India

दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत मोठी बातमी

Published by : Lokshahi News

भारतीय चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या हळूहळू कमी होत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या 223.30 कोटींवर आली, अशी माहिती सरकारने दिली आहे. चलनात असलेल्या एकूण नोटांच्या हे प्रमाण सुमारे 1.75 टक्के आहे. मार्च 2018 मध्ये चलनात दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या 336.3 कोटी होती. रिझर्व्ह बँकेने नुकताच एक अहवाल जारी केलाय. या अहवालानुसार RBI चालू आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांची एकही नोट छापणार नाही.

या अहवालानुसार 2020-21 या आर्थिक वर्षात कागदी चलनाची संख्या 223301 लाख इतकी होती. मागील आर्थिक वर्षात (2019-20) ही संख्या 223875 लाख इतकी होती. चलनात 500 आणि दोन हजारच्या नोटांचे मूल्य एकूण मूल्याच्या 85.70 टक्के आहे. 500 च्या नोटांची संख्या 31.10 टक्के आहे.

मार्च 2021 मध्ये लोकसभेत आणखी एक माहिती देण्यात आली होती, ज्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून दोन हजार रुपयांची नवी नोट छापण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले होते.तत्कालीन अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले होते की, 30 मार्च 2018 पर्यंत एकूण चलनात दोन हजारच्या 3362 दशलक्ष नोटा होत्या. खंडाच्या बाबतीत तो 3.27 टक्के होता.

व्यापाराच्या दृष्टीने हे मूल्य 37.26 टक्के होते. 26 फेब्रुवारी 2021 ला दोन हजारच्या नोटांची संख्या 2499 दशलक्षवर आली, जी एकूण नोटांच्या 2.01 टक्के आणि मूल्याच्या 17.78 टक्के आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2019 मध्ये एक निवेदन जारी केले होते, त्यानुसार दोन हजारच्या 3,542.991 दशलक्ष नोटा 2016-17 (एप्रिल 2016 ते मार्च 2017) या आर्थिक वर्षात छापण्यात आल्या होत्या. 2017-18 या आर्थिक वर्षात केवळ 111.507 दोन हजाराच्या नोटा छापण्यात आल्या. पुढील आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये केवळ 46.690 दशलक्ष दोन हजारच्या नोटा छापण्यात आल्या.एप्रिल 2019 पासून दोन हजारची एकही नोट छापण्यात आलेली नाही. सरकारने आधीच सांगितले आहे की, मार्च 2022 पर्यंत एकही नोट छापली जाणार नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Akshay Kumar : अक्षय कुमारची SUV पोलिसांकडून जप्त; नेमकं प्रकरण काय?

Rajasthan Accident : राजस्थानमधील दौसा येथे भीषण अपघात; 11 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update live : कबूतरखाना परिसरातील सगळी दुकाने देखील दुपारी 1 वाजेपर्यंत बंद करण्याचे पोलिसांचे आदेश

Asim Munir : "...तर पहिला हल्ला रिलायन्सच्या जामनगरमधील रिफायनरीवर करण्यात येईल"; पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची धमकी