आरोग्य मंत्रा

हिरवी मिरची खाण्याचे फायदे! वाचा काय होतात आरोग्यावर फायदे

मिरची जशी जेवणाची चव वाढवते. तशीच ती अनेक आजारांवरही रामबाण उपाय आहे. जर तुम्ही रोज मिरचीचे सेवन केले तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

Published by : Team Lokshahi

भारतीय जेवणात चव हिरव्या मिरचीमुळे जास्त येते. जेवणात तडका, तिखटपणा आणण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो. मिरची जशी जेवणाची चव वाढवते. तशीच ती अनेक आजारांवरही रामबाण उपाय आहे. जर तुम्ही रोज मिरचीचे सेवन केले तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6 असते. याशिवाय त्यात कॅप्सेसिन, कॅरोटीन, क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे अँटी-ऑक्सिडंट असतात जे फुफ्फुस आणि हृदयाच्या आजारांपासून संरक्षण करतात. अमीनो ऍसिड, फॉलिक ऍसिड आणि ऍस्कॉर्बिक ऍसिड असतात जे पाचक एन्झाईम वाढवतात आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

'या' समस्यांमध्ये फायदेशीर

हाय बीपी : हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन आढळते, म्हणूनच ज्यांना बीपीची समस्या आहे त्यांनी हिरव्या मिरच्यांचे सेवन केले पाहिजे. याबरोबरच मिरचीतील सायट्रिक अॅसिड रक्त पातळ करण्याचे काम करते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित राहते.

त्वचेसाठी फायदेशीर : हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे ते त्वचेला अधिक कोलेजन तयार करण्यास मदत करते. हिरवी मिरची त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यात मदत करते.

लोहाची कमतरता दूर करते : हिरव्या मिरचीमध्ये लोह भरपूर असते, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. ज्या लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता असते त्यांना थकवा जाणवतो. अशा लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश करावा.

डोळ्यांसाठी फायदेशीर : हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए सारखे पोषक घटक आढळतात, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. हे वृद्धत्वापासून संरक्षण करते आणि मोतीबिंदू सारख्या डोळ्यांच्या आजाराचा धोका कमी करते.

सांधेदुखीमध्ये फायदेशीर : हिरव्या मिरचीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. संधिवात आणि ऑस्टियोआर्थराइटिसच्या रुग्णांसाठी याचा वापर खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे हाडांची सूज आणि वेदना कमी होतात.

रक्ताभिसरण सुधारते : हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे संयुग आढळते ज्यामुळे ती तिखट लागते. मिरची खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि नसांमध्ये रक्तप्रवाह जलद होतो. हिरव्या मिरच्यांचे नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण संतुलित राहते.

पचन सुधारते : हिरवी मिरची अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, हिरव्या मिरचीमध्ये आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Congress : काँग्रेसला मोठा धक्का! आणखीन एक बडा नेता महायुतीच्या वाटेवर, 20 हजार कार्यकर्त्यांसह होणार पक्षप्रवेश

Kabutarkhana Hearing : कबुतरखान्यासंदर्भात हायकोर्टाचा निकाल स्पष्ट; रस्त्यावर पक्ष्यांना अन्नपाणी देण्यास बंदी कायम

Pune Dahi Handi 2025 : पुनीत बालन ग्रुपची संयुक्त दहीहंडी यंदा डिजे मुक्त; पारंपरिक ठेक्यांवर रंगणार उत्सव

Kaun Banega Crorepati Independence day 2025 : "नया भारत नये सोच के साथ" स्वातंत्र्यदिनी बिग बींच्या KBC मंचावर भारताच्या रणरागिणींची हजेरी; 'ऑपरेशन सिंदूर'वर रंगणार विशेष चर्चा