लाईफ स्टाइल

Gym Workout : जीमला जात असल्यास 'या' साध्या चुका टाळा

जीममध्ये कोणत्या चुका केल्याने शारीरिक दुखापत होते? याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

Published by : Shamal Sawant

फिटनेसच्या बाबतीत आज प्रत्येक जण सजग झालेला बघायला मिळतो. अनेक जण योगा करतात तर काही जण जीमला जाण्याला प्राधान्य देतात. मात्र जीममधून व्यायाम करून आल्यानंतर अनेकदा शरीर मोडून आल्यासारखे वाटते. तसेच दुखणं हे असह्यदेखील असते. पण यामागे नेमके काय कारण आहे? याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का?

जीम सुरू केल्यानंतर त्याबद्दल कोणतीही माहिती न घेता जोशामध्ये व्यायाम करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे अनेकदा शारीरिक दुखापत होते.आता जीममध्ये कोणत्या चुका केल्याने शारीरिक दुखापत होते? याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

वॉर्मअप टाळणे :

जीममध्ये व्यायाम करण्यासाठी शरीराचे तापमान वाढवणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही जीममध्ये गेल्यानंतर हलका व्यायाम, स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरेल. मात्र जर तुम्ही हे न करता व्यायाम करण्यास सुरुवात केली तर मसल्सवर अचानक दबाव येतो. त्यामुळे सूज येणे, दुखणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे कोणतेही हेवी वर्कआऊट करणार असाल त्याआधी 5 ते 10 मिनिटे वॉर्मअप नक्की करावा.

व्यायामानंतर पाणी न पिणे :

घामासोबतच शरीरातून मिनरल्स आणि पाणी देखील बाहेर पडते. जर तुम्ही कसरत केल्यानंतर पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट्स घेतले नाहीत तर डिहायड्रेशनमुळे स्नायू घट्ट होऊ शकतात आणि वेदना होऊ शकतात. व्यायामानंतर, एक किंवा दोन ग्लास पाणी प्या. तसेच तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही नारळ पाणी देखील घेऊ शकता.

प्रथिनांची कमतरता पूर्ण न करणे :

व्यायामानंतर स्नायूच्या आरोग्यासाठी प्रथिने Protien आणि कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात. जर तुम्ही रिकाम्या पोटी राहिलात किंवा फक्त पाणी प्यायलात तर शरीराला पुन्हा निर्माण करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही. यासाठी, व्यायाम केल्यानंतर 3 0मिनिटांच्या आत प्रथिनेयुक्त काहीतरी खा. केळी आणि शेंगदाणा बटर, अंडी, मूग डाळ चिल्ला किंवा प्रोटीन शेक हे चांगले मानले जातात.

अपुरी झोप :

रात्रीची अपूर्ण झोप स्नायूंवर परिणाम करते. तुम्ही झोपता तेव्हाच तुमचे स्नायू दुरुस्त होतात. रात्री कमीत कमी 7-8 तास झोपण्याचा प्रयत्न करा. कारण पुरेशी झोपच शरीराला बरे होण्याची संधी देईल.

शरीराला सामान्य स्थितीत आणणे :

व्यायाम पूर्ण केल्यानंतरही, तुमचे शरीर हळूहळू सामान्य स्थितीत आणणे महत्वाचे आहे. जर तुम्ही उठून थेट घरी गेलात तर रक्ताभिसरण थांबते आणि स्नायू कडक होतात. नेहमी हलके स्ट्रेचिंग करा किंवा 5 मिनिटे चालत जा, ज्यामुळे वेदना कमी होऊ शकतात.

रोज हेवी वर्कआऊट करणे :

फिटनेस तज्ज्ञांच्या मते, दररोज जिममध्ये जाऊन जड व्यायाम करण्याची गरज नाही. काही लोक दररोज जड प्रशिक्षण घेतात, ज्यामुळे स्नायूंना बरे होण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा लोकांनी आठवड्यातून किमान १-२ दिवस विश्रांती घेतली पाहिजे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur : चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या; दोन महिलांचा मृत्यू तर एका महिलेचा शोध सुरू

Uddhav Thackeray : "'ही' आमच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत

Uddhav Thackeray On Thackeray Brand : उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात: 'ठाकरे' म्हणजे महाराष्ट्राची ओळख

मिरचीची भजी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या