UP News : समोसा नाही आणला म्हणून बायको नवऱ्यासोबत जे काही केलं, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल...
पती-पत्नीतील कुरबुरी ही सर्वसामान्य बाब मानली जाते. अशा वादातून अनेक वेळा मोठ्या भांडणांचाही उद्रेक होतो. मात्र, समोसा न आणल्याच्या कारणावरून पत्नीने सासरच्या मंडळींना बोलावून नवऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात घडली आहे.
इतिहासातही बायकोच्या हट्टासाठी अनेकांनी आपली सत्ता गमावलेली आहे. त्याचप्रमाणे, एका पतीने फक्त गरमागरम समोसे न आणल्यामुळे आपल्या पत्नीच्या संतापाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, या पतीला फक्त बायकोनेच नव्हे, तर तिच्या सासरच्या नातेवाईकांनी मिळून चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पीडित नवऱ्याने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घटना पिलीभीत जिल्ह्यातील भगवंतापूर गावातील
शिवम नावाच्या युवकाचा हा प्रकार आहे, जो पिलीभीतच्या पुरनपूर कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भगवंतापुरात राहतो. २९ ऑगस्टच्या संध्याकाळी त्याची पत्नी संगीता हिने त्याच्याकडे समोसे आणण्याची मागणी केली. शिवमने पैसे हरवले असल्याने समोसे आणता आले नाहीत, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि संगीता रागाने फणफणली.
सासरचे लोक बोलावून मारहाण
या भांडणात संतप्त झालेल्या संगीता हिने आपल्या माहेरच्यांना बोलावून घेतले. तिची मावशी सरला आणि विमला, काका रामअवतार, धनीराम तसेच इतर नातेवाईकांनी मिळून शिवमला घरात घुसून जबर मारहाण केली. इतकेच नव्हे, तर तिचा भाऊ रामकरण आणि सासू विजय कुमारी यांनीही शिवमवर हात साफ केला.
पंचायतीनंतर पुन्हा हल्ला
या प्रकारानंतर गावातील काही ज्येष्ठांनी गावचे मुखिया अवधेश शर्मा यांच्या घरी बैठक बोलावली. पण या बैठकीदरम्यानही संगिताचे नातेवाईक संतापले आणि पुन्हा शिवमवर आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला चढवला. शिवमला पट्ट्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याचा मेहुणाही या हल्ल्यात जबर जखमी झाला.
पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेनंतर पुरनपूर कोतवाली पोलिसांनी संगीता, तिच्या मावश्या सरला आणि विमला, तसेच काका रामअवतार, धनीराम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे ही घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.