Crime

दागिने पॉलिश करणारे दोघे गजाआड

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप, सातारा | साताऱ्यात दागिने पॉलिश करण्याचे साहित्य घेऊन संशयितरीत्या फिरणार्या दोघा आरोपींना अटक करण्यात बोरगाव पोलिसांना यश आले आहे. सचिनकुमार साहा आणि रंजित साहा अशी आरोपींची नावे असून ते मुळचे बिहारचे रहिवासी आहेत.

बोरगाव पोलिस २८ सप्टेंबर रात्री १० वाजता पेट्रोलिंग करत असताना एसटी स्टँड जवळ ८ संशयित व्यक्ती फिरत असता आढळून आले.पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता,त्या व्यक्तींना स्वत;ची ओळख सांगता आली नाही.पोलिसांना समाधानकारक असे उत्तर मिळाले नाही म्हणून पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली आणि तपास करताच पोलिसांना त्यांच्या बॅगमध्ये दागिने पॉलिश करण्याचे साहित्य सापडले.

दरम्यान काही दिवसापूर्वी बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उंब्रज,कोयनानगर पोलीस ठाण्यात दागिने पॉलिश करून देतो ह्या बहाण्याने फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.त्याच संशयी आधारावर पोलिसांनी तपास केला असता या दोन्ही आरोपींची चौकशी केली असता संशय बळावला. आणि पोलीसांनी मुळचे बिहारचे राहणारे सचिनकुमार साहा आणि रंजित साहा या दोघांनी गुन्हे निष्पन्न झाले असून त्यांची दुचाकी देखील जप्त करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक डॉ.सागर वाघ यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर