Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test
भारतीय गोलंदाजांनी कसोटी सामन्यात इंग्लंड दौऱ्यात जी चूक केली ती आता त्यांना आशिया कपसाठी भोवणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंच्या तंदुरुस्तीची चाचणी घेण्यासाठी ब्रोंको चाचणी हा नवीन नियम लागू केला आहे.
त्यामुळे खेळाडू आता मैदानावर जास्त धावताना दिसणार आहेत. यामगचं कारण असं की, कसोटी सामन्यात गोलंदाजांचा हवा तसा परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही. त्यामुळे गोलंदाजांची फिटनेस आणि धावण्याची क्षमता चांगली रहावी यासाठी ब्रोंको टेस्ट घेतली जाणार आहे. ही टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतरच खेळाडूला टीम इंडियामध्ये स्थान मिळेल.
येत्या 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये रंगणार असणाऱ्या आशिया चषक 2025 स्पर्धेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ तरुणाई व अनुभवी खेळाडूंचा योग्य मेळ साधून निवडला आहे. शुबमन गिल उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र श्रेयस अय्यरला यावेळी संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आता गोलंदाजांसाठी बीसीसीआयने काढलेल्या नव्या नियमावर भारतीय गोलंदाज किती खरे उरतात हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.
ब्रोंको चाचणी म्हणजे काय?
ब्रोंको टेस्ट ही खेळाडूंची मुख्यत: गोलंदाजांची धावण्याची क्षमता आणि त्यांची फिटनेस तपासण्यासाठी केली जाते. गोलंदाज मैदानावर अधिक धावू शकतील यासाठी बीसीसीआयने ब्रोंको चाचणी सुरू केली आहे. यादरम्यान खेळाडूसाठी एक सेट तयार केला जातो, तसेच एकाच सेटमध्ये 20 मीटर, 40 मीटर आणि 60 मीटरची शटल रन पूर्ण करावी लागते. खेळाडूने असे एकून पाच सेट न थांबता पूर्ण करणे अपेक्षित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय खेळाडूंना 6 मिनिटांत ब्रोंको चाचणी उत्तीर्ण होण्यास सांगण्यात आले असून, खेळाडू पाच सेटमध्ये सुमारे 1200 मीटर धावेल. इंग्लंड दौऱ्यानंतर बीसीसीआयच्या सीओईमध्ये ब्रोंको चाचणी सुरू करण्यात आली आहे. तसेच काही खेळाडूंनी बंगळुरूस्थित सीओई येथे ब्रोंको चाचणी दिली आहे. यावर प्रशिक्षक गौतम गंभीरने देखील सहमती दर्शवली आहे. सुरवातीला ब्रोंको टेस्ट शिफारस स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक एड्रियन ले रॉक्स यांनी केली होती.