समोर आली. तसेच याबाबतच्या पुरवणी मागण्या 3 मार्चला सादर केल्या जाणार असून 4 मार्चला राज्यपाल अभिभाषणावर चर्चा सुरु होणार आहेत. तसेच हा अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 आठवडे चालणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक पार पडणार आहे. सकाळी 11 वाजता विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकी दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा आखली जाणार. 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. तर 10 मार्च रोजी अजित पवार, देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Mahakumbh 2025 : महाशिवरात्रीला होणार महाकुंभमेळ्याची सांगता, कुंभमेळ्यात तब्बल 60 कोटी भाविकांनी केले स्नान,

देशातील प्रयागराज येथे सध्या महाकुंभ मेळ्याची उत्सुकता बघायला मिळत आहे. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्याची सुरुवात झाली. 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी या महाकुंभ मेळ्याची सांगता होणार आहे. या महाकुंभ मेळ्यासाठी आजवर जगभरातील अनेक भाविकांनी हजेरी लावली आहे. या महाकुंभसाठी साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. यादरम्यान या महाकुंभ मेळ्यात अनेक साधू संत पाहाया मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभामध्ये आतापर्यंत 60 कोटी भाविकांनी स्नान केल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी केला. कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केल्यास मोक्ष मिळतो अशी अनेक भाविकांची समजूत आहे.

महाकुंभामध्ये स्नान करणाऱ्यांची आतापर्यंतची आकडेवारी

मौनी अमावस्येच्या दिवशी सर्वाधिक 8 कोटी भाविकांचे स्नान

मकरसंक्रातीला 3.50 कोटी

पौष पौर्णिमेला 1.7 कोटी

वसंतपंचमीला 2.57 कोटी

माघ पौर्णिमेला 2 कोटी

18 फेब्रुवारीपर्यंत 55 कोटी

22 फेब्रुवारीपर्यंत 60 कोटी

महाशिवरात्रीपर्यंत 65 कोटी भाविक स्नान करण्याची अपेक्षा

Special Trains For Holi : चाकरमान्यांसाठी खुशखबर! होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या 28 स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

गौरी-गणपती झाले की लगेच कोकणकर तयारीला लागतात ते होळी या सणासाठी. दरवर्षी प्रमाणे यावर्षी होळी 13 मार्च रोजी होळी आहे. होळी म्हणजेच शिमग्याला कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी प्रत्येक चाकरमानी डिसेंबरपासूनच ट्रेन तसेच बसच्या तिकीट बूक करण्याच्या धावपळीला लागतो. होळीदरम्यानच्या सर्व नियमित गाड्या रिग्रेट झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेनासे झाले आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी रेल्वेतर्फे स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहेत. शिमग्यानिमित्त कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे ते नागपूर दरम्यान 28 स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या स्पेशल ट्रेनच्या तिकिटासाठी प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत

जाणून घ्या ट्रेनचे वेळापत्रक

सीएसएमटी ते नागपूर दरम्यान स्पेशल ट्रेन

सीएसएमटी ते नागपूर दरम्यान स्पेशल ट्रेनच्या ८ फेऱ्या होणार आहेत. ०२१३९ सीएसएमटी-नागपूर ट्रेन ९,११,१६ आणि १८ मार्च रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटून नागपूरला दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीकरिता ०२१४०ट्रेन ९,११,१६ आणि १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी येणार आहे.

सीएसएमटी ते मडगाव दरम्यान स्पेशल ट्रेन

सीएसएमटी ते मडगाव दरम्यान स्पेशल ट्रेनच्या ४ फेऱ्या होणार आहेत. ०११५१ सीएसएमटी-मडगाव स्पेशल ट्रेन ६,१३ मार्च रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटून मडगावला दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे. परतीकरिता ०११५२ ट्रेन ६,१३ मार्च रोजी दुपारी सव्वा दोन वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी येणार आहे.

एलटीटी ते मडगाव दरम्यान स्पेशल ट्रेन

एलटीटी ते मडगाव दरम्यान ४ फेऱ्या धावणार आहेत. ०११२९ एलटीटी-मडगाव ट्रेन १३ आणि २० मार्च रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता पोहोचेल. परतीकरिता ०११३० ट्रेन मडगाव येथून १४ आणि २१ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता सुटून एलटीटीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी पोहोचणार आहे.

या ट्रेनला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांत थांबा दिला आहे.

Suresh Dhas : गोपीनाथ गड हे गोरगरिबांसाठी लढणारं विद्यापीठ - सुरेश धस

आमदार सुरेश धस नुकतेच परळीमध्ये जाऊन आले. यादरम्यान त्यांनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला भेट दिली होती. त्याचसोबत ते गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले होते. यादरम्यान त्यांनी सांगितल की, ते परळीत आल्यानंतर कधीही गोपीनाथ गडाचे दर्शन घेतल्या शिवाय जात नाही.

याचपार्श्वभूमिवर आमदार सुरेश धस म्हणाले की, 3 जून रोजी देखील मी गोपीनाथ गडावर येत असतो. 12 डिसेंबर रोजी मी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या घरी सांतून पर भेटीला गेलो होतो त्यामुळे मी गोपीनाथ गडावर येऊ शकलो नाही. परळीत आल्यानंतर मी कधीही गोपीनाथ गडाचे दर्शन घेतल्या शिवाय जात नाही. मी जवळपास दहा वर्ष गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर काम केलं काही वेळेस त्यांच्या विरोधात देखील काम केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात कधीही चुकीचे वक्तव्य केलं नाही.आताही कुठे वाकायचं कुठे झुकायचं कुणाबरोबर राहायचं हे मुंडे साहेबांकडूनच शिकलेलो आहे. संघर्ष कोणाबरोबर करायचा हे आम्हाला गोपीनाथ रावांनी शिकवलं. आता अन्याय अत्याचाराच्या विरोधात व गोरगरिबांसाठी लढणारा कोणता विद्यापीठ असेल, तर तो गोपीनाथ गड आहे. गोपीनाथराव हे गोपीनाथराव होते, त्यांच मन फार मोठं होत. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर त्यांचा वारसा पाहायला मिळत नाही, असं आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.

नैतिकता या सरकारच्या आसपास देखील कुठे फिरत नाही

Sanjay Raut : कोर्टानं भ्रष्टाचारी ठरवलं... नैतिकतेवरुन संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यादरम्यान त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर सुरु असलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया मांडली आहे. संजय राऊत म्हणाले की, ज्या अध्यक्षांनी 40 आमदारांना अभयदान दिल त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करत आहात. हे अध्यक्ष गेल्या 4 वर्षांमध्ये पदोपदी खोट बोलले आहेत आणि त्याचसोबत खोट वागलेले देखील आहेत. त्यांनी कायद्याची आणि घटनेची कोणतीही कदर न करता निर्णय घेतलेला आहे. राजकारण करायला काही हरकत नाही पण आपण संविधानिक पदावर बसलो आहोत आणि आपल्याला या पदावर न्याय करण्यासाठी बसवलं गेलं आहे. पहिला शिवसेनेच्या बाबतीत नंतर राष्ट्रवादीच्या बाबतीत आणि आता माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत त्यांच्याकडून इमानदार निर्णयाची अपेक्षा करण म्हणजे रेड्यानं दुध देण्यासारख आहे. राऊतांनी सरकारवर खोचक टोला लगावला आहे. पुढे संजय राऊत म्हणाले की, भाजपकडे अनेक वेगवेगळे रेडे आहेत. आम्ही कायद्याच्या चौकटीत मागणी करु शकतो आणि भूमिका मांडू शकतो. पण आम्हाला माहित आहे एक बेकायदेशीर सरकार विधानसभा अध्यक्षांच्या पाठिंब्याने चालत, यापेक्षा वाईट संविधानाची तुडवा तुडवी काय असू शकते. राहुल गांधी आणि सुनिल केदार यांच्या वेळेस जसे निर्णय तडकाफडक घेतले गेले, तसे या आमदारांच्या वेळेस का नाही घेत? राऊतांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच पुढे म्हणाले की, नैतिकता या सरकारच्या आसपास देखील कुठे फिरत नाही.ज्यावेळेस भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे पक्षाच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले त्यावेळेस उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी संजय राठोडचा राजीनामा घेतला. याला नैतिकता म्हणतात. मग आता कोर्टाने ज्यांना भ्रष्टाचारी ठरवलेलं आहे आणि कारवाई केली आहे त्यांच्या राजिनाम्यावर देवेंद्र फडणवीस गप्प का? असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Ravindra Dhangekar : काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला जोर, रवींद्र धंगेकर यांच्याशी खास बातचित

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर फार चर्चेत आले. अस असताना रवींद्र धंगेकर यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल. ज्यात त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेलं होत आणि 'राजा हरला काय राजा जिंकला काय, राजा हा राजा असतो...निष्ठेत तडजोड नाही' असा मजकूर देखील लिहलेला होता. या स्टेटसमुळे धंगेकर पुन्हा चर्चेत आले. रवींद्र धंगेकर लवकरच शिवसेनेत जाणार का? अशा चर्चा सुरु झाल्या. त्यांनी आता फेसबुक प्रोफाईलचा फोटो देखील बलला आहे, तर या फोटोमध्ये त्यांनी भगवी टोपी आणि भगवा उपरणं परिधान केल्याचं दिसून येत आहे. तसेच त्यांनी मजकूरात 'हे नाव पुन्हा ऐकण्याची तयार ठेवा' असं लिहल आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत धंगेकर पक्षबदल करण्याची शक्यता आहे. पण यामुळे आता राजकीयवर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. याचपार्श्वभूमिवर रविंद्र धंगेकर यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला.

स्टेटस आणि व्हायरल होत असलेल्या फोटोवरून धंगेकर म्हणाले की, मी जो स्टेटस ठेवला तो मी शिवजयंती निमित्त ठेवला होता. भगव्या रंगाच काय परिधान करण म्हणजे गुन्हा नाही. मी याआधी देखील श्रीरामांच्या मंदिरात जाताना असे भगव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. माझ्यासाठी माझा धर्म पहिला आणि पक्ष नंतर आहे. त्यामुळे मी माझा धर्म जोपासतो तर त्यात काही गैर नाही. महानगरपालिकाच्या पार्श्वभूमिवर पुण्यात विभागाची जबाबदारी कॉंग्रेसने रविंद्र धंगेकर यांच्यावर दिली नाही यावरून ते कॉंग्रेसमध्ये नाराज आहेत का? असा प्रश्न समोर उपस्थित राहतो आहे. जाणून घ्या काय म्हणाले रविंद्र धंगेकर...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com