Alexandra Djavi | ‘कंचना ३’मधील अभिनेत्रीचे निधन

Alexandra Djavi | ‘कंचना ३’मधील अभिनेत्रीचे निधन

Published by :
Published on

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील 'कंचना ३' या सुपरहिट चित्रपटात काम करणारी अभिनेत्री अ‍ॅलेक्झेंडर डिजवीचे निधन झाले आहे. ती २४व्या वर्षांची होती. तिच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

गोव्यात राहात असलेल्या घरात अ‍ॅलेक्झेंडर डिजवीचा मृत्यू झाला. पण तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शुक्रवारी, २० ऑगस्ट रोजी अ‍ॅलेक्झेंडरचे निधन झाले आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. तसेच अ‍ॅलेक्झेंडरने आत्महत्या केली असल्याचे देखील म्हटले जात आहे.

एका इग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅलेक्झेंडरचा बॉयफ्रेंड तिला सोडून गेल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती, अशी माहिती अ‍ॅलेक्झेंडरच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे नैराश्यामध्ये अ‍ॅलेक्झेंडरने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणी तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com