Afghan Taliban Crisis : ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
तालिबानने अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवला असून, आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबानने एकेक करून अफगाणिस्तानचा पूर्ण ताबा मिळवला. काहींनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकावर टीकास्त्र सोडलं आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत केलेल्या एका भाषणादरम्यान भारताने तालिबानशी संवाद कायम ठेवायला हवा. या चर्चेच्या माध्यमातून राजकीय हितांचे संरक्षण करायला हवे, असे म्हटले आहे. अफगाणिस्तान आणि तालिबान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी तेव्हाच सांगितले होते की, अफगाणिस्तानातील आपल्या हितांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तालिबानशी राजकीय स्तरावर संवाद सुरू केला पाहिजे. भारताने अफगाणिस्तानात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. कोणत्याही सरकारने या बाजूकडे लक्ष दिलेले नाही. आता यावर भारत सरकार काय करणार, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे. अफगाणिस्तानसंदर्भात भारताची भूमिका काय हे अद्यापही स्पष्ट नाही, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.