मनोरंजन

‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री सापडली मृतावस्थेत; डिलीट पोस्टमध्ये दिले होते संकेत

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क | बिग बॉसमधील माजी स्पर्धक आणि कन्नड अभिनेत्री जयश्री रमैया मृतावस्थेत सापडल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी बंगळुरुतील वृद्धाश्रमात तिचा मृतदेह आढळला. या घटनेने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे तिने आत्महत्येपूर्वी या संदर्भातली पोस्ट केली होती, त्यानंतर ती डिलीट केली.

गेल्या जुलै महिन्यापासून जयश्री रमैया नैराश्याचा सामना करत होती. या संदर्भात तिने २२ जूनला तिच्या फेसबुकवर आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे लिहिले होते. 'गुडबाय' असे तिने एफबी पोस्टमध्ये म्हटले होते. पण नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली व 'मी व्यवस्थित आणि सुरक्षित आहे. लव्ह यू ऑल' असे लिहिले होते.

दरम्यानच्या काळात जयश्री नैराश्याचा सामना करतचं होती. अखेर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत जयश्री रामय्या आयुष्य संपवलं.सोमवारी दुपारी बंगळुरुतील वृद्धाश्रमात तिचा मृतदेह आढळला. हे आत्महत्येचे प्रकरण असण्याची दाट शक्यता आहे.

बिग बॉस कन्नडच्या तिसऱ्या सीझनमधून तिला प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने कन्नड चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे. तिचे अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन जयश्रीला श्रद्धांजली वाहिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat Special Report : सामाजिक न्याय विभाग पुन्हा वादात, टेंडर प्रक्रियेत नियमांची पायमल्ली?

Latest Marathi News Update live : 'ज्यांना सगळं काही दिलं ते गद्दार झाले'; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Tesla's First Showroom In BKC : भारतात टेस्लाची एंट्री; मुंबईतील बीकेसी येथे सुरू होणार पहिलं शोरूम

Monika Bhadoriya : 'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीनं निर्मात्याच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानामुळं केला जीवन संपवण्याचा विचार; घडलं असं की....