आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आज सोन्याच्या किमतीत 152 रुपयांची घसरण झाली असून, दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा बंद भाव प्रति 10 ग्रॅम 48107 रुपये होता. शुक्रवारी सोन्याची किंमत 48259 रुपयांच्या पातळीवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीतही घट झाली.
चांदी 540 रुपयांनी घसरून 69925 रुपये प्रतिकिलोवर बंद आज चांदीच्या दरातही घट दिसून आली. चांदी 540 रुपयांनी घसरून 69925 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. शुक्रवारी चांदी 70465 रुपयांच्या पातळीवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरावरही दबाव आहे. चांदी सध्या प्रति औंस 27.72 डॉलरच्या पातळीवर व्यापार करीत असून, 0.17 डॉलर घसरली आहे.