धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील उलवे मध्ये रहाणारा सचिन मोरे अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याने घटस्फोटाची मागणी मान्य न केल्याने पत्नीने आपल्या 16 वर्षीय मुलगा आणि त्याचा मित्र आणि रिक्षा चालकाच्या मदतीने पतीचा कायमचा काटा काढला.
कारल्याच्या ज्यूस मध्ये जास्त प्रमाणात नशेच्या गोळ्या देऊन नंतर उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने रस्त्यातच ओढणीने गळा आवळून ठार करून उलवे खाडीत मृतदेह फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात पती मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांना खाडी किनारी मिळालेल्या मृतदेहाचा फोटो दाखवताच पत्नीने आपलाच पती असल्याचे सांगितले. शेवटी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संशय बळावला आणि पत्नी पोलिसांच्या जाळ्यात आली. शेवटी आपणच मुलगा आणि मुलाचा मित्र आणि रिक्षावाल्याच्या मदतीने ठार केल्याचे कबूल केले. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.