(Gold Rate ) सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः इस्त्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर, सोन्याच्या दरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
एका दिवसात तब्बल 2600 ची वाढ नोंदवण्यात आली असून, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,00,270 वर पोहोचला आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याशिवाय, चांदीच्या दरातही वाढ पाहायला मिळत आहे. सध्या 1 किलो चांदीसाठी 1,07,000 मोजावे लागत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, आगामी काही दिवसांत सोन्याचा दर 1,25,000 पर्यंत जाऊ शकतो. चीन आणि भारताकडून सध्या मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत असून, यामुळे सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.