लाईफ स्टाइल

Classy Outfit : ऑफिस आणि डेटसाठी क्लासी लूक हवाय? मग 'हे' Color Combination नक्की ट्राय करा

आकर्षक आणि क्लासी लूकसाठी जाणून घ्या हे कलर कॉम्बीनेशन आयडिया...

Published by : Team Lokshahi

आजच्या फॅशनच्या युगात प्रत्येकाला आपला लूक आकर्षक, क्लासी आणि आधुनिक दाखवायचा असतो. यासाठी बरेच जण महागडे ब्रँडेड कपडे, डिझायनर आउटफिट्स किंवा विविध फॅशनेबल अ‍ॅक्सेसरीजवर भरपूर खर्च करतात. मात्र, स्टायलिश दिसण्यासाठी नेहमीच मोठा खर्च करावा लागतो, असे नाही. खरंतर, योग्य रंगसंगतीची निवड केली, तर अगदी साधे कपडेही तुमचा लूक रॉयल आणि एलिगंट बनवू शकतात. तुमची ऑफिसची महत्त्वाची मीटिंग असो, डेटनाईट असो किंवा एखादा खास प्रसंग योग्य कलर कॉम्बिनेशन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवते. चला तर मग जाणून घ्या अशाच काही खास रंगसंगती, ज्या आजच्या ट्रेंडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रभावी ठरल्या आहेत.

नेव्ही ब्लू आणि व्हाईट परिपूर्ण प्रोफेशनल आणि एलिगंट लूक

नेव्ही ब्लू आणि व्हाईट हे एक अतिशय क्लासी व सुरक्षित कॉम्बिनेशन आहे. ऑफिस मीटिंग असो वा डेट नाईट, नेव्ही ब्लू ब्लेझरसोबत पांढरा शर्ट किंवा ड्रेस नेहमीच इम्प्रेस करतो. हा कॉम्बिनेशन फारसा अॅक्सेसरीजशिवायही प्रेझेन्स निर्माण करतो.

बेज आणि ब्राउन, न्यूट्रल टोनमध्ये रिचनेसचा स्पर्श

आजच्या न्यूट्रल ट्रेंडमध्ये बेज आणि ब्राउन हे सर्वोत्तम कॉम्बिनेशन मानले जाते. बेज ट्राउझर्ससोबत हलकासा ब्राउन शर्ट किंवा टॉप तुमच्या लूकमध्ये कमालीचा सौंदर्यपूर्ण परिपक्वतेचा टच देतो. हा लूक प्रत्येक हंगामात आणि प्रसंगात उठून दिसतो.

ब्लॅक आणि ग्रे, मिस्ट्री आणि क्लासचा संगम

काळा आणि ग्रे हे नेहमीच काळाच्या पुढे असलेले कलर कॉम्बिनेशन आहे. ब्लॅक शर्टसोबत ग्रे पँट किंवा टॉप हा लूक खूपच डॅशिंग आणि सॉफिस्टिकेटेड वाटतो. अॅक्सेसरीज कमी ठेवूनही हा लूक आपली छाप सोडतो.

ऑलिव्ह ग्रीन आणि व्हाईट, रिफ्रेशिंग आणि ट्रेंडी

ऑलिव्ह ग्रीन आणि व्हाईट हे सध्याच्या कॅज्युअल लूकसाठी सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे. व्हाईट टॉपसह ऑलिव्ह ग्रीन पँट किंवा स्कट घालून तुम्ही वीकेंड ब्रंच, कॅज्युअल डेट किंवा आउटिंगला एक स्टायलिश इम्प्रेशन निर्माण करू शकता.

व्हाईट आणि गोल्डन, रॉयल आणि ग्लॅमरस टच

पांढऱ्या रंगासोबत सोनेरी टच दिला, तर तुमचा लूक थेट शाही वाटतो. पांढऱ्या पोशाखासोबत गोल्डन अॅक्सेसरीज, पादत्राणे किंवा छोटासा हायलाईट दिला तरी तुम्ही गर्दीत उठून दिसाल. हा लूक पार्टी, समारंभ किंवा खास संध्याकाळीसाठी परिपूर्ण आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut In Rajya Sabha : 'पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा'; पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा मोदींवर जोरदार हल्ला

Donald Trump : भारताला धक्का! डोनाल्ड ट्रम्पनं 1 ऑगस्टपासून भारतावर 25 टक्के कर आणि दंडाची केली घोषणा

Tsunami And Earthquake Alert : रशियात भूकंपानंतर 'या' 12 देशांवर त्सुनामीचे संकट! भारताबाबत मोठी माहिती समोर; सविस्तर वाचा

NISAR Mission : आता भूकंप आणि त्सुनामीचा इशारा आधीच मिळणार! 'निसार' उपग्रहामुळे हेही शक्य; कसं ते जाणून घ्या