Akshay Kumar
Akshay Kumar

Akshay Kumar : अक्षय कुमारची SUV पोलिसांकडून जप्त; नेमकं प्रकरण काय?

अक्षय कुमार एका खाजगी ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनासाठी जम्मूला पोहोचला होता.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Akshay Kumar) अक्षय कुमार एका खाजगी ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनासाठी जम्मूला पोहोचला होता. जम्मू-काश्मीर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी चंदीगड नोंदणी क्रमांक असलेली एक रेंज रोव्हर SUV जप्त केली. यावेळी अक्षय जम्मूपर्यंत ज्या एसयूव्हीनं आला तीच एसयूव्ही पोलिसांनी जप्त केली आहे.

डोगरा चौकात तपासणीदरम्यान वाहनाच्या काचांवर टिंटेड फिल्म आढळल्याने एएसआय अधिकाऱ्यांनी ती ताब्यात घेतली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मूमध्ये कोणत्याही वाहनाला टिंटेड काच किंवा इतर अनधिकृत फेरबदल करण्याची मुभा नाही. “कायदा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे SUV जप्त करण्यात आली,” असे त्यांनी स्पष्ट केले.

घटनेच्या वेळी गाडीत अक्षय कुमार नव्हता. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या कारला काळ्या काचा होत्या. जे जम्मूमधील मोटार वाहन कायद्याच्या नियमांविरुद्ध आहे.यावर अभिनेता अक्षय कुमारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com