मनोरंजन

Vicky Kaushal: छावाचा टीझर रिलीज, विकीचा थरारक लूक अन् चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव

संभाजी महाराजांवर आणखी एक चित्रपट प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यान विकी कौशलने "छावा" या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Published by : Team Lokshahi

प्रत्येक मराठ्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मान, सन्मान आणि आदर आहे. त्यांच्या कतृत्त्वाची किमया जगभरात गाजलेली आहे, त्यांनी केलेली लढाई ही कधी न विसणारी आहे. त्यांनी अनेक लढाया केल्या आणि त्या जिंकल्या देखील म्हणूनच त्यांच्या बद्दल बोलताना डोळ्यात आदर आणि मनात एक सन्मानाची भावना निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर 'धाकले धनी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाधा आणि त्यांनी दिलेले आपले त्याग याबद्दल बोलायचं झाल तर अंगावर काटा येतो. त्यांनी केलेल्या लढाई या शौर्याच्या होत्या त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट आणि मालिका आल्या आहेत. जेणे करून जगभरातील लोकांना त्यांच्या शौर्याची गाथा कळावी.

अशातच संभाजी महाराजांवर आणखी एक चित्रपट प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यान विकी कौशलने "छावा" या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टसाठी त्याने कॅप्शनमध्ये लिहलं आहे, "स्वराज्याचे रक्षक, धर्माचे रक्षक 'छावा' - एका शूर योद्ध्याची महाकथा! आता टीझर आऊट". या चित्रपटासाठी विकी कौशल सुरुवातीपासूनच उत्सुक असल्याचं अनेक माध्यमातून पाहायला मिळालं. हा चित्रपट 6 डिसेंबरला जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे त्यामुळे या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे.

या टीझरमध्ये सुरुवातीला सैन्यांमध्ये युद्ध होताना दिसत आहे आणि तितक्यातच विकी कौशल जो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दाखवला आहे, त्या संभाजी महाराजांची एन्ट्री घोड्यावरून होताना दाखवली आहे. या एन्ट्री दरम्यान पार्श्वध्वनीमध्ये असं म्हटलं गेलं आहे, "छत्रपती शिवाजी महाराजांना सिंह म्हटलं जातं आणि सिंहाच्या मुलाला छावा" तसेच यामध्ये आणखी एक सिन दाखवण्यात आला आहे, ज्यात गनिमांवर विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत तुटून पडताना दिसत आहे. तसेच त्यात एक डायलॉग आहे ज्यात असं म्हटलं गेल आहे, "शिवा गेला पण त्याचा विचार सोडून गेला".

या चित्रपटासाठी विकी कौशलने घेतलेली मेहनत ही या टीझरमधून आणि त्याच्या अभिनयातून दिसून येत आहे. त्याचा या चित्रपटात थरारक असा लूक पाहायला मिळत आहे. त्याने केलेल्या या चित्रपटावर अमृता खानविलकर, शर्वरी, भूमी पेडणेकर यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट करत या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विकी कौशलचा चर्चत आलेला हा लूक पाहून चाहते विकीवर मोठ्या प्रमाणात फिदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. विकी कौशलच्या संभाजी महाराजांच्या भूमिकेवर आणि त्याने घेतलेल्या मेहनतीवर प्रेक्षकांकडून कौतुकांचा वर्षाव होताना दिसतं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान