Ankita Lokhande Team Lokshahi
मनोरंजन

Ankita Lokhande : म्हणून अंकिता लोखंडे बिग बॉस 17 मध्ये सहभागी झाली

बिग बॉस 17 मध्ये प्रवेश करण्याच 'हे' कारण, अंकिता लोखंडेने केले स्पष्ट.

Published by : Team Lokshahi

भारतीय मनोरंजन उद्योगातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैन सोबत बिग बॉस 17 च्या घरात प्रवेश करून चर्चेत आले आहेत. डिसेंबर 2021 मध्ये लग्न करणारे हे जोडपे या सीझनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक आहेत. पण टीव्ही आणि चित्रपटांमधील यशस्वी कारकीर्दीनंतर अंकिता लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये का सामील झाली? हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता. तिने बिग बॉस मध्ये येण्याचा निर्णय का घेतला हे तिने स्वतःच स्पष्ट सांगितलं आहे.

अंकिताने बिग बॉस 17 मध्ये सहभागी होण्याच्या तिच्या निर्णयामागील खरे कारण उघड केले. अंकिता म्हणते “मी बिग बॉस 17 शोमध्ये आलो आहे कारण लोक मला अर्चना म्हणून ओळखतात. आता त्यांनी अंकिताला ओळखावे. माझी खरी ओळख अंकिता म्हणून व्हावी अशी माझी इच्छा आहे. मी जशी आहे तस मला लोकांनी स्वीकारावं अस मला वाटत "

अंकिता "पवित्र रिश्ता " मधल्या अर्चना देशमुखच्या तिच्या प्रतिष्ठित भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. अंकिताने 2009 ते 2014 पर्यंत पाच वर्षे अर्चनाची भूमिका केली आणि तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार आणि कौतुक मिळवलं.

अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 मधील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. तिला तिच्या चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील मित्रांकडून खूप पाठिंबा आणि कौतुक मिळत आहे. शोमध्ये तिच्या उपस्थितीने प्रेक्षक खऱ्या अंकिता लोखंडेला बघण्यासाठी उत्सुक आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?