महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो आज खूपच लोकप्रिय झाला असून यामधील विशाखा आणि समीरची जोडी ही घराघरात लोकप्रिय झाली होती. पण अभिनेत्री विशाखा सुभेदार ने ही मालिका सोडत सगळ्यांना एकच धक्का दिला. महिनाभरापूर्वी विशाखा सुभेदारने महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.
एक निर्णय या नावाखाली तिनं ही पोस्ट शेअर केली होती. यात तिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून निरोप घेतल्याचं सांगितलं होत. परंतु त्यानंतर विशाखा पुढे काय करणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. याबद्दलची एक पोस्ट विशाखाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
या पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय, यामध्ये ती CID मालिकेत दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टी सोबत दिसत आहे. ते दोघेही लवकरच एका मराठी सिनेमात एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशाखाने हा फोटो शेअर करत त्याला हटके कॅप्शनही दिले आहे. तोड दो ये दरवाजा, दया. असे तिने म्हटले आहे.
विशाखाने आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं आहे. त्यामुळे आज ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 'मस्त चाललंय आमचं', 'येड्यांची जत्रा', 'अरे आवाज कोणाचा', 'झपाटलेला २', 'सासूच स्वयंवर', 'दगडाबाईची चाळ', 'ये रे ये रे पैसा' अशा कितीतरी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. विशाखा आता नाट्यनिमिर्ती म्हणूनही समोर येत आहे. तसेच तिच्या कुर्रर..., या नाटकाला रसिक प्रेक्षक भरभरुन दाद देत आहेत.