लाईफ स्टाइल

एसी खरेदी करताना 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या झळांपासून घरात थंडावा मिळवायचा असेल तर एसी हा पर्याय सगळ्यात उत्तम.

Published by : Team Lokshahi

उन्हाळ्याच्या झळांपासून घरात थंडावा मिळवायचा असेल तर एसी हा पर्याय सगळ्यात उत्तम. पण मार्केटमध्ये विविध प्रकारचे एसी उपलब्ध असल्यामुळे नेमकं कोणता एसी खरेदी करावा, याचा संभ्रम होतो. तुम्हीही नवीन एसी घेण्याचा विचार करत असाल, तर खाली दिलेल्या महत्त्वाच्या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

1. इन्व्हर्टर एसी म्हणजे स्मार्ट निवड

एसी दोन प्रकारचे असतात – नॉन-इन्व्हर्टर आणि इन्व्हर्टर. नॉन-इन्व्हर्टर एसी पूर्ण क्षमतेने चालतात आणि अधिक वीज घेतात. इन्व्हर्टर एसी मात्र गरजेनुसार शक्ती वाढवतात आणि कमी करतात. त्यामुळे सतत एकसमान कूलिंग मिळते आणि वीजबचत होते.

2. एसीची क्षमता "टन"मध्ये मोजली जाते. योग्य टन निवडल्यास एसी अधिक कार्यक्षम ठरतो.

1 टन: 100 ते 125 स्क्वे. फूट

1.5 टन: 150 ते 200 स्क्वे. फूट

2 टन: 200 स्क्वे. फूटच्या पुढे

3. वापराच्या वेळेनुसार स्टार रेटिंग निवडा

वीजबचत महत्त्वाची असेल तर स्टार रेटिंगकडे नक्की लक्ष द्या.

6 ते 8 तास वापर: 3 स्टार एसी पुरेसा

8 ते 16 तास वापर: 5 स्टार एसी योग्य

पाच स्टार एसी थोडा महाग असला तरी दीर्घकाळात वीजबचतीमुळे तुमचं बिल कमी करतं.

4. स्मार्ट फीचर्सचा विचार करा

मोबाइल अँपद्वारे नियंत्रण

रिमोटने ऑन-ऑफ

प्रत्येक तासाला तापमान सेटिंग

स्मार्ट होम इंटिग्रेशन

5. कूलिंग गॅस आणि स्मार्ट प्लगबद्दल माहिती

एसीमध्ये वापरला जाणारा गॅस महत्त्वाचा आहे. R32 गॅस अधिक पर्यावरणपूरक मानला जातो.

जुन्या एसीला स्मार्ट बनवायचंय? स्मार्ट प्लग वापरा. यामुळे एसी मोबाईलवरून कंट्रोल करता येतो आणि वीज वापराचाही डेटा पाहता येतो.

सामान्य एसी आणि स्मार्ट एसी यांच्यातील फरक समजून घेऊन, तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना पदोन्नती किंवा आर्थिक लाभ होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम