कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द

कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द

Published on

कोरोनाची दुसरी लाट हळुहळु ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या वर्षीही अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. याआधीही अमरनाथ यात्रा दहा दिवसांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सध्याची परिस्थिती पाहता अखेर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षीही अमरनाथ यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही यात्रा रद्द करण्याची घोषणा केली. दरम्यान, भाविकांना 28 जूनपासून ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.

अमरनाथ यात्रा रद्द झाली असली तरी बाबा बर्फानी गुहेत सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत. या सर्व पुजा अर्चेचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येणार आहे. अशी माहितीही देण्यात आली आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या आरतीचे लाइव्ह टेलिकास्ट करून भाविकांना व्हर्च्युअल दर्शन घेता येईल, असंही बोर्डाकडून सांगण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com