“आपका क्या होगा जनाबे आली…”, कौटुंबिक विवाह सोहळ्यात धनंजय मुंडेंचा डान्स

“आपका क्या होगा जनाबे आली…”, कौटुंबिक विवाह सोहळ्यात धनंजय मुंडेंचा डान्स

Published by :
Published on

विकास माने, बीड

लातूर येथे आपल्या भाचीच्या लग्नात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वधू वराबरोबर एका गाण्यावर चांगलाच ठेका धरलेला पाहायला मिळाला. तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघे बहीण भाऊ राजकीय वैमनस्य सोडून एकत्र आलेले पाहायला मिळाले होते, याच लग्नसभारंभाच्या निमित्ताने धनंजय मुंडेंचा हा नृत्य आविष्कार त्यांच्या कार्यकर्त्याच्या स्टेट्स वर चांगलाच व्हायरल झालाय.

हॉटेल कार्निवलमध्ये झालेल्या विवाहसोहळ्यात तेजश्री केंद्रे आणि शरद सोनहीवरे लग्नाच्या बेडीत अडकले. धनंजय मुंडे डान्स करत असल्याचं पाहून उपस्थितही यावेळी त्यांच्यासोबत डान्स करत तसंच आवाज देत उत्साह वाढवत होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com