आरोग्य मंत्रा

ज्वारीची भाकरी खाण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या...

महाराष्ट्रात चपातीसह भाकरीचेही सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. रोजच्या जेवणासाठी चपाती आणि नॉनव्हेज असल्यास भाकरीचा बेत केला जातो.

Published by : Team Lokshahi

कॉर्न फ्लेक्स, ओट्स यांच्यामुळे आहारातील ज्वारीचे प्रमाण फारच कमी झाले आहे. आधुनिक काळात डायट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश नसतो. त्यातल्या त्यात शहरी भागात तर ज्वारीची मागणीपण कमी झाली आहे, मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असतात.

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. ती उर्जा दिवसभर कामी येते म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी ज्वारीला प्राधान्य देतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात. पोळी, तंदूर रोटी, नान यांच्यामुळे मराठमोळ्या ज्वारीच्या भाकरीचं आहारात पाहुण्याचं स्थान निर्माण झालंय. आहारात ज्वारीची भाकरी नसल्यामुळे ज्वारीतून मिळणाऱ्या पोषक तत्वाचा शरीरात अभाव जाणवतो.

ज्वारीच्या सेवनाने होणारे फायदे

सध्या ब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधित आजारांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे सेवन गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

वाढत्या प्रदुषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या भऱपूर प्रमाणात वाढल्या आहेत. या संदर्भातील समस्यांमुळे जेवणात ज्वारीचं सेवन खुप महत्वाचं ठरते.

ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

ज्वारीत भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. अॅनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.

सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gunratan Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या “मटण हंडी” विनोदावर सदावर्तेंचा टोला; “हीच ठाकरे यांच्या विचारांची हंडी”

Independence day 2025 : स्वातंत्र्यदिन साजरा करताना तिरंग्याचा सन्मान राखा; ध्वज फडकवताना 'हे' नियम पाळा

Viral Video Raj Thackeray : दहीहंडी निमंत्रणावर राज ठाकरेंचं मिश्किल टिप्पणी “मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो”

'या' नेत्याच्या घरी मटण पार्टीचे आयोजन; थेट फडणवीसांना आमंत्रण, नेमकं प्रकरण काय?