परवाना संपलेल्या मेडिकलवर कारवाई; लाखोंचा औषध साठा जप्त

परवाना संपलेल्या मेडिकलवर कारवाई; लाखोंचा औषध साठा जप्त

Published by :
Published on

वर्ध्यातील आंजी येथे मुदत संपलेल्या मेडिकलची विनापरवाना दुकान सुरू असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई करण्यात आली असून दोन लाख 65 हजाराचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. कारवाईत डॉक्टराच्या नावाने सुरू असलेली मेडिकलचा परवाना संपल्यानंतर त्याचा भाऊ विनापरवानगी मेडिकल चालवत असल्याचे कारवाईत समोर आले आहे.

आंजी (मोठी) येथील साईकृपा मेडिकल स्टोअरचा परवाना 31ऑक्टोबर 2020 ला संपला होता ,मात्र तरी सुध्दा डॉ.अमोल गोमासे यांच्या नावाने असलेलं मेडिकल त्यांचे मोठे बंधू अतुल गोमासे हे चालवत असल्याचे अन्न व औषध प्रशासन माहिती मिळाली. याची चौकशी करण्यासाठी प्रशासन गुरुवार येथे पोहचले असता तापसणी दरम्यान दुकानाला फलक लागलेला दिसले व दुकानातून औषध विक्री सुरू असताना औषध परवाना दुकानात आढळून आले. यावेळी दुकानात फार्मसिस्ट उपस्थित नव्हता, तर दुकानात मोठया प्रमाणात औषध साठा दिसून आला. तपासणी अंती संपूर्ण औषध साठा जप्त केला असून दोन लाख 65 हजार रूपायचा माल आढळून आला.अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली.

औषध प्रशासन करणार पुरवठादारांची तपासणी

आंजी येथील साईकृपा मेडिकल चा परवाना संपला असता बेकायदेशीर चालु असलेल्या दुकानाला ठोक विक्रेत्याकडून औषध पुरवठा केला जात होता.यामध्ये कोणकोणत्या एजन्सी ने औषध पुरवठा केला त्याचा तपास केला जाणार असून दुकानात आढलेल्या औषधांचे सहा नमुने मुंबई येथील प्रयोगशाळा तपासणीला पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com