मनोरंजन

मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयनची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री

Published by : Lokshahi News

मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयन ही आता मराठी चित्रपट सुष्टीत पाऊल टाकणार आहे. निमिषा सजयन ही 'द ग्रेट इंडियन किचन'  या लोकप्रिय मल्याळम चित्रपटात काम केलं. चित्रपटात तिनं मुख्य भुमिकेत काम केल.त्यामंतर मलिक या चित्रपटातही तिनं काम केलं, आता ती दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या आगामी "हवाहवाई" चित्रपटात काम करणार आहे. हा चित्रपट १ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

"हवाहवाई" ह्या चित्रपटाची निर्मीती मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शनचे विजय शिंदे यांनी केली आहे.निमिषा सजयन सोबत अनेक नवे चेहरे या चित्रपटात दिसून येणार आहे. "द ग्रेट इंडियन किचन चित्रपटातील निमिषाचा अभिनय पाहून तिची मराठी चित्रपटात नियुक्ती करण्यात आली. निमिषाने या कामासाठी होकार दिल्या मुळे आगामी "हवाहवाई" चित्रपटात ती दिसणार आहे.निमिषाने 2017 रोजी मल्याळम चित्रपटातून पदार्पण केलं. त्यामंतर तिनं अनेक चित्रपट केले. केरळ राज्याकडून तिला फिल्म फेअर अॅवार्ड मिळाला आहे.

महेश टिळेकर नेहमी वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतात. "बाहुबली" या चित्रपटाचे कॅमेरामन सेन्थील कुमार यांना पहिली संधी महेश टिळेकर यांनी त्यांच्या "आधार" चित्रपटाद्वारे दिली होती.ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी ८८ व्या वर्षी "हवाहवाई" चित्रपटातील एक गाणं गायलं आहे. अनेक जण या चित्रपटाची वाट पाहत आहे. साऊथ मधील उत्तम अभिनय करणाऱ्या कलाकारांना मराठी चित्रपटात आणण्याचा नवा ट्रेण्ड महेश टिळेकर यांनी हवाहवाई सिनेमातून सुरू केला आहे .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?