Amit Shah
Vidhansabha Election
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभांचा धडाका; 'या' तारखेला एकाच दिवशी 4 सभा
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. 8 नोव्हेंबरला एकाच दिवशी अमित शाह यांच्या 4 सभा होणार आहेत.
अमित शाह कोल्हापूरमध्ये 7 नोव्हेंबरला मुक्कामी येणार असून कोल्हापूर दक्षिण, सांगली - जत, सातारा -कराड दक्षिण आणि पुणे येथे खडकवासला/पर्वतीला अमित शाह यांच्या सभा होणार आहेत.