मनोरंजन

'संघर्षयोद्धा' - मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचे पूर्ण

Published by : Siddhi Naringrekar

मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचे पूर्ण झाले असून आता हा चित्रपट येत्या २६ एप्रिल २०२४ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे "संघर्षयोद्धा" - मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे.

गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली असून सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे, तर शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे . या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा समाज म्हणून मराठा समाजाची एक वेगळीच ओळख आहे. इतिहासात शेतकरी आणि योद्धे म्हणून मराठ्यांना ओळखले जायचे.मराठ्यांच्या आरक्षणासाठी "एक मराठा, लाख मराठा" म्हणत २०१६ मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.

त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील... आंदोलन, उपोषणे करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त़्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे. अत़्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे, ह्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्या पासूनच लोकांन मध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे , त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल़्या नेतृत्वाचं चित्रण या चित्रपटातून लोकांसमोर आता लवकरच येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Crop Insurance Update : शेतकऱ्यांच्या लबाडीसाठी त्यांना थेट काळ्या यादीत स्थान; पीकविमा योजनेसंदर्भात नवीन घोषणा

Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."

Nishikant Dubey : "कोण कुत्रा आणि कोण वाघ..." मुंबईत हिंदी भाषिक वादावरून निशिकांत दुबे यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, जनसुरक्षा समिती प्रमुख तसेच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक