मनोरंजन

'राम सेतू'च्या टीझरची सोशल मीडियावर उडवली खिल्ली; यूजर्सने सोशल मीडियावर शेअर केले मजेशीर मीम्स

Published by : Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतूचा टीझर रिलीज झाला आहे. ‘राम सेतु’ येत्या दिवाळीला सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘राम सेतु’चा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षयचा एक नवा लूक पाहायला मिळत आहे.

“राम सेतू को बचाने के लिए हमारे पास सिर्फ तीन दिन है” या अक्षयच्या संवादाने टीझरची सुरुवात होते. त्यानंतर अ‍ॅक्शन सीन्सची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे. तसेच जॅकलिन फर्नांडिसही या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसेल. चित्रपटाच्या टीझरमध्ये जॅकलिनच्या लूकची झलक पाहायला मिळत आहे. अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं आहे. रामायणापासून प्रेरित होऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. अभिनेत्री नुसरत भरुचाही चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

टीझर रिलीज होताच यूजर्स सोशल मीडियावर मीम्स शेअर करून मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी चित्रपटाच्या व्हीएफएक्सची खिल्ली उडवली आहे. चला तर हे मिम्स आपण पाहूया

कान्समध्ये "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" चित्रपटाचा बोलबाला

पाण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी आक्रमक; पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन

12th HSC Result : बारावीच्या परीक्षेचा आज निकाल; दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य