NISAR Mission : आता भूकंप आणि त्सुनामीचा इशारा आधीच मिळणार! 'निसार' उपग्रहामुळे हेही शक्य; कसं ते जाणून घ्या
आज 30 जुलै 2025 रोजी नासा आणि इस्रोच्या संयुक्त प्रकल्पातील निसार (नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार) उपग्रहाचे प्रक्षेपण, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी 5:40 वाजता यशस्वीरित्या झाले. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगासाठी ही एक ऐतिहासिक गोष्ट ठरली आहे.
प्रक्षेपणानंतर सुरुवातीचे 90 दिवस हे ‘कमिशनिंग फेज’ म्हणून ओळखले जातील, ज्यामध्ये उपग्रहाची यंत्रणा कार्यक्षम आहे की नाही याची चाचणी होईल. त्यानंतर शास्त्रीय अभ्यासासाठी तो पूर्णपणे कार्यरत होईल. ही मोहीम भारत आणि अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थांमधील सहकार्याचा उत्तम नमुना आहे.
भारताच्या इस्रो आणि अमेरिकेच्या नासाने संयुक्तपणे विकसित केलेला सिंथेटिक अपर्चर रडार हा एक विशेष उपग्रह आहे. याचे उद्देश हे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बारकाईने निरीक्षण करणे आहे. हा उपग्रह प्रगत स्वीपएसएआर तंत्रज्ञानाचा वापर करतो, जो उच्च रिझोल्यूशनसह विस्तृत क्षेत्राचे फोटो घेण्यास सक्षम आहे.
हा उपग्रह जंगलातील बदल, बर्फाचे थर तुटणे, समुद्राच्या पातळीत वाढ, भूजलाची घट आणि नैसर्गिक आपत्ती यासारख्या परिस्थितींवर लक्ष ठेवेल. यामुळे हा उपग्रह पृथ्वीच्या जमिनीचे आणि बर्फाचे 3डी चित्र प्रदान करेल, जे भूकंप, भूस्खलन, समुद्रातील बर्फ आणि हिमनद्या, पीक
व्यवस्थापन आणि आपत्ती इशारा प्रणालींचे निरीक्षण करण्यात शास्त्रज्ञांना खूप मदत करेल. यामुळे भूकंप आणि त्सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती येण्यापुर्वीच त्याची चाहूल समजणे सोपे जाऊ शकते. यामुळे अशा आपत्तीवर निराकरण करण्यास मदत होईल, ज्यामुळे कोणतीही जीवत अथवा वित्तहाणी होण्यापासून देखील रोखले जाऊ शकते.