मनोरंजन

shershaah|अॅमेझॉन प्राइमसह इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट

Published by : Lokshahi News

सिद्धार्थ मल्होत्राचा रिलीज झालेला (shershaah)हा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर (AMAZON PRIME VIDEO)सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटास आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी सर्वात जास्त पसंती दर्शवली आहे. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मने मंगळवारी सांगितले की, हा चित्रपट चार हजार शंभरहून (4100) अधिक शहरांतील लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे. विष्णु वरदान (Vishnuvardhan) दिग्दर्शनाचा लोकप्रिय हिंदी चित्रपट आयएमडीबीवर (IMDB)देखील जास्त गाजला गेला आहे. त्यामुळे सध्या आयएमडीबीची रेटिंग 8 .9 आहे.

शेरशाह हा हिंदी भाषेतील चरित्रात्मक युद्ध ( biographical war film ) चित्रपट आहे .जो विष्णुवर्धन यांनी त्यांच्या बॉलिवूड पदार्पणात दिग्दर्शित केला. संदीप श्रीवास्तव हे या चित्रपटाचे लेखक आहेत. हा चित्रपट परमवीर चक्र पुरस्कारप्राप्त (Param Vir Chakra award ) कॅप्टन विक्रम बत्रा ( Vikram Batra) यांच्या जीवनावर आधारित आहे, त्याचे सैन्यात दाखल झाल्यापासून ते कारगिल युद्धात त्यांच्या मृत्यूपर्यंत या सर्व घडामोडी दर्शविण्यात आल्या आहेत.

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ( Sidharth Malhotra) ​​बत्राच्या भूमिकेत आणि कियारा अडवाणी ( Kiara Advani) त्याची प्रेयसी डिंपल चीमाची भूमिका साकारली आहे. धर्मा प्रोडक्शन आणि काश एंटरटेनमेंट ((Dharma Productions and Kaash Entertainment)यांनी चित्रपटाची निर्मिती केली. ज्यात हिरू यश जोहर (Hiroo Yash Johar), करण जोहर (Karan Johar), अपूर्व मेहता (Apoorva Mehta), शब्बीर बॉक्सवाला (Shabbir Boxwala), अजय शाह (Ajay Shah) आणि हिमांशू गांधी (Himanshu Gandhi) सह-निर्माता म्हणून काम केले.

सिद्धार्थ मल्होत्राने या यशाचा आनंद साजरा करत इन्स्टाग्रामवर पोस्ट केली, त्यात तो म्हणाला- #शेरशाहसाठी मिळत असलेल्या प्रेम आणि कौतुकाने मी भारावून गेलो आहे. माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो. शेरशाहमध्ये डिंपल चीमाची भूमिका साकारणाऱ्या कियारा आडवाणीने "शेरशाहसाठी आमच्यावर प्रेम, आदर आणि कौतुक केल्याबद्दल" चाहत्यांचे आभार मानले.

कारगिल युद्धादरम्यान शूरवीर कॅप्टन विक्रम बत्रा आणि भारतीय सैन्याची प्रेरणादायी कथा दूरदूरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. हा चित्रपट मातीच्या या जवानांना श्रद्धांजली आहे, ज्यांच्यासाठी देशाप्रती प्रेमापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. शेरशाह हा एक अतिशय खास चित्रपट आहे आणि देशच्या कानाकोपऱ्यातून अभूतपूर्व प्रमाणात प्रेम आणि यश मिळालेले पाहून आम्हाला आनंद झाला आहे. "असे म्हणाले.

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना मतदान करण्यासाठी पैसे वाटप...