राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावजवळील कानसवाडा गावच्या माजी उपसरपंचाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवराज कोळी हे शिवसेनेचे माजी उपसरपंच असल्याची माहिती मिळत आहे.
गावातील तिघांनी आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण असून हत्येचं नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोधासाठी पथक रवाना केले आहे.