लोकशाही स्पेशल

Birthday Special : रतन टाटांचं 'हे' अनमोल विचार देतील जीवनाला दिशा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Ratan Tata Birthday : रतन टाटा हे उद्योग आणि व्यवसाय जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता आणि ते त्यांचा 86 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. रतन टाटा हे एक यशस्वी उद्योगपती असण्यासोबतच चांगल्या मनाचे व्यक्ती देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या कामासोबतच लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वानेही प्रभावित झाले आहेत. रतन टाटा यांचे आदर्श, विचार आणि तत्त्वे नवीन आणि तरुण पिढीला जीवनाची दिशा देतात. तसेच, त्यांचे विचार यश मिळविण्यासाठी मनोबल वाढवण्यास मदत करतात. जाणून घ्या रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार...

रतन टाटा यांचे अनमोल विचार

- कॉलेज संपल्यावर ५ आकडी पगाराची अपेक्षा करू नका, कोणीही रातोरात राष्ट्रपती होत नाही. त्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात.

- आयुष्यात पुढे जाण्यासाठी चढ-उतार खूप महत्वाचे असतात. कारण ईसीजीमध्ये सरळ रेषा म्हणजे आपण जिवंत नाही.

- चूक फक्त तुमची आहे, तुमचे अपयश फक्त तुमचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नका. तुमच्या चुकीपासून शिका आणि आयुष्यात पुढे जा.

- तुमच्या मित्रांना कधीही चिडवू नका जे चांगले अभ्यास करतात आणि मेहनत करतात. एक वेळ अशी येईल की तुम्हालाही त्याच्या हाताखाली काम करावे लागेल.

- आपण माणसं आहोत, कॉम्प्युटर नाही, त्यामुळे आयुष्याचा आनंद घ्या, नेहमी गंभीर करू नका.

- योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि मग ते योग्य सिद्ध करतो.

- अशा अनेक गोष्टी आहेत ज्या, जर मला पुन्हा जगण्याची संधी मिळाली तर मी कदाचित वेगळ्या पद्धतीने करू शकेन. पण मला मागे वळून बघायला आवडणार नाही की मी काय करू शकलो नाही.

- जलद जायचं असेल तर एकटंच जा. पण दुर जायचं असेल तर एकत्र चाला.

- लोक तुमच्यावर दगडफेक करत असतील तर त्या दगडांचा वापर तुमचा महाल बांधण्यासाठी करा.

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस