नागपुरात निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी; कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू

नागपुरात निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी; कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • नागपुरात निवडणुकीसाठी प्रशासनाची जोरदार तयारी

  • कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरु

  • सर्व केंद्रावर सीसीटीव्हीची करडी नजर असणार

ज्ञानेश्वर पवार, नागपूर

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूरात निवडणुकीसाठी प्रशासनाकडून धावपळ सुरु असलेली पाहायला मिळत आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे , ईव्हीएम मशीनवर प्रात्यक्षिक माहिती देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत असून जिल्ह्यात 12 विधानसभा मतदार संघात 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत. 3 हजार 460 मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सुविधा, सर्व केंद्रावर सीसीटीव्हीने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा:

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com