Indian idol 13th season finale winner ayodhya rishi singh 
मनोरंजन

Indian Idol 13 Winner : ऋषी सिंह ठरला 'इंडियन आयडल 13 'चा विजेता

Rishi Singh wins Indian Idol 13: ऑडिशनमध्ये ऋषीने 'मेरा पहला पहला प्यार..' हे गाणे गायले होते.

Published by : Pankaj Prabhakar Rane

मुंबई : संगीत जगतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वांचे लक्ष लागून राहिलेला रियालिटी शो म्हणजे सोनी वाहिनीवरील ‘इंडियन आयडल’. या कार्यक्रमाचे 13 वे पर्व नुकतेच पार पडले आणि ‘इंडियन आयडॉल 13 ’चा विजेता ठरला आहे 'ऋषी सिंह'.

'ऋषी सिंह' या पर्वात आपल्या आवाजाने केवळ प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं नाही तर त्यांची मनंही जिंकली. ऋषी सिंह व्यतिरिक्त, सोनाक्षी कर, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, शिवम सिंह आणि देवोस्मिता हे स्पर्धक देखील फिनालेमधील दाखल झाले होते.पण अत्यंत चुरशीच्या या सामन्यातून ऋषिने सर्वांना मागे टाकत आणि आपले वेगळेपण सिद्ध करत 2 एप्रिल रोजी झालेल्या इंडियन आयडल ग्रँड फिनाले मध्ये विजेतेपद पटकावले.

या दिमाखदार सोहळ्यात ऋषिला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. सर्वांनी त्यांचं आणि त्याच्या आवाजाचं कौतुक केलं. एवढंच नाही तर सोशल मिडीयावरही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यंदाच्या पर्वाला नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया हा शो जज करत होते.ऋषी सिंहल ‘इंडियन आयडॉल 13 ’ च्या ट्रॉफीसह 25 लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि मारुती सुझुकी एसयूव्ही कार भेट म्हणून मिळाली आहे. याशिवाय त्याला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचा कॉन्ट्रॅक्टही मिळाला आहे.

विजेतेपद मिळाल्यावर ऋषी म्हणाला, ''माझं स्वप्न आज पूर्ण झालं. जेव्हा माझं नाव विजेता म्हणून घोषित करण्यात आलं, तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. या महत्त्वाच्या शोचा वारसा पुढे नेणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चॅनल, जज आणि इंडियन आयडॉलच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे.'ऋषी सिंह हा मूळचा उत्तर प्रदेश येथील अयोध्येचा रहिवासी आहे. त्याला लहानपणापासूनच गाणी गाण्याची व लिहिण्याची आवड आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ऋषी सिंह त्याच्या आई-वडिलांचा खरा मुलगा नाही, त्यांनी त्याला दत्तक घेतलं होतं, याचा खुलासा खुद्द ऋषीनेच शोमध्ये केला होता. तो सध्या डेहराडूनमधील हिमगिरी जी विद्यापीठातून त्याचं शिक्षण पूर्ण करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dadar Kabootarkhana :दादरमध्ये आंदोलन चिघळलं; आंदोलनात गोंधळ, पत्रकारांवर पोलिसांची आरेरावी

Latest Marathi News Update live : दादरमधील कबुतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन

Hydrogen Train : भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच सेवेत येणार; रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

Akshay Kumar : अक्षय कुमारची SUV पोलिसांकडून जप्त; नेमकं प्रकरण काय?