Sonakshi Sinha Team Lokshahi
लाईफ स्टाइल

Sonakshi Sinha Beauty Secret: सोनाक्षी सिन्हा सौंदर्यासाठी हा घरगुती उपाय करते फॉलो

तुम्ही हे टीप्स वापरुन आपल्या त्वचेचे आणि केसांचे निगा राखू शकता.

Published by : shweta walge

प्रत्येकाला अभिनेत्रींसारखी त्वचा हवी असते, त्यामुळे त्यांना त्यांच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घ्यायचे असते. आज आम्ही तुमच्यासाठी सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) सुंदर त्वचेचे आणि केसांचे रहस्य घेऊन आलो आहोत. तुम्ही हे टीप्स वापरुन आपल्या त्वचेची आणि केसांची निगा राखू शकता.

सुंदर त्वचेचे रहस्य -

सुंदर त्वचेसाठी सोनाक्षी भरपूर पाणी पिते. त्वचेसाठी हायड्रेशन (Hydration) खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत सोनाक्षी भरपूर पाणी पिते जेणेकरून तिच्या शरीरातील टॉक्सिन (Toxins) बाहेर काढता येईल. सोनाक्षी रात्री झोपण्यापूर्वी तिच्या त्वचेला चांगले मॉइश्चरायझ (Moisturize) करते.

केसांची निगा राखण्याचे रहस्य-

केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी केसांना तेल (Oil ) लावणे आवश्यक आहे. असे केल्याने केसांची वाढ चांगली होते. सोनाक्षी खोबरेल तेलात (Coconut oil) एरंडेल तेल (Castor oil) मिसळते आणि केसांना लावते. जर तुम्ही खूप उष्णता (Heat) आणि रासायनिक उत्पादने (Chemical products) वापरत असाल तर तुम्ही ते देखील टाळावे.

झोपण्यापूर्वी मेकअप काढा-

झोपण्यापूर्वी मेकअप (Makeup) काढणे फार महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही मेकअप न काढता रात्री झोपायला जात असाल तर हे करू नका. सोनाक्षीच्या स्वच्छ त्वचेचे रहस्य म्हणजे ती झोपण्यापूर्वी मेकअप काढते.

आईचा हा घरगुती उपाय फॉलो करते-

सुंदर त्वचेसाठी सोनाक्षी अंघोळीनंतर त्वचेवर कोरफड (Aloe vera) लावते. यासोबतच ती केसांसाठी दही (Yogurt) आणि अंड्याचा पांढरा भाग वापरते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

BEST Bus On Special Report : बेस्ट चांगल्या दिवसांच्या वाटेवर, बेस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ

Latest Marathi News Update live : नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : विधानभवनातील गोंधळावर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया; "गुंडांना पास कोणी दिले, याचा शोध घ्या....!

shravan 2025 : महाराष्ट्रात 25 जुलैपासून शुभारंभ, चार श्रावणी सोमवारांसह सणांचा महापर्व, जाणून घ्या...