Business

आताच करून घ्या बँकेची काम, पुढील ४ दिवस बँका राहणार बंद

Published by : Lokshahi News

बँक ग्राहकांसाठी ही महत्वाची माहिती आहे की उद्या शनिवारपासून बँका 4 दिवस बंद राहतील. जर बँकेशी संबंधित कोणतेही व्यवहार करायचे असेल तर ते आजच पूर्ण करा. कारण 28 ते 31 ऑगस्ट पर्यंत अनेक शहरांच्या बँकांमध्ये कोणते ही काम होणार नाही.खरं तर, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान बँका बंद राहतील. तथापि,या काळात ऑनलाइन बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा कार्यरत राहतील.

आरबीआय स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. RBI ने या आठवड्यात बँकांसाठी 4 दिवसांची सुट्टी निश्चित केली आहे. मात्र, या सुट्ट्या प्रत्येक राज्यातील बँकांना लागू नाहीत. 28 ऑगस्ट या महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी असेल. 29 ऑगस्ट हा रविवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील. 30 ऑगस्टला अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. जन्माष्टमी / श्री कृष्ण जयंती 30 ऑगस्ट, 2021 रोजी आहे.

या दिवशी बँका बंद राहतील:
28 ऑगस्ट 2021 – 4 था शनिवार,
29 ऑगस्ट 2021 रविवार,
30 ऑगस्ट 2021 – जन्माष्टमी / श्री कृष्ण जयंती (अहमदाबाद,चंदीगड,चेन्नई, देहरादून,जयपूर,जम्मू ,कानपूर, लखनौ,पटणा,रायपूर,रांची,शिलाँग,शिमला,श्रीनगर आणि गंगटोक), 31 ऑगस्ट 2021 – श्री कृष्ण जन्माष्टमी (हैदराबाद).

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

IND vs PAK: दुबईत भारताची कामगिरी फिक्की, किती सामने जिंकलेत?, जाणून घ्या...

Sahitya Sangh Mandir : गिरगावचे साहित्य संघ राजकारणाच्या भोवऱ्यात?

Latest Marathi News Update live : मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज…

Weather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता