राशीभविष्य
नवी मुंबईमध्ये महिलेने चिमुरड्याला कारने उडवलं, कारमधून फिरवलं, तिथेच आणून टाकलं
नवी मुंबईमध्ये एका महिलेने कारने चिमुरड्याला धडक देऊन गंभीर जखमी केले आणि नंतर त्याला घटनास्थळीच परत आणून सोडले. या विचित्र घटनेनंतर महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नवी मुंबईमध्ये एक विचित्र घटना घडली असून कार चालक महिलेच्या अजब कारनाम्यांनी अनेक जण अचंबित झालेत. नवी मुंबईच्या एल आणि टी चौकाजवळ भरधाव वेगात आलेल्या कारने चिमुरड्याला जबरदस्त धडक दिली. मुलाच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने मोठ्या प्रमाणात पायातून रक्तस्त्राव होत होता. अखेर कार चालक महिला मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यास तयार झाली. तिने गंभीर जखमी मुलाला आपल्या कारमधून तर नेले मात्र कोणत्याही हॉस्पिटलमध्ये न जाता तिने पुन्हा त्या मुलाला अपघातस्थळी आणले आणि रस्त्यावरच टाकून महिलेने घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेनंतर या विक्षिप्त कार चालक महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.