मनोरंजन

Rakhi Sawant| राखी सावंतचा भन्नाट व्हिडीओ

Published by : Lokshahi News

आपल्या भन्नाट व्हिडीओ सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. राखी लाइमलाइटपासून दूर असली तरी तिचे व्हिडीओ आणि फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतात. ऑलम्पिकमध्ये भारताने दैदिप्यमान यश मिळवले. यावेळी नीरज चोप्रा याचे अनुकरण करताना राखीचा एक व्हिडीओ वायरल झाला होता. आणि आता राखीचा अजून एक व्हिडीओ वायरल होतोय . यामध्ये राखीने स्पायडर वुमनचा ड्रेस परिधान करुन रस्त्यावर फिरताना दिसत आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने स्पायडर मॅनसारखे कपडे परिधान केले आहेत. पण स्पायडर वुमन बनण्यासाठी तिने कपाळाला लाल रंगाचा टिळा लावला आहे आणि गळ्यात जाड अशा गोल्डन चेन घातल्या आहेत. हातात सुटकेस घेऊन राखी रस्त्यावरुन चालत असते. त्यानंतर राखी रस्त्यावरच झोपते आणि बिग बॉसला घरात एण्ट्री देण्यास सांगते.

राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजरने 'तुला वेड लागले आहे का?' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'हे सगळं तू काय करते आहेस? संपूर्ण भारत विचारत आहे' असे म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते