मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून तीन दिवस पुन्हा ब्लॉक असणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर डोंगरगाव कुसगाव येथे पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी आजपासून तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकामांवर मत्स्य व बंदर विभागामार्फत मोठी कारवाई करण्यात आली असून मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर धडक कारवाई केली आहे.
भाजपच्या संघटन मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक असून थोड्याच वेळात भाजप प्रदेश मुख्यालयात बैठक सुरु होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कुंभमेळ्यात दाखल झाले असून कुंभमेळ्यात ते स्नान करणार आहेत.