मनोरंजन

Aaradhya Bachchan Video: ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी आराध्या बच्चन पहिल्यांदाच 'या' कारणामुळे चर्चेत! नेटकरी आश्चर्यचकित

ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी आराध्या बच्चन तिच्या शाळेत परफॉर्म केले होते, ज्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Published by : Team Lokshahi

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी मुलगी आराध्या बच्चन लोकप्रिय स्टार किड्सपैकीच एक आहे. आराध्याला नेहमी ऐश्वर्या राय बच्चनसोबत पाहिले जाते. मायलेकींच्या एकाच हेअरस्टाईलमुळे त्यांना अनेकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. नुकताच काल शाळेच्या कार्यक्रमात आराध्या अनोख्या लुकमध्ये दिसत होती.

काल संध्याकाळी आराध्या बच्चनच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक कार्यक्रम आयोजित केले होते. यात शाळेत शिकणाऱ्या अनेक स्टार्सच्या मुलांनी सहभाग घेतला होता. ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी आराध्या बच्चन सुध्दा शाळेच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

यावेळी स्टेजवर इंग्रजीत अभिनय करणाऱ्या आराध्याने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. विशेष म्हणजे आराध्याची हेअरस्टाइल पूर्णपणे वेगळी होती. तिचे केस मागच्या बाजूला बांधलेले होते, ज्यामुळे पहिल्यांदाच आराध्याचा संपूर्ण चेहरा स्पष्टपणे दिसत होता. इतकंच नाही, तर आराध्या या कार्यक्रमात खूप सुंदर दिसत होती.

आराध्याच्या शाळेतील परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकरी तिच्या लूकची प्रशंसा करताना थकत नसल्याचे दिसून येते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...