Vidhansabha Election

'हरण्यापूर्वीच, हरण्याच्या भीतीने, हरण्याची कारणे सांगितली...' राऊतांच्या आरोपांवर अरुण सावंत यांचं प्रत्युत्तर

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातून किमान 10,000 खऱ्या मतदारांची नावे हटवली आहेत असा आरोप भाजपवर केला आहे.

Published by : shweta walge

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातून किमान 10,000 खऱ्या मतदारांची नावे हटवली आहेत असा आरोप भाजपवर केला आहे. त्यावरच शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी प्रत्युत्तर देत 'दहा हजार नावे 150 मतदार संघातील मतदार यादीतून गायब करणार हा बदनामीचा नवा फंडा शोधून काढला' असं म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, दहा हजार नावे 150 मतदार संघातील मतदार यादीतून गायब करणार हा बदनामीचा नवा फंडा शोधून काढला आहे. हा मुद्दा सिर्फ देश मे ही नही इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म पर भी लेके जायेंगे, असं म्हणून देशातील लोकशाहीला बदनाम करण्याचा प्रयत्न मविआकडून सुरू झालेला आहे.

हरण्यापूर्वीच, हरण्याच्या भीतीने, हरण्याची कारणे सांगितली जात असल्याच अरुँण सावंत म्हणाले. विविध प्रकारची भीती जनतेला दाखवून जनतेमध्ये महायुती विरुद्ध रोष पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

रोजची ही वायफळ बडबड जनतेला आता नकोय त्यांना हवा आहे, विकास, प्रगती पायाभूत सुविधा, आणि महाराष्ट्राला पुढे नेणारं व्हिजन.आणि हे व्हिजन आहे फक्त आणि फक्त श्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे म्हणजेच महायुतीकडे आहे.

संजय राऊत म्हणाले होते की, महाराष्ट्र भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे हे बोनाफाईड मतदारांची नावे हटवण्याच्या आणि इतर राज्यातील बोगस नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या कटाचा एक भाग होते. "प्रत्येक मतदारसंघातून किमान 10,000 नावे हटवण्याचा कट उघड झाला आहे. आम्ही लोकांमध्ये जागृती करू आणि गरज पडल्यास ज्यांची नावे हटवली आहेत त्यांच्यासह निवडणूक कार्यालयावर निषेध मोर्चा काढू,असे राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत मोठी अपडेट! ऑगस्ट, सप्टेंबरला हप्ता एकत्र मिळण्याचा शक्यता?

Latest Marathi News Update live : विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावचं लागेल….

Pankaja Munde : 'ओबीसींवर अन्याय होणार नाही', मराठा आरक्षणानंतर पंकजा मुंडेंचं ठाम मत

UP News : समोसा नाही आणला म्हणून बायको नवऱ्यासोबत जे काही केलं, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल...